सुरवातीला वाटले की बारक्या शब्दाला 10 मिनिटांचा व्हिडिओ कशाला बनवला... मात्र जेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर त्यावेळेस माझं हे विचार करणे किती निरर्थक आहे हे लक्षात आलं. व्हिडिओ अतिशय छान आहे. खूप छान माहिती मिळाली. आनंद वाटला. ज्ञानात भर पडली. माझ्या कुटुंबीयांना तसेच इतरांना देखील मी आपल्या व्हिडिओ बद्दल आणि आपण दिलेल्या माहितीबद्दल सांगितले खूप खूप धन्यवाद अशाच व्हिडिओ चे स्वागत आहे..❤
खूप उपयुक्त माहिती दिलीत. मी स्वतः संस्कृतचा अभ्यासक आहे, 20 वर्षे मुंबई विद्यापीठात प्राध्यापकी सुद्धा केली आहे. त्या अनुभवांती सांगू इच्छितो की, शुद्ध मराठी लुप्त होत चालली आहे, आणि शालेय शिक्षक सुद्धा चुकीचे शब्दप्रयोग आणि शब्दोच्चार करतात हे सर्रास दिसून येते, ही अत्यंत खेदाची बाब आहे. यांच्या दृष्टीने रस्त्यावर मित्र ही 'भेटतो' आणि दुकानांत वही-पेन सुद्धा 'भेटते'.🤨 पुढील पिढी घडवणे हे आपल्यासारख्या शिक्षकांचे आणि पालकांचे काम आहे. जाता जाता, कदाचित सवयीने असेल, पण आपले उच्चार सुद्धा 'न' च्या जागी 'ण' होतात, उदाहरणार्थ, अनुस्वार च्या जागी अणुस्वार, अनुनासिक च्या जागी अणुनासिक, 'कोणते' च्या जागी 'कोनते';. असे अनेक शब्द दाखवून देता येतील. त्यावर आपण थोडे काम करावे अशी आपल्याला प्रामाणिक शिक्षकी सूचना!
अगदी बरोब्बर!!! आपली मातृभाषा शुध्द बोलता यायलाच हवी, विशेषतः मराठी भाषेच्या शिक्षकांना तरी मराठी यायलाच हवी. सरांनी दिलेली माहिती आणि सांगण्याची पद्धत उत्तम आहे, पण ण आणि न हे उच्चार सदोष आहेत, ते सुधारण आवश्यक आहे
होय ! व्हिडिओचा उद्देश अत्युत्तम . हस्ताक्षर भगवंताचे देणे म्हणावे इतके सुरेख सौंदर्यपूर्ण ! निवेदनात सरांनी थोडे अधिक अभ्यासपूर्ण उच्चारण केले तर या प्रकारचे व्हिडीओ हे श्रीशारदा , सरस्वती यांच्यानंतर सुधीर फडके , लता - आशा यांच्यासारखे मायमराठीच्या चाहते आणि अभ्यासकांसाठी पथदर्शक ठरतील . मराठी या शब्दाचा उच्चारही थोडासा मराटी असा ऐकू येतो आहे - यात औद्ध्यत्व नाही : विनम्रतेने सांगू इच्छिते !
नाही आवडला व्हीडिओ. हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. पण उच्चार नाही आवडले. ज्या *ञ* बद्दल हा व्हीडिओ आहे त्या ञ चाच उच्चार चुकीचा आहे. अन् संस्कृतमध्ये दोन शब्दही चुकीचे आहेत. खूप खंत वाटली हा व्हीडिओ बघून.
खूप धन्यवाद! संस्कृत मधील श्लोक, स्तौत्र वगैरे शिकतांना शुद्ध उच्चारात हा भाग आला होता विशेषतः संथा घेऊन शिकतांना... पण मराठीत इतकं सुंदर विस्ताराने अनुस्वाराबद्दलचे सखोल ज्ञान पहिल्यांदाच! खरंच धन्यवाद सर!
बरेच लोक या शब्दाला मोबाइलच्या टायपिंग मध्ये ' त्र ' च्या ठिकाणी वापरतात..... पण माझ्याकडे वीवो कंपनीचा एक मोबाईल फोन होता त्या मोबाइलच्या कीबोर्ड मध्ये ' ज्ञ ' हा शब्द नव्हता मग मी खूप म्हणजे खूपच प्रयत्न केला व ज या अक्षराला ् अर्ध करुन ' ञ ' हा शब्द जोडला तर त्यात लगेचच ' ज्ञ ' हा शब्द आला ..... आणि मला खूप छान वाटले की, मी स्वतः माझ्या प्रयत्नांनी एक शोध लावला.... आणि आज तुम्ही देखील ' ञ ' या अक्षराची खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 👍🏿
आदरणीय अमीत सर, तुम्ही खरचं नावीन्यपूर्ण माहिती दिली आहात. नक्कीच ही माहिती उदबोधक आहे. मराठी व संस्कृत याची सांगड घालून अनुनासिकाचा वापर कसा होतो हे मला तर आजच समजले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या हस्ताक्षराला सलाम सरजी. ञ चा व्हिडिओ पाहून बरेच शिकायला मिळाले. खूप खूप छान
माझ्या चार वर्षाच्या मुलाला आजच मी क ते ज्ञ मुळाक्षर शिकवताना या दोन अक्षरांचा उच्चार काय?हे सांगू शकले नाही. याची मला आतून कुठेतरी खंत वाटत होती की या दोन उच्चारांचा अर्थ आम्हाला कुठल्याच शिक्षकांनी सांगितलं नसल्यामुळे मी माझ्या मुलाला सांगू शकत नव्हते. तेव्हाच मनात विचार आला होता युट्युब वर याची माहिती मिळाली तर बरं होईल आणि योगायोगाने तो व्हिडिओ दोनच तासांमध्ये मला मिळाला. 🥰 खूप छान पद्धतीने सरांनी समजून सांगितलं. व आजपर्यंत याबद्दल नसलेली माहिती मिळाली. खूप खूप मनापासून धन्यवाद सर 🙏
गुरूजी सलाम तुम्हाला. शिक्षक पेक्षा चा सन्मान वाढवला सर्व शिक्षकांनी आपल्या कडून प्रेरणा घ्यावी. संशोधक पर शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाव विद्यार्थी दिव्य करतील शंकाच नाही. खाजगी शिकवणी चि गरज नाही.
