कवितेचा कोपरा | Kavitecha Kopara | Sandeep Khare | Marathi Poetry | Marathi Kavita | Episode 3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • "कवितेचा कोपरा"
    भाग : ३
    कवितेचे शीर्षक : 'मन तळ्यात मळ्यात'
    काव्यसंग्रह : मौनाची भाषांतरे (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
    छायाचित्रण आणि संकलन : देवदत्त कशाळीकर (देवदत्त फोटोग्राफी)
    रंगभूषा : कांचीस मेकओवर
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    क्रिएटिव्ह डिझाइन्स : क्षितीज विचारे
    व्यवस्थापन : कुशल खोत
    सहयोग : वाइड विंग्ज मीडिया ( / @widewingsmedia )
    कविता आणि सादरीकरण : संदीप खरे
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    RUclips : / @sandeepkhareofficial
    Facebook : / sandeepkhareofficialpage
    Instagram : / sandeepkhareofficial
    #SandeepKhare #KavitechaKopara #MarathiKavita

Комментарии • 143

  • @shitalpatil9767
    @shitalpatil9767 9 месяцев назад

    खूपच छान सर ,तुमची मन तळ्यात मळ्यात कविता मला खूप आवडते मी सतत ऐकत असते.अप्रतिम कविता लिहीता.

  • @priyankabarde2396
    @priyankabarde2396 Год назад

    Excellent reddish pink portrait of poem

  • @nikitajane956
    @nikitajane956 Год назад

    नखाची कोर नभात....ही माझी सगळ्यात आवडती ओळ होती...आहे...आणि राहील !

  • @shrutisamant2847
    @shrutisamant2847 Год назад

    कवी व गायक दोन्ही कविता भावल्या

  • @vishalsawardekar9709
    @vishalsawardekar9709 Год назад +2

    मला आठवतंय की मी कॉलेजमध्ये असताना ह्या कवींतेंच गाणं २००४-०५ साली ऐकली होती..आज त्याची आठवण झाली खूप खूप धन्यवाद...

  • @pallavikathakchannel
    @pallavikathakchannel 7 месяцев назад

    Khuppppppp sunderrrr Sandeep ji ❤️🙏🏻

  • @mrudulasoman8810
    @mrudulasoman8810 Год назад +17

    बाजूच्या खिडकीतून चंद्रकोर दिसायला हवी होती असं वाटत होतं episode बघताना

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Год назад

    आवडते गाणे

  • @varshazambare3406
    @varshazambare3406 Год назад

    कवितेच्या आधी जे सांगता ते अगदी वास्तव असते

  • @yogchw1806
    @yogchw1806 Год назад

    Jabardast shevatach kadav

  • @bhargavikatkar7439
    @bhargavikatkar7439 11 месяцев назад +2

    दोन्ही कविता अप्रतिम 🤍 "कसे सारतील सये" आणि "सरीवर सर" बद्दल ऐकण्याची प्रचंड उत्सुकता 🎇
    खूप खूप सारे सारे प्रेम, सदिच्छा, आणि शुभेच्छा 🧿

  • @saileejoshi-guptemangrovef6015

    कवी तुमच्या कविता
    नवीन कवाडे उघडते नेहमी
    माझ्यातल्या कवीला
    थोडासा आधार देती
    स्पूर्ते म्हणे तुम्हाला
    कविता अशीच अचानक
    पण माझासाठी मात्र तुमचीच कविता असते प्रोत्साहन.

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Год назад

    कवितेचा उगम भारी

  • @swapna.vaidya
    @swapna.vaidya Год назад

    खूप मस्त मालिका. Treat आहे आम्हाला.

  • @vanitacreation6990
    @vanitacreation6990 Год назад

    छान खूप छान

  • @sagarchawan411
    @sagarchawan411 Год назад

    Masttttttt

  • @nageshkulkarni1302
    @nageshkulkarni1302 Год назад +1

    भन्नाटच

  • @prachibandegiri6927
    @prachibandegiri6927 Год назад

    गुलाबी पोर्ट्रेट अतिशय लोभस!

