ऊस पिकामध्ये फुटवे वाढ व पोंग्यातली अळी नियंत्रण |uss pik futve vadh va ponga ali niyantran favarni|
HTML-код
- Опубликовано: 22 янв 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो,
बऱ्यापैकी उसाची काही ठिकाणी लागवड करून ४० -४५ दिवस झालेले आहेत, यामध्ये शेतकरी या विचारामध्ये आहेत किऊसाचे जास्तीत जास्त फुटव्यांसाठी काय करू शकतो. आणि ऊस पिकाचे फुटवे हे ४० दिवसांपासून ते १२० दिवसांपर्यंत वाढत असतात. त्यामुळे आपण या वेळेला काय काय करू शकतो कोणत्या औषधाचा आणि खताचा वापर करू शकतो या बाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अचूक आणि योग्य माहिती समजेल.
लागवडीनुसार डोळ्यांची संख्या
१) ऊस पिकाची लागवड ५*२ फूट असेल तर एकरी ४३०० डोळे लागतात, एकरी ४०००० फुटवे म्हणजे एक डोळ्या वर १० फुटवे
अळी लागते म्हणून आपल्याला एका डोळ्यावर १२ फुटवे धरून चालायचे आहे
२) ऊस पिकाची लागवड ५*१.५ फूट असेल तर एकरी ५८०० डोळे लागतात, एक डोळ्या वर ७-९ फुटवे
३) ऊस पिकाची लागवड ४.५*१ फूट असेल तर एकरी ९७०० डोळे लागतात, एक डोळ्या वर ५-७ फुटवे
फवारणी कधी करावी
१) पहिली फवारणी ४५ दिवसाचा होतो त्यावेळी
२) दूसरी फवारणी ६० दिवसांनी
३) तिसरी फवारणी ७०-७५ दिवसात
खते
१) १९:१९:१९@३ ग्राम प्रति लिटर पाणी
२) ११:३६:२४ @४ ग्राम प्रति लिटर पाणी
३) २०:२०:२० + मायक्रो @४ ग्राम प्रति लिटर पाणी
किटकनाशक
१) तफाबन (क्लोरोपायरीफॉस २०% इसी) @२ मिली प्रति लिटर पाणी
२) हिबिकि (क्लोरोपायरीफॉस ५०% इसी) @ २ मिली प्रति लिटर पाणी
३) हमला (क्लोरोपायरीफॉस ५०% +सायपरमेथ्रीन ५%) @ २ मिली प्रति लिटर पाणी
बुरशीनाशक
१) बाविस्टीन (कार्बेन्डाझिम) @ १ ग्राम प्रति लिटर पाणी
२) एम- ४५ ( मॅंकोझेब ७५% डब्ल्यू पी ) @ २ ग्राम प्रति लिटर
३) साफ (कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब ) @ २ ग्राम प्रति लिटर
सिलिकॉन कोणते आणि प्रमाण
१) SRP सिलिकॉन ६०% @२ ग्राम प्रति लिटर पाणी
२) सिलिकॉन २% मधील लिक्विड मधील २ मिली प्रति लिटर पाणी
३) सिलिकॉन ३% मधील लिक्विड मधील १.५ मिली प्रति लिटर पाणी
४) टबसील @१ गोळी प्रति ५ लिटर पाण्यासाठी
टिप :-
एकरी १५ लिटर चे ६ ते ७ पंप पुरेसे आहेत
उन्हामध्ये फवारणी घेणे टाळायचे आहे
फवारणी सोबत स्टिकर चा वापर करावा
स्टिकर चे प्रमाण :- ०.५ मिली प्रति लिटर पाणी
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
Cropxpert India या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
शेती संदर्भातील अनेक समस्येंचे समाधान या चॅनेल वर आपल्याला मिळणार आहे. अनेक वर्ष्यांचा अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बळीराजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयन्त इथे नक्कीच केला जाईल. चॅनल साठी काम करणारे सर्व जण कृषी पदवीधर आहेत आणि सगळ्याच महत्वाचे प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नावाजलेले आहेत, व्हिडिओ मधील सर्व गोष्टी ह्या एकात्मिक पद्धतीने कमी खर्चात उत्पन्न कशे वाढेल हे ध्येय ठेऊन हा चॅनेल सुरु करण्यात आला आहे. या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील. तुम्ही जर एक प्रगतशील शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- ...
उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!
मॅडम खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही.... धन्यवाद!
मॅडम आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आहे . ऊस पिकामध्ये कायम समस्या येत राहतात. हा विडिओ पाहून नक्कीच आम्ही चांगले नियोजन करू व उत्पन्नात वाढ करू. यासारखे खूप विडिओ बनवा आणि शेतकऱ्यांना मदत करा. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप छान माहिती देता
Thank you 👍
Mast माहिती दिली ताई तुम्ही .
Good information about sugarcane.
How can we use organic in sugarcane.
उत्तम माहिती दिली मॅडम
अशीच माहिती देत रहा
धन्यवाद 🙏🏻
Congratulations 🎉 nice information keep it up
Thank you 🙏🏻
very good
Thank You 🙂
You look like 🤩Kajal Aggarwal🤩.......!
Nutri veant .Icl che konte kht kdhi vaprayche yavr margdrshan krave
लवकरच माहिती घेऊन येऊ
टोमॅटोचा फुटवा होण्यासाठी व्हिडिओ टाका व माहिती सांगा
👍
🙏🏻
11.36.24 + हमला / कोराजन + साफ ...चालेल का
फळबाग झाडाचा वाडीसाठी टॉनिक वर विडिओ बनवा
लवकरच माहिती घेऊन येऊ 🙏
ऊस लागवड दिनांक 9/3/2023 ची आहे ऊस पिकाची जाडी व कालोखी येन्यासाठी व पेरी किंवा टिपरी लांब होन्यासाठी खंते कोनती द्यावी मैडम
I used corogen but no result.
कपाशी तिसरी फवारणी सांगा
लवकरच व्हिडिओद्वारे माहिती घेऊन येऊ 🙏🏻
ऊस दोन ते तीन काडीत आहे पण शेड्यात अळी लागली आहे उपाय काय करावे
फवारणी सांगा आधी
सोयाबीन पेरनी करून 35 दिवस झाले आहे तरी आता अलिका कीटकनाशक फवारनी केली तर चालेल का
हो 🙏🏻
18121-variety
🙏
कामापेक्षा बडबड लय होतीय
ठीक आहे सर 🙏🏻. आमचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी आहे. जर तुम्हाला माहिती बरोबर नसेल वाटत तर क्षमा असावी. कृपया आमची जी काही चूक आहे ती कमेंट मध्ये कळवावी 🙏🏻
तुमचा नंबर पाठवा
18121
👍
ऊस पिक लागवड दिनांक 9 मार्च 2023 ची आहे
ऊस पिकाला खंते कोनती द्यावी ऊस पिकाची जाडी होन्यासाठी व पेरी लांब किंवा टिपरी लांब व ठोकर होन्यासाठी खंते सागावी व उसाची क्वालिटी व फळ सेटिंग होन्यासाठी व तडकने व चिरा व भेगा येउ नये म्हनून खंते सागावी
ड्रीप आहे का?
@@CropXpertIndia ho
👍
🙏🏻