खूप छान माहिती मिळाली माझं शिक्षण बी पी एड झालंय काही वर्षे क्रीडाशिक्षक म्हणून काम केले मी या शब्दांचा नीट उच्चाराने वापर मराठी भाषेच्या शिक्षकांना कित्येक वेळा विचारला मात्र उत्तर मिळालं नाही आज आपल्याकडे मराठी भाषेच्या आणि संस्कृत भाषेच्या ज्ञानात भर पडली धन्यवाद 🙏🙏
व्वा सर .... खरोखरंच अतिशय उपयुक्त माहिती... आणि खूप अभिमान वाटला आपल्या पूर्वजांचा किती सखोल वर्णमाला केली आहे... अतिशय ज्ञानी लोक होते... पण आज आपण काय शिकत आहोत याची खंतही वाटते....
खूपच छान पद्धतशीर समजावून सांगितलं सर . शाळेतल्या शिक्षकांनी समजावून घ्यायला पाहिजे आणि मुलांना या पद्धतींनं शीकवायला पाहिजे . फारच गरज आहे याची. धन्यवाद सर😊😊
आदरणीय सर पाली भाषेत सुध्दा हा शब्द वापरला जातो . बुद्ध वंदने मध्ये आज सुध्दा सर्रास पणे म्हटले जाते. त्यांचा उच्चार बौद्ध साहित्यात य असा केला जाते. त्यांचे निराकरण करण्यात यावे ही विनंती..,
धन्यवाद सर , खूप च सुंदर हस्ताक्षर आहे तुमचे आणि समजावून सांगणे तर छानच . सगळे comments वाचताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बहुसंख्य प्रतिक्रिया या पन्नाशी आणि पुढील वयातील लोकांच्या आहेत . मी सुध्दा शिक्षिका म्हणून 32 वर्षे कार्यरत आहे पण कित्येक जण या बाबतीत अनभिज्ञ आहेत. प्रत्येकाने आपल्या माहिती तील प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ दाखवला पाहिजे .
@everyone वरील video मध्ये न आणि ण च्या उच्चारात साम्य वाटते. आहे. त्याबद्दल मी माफी मागतो. हा video एका online कार्यशाळेच्या निमित्ताने केला होता. तोच आता इथे you tube वर पोस्ट केला. त्यावेळी सर्दी मुळे माझे उच्चार योग्य होत नव्हते. तेच आता अनेकजण दाखवत आहेत. असो. चुकीच्या गोष्टी घेवू नकात, पण video चा मुख्य विषय आहे . त्याकडे लक्ष द्यावे. न आणि ण मधील उच्चारातील फरक लवकरच पोस्ट करेन. धन्यवाद
@@amitbhorkade नमस्कार, ट ठ ड ढ ण ही मूर्धन्य अक्षरे आहेत. जीभ किंचित मुडपून टाळूला मध्यभागी लावून ही कठोर अक्षरे उच्चारली जातात. न हे अक्षर दन्तव्य म्हणजे जीभेचा दाताला स्पर्श करून उच्चारले जाते.
न व ण ह्यावर विडिओ करा. लोकांना दोन्ही अक्षर माहीत आहेत पण ते न चुकता ण ला न, व न ला ण च म्हणतात. असंच बोलतात. तुम्ही सर्दी मुळे बोललात असं म्हणता, त्या मुळे पुढच्या विडिओ ची सर्व जण वाटत पहात आहोत.
व्वा खूपच छान समजावून सांगितले. हे माहित होते. पण आजकाल ञ हा स्वर सर्रास त्र साठी वापरला जातो.अगदी मराठी शाळांमध्ये पण असेच शिकवले जाते. आपण खूप छान शिकवले असे धडे मराठी शाळांमध्ये दिले पाहिजेत. धन्यवाद 🙏
माझी साठी जवळजवळ आहे आणि आता ह्या अक्षराच्या कोड्याच्या ओझातून मुक्त झालो. खरच अप्रतिम विडिओ डाऊनलोड झाला आहे. आपलं ऋण झाले आहे आज. त्यामुळे हा विडिओ माझ्या मित्रांना शेअर केला!