  • @temp3896
    @temp3896 Год назад

    माझे अनेक क्षण तुझ्या कवितांमुळे सार्थकी झाले

  • @priyakullarwar182
    @priyakullarwar182 Год назад

    माझी आवडती कविता आहे.

  • @rajendrawani521
    @rajendrawani521 Год назад +1

    मोहरून येते मन शब्दफुले ऐकुनी..
    भुलुनी जातो मी मजला , दरवळतो जणु
    जसा पहीला पाऊस मातीत मिसळुनी

  • @neetagaikwad5693
    @neetagaikwad5693 Год назад

    अजूनही ऐकते😇😇😇

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar5399 Год назад

    फारच छान कविता आहे
    माझ्या कडे तुमचा
    मौनाची भाषांतरे पुस्तक आहे

  • @YATRAvibe111
    @YATRAvibe111 Год назад +2

    Portrait kharch dolyasamor ubhe zale aikunach amazing sir

  • @neetajoshi2638
    @neetajoshi2638 Год назад

    ❤❤❤

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 Год назад

    Sundar

  • @vaibhavbankar4060
    @vaibhavbankar4060 Год назад

    मनाच्या कोपऱ्यात , कवितेने घर 🏠 केलं .

  • @nakuljoshi1485
    @nakuljoshi1485 Год назад

    हे सगळे episodes मस्त आहेतच पण त्या कवितेची process आणि तुमच्या बद्दल ऐकायला मजा येतेय

  • @user-we6lw2tv6t
    @user-we6lw2tv6t Год назад

    अप्रतिम

  • @kedarthanedar2855
    @kedarthanedar2855 Год назад

    Thanks Sandeep ji🙏

  • @kunalmahajan4896
    @kunalmahajan4896 Год назад

    माझी खूप आवडती कविता आहे दादा ही

  • @samarthsamdiscogamerz4643
    @samarthsamdiscogamerz4643 Год назад

    Khoop chan

  • @priyankashivalkar4970
    @priyankashivalkar4970 Год назад +1

    Khupach chan zali vo kavita , kavitech sadarikaran , tumcha aavaj.... Tumch te pause devun devun boln tar manala khupach भिडतं....he sagl मराठीतच lihaych hot pan mazi exam chi tayari chalu aahe ... tyamule vel aabhyasala dyava lagto.... pan tumcha ha karykram pahun , aikun khup aagdi aaplyashi konitari bolt aahe asa anubhav asto to....
    Sarv kahi khupach chan kelt tumhi....
    Tumhala ekda tari live aiknyachi khupa iccha aahe...

  • @anuyakale8101
    @anuyakale8101 Год назад

    खूपच सुंदर 👌💐💐

  • @ArogyavarBoluKahi
    @ArogyavarBoluKahi Год назад +2

    हा.कोपरा ऐकून मलाही काही सुचले
    माझ्या मनाचा कोपरा
    त्यात तू एक उपरा
    तुला काय माझं?
    पण मला मात्र
    तुझंच ओझं
    कोपऱ्यात मन
    मनात कोपरा
    तुझं काय ओझं?
    मन माझं गुंता
    कोपऱ्यात पसारा
    पसरलेलं मन
    माझं की तुझं
    हि झिम्मा
    की फुगडी
    पण नाचतंय मन
    घालते मी लंगडी
    तुझा चाले लपंडाव
    माझ्या मनाचा
    गेला ठाव
    तू दत्त म्हणून येशील
    नाचून भिंगरी होशील
    हीच साद मनाशी
    मन माझं कोपऱ्याशी

  • @namitajoshi5719
    @namitajoshi5719 Год назад

    अप्रतिम.

