Majha Katta With Baipan Bhari Deva Team : सहा बायका आणि बाईपणाची गोष्ट ऐका, जगभरात हाऊसफुल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #abpमाझा #abpmajha #MaharashtraCabinet #BaipanBhariDeva #Team #marathimovie #majhakatta
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra Cabinet news | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
    -------------------------------------------------
    Facebook:
    www.facebook.c...
    Instagram:
    ...
    Twitter:
    da...

Комментарии • 428

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 Год назад +112

    आम्हीं आहोत पाच बहिणी...आणि आम्ही हा सिनेमा आमच्या ९४ वर्षाच्या आई बरोबर खूप एन्जॉय केला...आईने पण खूप एन्जॉय केला..आमचे पण पाचनीचे खूप छान bonding आहे...❤

  • @tinashah7530
    @tinashah7530 Год назад +12

    मी गुजराती आहे पण मला मराठी चित्रपट खुप आवडतात मराठी चित्रपटमध्ये जीवनाविषयी खुप छान संदेश असतो i love marathi movie

  • @samip3124
    @samip3124 Год назад +20

    मराठी माणसांनी मराठी चित्रपटांना प्राध्यान्य द्यावे आणि मराठी दिग्दर्शकांसाठी ही पावतीच आहे जर तुम्ही मराठी प्रेक्षकांसाठी तुम्ही सुंदर चित्रपट दिले तर लोक तुम्हाला असाच भरभरून प्रतिसाद देतील आणि डोक्यावर घेतील ❤

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Год назад +52

    अतिशय उच्च दर्जाचा चित्रपट....... सर्वांचा अभिनय उत्तम.... प्रत्येकाच्या मनाला आनंद आणि भिडणार सिनेमा ❤❤ प्रत्येक स्त्री कोणत्या ना कोणत्या charactar मध्ये स्वतःहाला पाहत होती.... कधी डोळ्यात अश्रू तर कधी हासू या दोन्हींचा मेळ होत होता.... अतिशय सुंदर मुलाखत....व सिनेमा प्रत्येकाने परत परत बघावा असाच आहे❤❤ ❤❤❤❤

  • @principalashashantaramshin6366
    @principalashashantaramshin6366 Год назад +10

    'बाईपण भारी देवा' च्या टीमची ही मुलाखत अप्रतिम, अतिसुंदर! खूप आवडली. वंदना गुप्ते यांचे 'चारचौघी' हे नाटक फार वर्षापूर्वी पाहिले होते. या सगळ्या जणी कुशल अभिनेत्री आहेतच. संपूर्ण टीमचे अभिनंदन!

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Год назад +6

    किती सुंदर सिनेमा आहे! खूप वर्षांनी इतका छान सिनेमा पहायला मिळाला.केदार शिंदे व निखिल साने यांना धन्यवाद. सहाजणींचा अभिनय खूप भारी.

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 Год назад +42

    चित्रपताच्या लेखिका वैशाली नाईक यांना पण या कार्यक्रमात बोलवायला पाहिजे होतं. त्या स्टोरी ला अजून खुलवून सांगु शकल्या असत्या.

  • @Sunita-sv4mz
    @Sunita-sv4mz Год назад +118

    मी कालच हा सिनेमा पाहिला अत्यंत सुंदर सिनेमा आहे योगायोग असा आहे की अम्ही पण सहा बहिणी आहोत आणि आमचे माहेरचे आडनाव काकडे आहे😊😊

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh Год назад +2

      अरे वा 😊😊😊किती छान योगायोग

    • @Sunita-sv4mz
      @Sunita-sv4mz Год назад +1

      हो ना

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib Год назад

      बापरे

    • @anuradhakale6980
      @anuradhakale6980 Год назад +1

      क्या बात है !
      सुंदरच योगायोग !!
      Wish u all d happiness..
      ALWAYS ❣️

    • @Sunita-sv4mz
      @Sunita-sv4mz Год назад

      @@anuradhakale6980धन्यवाद 💕

  • @shwetaparab5971
    @shwetaparab5971 Год назад +7

    या दगदगीच्या जीवनात असे सिनेमे हवेच. सर असेच छान छान सिनेमा करा. आमच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.

