Sudha Murthy कसा झाला जगप्रसिद्ध इन्फोसिसचा जन्म? इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्तींशी गप्पा!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 авг 2020
  • Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 977

  • @subhashdhotre8338
    @subhashdhotre8338 3 года назад +17

    सुधाताई मूर्ती म्हणजे
    चालता बोलता इतिहास...
    श्रीमंत असाव्यात त्या अश्या...
    दानशूर...विनम्र..सतत हासू चेहेऱ्यावर असणाऱ्या...
    मानवतावादी...प्रणाम. 🙏🙏🙏

  • @deepakkumbhar9862
    @deepakkumbhar9862 Год назад +18

    मराठीतून बोलल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. मराठी मुळे खुप जवळच नात निर्माण झाले.

    • @Aj-mt1zo
      @Aj-mt1zo 2 дня назад

      Kulkarni ahe te lagn Murthy sobt zal evdhc 🤷🏻tya marathic ahe

  • @chaitanyaakumbhar8252
    @chaitanyaakumbhar8252 3 года назад +228

    राजकारणी आणि भंगार भुंगर लोकांना बोलवण्यापेक्षा. सुधा ताई, रतन जी टाटा अशा महान लोकांना बोलवलं तर तरुण वर्गाना एक प्रकारचं इन्स्पिरेशन मिळेल. या मुलाखती साठी खूप खूप धन्यवाद

  • @brahmandverse6050
    @brahmandverse6050 3 года назад +228

    आपण भारतत राहतो , कर्नाटक मधे मराठि बोलतात , महाराष्ट्रात कन्नड बोलतात हे आपली संस्कृती आहे फक्त राजकारण मुळे द्वेष निर्माण होतात राज्या राज्या मधे
    Very Inspiring Interview Sudha Murty Ma'am ... Thank you for this.Abp team.

    • @poorneshpoojari9531
      @poorneshpoojari9531 3 года назад +24

      South Indian che Khoop lok Marathi chaan boltaat (Mainly Karnataka People)We respect all languages from Mangalore Karnataka

    • @vishalpatil9662
      @vishalpatil9662 3 года назад +2

      yes

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 3 года назад +2

      बरोबर बोललात..

    • @jayshripatil2627
      @jayshripatil2627 3 года назад

      Correct..

    • @ajde69
      @ajde69 3 года назад +6

      त्या मूळच्या धारवाडच्या आहेत म्हणजे उत्तर कर्नाटक तो भाग बेळगाव, कारवार, बिजापूरसह पूर्वी महाराष्ट्राला संलग्न होता. त्यांचे कानडी वेगळे आहे ते लोक कानडी बोलतात त्यात मराठी शब्द जास्त आहेत. त्यांची संस्कृती, लग्नाच्या पद्धती मराठी आहेत. त्यामुळे ह्या चार जिल्ह्यातून आलेले अनेक कानडी लोकांना महाराष्ट्र जास्त आपला वाटतो आणि इथे स्थायिक झाल्यावर ते स्वतःला मराठी समजतात.

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 3 года назад +130

    काही रुपयांची नौकरी करून काही तथाकथित professional लोक काय तोरा दाखवत मिरवतात,
    पण सुधाताई मुर्तीं सारखी अत्यंत साधी व्यक्ती त्यांसारख्यां लाखोंना रोजी रोटी देवुन पण किती अत्यंत साधं राहणीमान 🙏🙏🙏

    • @killedarmadhav8
      @killedarmadhav8 3 года назад +1

      खरे आहे.
      हिंदीत एक म्हण आहे,
      *"इतनीसी झोपडी और नाम बोलो गाझियाबाद!"*
      आपले म्हणणे हे अगदी योग्य आहे.
      सुधा मूर्ती ह्या आदर्श आहेत.

  • @akkisat93
    @akkisat93 3 года назад +431

    हात गगनाला भिडलेले असूनसुद्धा बोलण्यात, जगण्यात इतकं साधेपण.
    पाय जमिनीवर असणं काय असतं?
    हे सुधा मूर्ती यांच्याकडून शिकावं.
    *आभाळाएवढी माणसं*
    कानडी वळणानं जाणारी त्यांची मराठी ऐकायला खूप गोड वाटतं!!!

