Rain in maharashtra : ढगफुटीसदृश्य पाऊस, अवघ्या काही तासात घरात २ फुटापर्यंत पाणी | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #पाऊस #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst
    Rain in maharashtra : ढगफुटीसदृश्य पाऊस, अवघ्या काही तासात घरात २ फुटापर्यंत पाणी | Hello Baliraja
    अवघ्या १४ तासात तब्बल १२१.६७ मिलीमीटर पाऊस पडलाय. या ढगफुटीसदृश्य पावसानं हाहाकार माजला. अनेक घरांमध्ये २ फुटांपर्यंत पाणी तुंबल्यांच दृश्य पहायला मिळालं. आता पाऊस बंद झालेला असला तरी पाणी ओसरत नसल्यानं नागरिकांची चिंता वाढलीये.
    सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    पनवेलमध्ये काल शनिवारी मध्यरात्रीपासून आज रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तुफान पाऊस झाला. या पावसामुळं कळंबोली परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. कळंबोलीतील सेक्टर २ ते १० या परिसरातील तळमजल्यावरील घरांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय.
    महापालिका क्षेत्रात सर्वत्र तुंबलेले पाणी धरण तलावात तसेच लोकवस्तीपासून दूर फेकण्यासाठी पालिकेने ७० मोटारपंप लावले होते. त्यापैकी २७ मोटारपंप हे एकट्या कळंबोली वसाहतीमध्ये लावल्यात आले होते. तरी देखील पाणी ओसरलं नाही. कासाडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलाय. यामुळे परिसरातील लोकांना स्थलांतरीत करण्यात आलंय.
    -------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 1

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 Месяц назад

    बातमी कितीही गंभीर असू द्या मात्र लाईक मागण्याची सवय मात्र सोडू नका