  • @kirangedam7696
    @kirangedam7696 Год назад +37

    सर्व सामान्य महिलांच्या जीवनाचा विषय 👍आम्ही मैत्रिणी ग्रुप ने अख्खा थेटर बुक करून 220 मैत्रिणी नी एकत्र सिनेमा पाहिला,मिरा भाईंदर ला ग्रुप बुकिंग ची सुरवात आम्ही मैत्रिणी पासून झाली.

    • @yogitabhavari
      @yogitabhavari Год назад +1

      220 मैत्रिणी बापरे....इथ साधी एकही भेटत नही या काळात...अप्रतिम❤

  • @bharatmanoharmore4295
    @bharatmanoharmore4295 Год назад +14

    तुम्ही चांगले सिनेमा बनवा प्रेक्षक आपोआपच प्रतिसाद देतात याच उत्तम उदाहरण म्हणजे बाई पण भारी देवा....❤❤❤

  • @sudheer091
    @sudheer091 Год назад +45

    😢 निखिल साने हे खरोखर परीस आहेत. त्यांनी झी मराठी ग्रुप सोडल्यानंतर त्यांच्या मराठी सिनेमांची काय अवस्था झाली आहे पहा

  • @sudheer091
    @sudheer091 Год назад +31

    रोहिणी ताई खरेच छान कलाकार आहेत. हया वयात सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेलदारपणा खूपच वाखाणण्यासारखा आहे.

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 Год назад +6

    खूप सुंदर सिनेमा आहे.. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.. ह्या चित्रपट पाहिल्यावर दुरावली गेलेली भावंड एकमेकांना पुन्हा भेटतील.. बहिणी बहिणी मध्ये असणारं प्रेम ,हे या चित्रपटात खूपच छान दाखवले आहे..

  • @sandeepdoiwad515
    @sandeepdoiwad515 Год назад +15

    बाई पण भारी देवा हा चित्रपट मी चार वेळेस पाहिला तरी अजून पहावस वाटतंय फुल धमाल

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Год назад +15

    मला वाटते पुरुष वर्गानेही हा चित्रपट बघावा म्हणजे ज्या महिलांना काहितरी करायचे आहे त्या महिलांना थोडी मोकळीक मिळेल नक्कीच पुरुषांनीही हा चित्रपट बघावा असे मला वाटते

  • @aparab82
    @aparab82 Год назад +18

    मंगळागौर या विषयावर अत्यंत क्रांतीकारक चित्रपट निर्माण केल्याबद्दल निर्माते आणि दिग्दर्शक यांचं अभिनंदन. स्त्रिया घराबाहेर पडून मंगळागौर साजरी करतात हे पाहणे सामाजिक प्रबोधन करणारे ठरेल. अशा नवनवोन्मेशषाली कल्पना राबवणारे कलावंत मराठी चित्रपट सृष्टीला मिळाले ही भाग्याची गोष्ट.

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh Год назад +1

      अतिशय सुंदर 🎥📽️📽️ सिनेमा आहे,वंदना ताईचा मिश्किल पना यात दिसला😂😂😂हलकेफुलके विनोद इतका मोठा आनंद ना..बास्स😂खूप हसलो,खूप एन्जॉय केला.आम्ही पण सगळ्या सक्क्या चुलत 9 जनी मस्त bonding आहे आमच्यात.दिवाळी किंवा गावची यात्रा ,लग्न भेटतो नुसता ghondal असतो. हा सिनेमा माझ्या नणंद बाईंनी सांगितलं पाहून ये ..😊 छान आहे..मग आम्ही मैत्रिणी जाऊन आलो.खरच प्रत्येक बायकांनी पहावा.

  • @pallavikadu8950
    @pallavikadu8950 Год назад +5

    खूपच मस्त ,आणि कोविडी मधे हा तुम्ही केलात ,म्हणून प्रत्येकाने तो आपला शेवटच्या क्षणापर्यंत त्या खरा अर्थाने काम केलय. की आपल्यात आपला माणूस किती महत्वाचा असतो.