    • @sunitavelankar6139
      @sunitavelankar6139 3 года назад +4

      Q

    • @sunitavelankar6139
      @sunitavelankar6139 3 года назад +1

      फाईन

    • @veenapitke7260
      @veenapitke7260 3 года назад +3

      सुधाताई माझा कट्टावर तुमची मुलाखत बघितली.
      इतक मनापासून आणि स्पष्ट बोलण ऐकून आपल्या साधे पणाची ओळख पटली.
      फार छान. आपल्या कार्यात आपल्याला सूयश लाभो.
      आपणा ऊभयताना ऊदंड आयूष्य आरोग्य लाभो

    • @vishalpatil9662
      @vishalpatil9662 3 года назад +1

      Right

    • @prabhakarsardesai6621
      @prabhakarsardesai6621 3 года назад

      Llllpllll

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s 3 года назад +44

    किती तो भाषिक आणि सांस्कृतिक स्वाभिमान, आपल्या बद्दल खूपच आदर🙏

  • @atharvajoshi1042
    @atharvajoshi1042 3 года назад +545

    ज्या व्यक्तिंना फक्त बघूनच मन प्रसन्न होतं, अश्या सुधाताई आहेत..❣❣

  • @akshayphadnis
    @akshayphadnis 2 года назад +4

    महाराष्ट्र आणि कर्नाटक च्या बाबतीत सगळ्यानी असाच विचार केला तर सारे वाद मिटतील ना.. 🙌🏻🙌🏻

  • @shaliknaik4773
    @shaliknaik4773 3 года назад +96

    मी आता पर्यंत बघितलेली सर्वोत्कृष्ट दिलखुलास मुलाखत ! साधी राहणी आणि उच्च विचारसरणी इतका नम्रपणा क्वचितच बघायला मिळतो,
    सौ.सुधाताई नारायण मूर्ती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन !!

  • @madhavpawar6167
    @madhavpawar6167 2 года назад +6

    खरच ताई आपण कर्मवीर आहात 🙏 आपल्याला ईश्वर दिर्घायुष्य प्रदान करो अशी मी प्रार्थना करतो 🙏 आपल्याला एक कळकळीची विनंती आहे , आपण टाॅयलेटचा जो त्रास भोगला आहे त्याची कल्पना करणच अश्यक्य आहे . एक विनंती आहे आपणास - मुंबईचा विक्रोळी लिंक रोड जिथे सेंट्रल हायवेला जोडला जातो त्याठिकाणी टाॅयलेटची अत्यंत निकडीची गरज आहे . तुम्ही जर तो जनतेसाठी बांधून दिलात तर लाखो लोक मनापासून तुम्हाला आशिर्वाद देतील 🙏🙏🙏🚩जय श्री राम 🚩जय हिंद!!!

  • @meherwadi5011
    @meherwadi5011 3 года назад +52

    19 ऑगस्ट... सुधा मूर्ती यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🙂
    (धारवाड, कर्नाटक)

  • @DK-bk3ix
    @DK-bk3ix 3 года назад +92

    यांना ऐकणं म्हणजे आत्मानंदी टाळी लागण्यासारखं आहे. असं वाटतं ऐकावं आणि ऐकतच राहावं. कानडी वळणाची सीमाभागातील मराठी खूप मधाळ वाटते, ज्यानं पुलंच्या बेळगावी रावसाहेबांची आठवण व्हावी. त्यांचं पुणे, सांगली, कोल्हापूर आणि एकूण महाराष्ट्रवरील प्रेम आणि जिव्हाळा आनंद देणारा आहे. खूप वेळा त्यांना एकूण पण नावीन्य जाणवत राहतं. सामान्यतून असामान्यत्व मिळवलेली प्रतिभावान उद्योजिका, दानशूर, तात्विक आणि सिद्धहस्त लेखिका. आभाळाला हात लागून पण जमिनीशी नातं सांगणाऱ्या.. सुधा मूर्ती-कुलकर्णी 🙏

  • @kdwild
    @kdwild Год назад +5

    Video बघताना खूप वेळा डोळ्यात पाणी आले. आणि इच्छा फक्त एवढीच वाटत होती की तिला आई म्हणून हाक मारावी 🙌 कारण इतकी निरागस आणि down to earth ही फक्त आई च असू शकते. त्याबरोबरच मला सिंधुताई चीही आठवण येऊन गेली. त्याही तितक्याच साध्या आणि सरळ होत्या ✨

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 3 года назад +7

    सुधा मुर्ती कर्नाटकच्या असूनही इतके सुंदर मराठी बोलतात पण काही लोक महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलायला त्यांना लाज वाटते. किती मराठी भाषेवर प्रेम आहे ते त्यांच्या बोलण्यावरून समजते. साधी राहणी उच्च विचार सरणी .खूप छान मुलाखत. एका आदर्श, सुसंस्कृत, सोज्वळ व्यक्तीरेखेची मुलाखत.ABP MAZA वर अशी मुलाखत पहिल्यांदा झाली असेल.