  • @ajay_mane
    @ajay_mane Год назад

    Mast👌👌👌

  • @SundeepGawande
    @SundeepGawande Год назад +1

    मोर येऊन देती दिलासा
    भेट होईल एवढ्यात
    🦚🦚🦚🦚🦚🦚

  • @sushamagramopadhye9808
    @sushamagramopadhye9808 Год назад

    Very nice

  • @hiraldesai7908
    @hiraldesai7908 2 месяца назад

    खूप छान❤️

  • @vidyabokil981
    @vidyabokil981 Год назад +1

    दरवळणारं हे मनाच्या कुपीतलं अत्तर,
    आसमंत भारलेला,
    सखी तुझी लावण्य खाण जणू,
    स्वप्न झुला झुललेला.

  • @omkarpatiljadhav3077
    @omkarpatiljadhav3077 8 месяцев назад

    अप्रतिम ❤️

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 Год назад +4

    माझे अतिशय आवडीचे गाणे संदीप सर, कविता तुमच्या आवाजात ऐकायला मजा येते..... दोन्ही कविता सुंदर 🙏🏻💐💐💐

  • @ganeshchavan8783
    @ganeshchavan8783 Год назад

    Khup khaas aahe😇🤗

  • @ganeshtarange6825
    @ganeshtarange6825 Год назад

    खूप छान सर मला पण असच आठवतं
    आणि मीही असाच सुरू होतो
    निघुन धकवा जातो, कुठुन
    येतं हुरूप माहीत नाही ,

  • @sanjanagaikwad2185
    @sanjanagaikwad2185 Год назад +1

    माणसाचं मन निसर्गाशी एकरूप झाले आहे.
    कविता मस्तच

  • @rohinichaphalkar6055
    @rohinichaphalkar6055 Год назад

    wah wah…Tu navachi kavita apratim hoti👌👌 i think kavite cha ani tichya rasikancha asach lal-gulabi nata asata, kavita avadanarya , kavitevar prem karanyarya saglyansathich ti gulabachya fulanchi bhashantarech asatat….ani kavitecha artha ulagadat jato tevha attarachi dehakupi daravalat rahate 🌹🌹🌹🌹rangapanchami hoti ranganchi…fikat gulabi antar…ahaha 👌

  • @kanchanshinde214
    @kanchanshinde214 Год назад

    Potrait खूप सुंदर

  • @dattaraysalunke6443
    @dattaraysalunke6443 Год назад +1

    गुलाबाच्या फुलाचं भाषांतर ... अतिशय सुंदर कल्पना...
    कवितेचा जन्म आणि रसग्रहण तेही कवीच्या तोंडून... भरपेट मेजवानी...मन तृप्त झालं

  • @nikitajane956
    @nikitajane956 Год назад

    'गुलाबी अंतर'...'गुलाबाचे भाषांतर'... म्हणजे अप्रतिमच! गुलाबी डंख झाल्यागत....

  • @priyankashivalkar4970
    @priyankashivalkar4970 Год назад +1

    Next episode sathi wait kart aahot.....

  • @madhuribhamare1261
    @madhuribhamare1261 Год назад +1

    Sir , सुरवातीला दिलेले explanation मी पूर्णपणे relate करू शकते .. मलाही कविता ही चाली सोबत सुचते आणि कधीही, कुठेही अणि इतरांच्या भावनांना मी माझ्या शब्दात मांडत असते, नेहमीच ते माझेच अनुभव असतील असे नाही. So हे एक कवि च समजू शकतो..

