पारंपरिक संगीत चालीतील फक्त १५ मिनिटांचा हरिपाठ - Traditional Haripath 15 Min -

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥
    संगीतमय २० मिनिटांचा हरिपाठ : • 23 मिनिटांचा संपूर्ण ह...
    कोरस सहित संपूर्ण ३० मिनिटांचं हरिपाठ : • Video
    Video Credits:
    Lyrics - Traditional
    Singer - Sachin Maharaj Mane
    Composer - Sachin Maharaj Mane
    Trust : Sant Shri Vaman Bhau Bhagvan Baba Maharaj Seva Samiti
    Music Label - DYMPlus (© & ℗ Santvani Marathi)
    Sampoorna Haripath (संपूर्ण हरीपाठ) is a collection of 28 abhangas or Bhajans composed by the thirteenth-century Marathi saint, Dnyaneshwar Maharaj. It is recited by Varkaris daily. Haripath is the creation of Abhangs by the great saint to perform Naam Smaran of Lord Vitthal. Haripath is very close to heart for every Varkari and it is recited daily in every Varkari home.
    भगवन्नामाचे महात्म्य, महत्त्व आणि महती जगातील सर्व संतांनी मुक्त कंठाने गायली आहे. प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात.अशा दिव्य नामाची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी २७ अभंगांचा हरिपाठ हा ग्रंथ प्रगट केला.
    ॥ एक ॥
    देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥
    असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
    ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ दोन ॥
    चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
    मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
    एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥
    ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ तीन ॥
    त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
    सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥
    अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥
    ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ चार ॥
    भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥
    कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
    सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
    ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ पाच ॥
    योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
    भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
    तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥
    ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ सहा ॥
    साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
    कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥
    मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
    ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ सात ॥
    पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥
    नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥
    अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥
    ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ आठ ॥
    संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥
    रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
    एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥
    नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥
    सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
    ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ न‌ऊ ॥
    विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
    उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥
    द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
    ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी
    ॥ दहा ॥
    त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
    नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥
    पुराणप्रसिद्ध वोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥
    ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी

Комментарии • 1