भुईमूग लागवड (Groundnut cultivation): वाणाची निवड, खत, तन, कीड, रोग, पाणी यांचे व्यवस्थापन व काढणी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 фев 2024
  • भुईमूग लागवड (Groundnut cultivation): वाणाची निवड, खत, तन, कीड, रोग, पाणी यांचे व्यवस्थापन व काढणी.
    भुईमूग पिकाचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान.
    लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती
    उत्पन्नामध्ये वाढ 100%
    भुईमूग लागवड: वाणाची निवड, खत, तन, कीड, रोग, पाणी यांचे व्यवस्थापन.
    ask
    भुईमूग किती दिवसात येते?,
    भुईमूग ही खरीप पीक आहे का?,
    भुईमुगाची पेरणी कशी होते?,
    भुईमुगाच्या बिया पेरण्यासाठी भारतात कोणता हंगाम आणि महिने चांगले आहेत?,
    भुईमूग लागवडीसाठी कोणता महिना चांगला आहे?,
    केरळमध्ये भुईमूग पिकतो का?,
    भुईमुगासाठी सर्वोत्तम खत कोणते?,
    भुईमुगासाठी कोणते खत चांगले आहे?,
    आपण वनस्पतींसाठी भुईमूग केक कसे वापरता?,
    भुईमुगासाठी अंतर किती?,
    भुईमुगाचे सर्वाधिक उत्पादक कोण?,
    भारतात भुईमुगाचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?,
    केरळमध्ये कोणती पिके घेतली जातात?,
    भुईमुगासाठी कोणती माती योग्य आहे?,
    भुईमुगाचे बियाणे प्रति हेक्टर किती?,
    भुईमुगाची काढणी कोणत्या महिन्यात केली जाते?,
    भुईमुगाच्या बियांच्या बीजप्रक्रियेसाठी बुरशीनाशक, आणि बॅक्टेरिया कल्चर खतांचा वापर कसा केला जातो?,
    भुईमुगाचे जीवनचक्र काय आहे?,
    शेंगदाणा बियाणे म्हणजे काय?,
    भुईमुगाला तेलबियांचा राजा का म्हणतात?,
    भुईमुगाचे उपयोग काय?,
    भुईमूगाचे जैविक महत्त्व काय आहे?,
    भुईमुगाची पेरणी कशी होते?,
    भुईमुगाच्या बिया पेरण्यासाठी भारतात कोणता हंगाम आणि महिने चांगले आहेत?,
    भुईमूग लागवडीसाठी कोणता महिना चांगला आहे?,
    केरळमध्ये भुईमूग पिकतो का?,
    या पद्धतीने करा उन्हाळी भुईमुगाची लागवड
    महाराष्ट्रात तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते.
    महाराष्ट्रात तेलबिया पिकांची (Oil seed crop) मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते.
    खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामातील (Summer Season) भुईमुगाची उत्पादकता (Groundnut Cultivation) जास्त असते. जमिनीत पुरेसा ओलावा, भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे हवामान या बाबी पिकाच्या वाढीस पोषक ठरतात.
    मध्यम,पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन लागवडीस योग्य असते.
    या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे हवा कायम खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन आऱ्या सहजतेने जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
    पूर्वमशागत करताना जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे.
    पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळावे.
    बुरशीनाशकांच्या बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर पेरणीसाठी वापरावे.
    भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीस उशीर होईल तशी उत्पादनात घट येते.
    पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. फुटके, कीडके, साल निघालेले, आकाराने लहान बी काढून टाकावे.
    लागवडीसाठी टी.जी. २६, एस.बी.- ११, जे.एल.- ५०१, टी.ए.जी.२४ या जातीचे हेक्टरी १०० किलो बियाणे लागते.
    फुले उन्नती, फुले उनप (जे.एल.- २८६), फुले भारती (जे.एल.- ७७६)- या जातीचे हेक्टरी १२०-१२५ किलो बियाणे लागते
    भुईमूग लागवड ही पेरणी आणि टोकण पद्धतीने करता येते. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून पेरणी करावी. उगवण झाल्यानंतर लगेच नांग्या भराव्यात.
    इक्रिसॅट पद्धतीने लागवड करण्यासाठी ट्रॅक्टर बेड यंत्राच्या साह्याने ९० सेंमी रुंदीचे वाफे तयार करून घ्यावेत. किंवा पूर्वमशागतीनंतर १.२ मीटर अंतरावर छोट्या नांगराच्या साह्याने ३० सेंमी रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात.
    त्यामुळे ९० सेंमी रुंदीचे रुंद गादीवाफे तयार होतात.वाफ्याची रुंदी १५ ते २० सेंमी ठेवावी. रुंद वाफ्यावर दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून टोकण पद्धतीने भुईमूग लागवड करावी.
    शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
    पेरणीच्या वेळी नत्र २५ किलो आणि स्फुरद ५० किलो द्यावे. ही खतमात्रा युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून द्यावयाची झाल्यास, युरिया ५४ किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट ३१२.५ किलो द्यावी.
    सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून स्फुरद दिल्यामुळे भुईमुगास आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि गंधक ही अन्नद्रव्ये पिकास मिळतात.
    अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतमात्रेसोबत ४०० किलो जिप्समचा वापर करावा. पेरणीवेळी २०० किलो जिप्सम आणि उर्वरीत मात्रा आऱ्या सुटताना द्यावी.
    Groundnut Cultivation: शेतकरी मित्रांनो भुईमुगाच्या 'या' वाणाची करा लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न
    भुईमूग शेतीतून चांगले उत्पादन काढायचे असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भुईमुगाच्या सुधारित वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. जेणेकरून ते कमी वेळेत वाढू शकतील आणि चांगले उत्पादन देऊ शकतील.
    भुईमूग शेतीतून चांगले उत्पादन काढायचे असेल तर शेतकऱ्यांनी (farmers) आपल्या शेतात भुईमुगाच्या सुधारित वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. जेणेकरून ते कमी वेळेत वाढू शकतील आणि चांगले उत्पादन देऊ शकतील.
    भुईमूग लागवडीसाठी काही सुधारित वाणाबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
    1) 425 - भुईमुगाच्या या जातीला राज दुर्गा या नावानेही संबोधले जाते, या जातीची झाडे दुष्काळ सहन करणारी आहे. ही जात बियाणे पेरल्यानंतर सुमारे 120 ते 125 दिवसांनी उत्पादन देऊ लागते. एक हेक्टर क्षेत्रातून सुमारे २८ ते ३६ क्विंटल उत्पादन घेता येते.
    2) HNG10 - भुईमुगाची ही जात जास्त पावसाच्या प्रदेशासाठी योग्य मानली गेली.

