खूप छान, प्रदीर्घ, अनुभव संपन्न मुलाखत झाली... प्रत्येक मुद्यावर भरभरून बोलल्या... शब्द हे अभिनयाचं गर्भ रूप असतं हा मुद्दा मनावर ठसला... ' क्षणस्थ ' हा शब्दप्रयोग फार आवडला.. प्रत्येक भूमिकेचा गालिचा तुम्ही छानच विणला आहे, हेच शेवटी सांगावसं वाटतं... धन्यवाद इलाताई... धन्यवाद रंग पंढरी
ईलाताईंच व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न आहे. एका लग्नाची गोष्ट मधली आईची भूमिका त्यांनी फारच सुंदर केली. ईला ताई तुम्हाला अजून ही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहायला आवडेल. रानडे सरांबद्दल असलेला आदर तुमच्या बोलण्यातुन खूप जाणवला व प्रत्येकाच श्रेय त्याला त्याला दिलंत हि खूप मोठी गोष्ट आहे तुमची, जे अभावाने आढळते.यु टर्न तर बेस्टच. खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम मुलाखत! श्री अशोक रानडे या अादरणीय व्यक्तीमत्वाची आठवण खूप आवडली! शब्द, संवाद,देहबोली याची माहीती आवडली ! ईला भाटे यांनी " बँरीस्टर " मधील" मावशी " ची भूमिका अप्रतिम केली आहे! एक गुणी अभिनेत्री! ❤❤
अप्रतिम !! याशिवाय शब्दच नाहीत. मागच्या अनेक भागांसाठीची मनातली प्रतिक्रिया अशीच आणि अशीच होती... इला भाटे यांनी इतक्या सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत... क्षणस्थ होणं ही त्यापैकी एक !! त्यांची मेहनती आणि अभ्यासू वृत्ती, प्रामाणिकपणा फार भावून गेला. मधुरणी मॅम.. सुंदर दिसलात.. आणि बोलते करण्याची हातोटी मस्त... तुम्हाला आणि तुमच्या team ला अनेकानेक शुभेच्छा !!
अप्रतिम. ईला ताईंच दुसरा सामना हे नाटक पाहिले आहे. आवाजाचा आणि शारीरिक हालचालींचा उपयोग नाटकात करणारी प्रयोगशील अभिनेत्री आहेत. शब्दोच्चार अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट असतात. खूप छान.
आजतागायत रंगपढंरीमधे झालेल्या मुलाखतींमधे सागर देशमुख यांची मुलाखत जितकी अनपेक्षित सुंदर झाली त्याहीपेक्षा कितीतरी पटीने सुखद धक्का देणारी इलाताईंची मुलाखत झाली 👌🏻👌🏻👌🏻 फार फार फारच सुंदर
नेहमी प्रमाणेच रंगलेली अप्रतिम मुलाखत! छान बोलतं केलंत, कुठेही न थांबवता त्यांना बोलू दिलंत, हे विशेष! कलाकारांना/नटांना सुद्धा खूप काही सांगायचं असतं, अनुभवलेलं,भावलेलं योग्य श्रोत्यांना सांगण्यात त्यांनाही रस असतो,त्यातला आनंद ही त्यांना मिळतो. त्यांची वैचारिक समृद्धता,आणि "नझरीया" समजतो. ईला ताई.....अजून खूप वेगवेगळ्या भूमिकेत तुम्हाला बघायची इच्छा आहे,प्रत्येक भूमिकेला तुम्ही अचूक न्याय देऊ शकाल! मुलाखत घेणाऱ्या ताई.......तुम्ही छान बोलतं करता,पाहुण्याला लिंक तोडू न देता भरभरून बोलू देता.... तुमचं काम/ड्युटी उत्तम करताय प्लस पाहुण्याला विषयात गुंतवून मनातले भाव,विचार बाहेर काढून घेता..... रंगपंढरी......बॅटींग खूप slow होत आहे अजून खूप कलाकार,अपेक्षा,मुलाखतीची अपेक्षा आहे. आधी सिनिअर आणि सध्या काम न करणारे ह्यांना पण बोलतं करा! खूप खूप शुभेच्छा!