भोरकडे दादा ... तुमचं सगळं पटलं.... पण..... मराठी वर ओझं म्हणणे भंपकपणाचे वाटले... वांगमय ( मोबाईल टायपिंग नुसार) हा शब्द ओझे कसा असेल... मुळात मराठी ही भाषाच संस्कृत पासुन तयार झालेली आहे... भाषा समृद्धी साठी हे शब्द अतिशय उपयुक्त आहेत... बाकीचा कन्टेन्ट पटल्यामुळे अगदी सौम्य भाषा वापरलीआहे.... आपले अक्षर उत्तम..❤❤
कमाल आहे, आज 60 व्या वर्षी हे ज्ञान मिळाले ते पण मराठी शाळेत शिकून सुद्धा। मला आठवत नाही त्यावेळी एवढं सविस्तर शिकविले की नाही। जरी शिकविले असले तरी आमचा वेळ त्यावेळी मागच्या बेंच वर बसून भंकस करण्यात गेला.
आपल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि खुप खूप आभार.... आपले हस्ताक्षर मोत्याहून आखीव रेखीव अन सुंदर विलोभनीय.... एक सेकंद सुद्धा video मधून बाहेर पडता आले नाही 👏🏻🙏🏻😊
व्हीडीओ खूप छान बनविला आहे. पण पंप ,आंबा ,पंत या शब्दाचे उच्चारण सांगताना आपण शेवटचे ( अन्त्य) अक्षरावर अनूस्वार उच्चारण अवलंबून असल्याचे सांगीतले आहे. त्याऐवजी अनुस्वारा नंतर येणारा वर्ण कोणता (कोणत्या गटातील) त्यावर अनुस्वार उच्चारण अबलंबून आहे असे सांगणे संयूक्तीक होईल, असे वाटते.
धन्यवाद, चांगली माहिती दिली आहे. खूपच मोठं काम करत आहात आपण. ञ त्याची बाराखडी वर क्लिप करावी. अ ते अ: नंतर येणारे चार स्वर आहेत. ऋ, ॠ, ऌ, ॡ ह्या स्वरांच्या बाबतीत पण क्लिप करावी, ही विनंती. आपण जर व्यंजन आणि स्वर वापरत नसू, तर सृष्टीतील त्यापासून निर्माण होणाऱ्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करत आहोत, हे लक्षात आणून देणं गरजेचे आहे
खूप छान माहिती आहे. पण आधीच माफी मागून एक विनंती करते की न च्या ऐवजी ण म्हणू नये व ण च्या ऐवजी न म्हणू नये. जसे की अणुस्वार न म्हणता अनुस्वार म्हणावे. अणुवाद न म्हणता अनुवाद म्हणावे. पानी व दुकाण असे न म्हणता पाणी व दुकान असे म्हणावे. तुम्ही उत्तम शिक्षक आहात असे दिसते, म्हणून तुम्हाला विनंती केली.
पन्नाशी उलटली माझी, तरीही शालेय अभ्यासक्रम, महविद्यालय मध्येही अशी सखोल माहीती नाही मिळाली. सदर व्हिडीओ मधून मिळाली...
आज पर्यंत कधीही ऐक ले न्ह वते. धन्यवाद सर 👌👌🙏
बरोबर आहे .शाळेत शिकवत नाहीत .मी एका सह्याद्री वाहिनीच्या शालेय कार्यकमात बघीतले होते .साधारण 25 वर्षा पूर्वी
Malahi
kharch. khup chan mahiti ahe.
विषयाची ओळख उच्चारानुसार वर्णाक्षरेबाबत द्यावी. जसे की कण्ठव्य, ओष्ठव्य इत्यादी
मग ही अनुनासिक अक्षरे कशी उच्चारावीत हे सहज उमगते.
खरोखर 99.99 शिक्षक ना च हे माहीत नव्हते परंतु आज खरी बाराखडी पूर्ण अर्थाने पूर्ण झाली फारफार आभारी आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
Yes
खरोखरच खरे उच्चार समजले.खूप छान.
सुरवातीला वाटले की बारक्या शब्दाला 10 मिनिटांचा व्हिडिओ कशाला बनवला...
मात्र जेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर त्यावेळेस माझं हे विचार करणे किती निरर्थक आहे हे लक्षात आलं. व्हिडिओ अतिशय छान आहे. खूप छान माहिती मिळाली. आनंद वाटला. ज्ञानात भर पडली. माझ्या कुटुंबीयांना तसेच इतरांना देखील मी आपल्या व्हिडिओ बद्दल आणि आपण दिलेल्या माहितीबद्दल सांगितले खूप खूप धन्यवाद अशाच व्हिडिओ चे स्वागत आहे..❤
धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
शब्द नाही हो!! अक्षर आहे ते 😂
खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे हा
मला ही वाटले होते 10 मिनिटाचा व्हिडिओ नक्कीच वेळकाढू पणा केला असेल पण खरंच खूप छान व्हिडिओ
खूप उपयुक्त माहिती दिलीत. मी स्वतः संस्कृतचा अभ्यासक आहे, 20 वर्षे मुंबई विद्यापीठात प्राध्यापकी सुद्धा केली आहे. त्या अनुभवांती सांगू इच्छितो की, शुद्ध मराठी लुप्त होत चालली आहे, आणि शालेय शिक्षक सुद्धा चुकीचे शब्दप्रयोग आणि शब्दोच्चार करतात हे सर्रास दिसून येते, ही अत्यंत खेदाची बाब आहे. यांच्या दृष्टीने रस्त्यावर मित्र ही 'भेटतो' आणि दुकानांत वही-पेन सुद्धा 'भेटते'.🤨
पुढील पिढी घडवणे हे आपल्यासारख्या शिक्षकांचे आणि पालकांचे काम आहे.
