कशी करावी चिया सीड्स लागवड ( पेरणी) कमी दिवसात भरघोस उत्पादन! Chiya farming in Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #चिया #सीड्स
    श्री सयाजी धायगुडे पाटील प्रगतिशील शेतकरी
    श्री अनिल सयाजी धायगुडे पाटील. प्रगतिशील शेतकरी
    9594528602
    ह.भ.प. श्री हनुमंत सयाजी धायगुडे प्रगतिशील शेतकरी
    9552818253
    मु पो. वाघोशी ता. खंडाळा जि . सातारा
    चिया सीड्स
    चिया हे पीक मूळ अमेरिकेमधील
    पेरणी दिनांक 10 नोव्हेंबर 2023
    प्रति एकरी बियाणे 2 किलो
    कमी खर्चात कमी पाण्यात कमी दिवसात भरघोस उत्पादन
    चिया सीड्स या पिकास शक्यतो कोणतीही औषध फवारणीची गरज पडत नाही
    चिया सीड्स या पिकास कोणताही पाळीव प्राणी किंवा वन्य प्राण्यांपासून त्रास नाही
    चिया पिकाला नवीन काळातील सुपर फूड (super food) असेही म्हणतात. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो. त्याची लागवड कशी करावी. लागवडी बद्दलचे अनुभव
    लागवड करताना
    - एकरी बियाणे 1500 ते 2000 ग्रॅम जास्तीत जास्त सोबत गांडुळ खत मिक्स केल्यास चांगली पेरणी होते
    - रोपे तयार करून लागवड केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. कांदा रोप तयार केल्यासारखे वाफ्यावर तयार करता येईल आणि मग लागवड करता येऊ शकेल.
    - पातळ पेरणी केल्यास फुटवा भरपूर होतो किंवा दाट झाल्यास विरळणी केलेली फायदयाची ठरते.
    - पेरणी साठी २६-२७ HP चे छोटे टॅक्टर व झिरो सेटिंग वर पेरणी करावी.
    - ट्रॅक्टरने पेरणी करताना गांडूळ खत व चिया बियाणे मिक्स केल्यास पुर्ण भरू नये कारण चियाचे वजन हलके असल्याने खत अगोदर पडते आणि मग अर्धी झाल्यास बियाणे व खत मिक्स होऊन व्यवस्थित पेरणी होते त्यामुळे ते अर्धे अर्धे भरून पेरणी करावी.
    - पेरणी करताना ओल असावी पण वाफसा असणे अत्यावश्यक आहे, जास्त किंवा कमी पाणी असल्यास उगवण होत नाही आणि जसजसे वाफसा भेटत जाईल तसे तसे उगवण होत राहते. यासाठी शेत आधी स्प्रिकलरने किंवा वाट पाण्याने भिजवावे आणि उद्या पेरणी करायची म्हणजे उत्तम उगवण मिळते.
    बीज प्रक्रीया बाबत घ्यायची काळजी
    - चिया पिकास बीजप्रक्रिया केल्यास मर रोग होत नाही कोरडी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. लिक्वीड किंवा ओली बीज प्रक्रिया केल्यास बियाण्याच्या गाठी बनतात आणि उगवण होत नाही, त्यामुळे फक्त पावडर चोळावे.
    - बीजप्रक्रिया करून पेरल्यानंतर चिया पाच ते आठ दिवसात उगवते.
    खत व्यवस्थापन
    - पेरणी करण्यापूर्वी जमिनीस चांगले कुजलेले शेणखत द्यावे.
    - चिया पेरणी करताना गांडुळ खत/ निबोंळी पेंड/ सेंद्रिय खत पैकी एक पेरणी करताना एकरी ५० किलो पसरून द्यावे.
    - वाढीच्या अवस्थेत पेरणी नंतर साधारण ३० ते ४५ दिवसांच्या कालावधीत जीवाणू स्लरी दिल्यास पिकाची वाढ जोमात होते आणि दुसरी जीवाणू स्लरी ५५ ते ६० दिवसांच्या अवस्थेत दिल्यास उत्तम परिणाम मिळतात.
    - वाढीच्या अवस्थेत ह्युमिक ॲसिड पाण्यामधून सोडावे वाढ वेगाने होते.
    - पिक फुलात असताना फुलविक ॲसिड फवारणी करावी.
    सिंचन/पाणी व्यवस्थापन
    - सिंचन दर आठवड्याला एकदा लागते म्हणजे जितके वाफसा देणारे पाणी अधिक तितके वाढ चांगली होत राहते. पिक तजेलदार दिसते.
    - स्प्रिंकलर ने पाणी दिल्यास माती वर उडून बसते आणि मग बियाणे खाली दबल्यास उगवण होत नाही म्हणून सिचन करताना किमान पहिले २ पाणी हे रेनपाईप ने किंवा पाट पाणी द्यावेत त्याचा चांगला परिणाम होतो.
    तण व्यवस्थापन
    - पिक नाजूक असल्याने तणनाशक वापरता येत नाही, वापरल्यास चिया सुद्धा जळून जाते.
    - चिया पेरणी नंतर २१ ते ३० दिवसांच्या आत एक वेळा कोळपणी किंवा खुरपणी करावी यामुळे वाढ वेगाने होते हे अत्यंत आवश्यक आहे.
    कीड-रोग व्यवस्थापन
    - चिया पिकावर मावा(पिवळा), पाने खाणारी अळी, इत्यादी किडी आढळतात.
    - यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणी नंतर २० ते ३० दिवसानी पहिली निंबोळी अर्क फवारणी करावी तसेच दर २५-३० दिवसांच्या अंतराने दशपर्णी अर्क फवारणी करावी.
    - या नंतर अनुभवी/तज्ञ व्यक्तींच्या शिफारशीनुसार सेंद्रिय प्रमाणित कीडनाशकांची फवारणी करावी.
    काढणी
    पीक तयार होण्यास ९० ते १२० दिवस लागतात. उगवण झाल्यापासून ४० ते ५० दिवसांमध्ये फुले येतात. दाणे तयार होऊन परिपक्व होण्यासाठी ९०-११५ दिवसांचा कालावधी लागतो. रोप पिवळे पडून वाळल्यानंतर कापणी करावी. कापल्यावर २ ते ३ दिवस शेतातच चांगले उन्हात वाळू द्यावे नंतर मळणी यंत्राद्वारे कमीत कमी स्पीड ठेवून मळणी करावी. उफणणी करून काडी कचरा काढुण टाकावा व दाणे वाळवून स्वच्छ करावेत.
    साठवणूक
    गोणी मध्ये भरून स्वच्छ जमिनीपासून उंचावर कोरड्या जागी साठवणूक करावी.
    विशेष
    चिया पिकास शेळ्या, रान-डुक्कर, हरीण इ. हे पीक खात नाहीत, या पिकास यांचा त्रास होत नाही असे दिसून आले आहे.
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    RUclips
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    www.instagram....
    What's app Chanel
    whatsapp.com/c...
    What's app group
    chat.whatsapp....
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja
    #चियाशेती
    #Chiya
    #Chiyabij
    #चियासीड