Slow batting - :) तुम्हाला अजून खूप आणि लवकर हवं आहे ह्यातच तुमचा उपक्रमाबद्दलचा जिव्हाळा प्रतीत होतो. धन्यवाद! - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
वाह मला इलाताई ,खूप आवडतात.त्यांचा आवाज खूपच घरातला वाटतो.पण त्या मागे आवजाचे इतके शास्त्र असते हे आजचं समजले.क्षणस्थ तर छानच.देवस्मोरील नैवेद्याच्या ताटातले वरणभात वर साजुक तूप, तुळशी चे पान ही मुद म्हणजे इला ताई . खुप शुभेच्छा. मधुराणी आणि टीम खूप धनयवाद. मुलाखत कशी घ्यावी याचे उदाहरण म्हणजे मधुराणी. दोघींचे वस्त्र ही छान.
खूपच छान मुलाखत इला भाटे यांची पाहिली,ऐकली.उत्तरे फारच छान आणि छोट्या छोट्या उदा.दिली.त्याचबरोबर मधुराणी यांनी फक्त प्रश्न विचारले व इला ताईंना बोलत केलं.मुलाखतीचा उत्कृष्ट नमुना.😊😊👌👌
नेहमीप्रमाणे खुप सुंदर मुलाखत झाली मला आवडली इला भाटे या माझ्या आवडीचा कलाकारl अभिनेत्री आहेत . त्यांच्या बोलण्यात / त्यांच्या चेहऱ्यात एक निरागसता मला दिसते रंगपंढरी मधे प्रत्येक कलाकाराचा अनुभव जस त्यांना काही देऊन / शिकवुन जातो तस आम्हांलाही काहीतरी देऊन जातो .एक नविन उर्जा मिळते म्हणुन रंगपंढरीचे आभार मनापासुन आभार व शुभेच्छा
मधुराणी नेहमीप्रमाणेच ही पण २ भागामध्ये झालेली मुलाखत छान झाली, ईला भाटे ह्या पण खूप छानच नाटक करताना किती गोष्टी शिकाव्या लागतात ते ह्या मुलाखतीत अगदी खूप छान सांगत होत्या. ऐकायला मजा येत होती.
इला ताई , शब्दाला रंग रूप गंध आणि व्यक्तिमत्व असतं हे आज तुमच्याकडून कळलं ... सुंदर अतिसुंदर. मी कधी असा विचारच केला नव्हता. त्याचबरोबर कलाकाराला कलेची म्हणजेच चित्रकलेची , गायनाची, नृत्याची सुद्धा आवड असेल तर तो एक पूर्ण कलाकार होतो हेही आजच ऐकलं. त्याचबरोबर आपल्यातल्या ज्या काही त्रुटी असतील त्या आपण मेहनतीने सुधारू शकतो हे पण आज तुमच्याकडून ऐकलं. आवाजाचा इतका अभ्यास असतो हे पण मी आज ऐकलं. बॅरिस्टर नाटक मी ४ वेळा बघितलं. खरंच तुम्ही त्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. लकबी, हातवारे, डोळ्यातून अभिनय !!! तुमची तारीफ करावी तेवढी थोडी !!! मला तर वाटतं भूमिकेवर एवढा अभ्यास करणारे मराठी अभिनेते आणि फार थोडे बॉलिवूड आणि हॉलिवूड मधलेच असतील. अशा उच्च दर्जाच्या कलाकारांना आपल्या मराठी रंगभूमीवर पाहणं हे माझं भाग्य समजतो. मी पार्ल्याला येत असतो पुढच्या वेळी तुम्हाला नक्की भेटायला येईन. आणि हो , तुमच्यापेक्षा मला तुमच्या मिस्टरांचं जास्त कौतुक वाटतं. त्यांनी तुम्हाला जे पाहिजे ते करू दिलं आणि तुम्ही त्याचं १०० टक्के चीज केलं !!!रंगपंढरीचे परत एकदा मस्त चविष्ट मेजवानी दिल्याबद्दल आभार. २ तास कसे गेले कळले नाहीत
