Wedding Rukhwat Decoration Ideas | Saptapadi | Soubhagya alankar | Aai cha Nirop | madebymayuri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • Hello Everyone , In this Video I have shown 4 most used Rukhwat Items in wedding for decoration. This includes Mahercha chuda , Aai cha Nirop , Soubhagya Alankar and Saptapadi .
    Rukhwat ideas for wedding homemade
    Rukhwat items how to make at home | Saptapadi Rukhwat | Saubhagya Alankar Rukhwat | Rukhwat ideas for wedding homemade | Rukhwat making at home | Rukhwat saman |
    Below is the typing content for your refernce.
    1. माहेरचा चुडा
    ===================
    1. पहिली बांगडी मायेची पाखरन चित्ती हुरहुर जाण माऊलीची
    2. दुसरी बांगडी पितृऋण दाटे आनंदाश्रु नयनांचे कन्यादान परक्याचे
    3. तिसरी बांगडी पृथ्वीमोलाची , लेणे सौभाग्याचे तुझे सखे गौरीहार
    4. चौथी बांगडी मनोमन घेई ओढ, कुंकुवाच्या धन्यासाठी नव्या माहेरची सोड
    5. पाचवी बांगडी सासुबाई सुखावती लेकाच्या गं जीवनात आज येई गृहलक्ष्मी
    6. सहावी बांगडी मामंजीचे कौतुक , मजेत गात नणंदेच्या मुलायम विनोदाची
    7. सातवी बांगडी शोभा वाढवी चुड्याची लाडकी आज सासरला जायची
    2. सौभाग्य अलंकार
    ====================
    सौभाग्याचा हा सर्वात मोठा अलंकार पौर्णिमेचा चंद्रासारखा वाढत राहो.
    कुड्या कुंडले डुल ही मुद्दाम जड आहेत कारण तुझे कान हलके होऊन त्यांनी वाईट काही ऐकु नये.
    अंगठीतील तेजस्वी रत्नाप्रमाणे तुझे रुप उजळु देते.
    नथेत हिरे माणके आहेत, नाकापेक्षा मोती जड होऊन तुझे नाक गर्वाने मुरुडु नये.
    बांगड्या, बिलवर, पाटल्या, गोठ, तोडे इत्यादी हस्तभुषण आहेत या अलंकारीक हाताने तू विपुल दानधर्म कर.
    नुपूर, साखळ्या, तोरडे, पैंजण हे नित्य पायाशी ठेव या सर्वामुळे तुझे पाऊल कधीही वेडे वाकडे पडणार नाही.
    हे नित्य अंगा खांद्यावर ठेवून त्याच्या भारा खाली रहावे. हे ज्या हृदयाच्या समीप असेल त्या हृदयात
    प्रेम, वास्तल्य, माया यांचा भरपूर वास असू देत .
    3. आईचा निरोप
    =================
    नमस्कार करतेस?
    शुभ- आशिर्वाद.
    जीवनाच्या प्रवासाचे पहिले पाऊल,
    मग डोळ्यात अश्रू का?
    अग सगळेच या वाटेने जातात.
    पहिला मायापाश तोडणे कठिण,
    पण नविन जोडणे त्याहुन कठिण,
    माहेरची नाती जोडायची असतात.
    सासरची नाती जोडायची असतात.
    ती अशी जोडायची असतात की,
    जोडणी दिसता कामा नये.
    आत्ता पर्यंतचे तुझे हट्ट पुरवले,
    आता मात्र तुला दुस-याचे
    हट्ट पुरवायचे आहेत.
    सासु, सासरे , दीर,नणंद अन् पति,
    एकाचा हट्ट पुरवताना दुस-यांना
    दुखावता कामा नये.
    या सगळ्यांचा तोल म्हणजे संसार..
    आता प्रत्येक क्षण म्हणजे परिक्षा
    अनिर्णित परिक्षा म्हणजे संसार,
    आता तु परिक्षेला बसणार,
    पास-नापास मात्र आई-वडिल ठरवतील,
    तु विद्यार्थिनी,
    निकाल मात्र नियतीच्या हाती .
    या जगावेगळ्या पराक्षेचे नाव
    म्हणजे संसार..
    आता प्रत्येक क्षण हार-जीत
    पचवायचे सामर्थ्य संसारात हवे.
    मात्र फळांची अपेक्षा न करता
    करत जायचे..
    चांगले पेरले तर चांगलेच उगवते.
    आई-वडिलांचा आशिर्वाद,
    पूर्वजांची पुण्याई आणि
    हितचिंतकाच्या शुभेच्छा व
    जीवनसाथीदाराचा आधार
    धरलेला हात प्रियतम पतिचा आहे,
    तसेच सदैव वैभवाकडे नेणारा आहे,
    हे लक्षात ठेव म्हणजे
    संसारात समाधानी होशील.
    जगाच्या पाठीवर कोठेही रहा,
    संसारातील अडचणींना धिटाईने
    सामना कर,
    यशस्वी होशील,
    सुखी होशील....
    4. सप्तपदी
    ==========
    1. हे सौभाग्य कांक्षिणा आज तुझ्या सौभाग्याची सुरुवात होत आहे कालचा अल्लडपणा विसरून नव्या जवाबदारीचे हे१ले पाऊल उचलतांना आजचा हा शुभदिन मनात जन्मभरघोळत राहणार आहे
    2. हे रमणी , हे २ रे पाऊल सहनशीलतेचे आहे . संसाराची तुझी रम्य सोनेरी स्वप्ने साकार होत असतांना कुठे बिनसले खटकले तरी सहशीलतेच्या गुणांची जोपासणा करून कुटुंबातील आनंद टिकवण्याचा प्रयत्न तू केला पाहिजेस
    3. हे भाग्यलक्ष्मीस्त्री जीवनाचा इतिहास तुला ठाऊक आहे ना तिने स्वतः साठी कधीच काही मागितले नाही पतीला देवासमान मानले याच आंनदाने व अभिमानाने तुला हे ३ रे पाऊल उचलायचे आहे
    4. हे स्वामिनी तुझा सहप्रवासी तुझा नुसता पती नाही तर सोबती सुध्दा आहे ही सोबत तुम्ही एकमेकांना द्यावयाची म्हणुन तुला हळुच सांगावेस वाटते की पुरुष लबाड असतात हे लक्षात ठेवुनच हे ४थे पाऊल उचलायच हं
    5. हे सगृहिणी , केवळ तू व तुझा पती म्हणजे सारा संसार असे न मानता , संसारातील इतरांनाही आपण हवे आहोत हे लक्षात ठेव , या परिक्षेच्या क्षणी सर्व प्रश्नांची बिनचूक उत्तरे देण्याचा आत्मविश्वासाला हे ५ वे पाउल उचलतांना बाळगला पाहिजेच बरे का !
    6. हे संसारी स्त्री सुखाच्या संसारात विहार करताना तुला मोहाचा क्षण आवरून धरला पाहीलेस , कारण तुझ्या बरोबरीचे नणंदा , दीर आहेत . हे ६ वे पाऊल उचलताना पतीच्या जबाबदारीचा अर्धा वाटा तू उचलला पाहीजेस बरं का!
    7. हे मातृदेवते तुझ्या स्त्रीत्वाची सांगता घेण्याची वेळ आता समीप आली आहे. अश्या वेळी जीवनातले हे ७ वे पाऊल उचलताना त्या संसार वेलीवरील फुलांत सौंदर्य , सुगंध , माधुर्य, ओतण्याची तुझ्यावरच आहे हं !

Комментарии • 8