  • @milindrokade7746
    @milindrokade7746 Год назад +3

    बाई पण भारी देवा कलेक्शन 50 करोड च्या पुढे....
    रसिकांच्या मनात चित्रपटाची क्रेज व आवड 100 करोड च्या पुढे. केदार शिंदे व सर्व कलाकार तंत्रज्ञ ,लेखक ,संगीतकार, नृत्यदिग्दर्शक व निर्माते यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
    कोण म्हणतं मराठी चित्रपट चालत नाही.....
    बाई पण भारी देवा हा चित्रपट त्याच जाज्वल उदाहरण आहे. जे चांगलं उत्तम असत त्याला प्रेक्षक नेहमी साथ देतात. तुम्ही चांगले चित्रपट नाटक द्या प्रेक्षक जरूर बघायला येणार...
    लेखक निर्माता दिग्दर्शक यांना नम्र विनंती चांगला कंटेंट ,चांगल प्रॉडक्ट, चांगला चित्रपट नाटक घेऊन या ,टुकार काही पैसे कमावण्यासाठी हा उद्योग करू नका व प्रेक्षकांचे पैसे व वेळ वाया घालवू नका . आम्ही तुमच्यावर, तुमच्या नावावर विश्वास ठेवून तुमची कलाकृती बघायला येतो त्याच भान ठेवा.चांगला दिलत तर चांगलच फळ मिळेल याच चांगल उदाहरण....
    बाई पण भारी देवा...

  • @VIJAYKUMAR070985
    @VIJAYKUMAR070985 Год назад +13

    Level of Marathi movie was very high in old days. Suspense and no single point to raise. It's like reality

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 Год назад +23

    खुप अभ्यास पूर्ण मूव्ही झाला आहे केदार सर 🎉

  • @India.....7779
    @India.....7779 Год назад +2

    आमच्या थेटर मधे कणकवली ला इतकि गर्दी की तिथे हिन्दी पिक्चर ला कोनि नाही हे प्रथम च घडले बाकी बाइपन भारी देवा च्या टीम ला धन्यवाद

  • @shwetaparab5971
    @shwetaparab5971 Год назад +5

    अतिशय सुंदर चित्रपट. केदार सर निखिल सर व सर्व कलाकारचे मनापासून खुप खुप अभिनंदन❤❤

  • @anitaredekar4744
    @anitaredekar4744 Год назад +76

    सहाजनिनी उत्तम अभिनय केला आहे. प्रत्येक इमोशनल सिनला रडायला येत ❤

    • @VyankateshManjrekar
      @VyankateshManjrekar Год назад +2

      प्रत्येक इमोशनल सिनला रडायला येत - kuthe tari life che incidence vichar karayala lavun gele ya 6 bahininhcy nimittane....me sahamat ahe hya sampurna vakyala

    • @lalitaingavale27
      @lalitaingavale27 Год назад

      Kabirke dohe

    • @kalpanapatil1623
      @kalpanapatil1623 Год назад

      ​@@VyankateshManjrekar00⁰

    • @vaishalikete4463
      @vaishalikete4463 Год назад

      1

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Год назад +1

    आम्हीं पण सर्व मैत्रीण मिळुन चित्रपट पाहिला, वैशाली ताई आणि केदार दादा, निखिल काका एकदम भारी आपला मराठी चित्रपट बनवला आहे, आम्हीं लहान असताना एका कुणाच्या घरी जाऊन दूरदर्शन वर शनिवारी मराठी चित्रपट पाहावा तसा भारी वाटला आपला @बाई पण भारी देवा ❤

  • @deepabagde7018
    @deepabagde7018 Год назад +2

    मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की माझ्या सासूबाईंच्या माहेरचं आडनाव काकडे होतं... त्या पूर्वी सुरुवातीला गिरगावात राहत होत्या आणि त्या सुद्धा सख्या आठ बहिणी आणि सावत्र चार जणी अशा होत्या... आठ जणींमध्ये त्यांची नावं पण माई, जीजी, जया, रजनी, शशी, निमा, तारु, चित्रा अशी होती... हा खूप छान योगायोग आहे म्हणून सांगावासा वाटला... सिनेमा खूपच अप्रतिम आहे...‌👌👌

  • @surekhapatil8409
    @surekhapatil8409 Год назад +12

    अतिशय उत्कृष्ट पिक्चर कथा आणि अभिनय 🎉🎉❤❤

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Год назад +1

    खूप छान सिनेमा आहे,मी आजच पाहिला, केदार शिंदे चे आभार,एक चांगला विषयावर, बाईच्या प्रत्येक सुखदु:खाचा विचार केला आहे.