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 3 года назад +143

    खांडेकरजी, थोडक्यात प्रश्न विचारत जा सगळा रसभंग होतो, खूप लांबलचक प्रश्नाने

  • @vidyasalunkhe8266
    @vidyasalunkhe8266 2 года назад +5

    साधी राहणी, उच्च विचारसरणी याची सर्वाना खूप गरज आहे. ती आपल्या कडून सर्वाना मिळालेली भेट समजतो

  • @prasaddhanorkar.832
    @prasaddhanorkar.832 3 года назад +146

    Abp माझा च्या इतिहास मध्ये एवढं सुंदर interview कधी पहिला नव्हता,
    Thanks abp majha 🙏
    आशा थोर लोकांचा interview घ्या फालतू लोकांना बोलून काही होते नाही 🙏

  • @indianlawofficer8039
    @indianlawofficer8039 3 года назад +105

    शेवटचं वाक्य ...जय महाराष्ट्र👍

    • @CyberGenious24
      @CyberGenious24 3 года назад +4

      Pan tyaavar host ni Jai Maharashtra mhanta nahe te durdaiva pratyekane Jai Maharashtra mhatlyaavar reply pan Jai Maharashtra ne dyaava he vinanti .. !!!!
      Aso !!!!!!! Jai Maharashtra !!!

    • @AamhiPharmacist
      @AamhiPharmacist 3 года назад +3

      @@CyberGenious24 खर आहे तुमचं
      जय हिंद जय मराठी जय महाराष्ट्र

  • @prince-if7zc
    @prince-if7zc 3 года назад +30

    एक तासाची मुलाखत ,अजून दोन तास चालावी असे सतत वाटत होते.
    खुपच छान.

  • @vilasraok.jadhav4473
    @vilasraok.jadhav4473 3 года назад +4

    सुधाताई मूर्ती कहाणी ऐकून माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला। सौ मुर्तीना कोटी कोटी प्रणाम,

  • @deepakjawkar6709
    @deepakjawkar6709 3 года назад +9

    सौ सुधा मूर्ती महाराष्ट्र कर्नाटका सिमे वरील कुटुंबातील असून उत्कृष्ट मराठी बोलणाऱ्या आहेत मराठी भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लीहली आहेत आज त्या श्रीमंतीच्या यादीत असताना देखील साधे पणाने राहणे पसंत करतात साधी राहणी व उच्च विचारसरणी हा जीवन मंत्र आहे त्यांचा इंग्रजी भाषेवर ही प्रभुत्व आहे पुणे येथे अनेक वर्ष वास्तव्यास होत्या व पुणे शहरावर अधिक प्रेम आहे संगणक क्षेत्रात आघाडीवर असलेले नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत संगणक क्षेत्रात मोलाची प्रगती करून आपल्या भारत देशा मध्ये क्रांती घडवून आणली सौ सुधा मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसा निम्मित हार्दिक शुभेच्छा

  • @shailab.2792
    @shailab.2792 3 года назад +37

    खूपच गोड, साध्या, विद्वान आणि खट्याळ पण आहेत मॅम. मुलाखत नसून गप्पा गोष्टी चालू आहेत घरच्या व्यक्ती बरोबर असंच वाटतंय. Love you Mam.♥️♥️♥️

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 года назад +5

    सुधा ताई तुमच्या कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाला प्रणाम🚩 🇮🇳🙏👋कृष्ण वंदे जगद्गुरु🚩🇮🇳🙏👋

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 года назад +13

    एक उच्च विद्याविभूषित व खऱ्या अर्थाने सुशिक्षित व्यक्ती म्हणजे सुधा मुर्ती..विनम्र अभिवादन. ..

  • @shobhapatwardhan8389
    @shobhapatwardhan8389 3 года назад +19

    सुधाताईंना माझा कट्ट्यावर बोलावल्या बद्दल खूप खूप धन्यवाद....भविष्यात अशाच उत्तुंग व्यक्तिंना भेटता येईल अशी आशा...

  • @pratikshabaviskar8430
    @pratikshabaviskar8430 3 года назад +119

    आभाळाएवढे उच्च विचार आणि पाय सदैव जमिनीवर 🙂
    hearing you is blessing Sudha Murthy mam❤
    Inspiration for us....