खूप छान मुलाखत. शब्द आणि संवाद याचं महत्व खूप छान पध्दतीने अधोरेखित केलंय. या मुलाखती फक्त कलाकारांना अभिनय करण्यासाठी होणत नाही तर, आमच्या सारखे साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना देखील खूप उपयुक्त. आभार 🙏🙏
इला भाटे यांचे काम मला नेहमीच आवडत आले आहे. पण असे काम करताना त्या किती गोष्टींचा किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात हे पाहून ऐकून त्यांच्या बद्दलचे कौतुक आणि आदर खूपच वाढला Hats off to her 👏
खूप छान झाली मुलाखत.. आणि त्यांनी कमीत कमी इंग्रजी शब्द वापरून अधिक मराठी शब्दांचा प्रयोग अप्रतिमच. 👍 आमच्या सारख्या नवीन पिढीला इतके शब्द ऐकणे म्हणजे पर्वणीच.. 😊खूप धन्यवाद 👏❤️
मधुराणी, चेतन दातार यांचा ओझरता उल्लेख ऐकून सुद्धा बरे वाटले. इतक्या भागांमध्ये पहिल्यांदाच त्यांची आठवण निघाली! इतक्या वर्षांनी ते स्मरणात आहेत, हे पाहून समाधान वाटले.
Ila Bhate, is one of my favourite actors. Heard her after long long time. Thank you for inviting her on this platform and gave us an opportunity to hear her.
इला भाटे, माझ्या आवडत्या अभिनेत्री.....उत्तम अभिनय, उत्तम आवाज आणि संवाद फेक, प्रत्येक भूमिकेचा केलेला खोलवर अभ्यास , भूमिकेविषयी दिग्दर्शकांकडून केलेले शंका समाधान हे सर्व इलाताईंनी भरभरून सांगणे व आपण तल्लीन होऊन श्रवण करणे हे खूपच विलक्षण आहे....
खूप छान मुलाखत !!👏👏 नाटकातले शब्दांचे , संवादांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आणि त्याचा वापर कसा करावा , याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी लाभली. आवाजाच्या वापराची , त्याच्या जोपासनेची विविध तंत्रे कळली. एकूणच नाटकाकडे पाहण्याच्या अभ्यासू दृष्टिकोनात भर पडली .😊
Best interview till now & great interaction too. Sweetness personified. She happens to be my most fav. actress. Can write endless about her. Boundless beauty! ❤
प्रश्न तेच असले तरी विचार करण्याची पद्धत, खोली, दिशा, क्षमता यामुळे इला भाटे यांनी वेगळी उंची गाठली आहे व त्यांच्याकडे रानडे सरांकडून मिळालेले ज्ञान व स्वतःचा अनुभव संपन्न विचार पुढच्या पिढीला देण्याची क्षमता आहे.ते त्यांनी करण्याचा विचार करायला हवा.
खूप छान, प्रदीर्घ, अनुभव संपन्न मुलाखत झाली... प्रत्येक मुद्यावर भरभरून बोलल्या...
शब्द हे अभिनयाचं गर्भ रूप असतं
हा मुद्दा मनावर ठसला...
' क्षणस्थ ' हा शब्दप्रयोग फार आवडला.. प्रत्येक भूमिकेचा गालिचा तुम्ही छानच विणला आहे, हेच शेवटी सांगावसं वाटतं...