जाता जाता, कदाचित सवयीने असेल, पण आपले उच्चार सुद्धा 'न' च्या जागी 'ण' होतात, उदाहरणार्थ, अनुस्वार च्या जागी अणुस्वार, अनुनासिक च्या जागी अणुनासिक, 'कोणते' च्या जागी 'कोनते';. असे अनेक शब्द दाखवून देता येतील. त्यावर आपण थोडे काम करावे अशी आपल्याला प्रामाणिक शिक्षकी सूचना!
अगदी बरोब्बर!!!
आपली मातृभाषा शुध्द बोलता यायलाच हवी, विशेषतः मराठी भाषेच्या शिक्षकांना तरी मराठी यायलाच हवी.
सरांनी दिलेली माहिती आणि सांगण्याची पद्धत उत्तम आहे, पण ण आणि न हे उच्चार सदोष आहेत, ते सुधारण आवश्यक आहे
होय ! व्हिडिओचा उद्देश अत्युत्तम . हस्ताक्षर भगवंताचे देणे म्हणावे इतके सुरेख सौंदर्यपूर्ण !
निवेदनात सरांनी थोडे अधिक अभ्यासपूर्ण उच्चारण केले तर या प्रकारचे व्हिडीओ हे श्रीशारदा , सरस्वती यांच्यानंतर सुधीर फडके , लता - आशा यांच्यासारखे मायमराठीच्या चाहते आणि अभ्यासकांसाठी पथदर्शक ठरतील .
मराठी या शब्दाचा उच्चारही थोडासा मराटी असा ऐकू येतो आहे -
यात औद्ध्यत्व नाही : विनम्रतेने सांगू इच्छिते !
मराठी,( मराटी) उच्चार नको.इतर माहिती छान दिली आहे.
बरोबर.
नाही आवडला व्हीडिओ. हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. पण उच्चार नाही आवडले. ज्या *ञ* बद्दल हा व्हीडिओ आहे त्या ञ चाच उच्चार चुकीचा आहे. अन् संस्कृतमध्ये दोन शब्दही चुकीचे आहेत. खूप खंत वाटली हा व्हीडिओ बघून.
खूप धन्यवाद! संस्कृत मधील श्लोक, स्तौत्र वगैरे शिकतांना शुद्ध उच्चारात हा भाग आला होता विशेषतः संथा घेऊन शिकतांना... पण मराठीत इतकं सुंदर विस्ताराने अनुस्वाराबद्दलचे सखोल ज्ञान पहिल्यांदाच! खरंच धन्यवाद सर!
आज पहिल्यांदा खरी आणि योग्य माहिती मिळाली,धन्यवाद
मी अत्यंत आभारी आहे. माझे वय आज ७२ आहे. माझी लहानपणापासून च्या शंकेचे आज समाधान झाले. धन्यवाद.
आता सुखाने झोपा 😂
@@shrikantshitole1😂
@@shrikantshitole1😂
😂@@shrikantshitole1
आताच्या विद्यार्थ्या ना आणि त्यांच्या आई वडिलांसाठी अतिशय अतिशय गरजेचा, उपयुक्त, आवश्यक असा हा व्हिडीओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्य आहे गुरुजी तुमची 80 वर्षात मला कोणीही शिकवले नाही ते तुम्ही मला तीस मिनिटांत शिकवले धन्यवाद
सुंदर अक्षरात, सुंदर, सोप्या पध्दतीने आवश्यक
माहिती दिलीत;गुरूवर्य धन्यवाद
बरेच लोक या शब्दाला मोबाइलच्या टायपिंग मध्ये ' त्र ' च्या ठिकाणी वापरतात.....
पण माझ्याकडे वीवो कंपनीचा एक मोबाईल फोन होता त्या मोबाइलच्या कीबोर्ड मध्ये
' ज्ञ ' हा शब्द नव्हता मग मी खूप म्हणजे खूपच प्रयत्न केला व ज या अक्षराला ् अर्ध करुन ' ञ ' हा शब्द जोडला तर त्यात लगेचच
' ज्ञ ' हा शब्द आला ..... आणि मला खूप छान वाटले की, मी स्वतः माझ्या प्रयत्नांनी एक शोध लावला.... आणि आज तुम्ही देखील ' ञ ' या अक्षराची खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर 👍🏿
Va bhavgvan aahat tumhi.. Asech barach aahe prayatna kara
मला हे माहित होते पण आपण फारच छान समजावलेत... 👍🏻🙏
अनन्त, वसन्त, दङ्गा (दंगा), ऋञ्जी (रुञ्जी / रुंजी ) ,घडवञ्ची (घडवंची), टाङ्गा (टांगा), जाञ्घ (जांघ)
आदरणीय अमीत सर,
तुम्ही खरचं नावीन्यपूर्ण माहिती दिली आहात. नक्कीच ही माहिती उदबोधक आहे. मराठी व संस्कृत याची सांगड घालून अनुनासिकाचा वापर कसा होतो हे मला तर आजच समजले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या हस्ताक्षराला सलाम सरजी.
