ujani dam update : उजनी धरणात येणारी आवक दुप्पट झाली उजनी धरण अपडेट | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #ujanidam #उजनी #Ujanidamupdate #ujani_water_level #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : उजनी धरणात येणारी आवक दुप्पट झाली उजनी धरण अपडेट | Hello Baliraja
    राज्यात सांगली, सातारा, कोल्हापूर भागात मुसळधार पाऊस होत आहे. या भागातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात १५ हजाराहून अधिक क्युसेकने आवक येत आहे. मागील २४ तासात २ टीएमसी हून अधिक पाणी धरणात जमा झाला आहे. येत्या काही तासात महाराष्ट्रातील विविध भागात चांगला पाऊस होईल. असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.
    आज गुरूवार ३ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. यामध्ये उजनी धरणात सद्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ४ हजार ५१९ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. कालच्या तुलनेत आज आवकमध्ये वाढ झाली आहे. काल उजनी धरणात २ हजार १७१ क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४१.९९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस २१.६७ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ४०.४४ टक्क्यावर आहे.
    दरम्यान, उजनी धरणात ७ जूनपासून आजपर्यंत १० टीएमसी हून अधिक पाणी झालं आहे. तर उजनी धरण २१ टक्क्यांनी वधारलं आहे. यामुळं उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळालाय.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 6