धन्यवाद इलाताई... धन्यवाद रंग पंढरी
Kiti ha abhyas!! Great! Mulakhat pan atishay sunder ghetali Madhurani tumhi! Ekandar sagali bhatti jamun aliy! Khup sunder Bhag 1 ani 2
ईलाताईंच व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न आहे. एका लग्नाची गोष्ट मधली आईची भूमिका त्यांनी फारच सुंदर केली. ईला ताई तुम्हाला अजून ही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहायला आवडेल. रानडे सरांबद्दल असलेला आदर तुमच्या बोलण्यातुन खूप जाणवला व प्रत्येकाच श्रेय त्याला त्याला दिलंत हि खूप मोठी गोष्ट आहे तुमची, जे अभावाने आढळते.यु टर्न तर बेस्टच. खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम मुलाखत! श्री अशोक रानडे या अादरणीय व्यक्तीमत्वाची आठवण खूप आवडली! शब्द, संवाद,देहबोली याची माहीती आवडली ! ईला भाटे यांनी " बँरीस्टर " मधील" मावशी " ची भूमिका अप्रतिम केली आहे! एक गुणी अभिनेत्री! ❤❤
अप्रतिम !! याशिवाय शब्दच नाहीत. मागच्या अनेक भागांसाठीची मनातली प्रतिक्रिया अशीच आणि अशीच होती... इला भाटे यांनी इतक्या सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत... क्षणस्थ होणं ही त्यापैकी एक !! त्यांची मेहनती आणि अभ्यासू वृत्ती, प्रामाणिकपणा फार भावून गेला. मधुरणी मॅम.. सुंदर दिसलात.. आणि बोलते करण्याची हातोटी मस्त... तुम्हाला आणि तुमच्या team ला अनेकानेक शुभेच्छा !!
अप्रतिम. ईला ताईंच दुसरा सामना हे नाटक पाहिले आहे. आवाजाचा आणि शारीरिक हालचालींचा उपयोग नाटकात करणारी प्रयोगशील अभिनेत्री आहेत. शब्दोच्चार अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट असतात. खूप छान.
आजतागायत रंगपढंरीमधे झालेल्या मुलाखतींमधे सागर देशमुख यांची मुलाखत जितकी अनपेक्षित सुंदर झाली त्याहीपेक्षा कितीतरी पटीने सुखद धक्का देणारी इलाताईंची मुलाखत झाली 👌🏻👌🏻👌🏻 फार फार फारच सुंदर
नेहमी प्रमाणेच रंगलेली अप्रतिम मुलाखत!
छान बोलतं केलंत, कुठेही न थांबवता त्यांना बोलू दिलंत, हे विशेष!
कलाकारांना/नटांना सुद्धा खूप काही सांगायचं असतं, अनुभवलेलं,भावलेलं योग्य श्रोत्यांना सांगण्यात त्यांनाही रस असतो,त्यातला आनंद ही त्यांना मिळतो.
त्यांची वैचारिक समृद्धता,आणि "नझरीया" समजतो.
ईला ताई.....अजून खूप वेगवेगळ्या भूमिकेत तुम्हाला बघायची इच्छा आहे,प्रत्येक भूमिकेला तुम्ही अचूक न्याय देऊ शकाल!
मुलाखत घेणाऱ्या ताई.......तुम्ही छान बोलतं करता,पाहुण्याला लिंक तोडू न देता भरभरून बोलू देता.... तुमचं काम/ड्युटी उत्तम करताय प्लस पाहुण्याला विषयात गुंतवून मनातले भाव,विचार बाहेर काढून घेता.....
रंगपंढरी......बॅटींग खूप slow होत आहे
अजून खूप कलाकार,अपेक्षा,मुलाखतीची अपेक्षा आहे.
आधी सिनिअर आणि सध्या काम न करणारे ह्यांना पण बोलतं करा!
खूप खूप शुभेच्छा!
Slow batting - :)
तुम्हाला अजून खूप आणि लवकर हवं आहे ह्यातच तुमचा उपक्रमाबद्दलचा जिव्हाळा प्रतीत होतो.
धन्यवाद!
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
वाह मला इलाताई ,खूप आवडतात.त्यांचा आवाज खूपच घरातला वाटतो.पण त्या मागे आवजाचे इतके शास्त्र असते हे आजचं समजले.क्षणस्थ तर छानच.देवस्मोरील नैवेद्याच्या ताटातले वरणभात वर साजुक तूप, तुळशी चे पान ही मुद म्हणजे इला ताई . खुप शुभेच्छा. मधुराणी आणि टीम खूप धनयवाद. मुलाखत कशी घ्यावी याचे उदाहरण म्हणजे मधुराणी. दोघींचे वस्त्र ही छान.
