Это видео недоступно.
Сожалеем об этом.

maharashtra weather : राज्यातील या भागात पावसाचा जोर वाढणार | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #strom #maharashtra_weather #imd #IMD_On_rain #IMD_weather_today #IMD_weather #rain #cloudburst #maharashtra_weather_news #maharashtra_weather_live
    maharashtra weather : राज्यातील या भागात पावसाचा जोर वाढणार | Hello Baliraja
    राज्यातील बहुतांश ठिकाणी अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे पण तो सर्वदूर नाही. पण आता अशात हवामान विभागानं एक नवा अंदाज सांगितला आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यात एकीकडं पाऊस होतोय तर दुसरीकडं पावसाची प्रतिक्षा आहे.
    हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळं या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनंगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
    संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच खानदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. तर मध्यम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •