21 days No Sugar Challenge| साखरेचा अतिरेक कसा टाळावा?| Dr. Smita Bora

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • 21 days No Sugar Challenge| साखरेचा अतिरेक कसा टाळावा?| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मराठीत खूप वाक्प्रचार आणि म्हणी आहेत अगदी रोजच्या जीवनाशी निगडित अशा या म्हणी आपले समज आणि आपली मानसिकता प्रतिबिंबित करत असतात.
    आज आपण बोलत आहोत साखर या विषयावर
    साखरेचे खाणार त्याला देव देणार
    मुंगी होऊन साखर खावी
    असे काही शब्दप्रयोग मला आठवतात तुम्हाला साखरेवरून काही म्हणी वाक्प्रचार आठवले तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा.
    म्हणजे काय तर साखर ही आनंदाचे.... शुभ प्रसंगाचे प्रतीक आहे .. आपण लग्न समारंभ किंवा आनंदाच्या प्रसंगी गोडधोड खातो ...मिठाई खातो आणि सणावाराच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांनाही आवर्जून गोड पदार्थ देण्याची.... फक्त भारतातच नाही तर सगळ्या जगात पद्धत आहे..... सगळ्यांनाच गोड फार आवडतं... अगदी लहानपणापासून ....कारण आयुर्वेदानुसार मधुर हा रस किंवा चव जन्मसात आहे म्हणजे काय तर जन्मापासून सात ... सवयीचं आहे....
    कारण बाळाचा पहिला आहार म्हणजे दूध आहे ते सुद्धा मधुर आहे ... आपला आहार असतो तो मधुर रस प्रधान असतो म्हणजे त्यामध्ये गोड चवीचे प्राधान्य असतं..... इतर चवींचं प्रमाण त्यामानाने कमी असतं
    मधुर वर्ग आयुर्वेदामध्ये वर्णन केला आहे आणि त्या पदार्थांचे गुण सुद्धा फार छान वर्णन केले आहेत.
    मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला आहे... प्रत्येक चवीचा अतिरेक केल्यामुळे शरीरात काय परिणाम होतात याचं सुद्धा वर्णन अष्टांगले या ग्रंथात केला आहे.
    साखर हा सध्याचा जीवनशैलीत मोठाच घातक घटक तयार झाला आहे कारण पूर्वी गोडधोड फक्त सणावाराच्या निमित्ताने खाल्लं जायचं रोज गोड खाण्याची पद्धतही नव्हती आणि तेवढं उपलब्धता नव्हती.
    सध्या मात्र सर्वांचीच रोजचेच दिवाळी आहे..... कारण सगळेच अन्नपदार्थ भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत... त्यातही अनेक गोड पदार्थ आपल्याला अगदी सहज आणि स्वस्तात मिळू शकतात ....त्यामुळे सगळ्यांचा गोड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळेच भारत सध्या जगात डायबिटीस कॅपिटल म्हणून ओळखला जातो
    अगदी प्रत्येक घराघरांमध्ये डायबेटीसचे पेशंट आहेत .. तुमच्याही घरात असतील.... अर्थात याला इतरही घटक कारणीभूत आहेत पण गोड खाण्याची सवय आणि आवड या दोन्हीमुळे बरेच दुष्परिणाम होतात हे तर तुम्हालाही माहिती आहे...
    नेमकं गोड खाण्यामुळे काय होतं
    विशेषतः साखरेचा अतिरेक झाला तर शरीरात काय परिणाम होतात
    आणि ते कमी करण्यासाठी आपण काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

Комментарии • 180