Комментарии • 16

  • @vijayjadhav9977
    @vijayjadhav9977 5 месяцев назад +1

    पाणी गोड पाहिजे का? आजूबाजूला विविध रासायनिक फवारणी केली तर परिणाम होतो का ? पाणी स्प्रिंकलर/ फ्लो न द्यायचं

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 7 месяцев назад +1

    धन्यवाद🙏 नवीन माहिती मिळाली.

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 7 месяцев назад +1

    आज नवीन पिकाची माहिती मिळाली,👍👍

  • @akashdhaygude3052
    @akashdhaygude3052 7 месяцев назад +2

    प्रगतशील बागायतदार

  • @Bhakti-------sadhana
    @Bhakti-------sadhana 7 месяцев назад +2

    एकरी बियाणे किती वापरावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  7 месяцев назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती दिलेली आहे,🙏

  • @vijayjadhav9977
    @vijayjadhav9977 5 месяцев назад

    चिया पीक घेतल्यानंतर खरीप पिकावर काही परिणाम होतो का ?

  • @nitinbokey7867
    @nitinbokey7867 7 месяцев назад +2

    Perani kuthalya mahinyat karavi?

  • @ganeshchinchole5748
    @ganeshchinchole5748 7 месяцев назад +1

    विक्री कुठे करावी व बियाणे सर्टिफाईड का पारंपारिक वापरावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  7 месяцев назад

      मध्यप्रदेश मध्ये निमज आणि मंदसौर या ठिकाणी विक्री बाजारपेठ आहे अशी माहिती मिळालेली आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  7 месяцев назад

      ऑनलाइन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन सारख्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा विक्री करता येऊ शकते

    • @babuchavan770
      @babuchavan770 5 месяцев назад

      Bhav kiti ahe prati ktl