वाह वाह! मस्त उपमा, दीपिका जी. ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभार.
फारच अप्रतिम झाली आहे ही मुलाखत. किती बारकाईने भूमिकेचा विचार करतात इला मॅडम. खूप छान .
खूपच छान मुलाखत इला भाटे यांची पाहिली,ऐकली.उत्तरे फारच छान आणि छोट्या छोट्या उदा.दिली.त्याचबरोबर मधुराणी यांनी फक्त प्रश्न विचारले व इला ताईंना बोलत केलं.मुलाखतीचा उत्कृष्ट नमुना.😊😊👌👌
विस्तृत मुलाखत उत्तम झाली. विविधांगी भूमिका बाबतीत सुरेख मार्गदर्शन केले. विद्यार्थी म्हणून जो विचार मांडला तो भावला.
नेहमीप्रमाणे खुप सुंदर मुलाखत झाली मला आवडली
इला भाटे या माझ्या आवडीचा कलाकारl अभिनेत्री आहेत . त्यांच्या बोलण्यात / त्यांच्या चेहऱ्यात एक निरागसता मला दिसते
रंगपंढरी मधे प्रत्येक कलाकाराचा अनुभव जस त्यांना काही देऊन / शिकवुन जातो तस आम्हांलाही काहीतरी देऊन जातो .एक नविन उर्जा मिळते म्हणुन रंगपंढरीचे आभार
मनापासुन आभार व शुभेच्छा
Thanks स्नेहा जी.
धन्यवाद.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
मधुराणी नेहमीप्रमाणेच ही पण २ भागामध्ये झालेली मुलाखत छान झाली,
ईला भाटे ह्या पण खूप छानच नाटक करताना किती गोष्टी शिकाव्या लागतात ते ह्या मुलाखतीत अगदी खूप छान सांगत होत्या. ऐकायला मजा येत होती.
जणूकाही आधुनिक भरतमुनी.नाट्यशास्त्र शिकवणारे.सुंदर सखोल विचार इलाताईंचे.
अतिशय सुंदर मुलाखत! किती प्रगल्भ कलाकार आहेत इलाताई!सुंदरता आणि बुद्धिमत्ता यांचा सुंदर मिलाप आहे. तुम्हाला अनेक शुभेच्छा!
छानच! नेहमीप्रमाणे. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इलाताईंची भाषा! एवढी सुंदर, ओघवती आणि तरीही समृद्ध भाषा फार वर्षांनी ऐकली. धन्यवाद!
इला ताई , शब्दाला रंग रूप गंध आणि व्यक्तिमत्व असतं हे आज तुमच्याकडून कळलं ... सुंदर अतिसुंदर. मी कधी असा विचारच केला नव्हता. त्याचबरोबर कलाकाराला कलेची म्हणजेच चित्रकलेची , गायनाची, नृत्याची सुद्धा आवड असेल तर तो एक पूर्ण कलाकार होतो हेही आजच ऐकलं. त्याचबरोबर आपल्यातल्या ज्या काही त्रुटी असतील त्या आपण मेहनतीने सुधारू शकतो हे पण आज तुमच्याकडून ऐकलं. आवाजाचा इतका अभ्यास असतो हे पण मी आज ऐकलं. बॅरिस्टर नाटक मी ४ वेळा बघितलं. खरंच तुम्ही त्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. लकबी, हातवारे, डोळ्यातून अभिनय !!! तुमची तारीफ करावी तेवढी थोडी !!! मला तर वाटतं भूमिकेवर एवढा अभ्यास करणारे मराठी अभिनेते आणि फार थोडे बॉलिवूड आणि हॉलिवूड मधलेच असतील. अशा उच्च दर्जाच्या कलाकारांना आपल्या मराठी रंगभूमीवर पाहणं हे माझं भाग्य समजतो. मी पार्ल्याला येत असतो पुढच्या वेळी तुम्हाला नक्की भेटायला येईन. आणि हो , तुमच्यापेक्षा मला तुमच्या मिस्टरांचं जास्त कौतुक वाटतं. त्यांनी तुम्हाला जे पाहिजे ते करू दिलं आणि तुम्ही त्याचं १०० टक्के चीज केलं !!!रंगपंढरीचे परत एकदा मस्त चविष्ट मेजवानी दिल्याबद्दल आभार. २ तास कसे गेले कळले नाहीत
Thanks freebk! नेहेमी प्रतिक्रिया येतेच तुमची. आभारी आहे.
