#Salher

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • साल्हेरचे युद्ध इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला. तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी सूर्याजी काकडे मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठवले. इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता. ‘एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली. एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली. मोठे युद्ध जाहले. मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती तर मराठी फौज त्यांच्या तुलनेने सुमारे पन्नास हजार इतकीच होती. मोगल, पठाण, रजपूत, तोफची, हत्ती, उंट, आराबा घालून युद्ध जाहले. युद्धात जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजांकडे गणतीस आले. सव्वाशे हत्ती सापडले. सहा हजार उंट सापडली. मालमत्ता, खजिना, जडजवाहीर, कापड अगणित बिछाइत हातास लागली. बावीस नामांकित वजीर धरिले. युद्धात खासा इख्लासखान याचा पाडाव झाला. हजार-दोन हजार सडे, सडे पळाले, असे युद्ध जाहले.’ या युद्धात शिवाजीराजांचे एक सहकारी पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे हे छोट्या तोफेचा गोळा लागून पडले. महाराज म्हणाले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता.' साल्हेरच्या युद्धाचा मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. तेव्हापासून ते शिवाजी महाराज अजिंक्य आहे असे मानू लागले.
    Music By : Epidemic Sound
    Download The App 👇🏻
    apps.apple.com...
    For more information
    Follow me on Instagram
    ...
    धन्यवाद .

Комментарии • 10

  • @MANISHGaMeR-7888
    @MANISHGaMeR-7888 9 месяцев назад +1

    Jay Shivaji ❤ 🚩

  • @kirannikamvlogs8577
    @kirannikamvlogs8577 9 месяцев назад +1

    💯💯💯💯💥

  • @shreya6650
    @shreya6650 9 месяцев назад

    🚩जय शिवराय 🚩

  • @hrutikdandge6733
    @hrutikdandge6733 8 месяцев назад +2

    1 day kelet bhava salher salota

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog 8 дней назад

    🚩जय शिवराय🚩
    अप्रतिम ट्रेक.संकेत भाऊ, आणि तुमचे मित्र अप्रतिम ट्रेक.या दोन्ही ट्रेक गाईड ची आवश्यकता आहे का.

    • @sanketkhadefilms
      @sanketkhadefilms  7 дней назад +1

      ट्रेक मोठा आहे
      ट्रेक गाइड असेल तर सोप जाईल