गांडूळखतासाठी शेड कसे करायचे। फक्त 3000 मध्ये शेड तयार। गांडूळखत निर्मिती। low cost shed

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • गांडूळखतासाठी शेड कसे करायचे । 3000 मध्ये शेड तयार। गांडूळखत निर्मिती।
    गांडूळखतासाठी शेड कसे करायचे याची माहिती आपण ह्या व्हिडिओ मधून घेणार आहोत.
    गांडूळखत निर्मितिसाठी सावली खूप महत्त्वाची आहे त्यासाठी आपल्याला बेड वर सावली तयार करावी लागते, म्हणून आपण कमी खर्चात शेड कसा उभा करायचं ते पाहणार आहे, हे शेड आपण अंदाजे 3000 मध्ये तयार केले आहे, ह्यासाठी लागणारे सगळे साहीत्य बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे,
    लागणारे साहित्य
    १) बांबू- ४/५
    २) काट्या- 7/8
    ३) तार (binding wire)
    ४) शेड नेट
    ५) वाळू, सिमेंट, खडी
    हे साहित्य वापरून आपण शेड तयार करू शकतो..
    ----------------------------------------------------------------------------
    गांडूळ खताचे फायदे
    १) जमिनीचा सामू उदासीन करण्यास मदत होते.
    २) गांडूळ खतवापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो.
    ३) जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.
    ४) उत्पादन क्षमता व जमिनीची सच्छिद्रता वाढते.
    ५) जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.
    ६) जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते, त्यामुळे जैविक क्रिया वाढते.
    ७) गांडूळ खतामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढते.
    ८) पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.
    ९) रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.
    १०) पिकाचे उत्पादन वाढते.
    gandul khat project in marathi
    gandul khat project in marathi at home
    gandul khat bed kasa karaycha
    gandul khat tayar karnyachi padhat
    gandul khat business
    gandul khat nirmiti
    gandul khat prakalp
    Rajvardhan pawar
    #vermicompost #yuvashetkariudyojak #rajvardhanpawar

Комментарии • 40