म्हणून Pankaja Munde हरून सुद्धा जिंकल्यात ! ३ मुद्दे | Marathi News Live | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • म्हणून Pankaja Munde हरून सुद्धा जिंकल्यात ! ३ मुद्दे | Marathi News Live | Vishaych Bhari
    नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधील निकालांवर मराठा आरक्षण आंदोलन आणि जरांगे पाटील फॅक्टरचा मोठा परिणाम झालेला दिसला. राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात त्याचा राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. भाजपाविरोधात मराठा आंदोलनाची तीव्रता एवढी होती की त्यामुळे भाजपाचा त्याच्या अनेक परंपरागत बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातही दारुण पराभव झाला. त्यामध्ये बीड, जालना, अहमदनगर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. एकीकडे महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याचं बोललं जात असलं तरी छत्रपती संभाजीनगरसारख्या मतदारसंघात मात्र याच जरांगे फॅक्टरमुळे शिंदे गटाचा विजय झाल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपा आणि महायुतीकडून करण्यात येत असलेल्या विश्लेषणामधून मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यावर न निघालेला समाधानकारक तोडगा हे पराभवाचं मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष महायुतीकडून काढण्यात आला आहे. तसेच अगदी काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल, याची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालेला असतानाच ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्यात येऊ नये, अशी मागणी करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केल्याने महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची ठिणगी पडली आहे. तसेच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. या संघर्षामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार दुहेरी कात्रीत सापडलं आहे. तसेच सध्या धुमसत असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चिघळला तर त्याचा मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच महायुतीला बसण्याची शक्यता आहे.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #pankajamundhe
    #pankajamunde
    #विषयचभारी
    pankaja munde,pankaja mundhe,pankaja munde live,pankaja munde news,pankaja munde latest news,pankaja munde sabha,pankaja munde result live,pankaja munde vs bajrang sonavane,pankaja munde vs bajrang sonawane news,pankaja munde bjp,pankaja munde bhashan,pankaja munde today news,pankaja munde beed loksabha,pankaja munde vs bajrang sonawane,pankaja munde on bajrang sonawane,pankaja munde vs bajarange sonavane,pankja mundhe,pankaja munde song

Комментарии • 177