जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंबा मराठी पालखी सोहळा
HTML-код
- Опубликовано: 22 дек 2024
- कारंबा शाळेत आषाढी दिंडी उत्साहात साजरी
आज दिनांक 15 जुलै 2024 रोजी जि प प्रा शाळा कारंबा मराठी या शाळेमधून आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेषामध्ये दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडीमध्ये विठ्ठल,रुक्मिणी,संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मीराबाई,संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजामाता अशा प्रकारच्या वेशभूषा केलेले अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. या बालदिंडीमध्ये गावातील सर्व अबालवृद्ध,महिला तसेच पुरुष देखील सहभागी झाले होते.गावातील वारकरी संप्रदायाने व भजनी मंडळाने या बालदिंडीसाठी आवश्यक असणारे टाळ, मृदंग, विना,केशरी ध्वज अशा प्रकारचे साहित्य दिले होते. बालदिंडीमध्ये 'ग्यानबा तुकाराम'च्या गजरामध्ये सर्व विद्यार्थी ठेका धरून पाऊल खेळत होते. तसेच गावातील प्रत्येक चौकामध्ये रिंगण सोहळा पार पडला.यामध्ये माऊली माऊली या गीतावरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच गावातील अबाल वृद्ध, विद्यार्थी व शिक्षक या सर्वांनीच फुगडी या खेळाचा आनंद घेतला. आजच्या बाल दिंडीस गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते.
बालदिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पुंडलिक नवले सर, श्री सचिन घुगे सर, श्री सोमनाथ मिसाळ सर, श्री वैभव गवळी सर, श्रीमती गीता गायकवाड मॅडम, श्रीमती तेजश्री ढगारे मॅडम, श्रीमती लता सूर्यवंशी मॅडम,श्रीमती मंदाकिनी शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
• #marathi #education #ज...
#marathi #education #15ऑगस्ट2024
• #सुपर डुपर शाळा पार्टी
#जिपप्राथमिकशाळाकारंबामराठी
#viralvideo #schools #rakshabandhan
#viralshorts #youtubeshorts #government
@marathi_school #video #youtube #schoollife
#पांडुरंगअभंग #pandharpur #bhajan