कारले आणि दोडका पिकातील भुरी रोग नियंत्रण | bhuri rog niyantran | powdery mildew fungicide

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bh...
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱कारले आणि दोडका पिकातील भुरी रोग नियंत्रण | bhuri rog niyantran | powdery mildew fungicide👍
    👉रोगाची लक्षणे : -
    1. भुरी रोगाच्या वाढीसाठी थंड आणि कोरडे वातावरण पोषक आहे.
    2. रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जुन्या पानांवर किंवा बुंध्याजवळील पानांवर होतो
    3. प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या पानांवर, फुलकळी तसेच देठावर भुरकट रंगाचे बुरशीचे ठिपके दिसून येतात.
    4. कालांतराने झाडाची पाने पिवळी पडून गळून जातात. तसेच प्रकाशसंश्लेषन क्रियेमध्ये मंदावते. त्यामुळे भुरी 5. रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
    👉एकात्मिक नियंत्रण :-
    1. भुरी रोगास सहनशील असणाऱ्या सिंजेन्टा बीजीएच-106 सारख्या वाणांची निवड करावी.
    2. पिकांची फेरपालट करावी व पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करावे तसेच पिकामध्ये पोटॅश या अन्नद्रव्यची कमतरता झाल्यास पीक भुरी रोगाला बळी पडते त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर शिफारसी प्रमाणे करून पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही.
    3. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला जैविक पद्धतीचा अवलंब करावा यासाठी बॅसिलस सबस्टीलीस @ 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा पिकात फवारणी करावी.
    4. रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन @ १ ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेपूर्वी २ वेळा फवारणी करावी.
    5. वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल.
    6. शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा.
    - यूपीएल साफ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी) - 30 ग्रॅम
    - बायोस्टॅड रोको (थिओफॅनेट-मिथाइल 70% डब्ल्यूपी)- 10 ग्रॅम
    - टाटा रैलिस ताकत (कैप्टन 70% + हेक्साकोनाज़ोल 5% डब्ल्यूपी) - 30 ग्रॅम
    - इंडोफिल अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68%) - 30 ग्रॅम
    - यूपीएल अवेंसर ग्लो (एज़ोक्सिस्ट्रोबिन 8.3% + मैनकोज़ेब 66.7% डब्ल्यूजी) - 45
    - अदामा शमीर (टेबुकोनाजोल ६.७% + कैप्टान २६.९% एससी) - 30 मिली
    - बीएएसएफ मेरिवॉन (फ्लुक्सापायरोक्सैड 250 + पाइराक्लोस्ट्रोबिन 250 एससी) - 8 मिली
    (टीप - या पैकी कोणतेही एक बुरशीनाशक घेऊन १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा आलटून पालटून बुरशीनाशकाची फवारणी करावी. )
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии • 14

  • @dhanajibabar9154
    @dhanajibabar9154 Год назад +3

    दुकानात रोख व्यवहार स्वस्त आहेत सर्व औषध

  • @anilgalve3387
    @anilgalve3387 Год назад +1

    Super good job sir 💐💐💐💐💐

    • @sunandachaskar5165
      @sunandachaskar5165 Год назад

      सर करटुले चे कळे पिवळे होतात उपाय सांगा

  • @op-tf9ri
    @op-tf9ri Год назад +2

    गवार पीक शेंद्यापसून काळे पडत आहे उपाय सुचवावा शेंगा पण काल्या पडत आहेत

  • @Ganeshmore-ee7pk
    @Ganeshmore-ee7pk Год назад +1

    पावट्या साठी बनवा एखादा विडीओ

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      चालेल. मी नक्की प्रयत्न करेन

  • @ashokshinde923
    @ashokshinde923 6 месяцев назад

    🎉

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद .

  • @swapniljadhal1701
    @swapniljadhal1701 Год назад

    कारले व दोडका आणि काकडी या पिकाची कळी पिवळी होत आहे उपाय सांगा

  • @abhimanyudhole9149
    @abhimanyudhole9149 3 месяца назад

    छान

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 месяца назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @digupatil2806
    @digupatil2806 6 месяцев назад

    सर भारत आग्री वर मार्केट च्या तुलनेत महाग मिळतात maraket मध्ये त्यांची किंमत कमी असते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण भारत ऍग्री ऐप्लिकेशन मधून कॉइन्स चा लाभ घेऊ शकता किंवा डिस्काउंट कूपन कोडचा सुद्धा लाभ घेऊन ऑर्डर करू शकता, जेणेकरून उत्पादनाची किंमत कमी होईल, ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/e2KZ

  • @Depak078
    @Depak078 Год назад

    Amba pika varil bhuri n turtude