  • @boharapi
    @boharapi Год назад +49

    The way Nikhil Sane explained why Marathi cinema is extraordinary is superb, that includes mature Marathi audience, culture, literature, theatre.

    • @mandajagtap3908
      @mandajagtap3908 Год назад +2

      Cinema hall madhe nachatat pan utubwar Kattan pahatana Sudha nachatat ya well nagpanchi rangnar

    • @sangitapawar4902
      @sangitapawar4902 Год назад +1

      Vayral video aani sadhana ekade ye, mangala gur khup nachav vatat

    • @shantagondhalikar6838
      @shantagondhalikar6838 Год назад

      ❤g

    • @sangitajagtap1986
      @sangitajagtap1986 Год назад

      ​@@sangitapawar4902हो ओओ हो ओओ ओओ

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675 Год назад +2

    खूप छान चित्रपट आहे.आम्हीसुद्धा सहा बहिणी आहे .हा चित्रपट पाहताना आमच्या आठवणी पण मिळत्या जुळत्या आहे.आम्ही दीडशे महिलांनी एकत्र पा हिला हा मूव्ही

  • @supriyachavan329
    @supriyachavan329 Год назад +2

    मी आजच हा सिनेमा बघून आले आणि मला हा सिनेमा आणि ह्याची katha खुपच आवडली. 👌👌👌

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh Год назад +5

    😮😮😮😂😂😂 सुकन्या कुलकर्णी यांच्या addition एवढ्या भारी 😊😊😊आम्ही खूप एन्जॉय केल्या,खरच लै हसलो😂😂😂सिनेमा पाहताना .असा नग असतो की एखादा आपल्याकडे.addition avdya bhari

  • @manishasabnis8124
    @manishasabnis8124 Год назад +12

    Khooop chhan mulakhat 👌👌👌
    Glad that reporter asked about song “उघड्या पुन्हा जहाल्या जखमा ऊरातल्या” why it’s not released (audio jukebox or on video anywhere)?
    Loved the movie absolutely !!
    Once in India once in Atlanta, USA 😍

    • @arunasuryavanshi7689
      @arunasuryavanshi7689 Год назад

      खरंच बाईपण भारी आहे देवा ...

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 Год назад +1

    किती‌ सुंदर सिनेमा आहे खूप वर्षांनी इतका छान सिनेमा पहायला मिळाला केदार शिंदे व निखिल साने यांना धन्यवाद सहाजणीचा अभिनय खूप भारी❤❤

  • @samip3124
    @samip3124 Год назад +47

    Bai Pan Bhari Deva 2 is very much needed ❤

  • @alkawelankar6998
    @alkawelankar6998 Год назад +39

    Supperb acting💃🏻💃🏻💃🏻
    Supperb direction👌👌
    Supperb cinema👍👍
    Marathi Cinema has arrived at a different super duper level👌👌👌
    All d best to our Marathi Film Industry👍👍👍
    Jai Maharashtra🚩🚩

  • @sangitajadhav7852
    @sangitajadhav7852 Год назад +2

    खुप खुप छान आती सुंदर सिनेमा आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤❤

  • @samip3124
    @samip3124 Год назад +18

    Best movie of the year ❤❤❤ family entertainer

  • @ArchanasSecretRecipe
    @ArchanasSecretRecipe Год назад +12

    I saw it in Singapore. The movie was awesome ❤❤❤

  • @suyashjadhav1445
    @suyashjadhav1445 Год назад +1

    अप्रतीम चित्रपट आहे... आजच पाहिला ❤
    कथा आपल्या आईची, आजीची, काकिची, दीदीची , आत्याची, मावशिची ❤