खूप छान मुलाखत. शब्द आणि संवाद याचं महत्व खूप छान पध्दतीने अधोरेखित केलंय.
या मुलाखती फक्त कलाकारांना अभिनय करण्यासाठी होणत नाही तर, आमच्या सारखे साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना देखील खूप उपयुक्त.
आभार 🙏🙏
चारुशीला जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभारी आहोत. 🙏
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
इला भाटे यांचे काम मला नेहमीच आवडत आले आहे. पण असे काम करताना त्या किती गोष्टींचा किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात हे पाहून ऐकून त्यांच्या बद्दलचे कौतुक आणि आदर खूपच वाढला Hats off to her 👏
सहज, साध, लाघवी असलेल्या इलाताई इथेही तशाच जाणवल्या.छानच झाली मुलाखत मधुराणी.
अप्रतिम मुलाखत. ईलाताईंनी प्रयत्नपूर्वक मराठी भाषेतच विवेचन केले त्याबद्दल विशेष धन्यवाद 🙏🏻
खूप छान मुलाखत एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली ईलाताईंची भुमिका मला खूपच आवडली
खूप छान झाली मुलाखत.. आणि त्यांनी कमीत कमी इंग्रजी शब्द वापरून अधिक मराठी शब्दांचा प्रयोग अप्रतिमच. 👍 आमच्या सारख्या नवीन पिढीला इतके शब्द ऐकणे म्हणजे पर्वणीच.. 😊खूप धन्यवाद 👏❤️
Khup chaan interview jhala. Ilatai spoke so well & in detail about her acting experiences, her drama career etc....
Khup chaan 👍 She is so simple and self made Artist ❤
Mulakhat sampuch naye asa wattay. Itki sundar mulakhat aahe. Aprateem zale donhi bhaag.😀😀
अप्रतिम मुलाखत
All phases of acting are explained so efficiently by great actor Ila Bhate. Really very much appreciable
Apratim..
her modesty makes it all appear like a commoner who has rightfully found her path .
Keep it up 👍
मधुराणी, चेतन दातार यांचा ओझरता उल्लेख ऐकून सुद्धा बरे वाटले. इतक्या भागांमध्ये पहिल्यांदाच त्यांची आठवण निघाली! इतक्या वर्षांनी ते स्मरणात आहेत, हे पाहून समाधान वाटले.
Thanks beautiful interview.
खुप सुंदर होती मुलाखत आणि ईला ताई धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा 😍
Ila Bhate, is one of my favourite actors. Heard her after long long time. Thank you for inviting her on this platform and gave us an opportunity to hear her.
Thanks for watching!
Such a nice detailing by Ila tai.
Thanks Madhurani.
Khoop chhan. Mala aadhipasun Ilatai awadayachyach. Aata ajun bhawalya.
ताळेबंदी च्या या काळात तुम्ही कलावंता बरोबर साधलेल्या सुसंवादा मुळे आमचे अनुभव विश्व सम्रुद्ध झाले त्या बद्दल तुमच्या सर्व टिमचे खुप खुप आभार.
अप्रतीम मुलाखत !!!
शब्दांच्या मूर्त रुपाकडून अमूर्त शोधणं...हे खूपच भावले....क्षणस्थ होण्याची जाणीव खूप छान!!