ञ चा व्हिडिओ पाहून बरेच शिकायला मिळाले.
खूप खूप छान
पांडुरंग पुर्वी कसं लिहायचं?
लिहायचे
माझ्या चार वर्षाच्या मुलाला आजच मी क ते ज्ञ मुळाक्षर शिकवताना या दोन अक्षरांचा उच्चार काय?हे सांगू शकले नाही. याची मला आतून कुठेतरी खंत वाटत होती की या दोन उच्चारांचा अर्थ आम्हाला कुठल्याच शिक्षकांनी सांगितलं नसल्यामुळे मी माझ्या मुलाला सांगू शकत नव्हते. तेव्हाच मनात विचार आला होता युट्युब वर याची माहिती मिळाली तर बरं होईल आणि योगायोगाने तो व्हिडिओ दोनच तासांमध्ये मला मिळाला. 🥰 खूप छान पद्धतीने सरांनी समजून सांगितलं. व आजपर्यंत याबद्दल नसलेली माहिती मिळाली. खूप खूप मनापासून धन्यवाद सर 🙏
गुरूजी सलाम तुम्हाला. शिक्षक पेक्षा चा सन्मान वाढवला सर्व शिक्षकांनी आपल्या कडून प्रेरणा घ्यावी. संशोधक पर शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाव विद्यार्थी दिव्य करतील शंकाच नाही. खाजगी शिकवणी चि गरज नाही.
खूप छान माहिती मिळाली
माझं शिक्षण बी पी एड झालंय काही वर्षे क्रीडाशिक्षक म्हणून काम केले
मी या शब्दांचा नीट उच्चाराने वापर मराठी भाषेच्या शिक्षकांना कित्येक वेळा विचारला मात्र उत्तर मिळालं नाही
आज आपल्याकडे मराठी भाषेच्या आणि संस्कृत भाषेच्या ज्ञानात भर पडली
धन्यवाद 🙏🙏
माझ्या 56वर्षाच्या आयुष्यात अशी माहिती कोनीही दिली नाही. ना शाळेत ना काॅलेज मधे.
खूप खूप धन्यवाद सर.❤
कोणीही....
माहिती दिल्याबद्दल आणि ह्या विषयावर व्हिडिओ बनवलात याबद्दल खुप खुप धन्यवाद
सुंदर खूपच अप्रतिम मराठी सोबत संस्कृत सुद्धा शिकायला मिळाली … खूप खूप धन्यवाद
एका अक्षरा साठी दहा मिनिटांचा व्हिडिओ त्यात 5 मिनिटे जाहिरात काय कमाल केली आहे ञ खूप महागात पडले बाबा
Yes
धन्यवाद सर महाराष्ट्राच्या शाळेला तुमची अत्यंत गरज आहे🙏🥰🙏
Kharch
कोणताही शिक्षक एवढे समजून सांगणार नाही तेवढे तुम्ही सांगितले आहे फार सुंदर सांगितले आहेत मला तुमचा अभिमान वाटतो
He 10 minutes khup anmol ahet mazya ayushyatle ata . Dhanyawaad sir 😊❤❤
व्वा सर .... खरोखरंच अतिशय उपयुक्त माहिती... आणि खूप अभिमान वाटला आपल्या पूर्वजांचा किती सखोल वर्णमाला केली आहे... अतिशय ज्ञानी लोक होते... पण आज आपण काय शिकत आहोत याची खंतही वाटते....
अन् = ञ
खूप सुंदर हस्ताक्षर आहे सर तुमचे.खूप उपयुक्त माहिती दिली सर तुम्ही, खूप खूप धन्यवाद!!
'त्र या अनुनासिकचा वापर पाली भाषेत सुद्धा आहे. सर ,आपण अत्यंत अनमोल आणि नवीन माहिती सांगितली ,धन्यवाद !
वयाच्या ५५ व्या वर्षी मराठी भाषेतील मुळाक्षरे समजली.... धन्यवाद.
मुळात मराठी शिकवायला अभ्यासु शिक्षक असणं आवश्यक आहे...
क्षण
खूपच छान पद्धतशीर समजावून सांगितलं सर . शाळेतल्या शिक्षकांनी समजावून घ्यायला पाहिजे आणि मुलांना या पद्धतींनं शीकवायला पाहिजे . फारच गरज आहे याची.