  • @ArchanasSecretRecipe
    @ArchanasSecretRecipe Год назад +12

    The movie got overwhelming response in Singapore !!! ❤

  • @ashokbirani816
    @ashokbirani816 Год назад

    नमस्कार. मी. पिंपरी. पुणे. येथे. राहतो. तिकीट. काढणे साठी. गेलो. असता. तेथे. बोर्ड. होता. आजचे. सर्व. शो. फुल्ल. उद्याचे. पण. सर्व. शो. हाऊस. फुल. ते. सध्छा. शनिवार. रविवार. सोडून...... खूप. भारी. वाटले

  • @bharatipathak7448
    @bharatipathak7448 Год назад +1

    पूर्णतः वेगवेगळे विषय घेऊन सिनेमा करणे हे फक्त मराठीतच होऊ शकते, आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही 9 जुलै ला हा सिनेमा टेनिसी अमेरिकेत बघितला, खूपच छान सिनेमा आहे

  • @rajeshreekambli7847
    @rajeshreekambli7847 Год назад +1

    मी,माझी मुलगी आणि माझा नवरा १६ तारिखला आम्ही पाहिला सिनेमाला जायच्या अगोदर मोठ्या बहिणीला (माझ्या 3 मुली) फोन केला ताई आम्ही पप्पा मी आई बाईपण लयभारी देवा बघायला चाललो आहे.
    पप्पा आणि मी झोपणार फक्त आई सिनेमा बगणार पण सुरवाती पासून ते संपेपर्यंत पूर्ण सिनेमा बघितला धन्यवाद सर्व टीमचे ❤🙏

  • @DilipBhagat-wp5nh
    @DilipBhagat-wp5nh Год назад

    खऱ्या आयुष्यात स्त्रीयांना जगताना ज्या समस्यातुन जावं लागतं त्यांच सुंदर सादरीकरण केले आणि नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये समज गैरसमज.एकलेपण, अहंकार ह्यामुळे नात्यांमध्ये कशी कटूता येते आणि खऱ्याखुऱ्या आनंदाला मुकतो आणि जर आपण हे सोडून भावंडे एकत्र आली तर किती सुख समाधान आनंद मिळतो हे कथानकात असल्याने हा सिनेमा सगळ्यांना आपलासा वाटतो., महिलांना आपल्या भावना मोकळे करणार व्यासपीठ म्हणजे हा चित्रपट आहे, म्हणून हा सिनेमा पुरुषांनी सुद्धा पाहिला पाहिजे....

  • @nitavp2359
    @nitavp2359 Год назад +8

    Bhaari ahe movie. Everyones contribution is awesome.

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 Год назад +2

    मी हा सिनेमा कालच पाहीला माझ्या बरोबर कोणी नव्हते मी माझ्या मिसटरांना घेऊन गेले होते खुप छान आहे सिनेमा❤❤

  • @madhurisud8311
    @madhurisud8311 Год назад +23

    We really enjoyed watching this film alongwith my family... it's so simple yet with variety of emotions and fun. Thank u team leaders of this film.❤

  • @sarojineepatil1366
    @sarojineepatil1366 Год назад +2

    आम्ही ही सहा बहिणी आहोत, आमच्यात खूप प्रेम आहे, आम्ही तो एकत्र पहिला, धम्माल केली
    मस्त सिनेमा 👌👌

  • @dhavalesanjay
    @dhavalesanjay Год назад +23

    The best movie in every sense more than any bollywood and holywood ..... the masterpiece, black and white song is the peak point , every scene better than another.Salute to every contributor 💗💗

  • @shwetaparab5971
    @shwetaparab5971 Год назад +1

    कटयावरच्या गप्पा एकदम मस्तच, वंदना ताई सुपरच. हसून हसून पोट दुखणे.

  • @naturelover8506
    @naturelover8506 Год назад +36

    The content of Marathi Cinema is at the different level...absolutely outstanding movie 🎬 🎉

  • @sharmilamathkar5215
    @sharmilamathkar5215 Год назад +5

    आम्ही New Jersey (Edison )la पिक्चर बघितला. खूप सुंदर, अप्रतिम सिनेमा.