  • @yogisgl
    @yogisgl Год назад +2

    सर "सॅन्डीच्या" कवितांवरती एक डिटेल्ड भाग करा... प्लीज 🙏

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 Год назад +1

    वाह! अप्रतिम कविता...‌‌👌🏻👌🏻👌🏻👌🏻 संदीप सर तुमच्या पहिल्या अल्बमच्या कॅसेटमधून बरेचदा ऐकली......मला फार आवडायची.......बरेच वर्षांनी ऐकली आणि ती पण आपल्या आवाजात खुप खुप छान वाटली🙏🏻👌🏻👌🏻

  • @Chitrabhushan
    @Chitrabhushan Год назад +1

    'मन तळ्यात मळ्यात' ही कविता मी २००७ च्या काळात FM वर पहिल्यांदा ऐकली तेव्हापासून आतापर्यंत ती किती वेळा ऐकली, वाचली याला काही सीमा नाही, पण आज तुमच्याकडून त्यामागची पार्श्वभूमी ऐकली आणि कविता अजूनच छान उलगडली. तुमच्या कविता वाचनाला तबला पेटीची साथ कशाला हवी? बोलके पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर अलगद येणारे स्मितहास्य इतकी छान साथसंगत करतात की कविता श्रोते, प्रेक्षकांच्या मनात आपोआप घर करू लागते. मनात, मेंदूमध्ये तुमचा, तुमच्या कवितांचा एक विशेष असा कोपरा आहे, त्यात प्रत्येक भागागणिक एकेक कवितारुपी, आठवणरुपी मौल्यवान रत्न मांडले, साठवले जाते आणि परिस्थितीनुरूप एकेक रत्न, ओळी ओठांवरही सहज उतरतात. आजही मैफिल छान रंगली. खूप खुप प्रेम❤️❤️😊🙏

  • @rohinilimaye5712
    @rohinilimaye5712 Год назад +1

    फारच सुंदर ! मन तळ्यात ऐकली होती आणि आवडली होती थोडया शब्दात खूप आशय असतो तुमच्या कवितेत!! पार्ट्रेट ही झकास जमलंय गुलाबी लाल..

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Год назад

    संदीप खरे जी, तुम्ही माझे सर्वात प्रीय कवी आहात. माझे कवितेवर मनापासून प्रेम आहे.
    तुम्ही आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवीं पैकी एक आहात.
    तुम्ही तुमच्या ह्या RUclips Channel च्या माध्यमातून तुमच्या कविता सादर करून आम्हा सारख्या काव्य प्रेमींना आनंददायी करतं आहात.
    ह्या बद्दल शतशः आभार. तुमच्या कविता ऐकन म्हणजे अविस्मरणीय अशी स्वर्गीय अनुभूती असते.
    मन तळ्यात मळ्यात... ही तुमची प्रसिद्ध कविता आणि गाणे पण आहे. ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहे आणि तुमचं सादरीकरण पण मनस्पर्शी आहे. शेवटीची छोटी कविता तर लाजवाब होती. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 Год назад +1

    वा अप्रतिम 👍 पारायण झाली आहेत सर्व कवितांची

  • @neetagaikwad5693
    @neetagaikwad5693 Год назад +1

    हे गाणं मी नेहमी ऐकायचे.
    काही दिवस तर रिंगटोन सुद्धा ठेवली होती😊😊❤️

  • @latikagoregaonkar7266
    @latikagoregaonkar7266 Год назад +1

    पुन्हा प्रेमात तुमच्या कवितांच्या प्रेमात दादा...❤️❤️❤️💓

  • @rasikahinge2630
    @rasikahinge2630 Год назад

    वाह मस्त
    मन तळ्यात मळ्यात तर भारीच
    लाल गुलाबी रंगातील तू खूप मस्त
    गुलाबाच्या फुलाचे भाषांतर
    भारी कल्पना

  • @swaps1186
    @swaps1186 Год назад +1

    सर काळाच्या पुढे आहेत तुमच्या कवीता.... ९ वर्षा पूर्वीच्या कविता आज instra ला ट्रेंडिंग आहेत