धन्यवाद सर😊😊
आदरणीय सर पाली भाषेत सुध्दा हा शब्द वापरला जातो . बुद्ध वंदने मध्ये आज सुध्दा सर्रास पणे म्हटले जाते. त्यांचा उच्चार बौद्ध साहित्यात य असा केला जाते. त्यांचे निराकरण करण्यात यावे ही विनंती..,
मराठी भाषा विषय शिक्षकांसाठी फार महत्त्वाचा विडियो..... खूप खूप धन्यवाद सर.... 🙏
धन्यवाद सर , खूप च सुंदर हस्ताक्षर आहे तुमचे आणि समजावून सांगणे तर छानच . सगळे comments वाचताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बहुसंख्य प्रतिक्रिया या पन्नाशी आणि पुढील वयातील लोकांच्या आहेत . मी सुध्दा शिक्षिका म्हणून 32 वर्षे कार्यरत आहे पण कित्येक जण या बाबतीत अनभिज्ञ आहेत. प्रत्येकाने आपल्या माहिती तील प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ दाखवला पाहिजे .
खूप सुंदर हस्ताक्षर आहे तुमचं
@everyone वरील video मध्ये न आणि ण च्या उच्चारात साम्य वाटते. आहे. त्याबद्दल मी माफी मागतो.
हा video एका online कार्यशाळेच्या निमित्ताने केला होता. तोच आता इथे you tube वर पोस्ट केला. त्यावेळी सर्दी मुळे माझे उच्चार योग्य होत नव्हते. तेच आता अनेकजण दाखवत आहेत. असो. चुकीच्या गोष्टी घेवू नकात, पण video चा मुख्य विषय आहे . त्याकडे लक्ष द्यावे.
न आणि ण मधील उच्चारातील फरक लवकरच पोस्ट करेन.
धन्यवाद
@@amitbhorkade
नमस्कार,
ट ठ ड ढ ण ही मूर्धन्य अक्षरे आहेत.
जीभ किंचित मुडपून टाळूला मध्यभागी लावून ही कठोर अक्षरे उच्चारली जातात.
न हे अक्षर दन्तव्य म्हणजे जीभेचा दाताला स्पर्श करून उच्चारले जाते.
न व ण ह्यावर विडिओ करा. लोकांना दोन्ही अक्षर माहीत आहेत पण ते न चुकता ण ला न, व न ला ण च म्हणतात. असंच बोलतात. तुम्ही सर्दी मुळे बोललात असं म्हणता, त्या मुळे पुढच्या विडिओ ची सर्व जण वाटत पहात आहोत.
माझं बी ए पर्यंत मराठी साहित्य होत पण ही उच्चरांची खरी अक्षर ओळख आज तुम्ही करून दिली धन्यवाद
अतिशय सुंदर स्पष्टीकरण मला पहिल्यांदाच अनुस्वाराचे एवढे प्रकार समजले हस्ताक्षर खूप सुंदर.
फारच छान माहिती मिळाली. त्या अक्षराबद्दलच्या शंकांचे निरसन झाले.आभारी आहे.
खरंच सर अतिशय सुंदर माहिती दिली आहे . आताच्या पिढीला व्याकरणाची आवड दिसून येत नाही. तुमचं व्याकरण, हस्ताक्षर व उच्चार खरंच खूप छान वाटले.
अत्यंत समर्पक माहिती, अशी माहिती अनुभवी,अगदी सेवा निवृत्ती ला पोहचलेले शिक्षक सुद्धा देऊ शकले नसते.
खूप खूप धन्यवाद.
सर तूमचे आक्षर किती सुंदर आहे हो ! छान दुर्मीळ माहीती दिल्या बध्दल धन्यवाद ❤❤❤❤❤❤
छान समजावले.आता भगवत गीता शिकताना खुप उपयोग झाला🙏
अप्रतिम मला आज हया अक्षराचा कसा वापर होतो ते माहित झाले. Thank you for sharing
खुपच छान माहीत दिली. अनुस्वाराचा अर्थ अक्षराशी असेल अस माहीत नव्हत 🎉🎉
खूप धन्यवाद, वयाच्या साठाव्या वर्षी हे विस्तृत ज्ञान मिळाले!
खूप उपयोगी माहिती समजावून सांगण्याची पदधत पण खूप सुंदर
खूपच छान माहिती मिळाली वयाच्या चाळीशीनंतर कळाले देवाघरी जाण्याअगोदर किमान येणाऱ्या पिढीलाही सांगता येईल👌💯✅
इतक्या वर्षांनी म्हणजे साठीनंतर शब्दांचे योग्य उच्चार कळले. खूप खूप धन्यवाद.
व्वा खूपच छान समजावून सांगितले.
हे माहित होते.
पण आजकाल ञ हा स्वर सर्रास त्र साठी वापरला जातो.अगदी मराठी शाळांमध्ये पण असेच शिकवले जाते.
आपण खूप छान शिकवले असे धडे मराठी शाळांमध्ये दिले पाहिजेत.
धन्यवाद 🙏
मला सुद्धा आज या विश्लेषण मधून कळाले. धन्यवाद गुरुजी या माहिती प्रसारणासाठी.
फारच उपयुक्त माहिती. बालपणा पासून असलेल्या शंकेचे निरसन झाले.धन्यवाद!