  • @saaamarthhh
    @saaamarthhh Год назад +1

    बाई पण भारी देवा , अतिशय उत्कृष्ट चित्रपट, सगळेच कलाकार अप्रतिम , खरच बाई पण भारी आहे ,मला अभिमान वाटतो मी बाई असल्याचा, आणि तो ही हा पिक्चर बागितल्या पासून ,

  • @poshanabhiyankudal
    @poshanabhiyankudal Год назад +5

    या सिनेमाचे यश हे जणू या चित्रपटात दाखवलेल्या मंगळागौर स्पर्धेतील वाईल्ड कार्ड एन्ट्री वेळी या 6 जणींना आश्चर्यच्या धक्का बसलेल्या सिनप्रमाणेच आहे.

  • @shubhangikulkarni377
    @shubhangikulkarni377 Год назад +2

    😂😢आम्ही पण सहा बहिणी आहोत त्यामुळे हा सिनेमा पाहताना सतत माझ्या डोळ्यासमोर आम्ही बहिणी ह्यामध्ये कोठे बसतो ह्याची कल्पना येत होती

  • @dipalijoshi2498
    @dipalijoshi2498 Год назад +4

    खूप छान
    खास करून शेवटचे 45 मिन खूप काही नवीन ऐकायला मिळालं.
    भरगोस यश मिळो सिनेमाला
    या मनापासून शुभेच्छा

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Год назад +3

    समाजातील काही थोड्या महिला जे सांगू शकत नाही ते हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो,बाईपण भारीच आहे पण ते पुरुषांना समजण्यासाठी जास्त पुरुषांनी सिनेमा पाहिला पाहिजे

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 Год назад +4

    Nikhil sani great ahe. Socially ekdam knowledgable ahe. Kedar shinde pekshahi.

  • @ushadhamane6853
    @ushadhamane6853 Год назад +5

    Hats of all the team ❤

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 Год назад +2

    बरयाच दिवसाने छान घरगुती व प्रत्तेक स्री ला आपलीच भूमिका वाटायला लागते. म्हणून हा सिनेमा प्रसिध्द झाला आहे.

  • @sanjeevdighe6769
    @sanjeevdighe6769 Год назад +1

    अमेरिके असल्याने सिनेमा पाहिला नव्हता म्हणून तुमच्या माझा कट्टा वर परत आलो. रोज सकाळ झाली की संजय बघून बघून शेवटी abp बघणे बंद केले होते. माझा कट्टा न चुकता बघणारा मी ही च्यानल कधीही बघायची नाही ठरविले होते, आजच्या ह्या भागा मुळे परत मी कट्या वर परत येईल.
    संजीव दिघे.

  • @vijayachincholi200
    @vijayachincholi200 Год назад +4

    मंगळागौरीचे पूर्ण गाणे बघायला माझ्यासारख्या अनेक बायकांना आवडेल ...

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Год назад

    तुम्हा सहा जणींचे उपकार आम्ही कधीच विसरु शकत नाही.खूपच छान जबरदस्त सिनेमा.

  • @aparnasseams9133
    @aparnasseams9133 Год назад +31

    Congratulations for this best cinema in Marathi.🎉
    Dub... this cinema in other languages.❤
    I wrote blog of this cinema......I liked the cinema soooooo much.
    Kedar Shinde and team.. all the best ❤❤

  • @suvarnamohite9079
    @suvarnamohite9079 Год назад

    अतिशय सुंदर फिल्म आहे हिरोईन सगळ्याच अगदी जवळच्या आहेत खुप शुभेच्छा सर्वांना

  • @yatinkambli8806
    @yatinkambli8806 Год назад +2

    "माझा कट्टा" खरच एक कट्टा आहे, इथे येणारे प्रत्येक जण मन मोकळे करत गप्पा मारतात आणि आम्हाला ते पहायला देखील छान वाटते 👌🏿👍

  • @user-rf9pj6ij1z
    @user-rf9pj6ij1z Год назад

    खूप सुंदर सिनेमा मी पहिल्यांदाच चित्रपट गृहात जावून पाहिला

  • @shwetaparab5971
    @shwetaparab5971 Год назад

    सर्वजणी, त्या त्या भुमिकेत एकदम चपखल बसल्यात. मस्तच.