Khuuup chaan zali mulakhat. Apratim ILa tai
Khup informative aahe...
इला भाटे, माझ्या आवडत्या अभिनेत्री.....उत्तम अभिनय, उत्तम आवाज आणि संवाद फेक, प्रत्येक भूमिकेचा केलेला खोलवर अभ्यास , भूमिकेविषयी दिग्दर्शकांकडून केलेले शंका समाधान हे सर्व इलाताईंनी भरभरून सांगणे व आपण तल्लीन होऊन श्रवण करणे हे खूपच विलक्षण आहे....
प्रगल्भ ,अभिनयाचा सर्वांगीण अभ्यास, काही आम्हीही मिळवलं.आभार!
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद, रत्नाकर जी. 🙏
ताई, तुम्हाला लाभलेल्या ठिपक्यांची रांगोळी तुम्ही नक्कीच देखणी रंगवली आहे!
❤ salas , sojval , abhyasu , pragalbh vyaktimtv , kalaksr aani manus ...bhannat ..🙏🙏👍👍
Dear Madhurani , Keep exploring wonderful marathi drama personalities & science , art behind dramatis
❤ 😇🙏👍👍 Kerpup ...
छान जमली मुलाखत...आवाज बद्दल किती हा अभ्यास
खूप छान मुलाखत !!👏👏
नाटकातले शब्दांचे , संवादांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आणि त्याचा वापर कसा करावा , याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी लाभली. आवाजाच्या वापराची , त्याच्या जोपासनेची विविध तंत्रे कळली. एकूणच नाटकाकडे पाहण्याच्या अभ्यासू दृष्टिकोनात भर पडली .😊
नेहमीप्रमाणे खूप छान! कलाकार तुमच्याकडे येऊन खूप भरभरून, आणि मनसोक्त बोलतात.. हीच तुमची खासियत!
धन्यवाद P a जी. असाच आवर्जून कार्यक्रम पहात रहा.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Best interview till now & great interaction too. Sweetness personified. She happens to be my most fav. actress. Can write endless about her. Boundless beauty! ❤
खूप सुंदर आणि अभ्यास पूर्ण मुलाखत...👌👍
प्रश्न तेच असले तरी विचार करण्याची पद्धत, खोली, दिशा, क्षमता यामुळे इला भाटे यांनी वेगळी उंची गाठली आहे व त्यांच्याकडे रानडे सरांकडून मिळालेले ज्ञान व स्वतःचा अनुभव संपन्न विचार पुढच्या पिढीला देण्याची क्षमता आहे.ते त्यांनी करण्याचा विचार करायला हवा.
"क्षणस्थ " शब्द खूप आवडला! 👌👌👌
व्यामिश्र हा शब्द माहित असणारी आणि तरीही सहज वापरणारी, विक्रम गोखले स्कूल ऑफ अक्टिंग मध्ये घडलेली उत्तम अभिनेत्री.
आणखीन एक उत्तम भाग!
Thanks!
Beyond words.. captivating and meditative in itself! Thanks 😊
Khup chaan
Very very nice
Excellent interview. Thank you for uploading such great quality content. Very inspiring 😀😀😀🙏🏻
धन्यवाद देवकी जी. Glad that the channel content is resonating well with you. असाच कार्यक्रम पहात रहा.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
सीरियल मधली माझी आवडती आई आहे🙏❤️.....माझी आई पण अशीच होती🙂
सुंदर मुलाखत!
Thank you for great interaction!...
awajasathi kahi courses/workshops available ahet ka mhanje madam ni jase vyayam dakhavle
आशा काळे ताईंना मुलाखतीसाठी बोलावावे असं वाटतं.
Excellent
🙏🙏👏👌
💕
Cannot see Part 1!
ruclips.net/video/eu-ke1cDaQc/видео.html
छान
खूप छान!
मी email I D धारकाची पत्नी लिहित आहे, मधुराणी एंकर म्हणून अजिबात ठीक नाही....अरुंधति च ठीक.