😊फारच उपयुक्त माहिती. जणांना याची एवढी माहिती नसावी.अत्यंत आभारी. "मोत्याच्या दाण्या"सारखे अक्षर आहे सर आपले.मन:पूर्वक धन्यवाद सर😊🎉
सर्व मूळआक्षरांची माहिती साठी असेच व्हिडियो बनवा खूप छान माहिती
भगवत गीता शिकताना याचा फार उपयोग होत आहे, धन्यवाद सर 🙏🙏
क,च, ट, त, प या वर्गाने होणारा अनुनसिकांचा उच्चार चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितला. धन्यवाद सर.
खूपच चांगली माहिती दिलीत. वाङनिश्चय हा आणखी एक शब्द
आपले अक्षर कित्ती छान आहे, खूप छान माहिती
खूप सुंदर मराठी बाराखडीचा अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. मनापासून धन्यवाद. असे शिक्षण जर शिक्षकांनी दिले तर मराठीचा दर्जा सुधारण्यासाठी उपयोग होईल.
अप्रतिम अक्षर आहे.
सर सांगण्याची रीत खुप सुंदर.
🎉
खूपच छान पद्धतीने स्पष्टीकरण केले आहे.इतक्या शांतपूर्ण शैली मध्ये सांगितल्या मुळे ते अगदी सहज लक्षात राहील नक्की .हाडाचा शिक्षक हे करू शकतो 😊.आभार.
कित्ती सुरेख पडतीने तुम्ही समजावले म्हणून आभारी अहे
दादा तुमची माहिती महत्वाची तसेच अक्षर ही अतिशय सुरेख आहे. माहिती ऐकताना लक्ष तुमच्या अक्षरा वर खिळून राहिले ✍️👌👌🙏🙏
छान सर... यालाच परस वर्ण संकल्पना म्हणतात . अनुस्वार असलेल्या अक्षारापुढे जे अक्षर असेल त्यातील अनुनासिक अक्षर अनुस्वार येतो.
माझी साठी जवळजवळ आहे आणि आता ह्या अक्षराच्या कोड्याच्या ओझातून मुक्त झालो. खरच अप्रतिम विडिओ डाऊनलोड झाला आहे. आपलं ऋण झाले आहे आज. त्यामुळे हा विडिओ माझ्या मित्रांना शेअर केला!
खूपच सुंदर sir.बऱ्याच जणांना हे अक्षर उचार्ता येत नाही चुकीचा शिकवला जातो.dhanyawad.,❤
उच्चारता असा शब्द आहे उचार्ता असा नाही.
काही शंका होत्या.. आज दूर झाल्या.. धन्यवाद मनापासून.. खूप छान सर.. कोल्हापूर मध्ये असाल तर येथील विद्यार्थ्यांना उत्तम गुरु भेटतील. 🙏🏻🙏🏻🌷
अप्रतिम हस्ताक्षर, शिकवण्याची पद्धत अति सुंदर.
भोरकडे दादा ...
तुमचं सगळं पटलं....
पण.....
मराठी वर ओझं म्हणणे भंपकपणाचे वाटले...
वांगमय ( मोबाईल टायपिंग नुसार) हा शब्द ओझे कसा असेल...
मुळात मराठी ही भाषाच संस्कृत पासुन तयार झालेली आहे...
भाषा समृद्धी साठी हे शब्द अतिशय उपयुक्त आहेत...
बाकीचा कन्टेन्ट पटल्यामुळे अगदी सौम्य भाषा वापरलीआहे....
आपले अक्षर उत्तम..❤❤
मराठी ही संस्कृतपासून निर्माण झाली हे निर्विवादपणे सिद्ध ,मान्य झालेले नाही.कृपया पुरावा द्यावा
खुपच सुरेख अक्षर ,छान माहिती दिली
छान शिकवले आहे.
आपले अक्षर अतिशय सुरेख आहे.
एखादा फाँट असावा लिहिण्याचा तसे आहे.
सुंदर!
यामुळे आता संस्कृत श्लोक व्यवस्थित वाचता येतील... धन्यवाद मास्तर ❤
सर खरच आज पर्यंत हे माहीत नव्हतं.
खूप च महत्वाची माहिती दिली ,त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
अति सुंदर … हस्ताक्षर तर फारच छान…. अगदी मराठीशाळेत पण असे शिकवले गेले हे आठवत नाही.
खूप छान माहिती- -👍
पण भावलं ते आपलं हस्ताक्षर - - - अगदी टायपिंग सारखे आपले हस्तलेखन - - -खूपच म्हणजे खूपच सुंदर,अप्रतिम 👌
अतिशय रंजक माहिती. उभ्या आयुष्यात आज ५९व्या वर्षी या अनुनासिक वर्णाक्षरांची योग्य माहिती झाली. आभारी आहोत 🙏
छान उपयुक्त व्हिडिओ!इतर भाषांमधून शब्द घेऊनही मराठी भाषा समृद्ध झाली आहे.मराठीची मातृभाषा संस्कृत मधून तर हक्कानेच शब्द घेण्यात काहीच प्रत्यवाय नाही.
खूप सुंदर विडीओ... उत्तम माहिती 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर समजून सांगण्याची पद्धत पण एकदम मस्त
साठीत कळल, खूप छान आणि उपयुक्त माहिती.