  • @bhaskarhadawale8285
    @bhaskarhadawale8285 Год назад +15

    This is very class cinema ,shows that Marathi cinema growing on in all aspects 🎉🎉🎉

  • @rushikeshkherade9546
    @rushikeshkherade9546 Год назад +1

    मी फक्त आदरणीय वंदनाताई गुप्ते यांचा अभिनय बघण्यासाठी चित्रपट बघायला गेलो होतो पण एकंदरीत सर्व सहा बहिणींनी अप्रतिम अभिनय केला.

  • @yogeshkulkarni9174
    @yogeshkulkarni9174 Год назад +3

    समाज मनाच्या वेदना, समस्या,आनंद वास्तव, विकासा च्या वाटा जर दाखवल तर चित्रपटाला प्रेक्षक मिळताच.

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Год назад

    सुंदर मुलाखत ,आम्ही 20 जणी गेलो होतो .सुंदर सिनेमा😊मला वाटत पहिल्यांदा गृपने आणि नंतर नवरा ,भाऊ यानी हजेरी लावली.

  • @swatidhekane1917
    @swatidhekane1917 Год назад

    सिनेमा खूपच आवडला. स्त्रीच्या मनातील भावना, संवेदना, वेगवेगळ्या स्वभाव छटा उत्तम दाखवल्या आहेत.
    जणू एकाच स्त्रीमधे वेगवेगळ्या तिच्या परिस्थिती नुसार हे सहा रंग आपल्यासमोर येतात. असे मला वाटले.
    सहा रंगी फुलपाखरू म्हणजे ही स्त्री आहे. असेच वाटते. कारण अनेक वेळा आपल्या जीवनात थोड्या फरकाने का होईना असे घडलेले असते.

  • @rajivdevidaskarale-xr2pv
    @rajivdevidaskarale-xr2pv Год назад +2

    वाडा चिरेबंदी नंतर कौटुंबिक नाते संबधावर आधारित एक अभिजात कलाकृती ..सर्व टीमचे अभिनंदन . राजीव कराळे .

  • @swatihadawale6812
    @swatihadawale6812 Год назад

    खूपच छान बाईपण.... आता पुढील वेळेस बहिणी आणि भाऊ यांचा चित्रपट पाहायला खूप आवडेल.

  • @veenabhartiya7000
    @veenabhartiya7000 Год назад +4

    आम्ही तिघी बहिणी आहोत समज गैरसमजातून दुरावा आलाय .होईल का तो दूर.मला माई म्हणतात आणि सिनेमातल्या माईसारखीच माझी गत झाली आहे .

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Год назад +1

    तुम्ही सहा जणींने आम्हांला खूपच आनंद दिला आहात.आमच्या घरातल्याच वाटता.

  • @anjalikulkarni7522
    @anjalikulkarni7522 Год назад +2

    माझी आई ला सहा बहिणी आहेत..खूप धमाल करतात.म्हणून हा चित्रपट जवळचा वाटला.

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 Год назад

    Khup khup sundar movie... 👌👌👌❤❤manala bhidla.. Prtyek emossional moment la radayala yet.. Mazya hrudyala bhidun gela movie.. Pratyek bai relate karte ya movie la.. Thanks kedar shinde sir🙏🙏🙏🙏❤❤❤

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 Год назад

    धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक सादरीकरण

  • @deepaliwarkad3939
    @deepaliwarkad3939 Год назад

    खूप छान वाटले बाय पण भारी देवा खूप छान चित्रपट आहे असं वाटतं माझ्या जीवनावर आधारित आहे

  • @Atleast641
    @Atleast641 Год назад +4

    माझी आवडीची actress'वंदना ताई❤❤

  • @saurabhgawali8927
    @saurabhgawali8927 Год назад +4

    सगळ्या जणी कसलेल्या actors ahet. मराठीत असले कलाकार लाभले हे भाग्यच. ते संपूर्ण सिनेमा मध्ये अभिनय करत आहेत अस वाटतच नाही.