  • @user-mi2wz3dz9q
    @user-mi2wz3dz9q Год назад

    अतिशय आवडती कविता आहे माझी
    तुमच्या सगळ्या कविता मी नेहमी नेहमी ऐकत असते.आणि त्याच श्रेय लेखिका अवंती काटे यांना देते मी कारण त्यांच्या कथेत मी पहिल्यांदा तुमची कसे सरतील सये ही वाचली अतिशय जास्त आवडली मग सर्च करून शोधली आणि अक्षरशः रोज ऐकल्याशिवाय दिवस जात नव्हता .तुमच्या कवितांनी वेड लावलाय अगदी मला खूप छान कवी आहात तुम्ही. आणि अजून एक तुझे नी माझे नाते काय या एका गाण्यातून किती आणि काय काय सांगितलय तुम्ही🙏🙏 आणि त्यांना अतिशय उत्कृष्ट प्ने अवंती ताई त्यांच्या कथेत वापरतात . धन्यवाद🙏

  • @chandrashekharkocharekar3889
    @chandrashekharkocharekar3889 Год назад

    शब्दांनी काढलेले पोट्रेट खुपच गुलाबी रंगदार आहे. सुंदर...!

  • @deepapujari4067
    @deepapujari4067 Год назад +1

    वा!! 'तू म्हणजे गुलाबाच्या फुलाचे भाषांतर '... मस्त एपिसोड 👌👌👌

  • @archanadurve102
    @archanadurve102 Год назад

    खूपच सुंदर...मन तळ्यात...या कवितेत 15 वर्षानंतर जोडलेल्या 2 ओळी लाजवाब..
    आणि "तू" सुंदर...गुलाबी ..गुलाबी.

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 Год назад +1

    संदीप दादा खुप खुप आभार ही मालिका सुरू करण्यासाठी ❤️🙏

  • @nbgandhe
    @nbgandhe Год назад

    shabtatun portrait , atishay sundar kalpna..... khup surekh jamlay...

  • @swaranyaS
    @swaranyaS Год назад

    Aaj sakalpasun mi ya kavitechya oli gungunat hote. Ratri ghari chalat yetanahi...aakashakade baghat...sundar ashi chandrakor baghat😊 aani achanak ya video che suggestion aale. Halli youtube la hi manatla kalata ki kay..

  • @vinitagupte
    @vinitagupte Год назад

    क्या बात है....अशाच छान छान कविता ऐकवत रहा...नवीन कविताही मस्तच....

  • @yaaminiM0801
    @yaaminiM0801 Год назад

    गुलाबाच्या फुलाचे भाषांतर ❤️ आहा

  • @preranachouk5845
    @preranachouk5845 Год назад +1

    पण संदीप दादा, तुझ्या कवितेतील "ती" नेहमी मनाने कठोरच असते त्यामुळे तू म्हणजे "गुलाबाच्या काट्याचे भाषांतर" असे लिहायला हवे होतेस😃

  • @sanjeevdalvi5578
    @sanjeevdalvi5578 Год назад

    फार फार सुंदर अनुभव. असेच अनुभव देत रहा ही विनंती.

  • @suryakantshinde6644
    @suryakantshinde6644 Год назад

    गुलाबी प्रोट्रेट फारच सुंदर.....मन गुलाबी 4गुलाबी होऊन गेलं.... रसिक म्हणुन गुलाबी शुभेच्छा... सुंदर....,,🙏🙏

  • @sameerjirankalgikar3590
    @sameerjirankalgikar3590 Год назад

    गुलाबाच्या फुलाचे भाषांतर! वाह!

  • @ashaysant
    @ashaysant Год назад

    दर्जा ❤️❤️
    हे शुक्रवार कायम येत राहो

  • @yaaminiM0801
    @yaaminiM0801 Год назад +2

    This is my favorite song ...listened so many times and yet was unaware that you were the lyricist, sir!
    Thank you so much for sharing ❤️😊

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Год назад

    दुसरी कविता सुंदर...लाल गुलाबी⚘️

  • @Pathak24sarit
    @Pathak24sarit Год назад +1

    Portrait कविता,चारच ओळी पण लाजवाब 👌👌😊

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 Год назад

    गुलाबाचे भाषांतर कमाल

  • @anjalimhadgut
    @anjalimhadgut Год назад

    मन तळयात, मळ्यात , अप्रतिम

  • @dhrutiashar5770
    @dhrutiashar5770 Год назад

    खूपच छान....मस्त. असेच लिहित राहा आणि आम्हाला कविता आईकवत राहा सर

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Год назад

    💖💖💖भाषांतर गोड!

