KARN PRAYAG | कर्ण प्रयाग | पिंडार आणि अलकनंदा या नद्यांच्या संगमाचे ठिकाण.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024
  • [चार धाम यात्रेवरील सचित्र व्याख्यान पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा : • CHAR DHAM YATRA Speech...
    चार धाम यात्रा ही भारतातील उत्तराखंड उर्फ उत्तरांचल राज्यातील गढवाल भागामध्ये असणाऱ्या यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ या चार धामांची तीर्थयात्रा आहे. या यात्रेला "छोटी चार धाम यात्रा" असेही म्हणतात. केवळ धार्मिक महत्व म्हणून नाही तर अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यात एकदा तरी ही यात्रा केली पाहिजे. आणि ती देखील तरुणपणीच.
    आम्ही सप्टेंबर 2023 मध्ये हि यात्रा 17 दिवसांमध्ये केली. या यात्रेमध्ये आम्ही दिल्ली वरून सुरुवात करून हरिद्वार, डेहराडून, लाखामंडल, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगनानी, हर्सिल, गरतांग गली, गंगोत्री, गोमुख, अगस्तमुनी, गुप्तकाशी, नारायणकोटी, त्रियुगीनारायण, गौरीकुंड, केदारनाथ, उखीमठ, चोपता, तुंगनाथ, गोपेश्वर, जोशीमठ, गोविंदघाट, हेमकुंड, व्हॅली ऑफ फ्लॉवर, बद्रीनाथ, माना, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग, हृषीकेश इ. ठिकाणे पाहून पुन्हा दिल्ली येथे आलो. या सव ठिकाणांचे प्रवास वर्णन, तेथील स्थानमाहात्म्य, भौगोलिक स्थान, पौराणिक व लोककथा इत्यादी माहिती या संपूर्ण व्याख्यानामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. श्री अंबिकामाता भजनी मंडळ, 314, शुक्रवार पेठ, शिवाजी रोड, पुणे यांनी नवरात्रोत्सवामध्ये शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी या व्याख्यानाचे आयोजन केले होते.]
    या यात्रेमध्ये बद्रीनाथ वरून निघाल्यानंतर ऋषिकेश-हरिद्वार येथे येत असताना अलकनंदा नदीला अनेक नद्या येऊन मिळतात. पैकी काही प्रमुख नद्या जेथे मिळतात त्यास संगम किंवा "प्रयाग" असे म्हटले जाते. पैकी पिंडार ग्लॅशियर येथून येणारी पिंडार नदी आणि अलकनंदा नदीचा संगम "कर्ण प्रयाग" येथे होतो. येथे एका तीरावर उमा देवीचे उर्फ पार्वती मातेचे मंदिर असून येथेच कार्तिकेय यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. तसेच एका तीरावर कर्ण शीला असून येथे कर्णाने तपश्चर्या केली व सूर्यदेवाकडून कवचकुंडले मिळविल्याचे सांगितले जाते. स्वामी विवेकानंद यांनी देखील १८ दिवस येथेच ध्यानधारणा केली. असे हे पवित्र ठिकाण आपण अवश्य पाहावे.
    Contact : / aniketyadav1984
    #chardhamyatra
    #uttarakhandyatra
    #karnprayag

Комментарии •