    • @samip3124
      @samip3124 Год назад +2

      बरोबर रोहिणी ताई फक्त चेहऱ्यावर संवाद बोलतात संपूर्ण चित्रपटात

  • @kirangedam7696
    @kirangedam7696 Год назад +2

    मिरा भाईंदर ला ग्रुप बुकिंग ची सुरवात आम्ही मैत्रिणी पासून झाली 💃💃

  • @seemapatilseema6085
    @seemapatilseema6085 Год назад +1

    Khup mast movie , suchitra taini khup radawle vandana taini khup hasawle, fakt baykanach nahi tar Tarun mulina pan khup aawadat ahe movie, sukanya tai khup cute 🥰 saglech kalakar mast 🎉🎉❤❤

  • @sunandabagul3290
    @sunandabagul3290 Год назад +2

    शिल्पा आणि सुचित्रा सुंदर अक्टिंग,🙏

  • @ashwinipatil173
    @ashwinipatil173 Год назад

    मी पण माझ्या ४ मावशी ना व माझी मम्मी ला घेऊन गेले होते दुसरेच दिवशी मावशी खूप खुश झाले.मला पण खूप आनंद झाला ,आणि माझी दोन मावशी नी डान्स ही केला . मी पोस्टर ही पाहिले नव्हते आणि मला सहजच सुचलं की आपण ही कॅप आणि गॉगल्स घेऊन जावेत आणि मावशी चे फोटो काढू यात आणि हीच माझी कल्पना ichajkaranji मध्ये फेमस झाली .

  • @ganeshwange5080
    @ganeshwange5080 Год назад

    असे कितीतरि 53:23 लोक असतील की, त्यांना परत हा सिनेमा परत बघायचा आहे..... सुंदर...

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Год назад

    सर्व नात्यांनी एकमेका बदल विचार आणि चिंतन करायला शिकवलं.one ऑफ the बेस्ट films.❤❤🎉🎉😅😅

  • @sandeepdoiwad515
    @sandeepdoiwad515 Год назад +5

    पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे PVR खूप चित्रपट पाहण्यासाठी गर्दी आहे आज 15 जुलैला

  • @savitamunot3512
    @savitamunot3512 Год назад +2

    Khupach Chan story congratulations all of you

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Год назад +4

    सुशिक्षित नाहीतर अगदी सामान्य बायका नमुळे ही ह्याच यश आहे

  • @akshu1594
    @akshu1594 Год назад +7

    लक्षात ठेवा मित्रानो, बॉलीवूड जरी आपल्या राज्यात असल तरी तिथे 5-6% मराठी बांधव आहेत . पण, मराठी चित्रपट सृष्टि मध्ये 100 % मराठी बांधव आहेत. आपण आपल्या लोकाना सपोर्ट नाही करणार तर कोण करणार? याच दृष्टिकोणातुन दाक्षिणात्य लोकानी आपली फिल्म इंडस्ट्री वृद्धिंगतकेली आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली. मराठी माणसाने सुद्दा यात प्रगती करणे आवश्यक आहे.

  • @deepalirane7455
    @deepalirane7455 Год назад +4

    बाई पण खरच भारी....❤❤🙏🙏

  • @ddbhutekar5459
    @ddbhutekar5459 Год назад +3

    Nice film....❤from jalna.....many of are going to sambhaji nagar....for movie👍👍👍

  • @meghaagarkar6103
    @meghaagarkar6103 Год назад

    अप्रतिम झालाय चित्रपट,❤❤ प्रत्येक स्त्रीने एक वेळ बघावा आमच्या ग्रुप ला तिकीट लवकर मिळाले नाही पण नंतर मिळाली आणि खूप छान वाटला

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar1939 Год назад +1

    खूप खूप मस्त.... आणि खूप शुभेच्छा 🎉

  • @suvarnashinde7142
    @suvarnashinde7142 Год назад +1

    आम्ही 6 बहिणी नसलो तरी 6 मैत्रिणी आहोत
    आमच्यात काही भांडण होती. तर त्यावर परत एक वेळ नक्की विचार करावा वाटला
    आणि प्रत्येकीचा रोल स्वतंत्र आम्ही जगत आहोत. असे वाटते.

  • @sghuge4661
    @sghuge4661 Год назад +1

    आम्ही पण सहा बहिणी आहोत मला खूप आवडला सिनेमा❤❤