MUMBAI | गणपती मंडळांच्या कार्यालयाला रेसिडेन्सीएल टॅक्स लावावा अशी मागणी केली आहे - दीपक केसरकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • गणपती मंडळांना दिलासा देणारे निर्णय आम्ही घेतले आहेत.
    मंडळाकडून आता फक्त 100 रुपये भाडं आकारले जाईल
    वर्षभर कार्यक्रम राबवणाऱ्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या कार्यालयाचं भाडं कमर्शियल दराप्रमाणे भाडं घेतलं जातं. ते रेसिडेन्शियल रेटनी घ्यावं अशी मागणी केली होती. कमर्शियल दराने घेतल्यामुळे मोठी थकबाकी होती त्याच्यावरील व्याज रद्द करावा आणि भाड्याच्या रकमेत 50 टक्के कपात करण्यात यावी अशी मागणी केली.
    अग्निशामन दलाचे लाखो रुपये भाडे मंडळला भराव लागत होते. ते पूर्णपणे भाडे माफ करण्यात आले आहे.
    मूर्तिकाऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली. मूर्तिकारांना साहित्य सबसिडी योजना राबवण्यात यावी. अशी मागणी दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली
    लालबागचा राजा किंवा मोठ्या मंडळाच्याआजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळात मोफत करण्यात येतील
    पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा केला जाईल यासाठी विशेष इनिशेटिव्ह घेतला जाणार आहे
    गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईच्या लोकल ट्रेन रात्रभर चालू ठेवण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला करणार आहोत.
    गणेशोत्सव काळात स्पीकर लावण्यासाठी चार दिवस सुट देण्यात आली आहे. दुसरा दिवस पाचवा दिवस सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी असेल.
    On नितेश राणे पोलिस धमकी
    याला धमकी म्हणत नाही महिलांचे संरक्षण केलेच पाहिजे
    On गणवेश
    महिलांना रोजगार मिळावे यासाठी महिला बचत गटांना देशाचे काम दिले होते. त्याचबरोबर यावेळी गणवेशाची दर्जा उत्तम असावा हा आमचा प्रयत्न आहे. पहिलं वर्ष होतं त्यामुळे थोडीशी अडचण झाली. यापुढे सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. मुलांना लवकरच गणवेश मिळेतील.
    On अजित पवारांच्या आमदारांच्या फाईल
    मुख्यमंत्री त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक फाईलवर लगेच सही करतात. ठेवत नाहीत. त्यामुळे या गोष्टी तथ्य नाही
    सर्व गणपती मंडळ यांना अग्निशमन सेवा मोफत दिली जाणार, याआधी या सेवेसाठी लाखो रुपये मंडळांना मोजावे लागायचे
    तर गणपती काळात रात्री रेल्वे सेवा व बस सेवा सुरू ठेवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची ही महत्त्वाची माहिती समोर येत आहे
    तर गणपती मंडळांच्या कार्यलयाला आता पर्यंत कमर्शियल टॅक्स लागत होता आता तो रेसिडेन्सीएल टॅक्स लागणार
    BYTE - दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री

Комментарии •