धन्यवाद
खुप सोप्या पद्धतीने संकल्पना मांडली खुप छान सर
मुळात अनुनासिक हा शब्दच पहिल्यांदा ऐकतोय. उच्चार करताना अनुस्वाराचे महत्व खूप छान सांगितले, धन्यवाद 🙏🏽
धन्यवाद 🌹🙏🏻 सर !
छान माहिती दिली आहेत ... अगदी सोप्या रीतीने ... अक्षर सुद्धा सुरेख आहे ...
धन्यवाद !
मस्त चलचित्र 👍
विडिओ ❌️
चलचित्र ✅️
@tusharbhavsar6065 बरोबर
कमाल आहे, आज 60 व्या वर्षी हे ज्ञान मिळाले ते पण मराठी शाळेत शिकून सुद्धा। मला आठवत नाही त्यावेळी एवढं सविस्तर शिकविले की नाही। जरी शिकविले असले तरी आमचा वेळ त्यावेळी मागच्या बेंच वर बसून भंकस करण्यात गेला.
अतिशय सोप्या आणि शास्त्र शुध्द पद्धतीने समजून सांगितले सर........खूप खूप धन्यवाद....
मी याच पद्धतीने शिकवले. शुद्ध लेखन ४१ नियम . वाळींबे यांचे पुस्तक आहे . दुर्दैव असे की या प्रमाणे सर्व शिक्षक शिकवीत नाहीत.
आपल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि खुप खूप आभार.... आपले हस्ताक्षर मोत्याहून आखीव रेखीव अन सुंदर विलोभनीय.... एक सेकंद सुद्धा video मधून बाहेर पडता आले नाही 👏🏻🙏🏻😊
खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले सर धन्यवाद.
खूप सुंदर माहिती दिली आहे सर आणि तुमचे अक्षर पद्धती अक्षर खूप सुंदर आहे धन्यवाद
अक्षर खूप छान आहे उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर
तुम्ही पेशाने शिक्षक आहात का माहित नाही पण तुम्ही एक उत्कृष्ट शिक्षक आहात सर !!
आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल शताश: धन्यवाद !!
छान पद्धत आहे शिकवण्याची 👍👌🙏
आज प्रथमच हि माहिती मिळाली.धन्यवाद ! आपले अक्षर सुंदर आहे.
व्हीडीओ खूप छान बनविला आहे. पण पंप ,आंबा ,पंत या शब्दाचे उच्चारण सांगताना आपण शेवटचे ( अन्त्य) अक्षरावर अनूस्वार उच्चारण अवलंबून असल्याचे सांगीतले आहे. त्याऐवजी अनुस्वारा नंतर येणारा वर्ण कोणता (कोणत्या गटातील) त्यावर अनुस्वार उच्चारण अबलंबून आहे असे सांगणे संयूक्तीक होईल, असे वाटते.
@@ashokvishwsrao9932 बरोबर आहे आपले
धन्यवाद, चांगली माहिती दिली आहे. खूपच मोठं काम करत आहात आपण.
ञ त्याची बाराखडी वर क्लिप करावी.
अ ते अ: नंतर येणारे चार स्वर आहेत. ऋ, ॠ, ऌ, ॡ ह्या स्वरांच्या बाबतीत पण क्लिप करावी, ही विनंती.
आपण जर व्यंजन आणि स्वर वापरत नसू, तर सृष्टीतील त्यापासून निर्माण होणाऱ्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करत आहोत, हे लक्षात आणून देणं गरजेचे आहे
अक्षर खूपच सुंदर 😊😊
मोत्यां सारखे अक्षर, खुप छान माहिती
खूप छान माहिती आहे. पण आधीच माफी मागून एक विनंती करते की न च्या ऐवजी ण म्हणू नये व ण च्या ऐवजी न म्हणू नये. जसे की अणुस्वार न म्हणता अनुस्वार म्हणावे. अणुवाद न म्हणता अनुवाद म्हणावे. पानी व दुकाण असे न म्हणता पाणी व दुकान असे म्हणावे. तुम्ही उत्तम शिक्षक आहात असे दिसते, म्हणून तुम्हाला विनंती केली.
व्वा मस्त 😊
मला एक शब्द कळत नाही.. प्रतिष्ठान की प्रतिष्ठाण?
शहरातली बावळट लोक असणार ला अश्णार म्हणतात. सिरियल मधल्या फालतू नायिका. किती घाण वाटत ते. शी
अशनार , नशनार 😂
हो ना, आम्ही प्रतिष्ठान असे शिकलो पण अलीकडे बऱ्याच ठिकाणी प्रतिष्ठाण असे लिहिलेले आढळते…
सर ..खरच खूप खूप धन्यवाद....आजपर्यंत च्या अनुत्तरीत शंकांचे तुम्ही फार सुंदर रित्या विश्लेषण करून दाखवलेत ...🙏🙏
याच प्रमाणे, ऋ, ऋ ,लृ, लृ वगैरे मूलक्षराबद्दल सविस्तरपणे माहिती द्यावी, धन्यवाद
ऌ वर बनवा
खूप छान वाटले ऐकून, शाळेत शिकलो होतो, पण आज recollect झाले. खूप खूप धन्यवाद!!🙏शिक्षक दिनानिमित्त नमस्कार