  • @meghakolhekar
    @meghakolhekar Год назад +1

    I could visualize the you at 2.30 am penning down this poem in the bus 😀 very nice to hear the story behind the close to heart poem which I must have heard umpteen times...!!
    You have a unique way of relating your poems-- even the romantic ones-- with a certain matter of fact expression on your face... The real expression is only in your eyes😊 so it's really amusing to "see" your poems....!! गुलाबाचे भाषांतर सुद्धा त्याच पद्धतीने सादर केलीत...! Actually I think in the history of poetry I don't think anyone would have come up with this metaphore.... But you make it sound so regular...😀 Lots of respect 🙏

  • @gaytrithorat8835
    @gaytrithorat8835 Год назад

    वाह सर... अप्रतिम अफलातुन आणि शेवटच्या चार ओळी तर खुप खुप सुंदर... तुम्ही म्हणालात तस कविता कधीही कुठेही आणि कोणतीही सुचू शकते माझ्या बरोबर पण असच होत आपण खुष असतानाही कधी विरहाच्या कविता सुचतात... असो तुमच्या शब्दांना किती आणि काय काय दाद द्यावी हेच कळत नाही... इतकी सुंदर कविता ऐकवल्या बद्दल तुमचे आभार ... अश्याच आम्हाला सुंदर सुंदर कविता ऐकवत रहा..धन्यवाद

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 Год назад

    तुमची एक दोन कविता स्पुहा च्या कार्यक्रमात ऐकल्या त्यावेळी पासून आवडला लागल्या खूप छान असतात

  • @sudnyathakur33
    @sudnyathakur33 Год назад

    गुलाबाच्या फुलाचे attar वाटले मला

  • @manohartongaonkar1938
    @manohartongaonkar1938 Год назад

    मनाला भावलेल्या कविता आहेत तुमच्या. स्वागतच !

  • @niranjankulkarni3651
    @niranjankulkarni3651 Год назад

    पुन्हा प्रेमात ❤️ दादा

  • @sharadkondejkar3105
    @sharadkondejkar3105 Год назад

    पोर्ट्रेट प्रथमच ऐकली . फारच सुंदर !

  • @bhalchandrashrikhande8128
    @bhalchandrashrikhande8128 Год назад

    गुलाबाच्या फुलाचं भाषांतर!!
    वाह वा, क्या बात है! झक्कास कल्पना!

  • @kunupat
    @kunupat Год назад

    रात्र सुंदर, चंद्र सुंदर... We would like to understand about this one.

  • @sameerbhosale2476
    @sameerbhosale2476 Год назад

    Wah Dada..... Apratim 👌👌👌

  • @nitijavartak1069
    @nitijavartak1069 Год назад

    गुलाबाच्या फुलाचे भाषांतर .. खूपच सुंदर👌

  • @amolkumbhar4751
    @amolkumbhar4751 Год назад

    kya bat…khupach sundar. mala thet college madhe gelyasarkhe vatale, tyaveli ayushavar bolu kahi madhe hoti he kavita

  • @minakshikulkarni5844
    @minakshikulkarni5844 Год назад

    👌👌👍💐

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 Год назад

    ❤दादा 👌🏻

  • @ganeshtarange6825
    @ganeshtarange6825 Год назад

    खूप इच्छा आहे दादा वाटतं
    भेट आपली एक होईल का
    येईल झळाळी कवितेला माझ्या
    चार ओळी तुझ्या सुरात गाशील का
    गणपत रामचंद्र तरंगे

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 Год назад

    पोर्ट्रेट मस्तच

  • @सुनीतिलिमये

    फार फार सुंदर