Комментарии • 25

  • @veersenmugulkhode1963
    @veersenmugulkhode1963 16 часов назад +1

    आमच्या कडे धनलक्ष्मी बियाणे आहे
    धनलक्ष्मी बदल काय माहिती आहे का?

  • @nareshravankar8094
    @nareshravankar8094 3 месяца назад +4

    दादा पावसाळी भुईमुग लागवड कुठ कुठ केली जाते कोणाला आहे का काही आयडिया

  • @indianculture2459
    @indianculture2459 5 месяцев назад +3

    माहिती पूर्वक व्हिडिओ ❤

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 месяца назад +2

    Sir फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @shivamstores4093
    @shivamstores4093 2 месяца назад +2

    छान माहिती दिली साहेब 👌

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 23 дня назад +2

    स्टेप बाय स्टेप माहिती सांगा कोणते आऊषध किती दिवसांनी हे पण सांगा

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  22 дня назад +1

      पुढच्या व्हिडिओ पासुन या कडे नकीच लक्ष देवु

  • @devidasnil7291
    @devidasnil7291 12 дней назад +1

    Purna ka taaja calculation Kara

  • @rakeshsapakale1114
    @rakeshsapakale1114 2 месяца назад +3

    Ok

  • @AllauddinMullani
    @AllauddinMullani Месяц назад +1

    भुईमूग उगवल्यावर जिप्सम टाकलं तर चालतय काय

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 2 месяца назад +2

    कोणतं तणनाशक चालत

  • @arunhadke1349
    @arunhadke1349 22 дня назад +1

    1:21 1:21 भुईमूग पिकाला मातीची भर केव्हा लावावी 0:44 0:44 0:44 0:44 1:17

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  22 дня назад +1

      पिकाला फुल येण्याच्या आगोदर

    • @arunhadke1349
      @arunhadke1349 22 дня назад

      @@krushisavardhanmaharashtra भुईमूग पेरून एक महिना झाला फुल दिसत आहे मग आता माती केव्हा लावावी

  • @bhgwangaykwad5728
    @bhgwangaykwad5728 14 дней назад +1

    Lamda

  • @Sanvidhanpremi.2162
    @Sanvidhanpremi.2162 10 дней назад +1

    एकदम बेकार