पाण्यात विरघळणारे पदार्थ आणि न विरघळणारे पदार्थ - इ.चौथी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • प्रयोगाचे नाव : पाण्यात कोणते पदार्थ विरघळतात कोणते विरघळत नाहीत?
    साहित्य: काचेचे ९ ग्लास , चमचा, पाणी ,पदार्थाच्या नावाच्या पट्ट्या , चिकटपट्टी ,मीठ, साखर,तुरटीची पूड,धुण्याचा सोडा,वाळू, दगड,तेल,गव्हाचे पीठ, हळदपूड, लाकडाचा भुस्सा इत्यादी.
    कार्यकृती:
    काचेचे ९ ग्लास घ्या. एक घेतला तरी चालेल पण तो प्रत्येक वेळी धुवून घ्यावा.
    ते ग्लास अर्ध्यापर्यंत पाण्याने भरा.
    आपल्या परिसरातील काही वस्तू गोळा करा किंवा तुमच्याकडे असलेल्या वस्तू घ्या.
    एक एक पदार्थ पाण्यात टाका त्यानंतर नीट चमच्याने ढवळा व त्याच पाण्याचे निरीक्षण करा.
    काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत.असे का झाले ? त्यामागचे कारण शोधा.

Комментарии • 1