  • @subhashchavan3175
    @subhashchavan3175 2 года назад +5

    एक दिग्गज व्यक्ती ची मुलाखतीतून प्रेरणा मिळाली. 🙏💐👍

  • @rahulkumbhar711
    @rahulkumbhar711 3 года назад +127

    I am working for Infosys....feels so much proud for having such idiol as our leaders.

  • @mayur9185
    @mayur9185 3 года назад +88

    खूप सुंदर मराठी बोलतात मॅम, साऊथ च्या आहेत असे वाटतच नाही.

    • @poorneshpoojari9531
      @poorneshpoojari9531 3 года назад +15

      South Indian che Khoop lok Marathi chaan boltaat (Mainly Karnataka People)We respect all languages from Mangalore Karnataka

    • @yashwantjoshi8609
      @yashwantjoshi8609 3 года назад +9

      Maheracha adnav Kulkarni ahe tyanche

    • @meherwadi5011
      @meherwadi5011 3 года назад +1

      @@yashwantjoshi8609
      आणि नावदेखील नलिनी आहे.

    • @meherwadi5011
      @meherwadi5011 3 года назад +10

      1956 पर्यंत धारवाड-हुबळी प्रदेश तेव्हाच्या Bombay State मधे होता, त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा देखील होत्या.
      मराठी नाटक-सिनेमा देखील पहायला मिळायचे.

    • @Tubemith
      @Tubemith 3 года назад +2

      Ti pan maharashtrian ashesh manhooon.....konkani...

  • @manjukelkar2973
    @manjukelkar2973 2 года назад +3

    किती सहज सुंदर पाण्या सारख्या नितळ आणि खूप grt व्यक्तिमत्त्व

  • @nitaandhare7512
    @nitaandhare7512 3 года назад +42

    सुथामूरतीची मुलाखत खूपच उदबोधक आहे साधी राहणी उच्च विचारसरणी त्यांचे जीवन आपल्याला एक उर्जा देऊन जाते

  • @sonamalatpure7293
    @sonamalatpure7293 3 года назад +5

    सुधा मूर्ती म्हणजे माझं प्रेरणा स्थान. मला त्यांना भेटायचं, आहे एकदातरी नक्कीच. लोकमत कट्टा आज प्रगल्भ झालाय असं मी म्हणेन. खुप मस्त वाटतं की इतक्या कर्तुत्ववान व्यक्ती इतक्या साधेपणाने राहतात, बोलतात, वागतात. साधी रहाणी उच्च विचार याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती

  • @ashishkulkarni2315
    @ashishkulkarni2315 3 года назад +71

    एबीपी माझा च्या खजिन्यात एक अजून उत्तम नजराणा जमा झाला...खांडेकर आणि ज्ञानदा आपण दोघांनी छान निवेदन केलेत...
    कार्यक्रम खूपच छान झाला.
    एबीपी माझा चे खूप खूप धन्यवाद..

  • @namitagore4176
    @namitagore4176 Год назад +2

    ABP माझा चा माझा कट्टा हा कार्यक्रम मला खूप आवडतो. तुम्ही मुलाखतीसाठी बोलावलेल्या लोकांबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी कळतात. ह्याच बरोबर सगळ्या लोकांकडून, त्यांच्या अनुभवामधून खूप शिकायला मिळतं. हा कार्यक्रम करत असल्याबद्दल ABP माझाचे आभार. हा कार्यक्रम असाच चालू राहो आणि अजून अनेक व्यक्तींच्या मुलाखती तुम्हाला घेता येवोत ह्यासाठी शुभेच्छा!

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 3 года назад +12

    सुधाताई मूर्ती !
    नव्या वाटा चोखाळणा-यांसाठी अखंड स्फूर्ति !!
    केवढं सौजन्य ! किती साधेपणा !!
    अनुभवाचे अपूर्व बोल !!!
    देशकार्य अनमोल !
    शुभेच्छा व अभीष्टचिंतन !!!

  • @archanajoshi3039
    @archanajoshi3039 3 года назад +11

    सुधा आक्का म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व मी त्यांची खूप च मोठी फॅन आहे मराठीमध्ये जितकी पुस्तके आहेत जवळ जवळ 22 सगळी पुस्तके माझ्याकडे आहेत 1 पुस्तकावर त्यांची सही सुद्धा आहे त्या कोल्हापूर मध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता मेहता बुक सेलर च्या अनिल मेहता सर नि त्या कार्यक्रमा ला आम्ही गेलो होतो अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि कोल्हापूर चा नेहमी उल्लेख असतो त्यांच्या भाषणात love uu सुधाजी 😘😘😘

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 Год назад +2

    Mulgi shikle pragati zale.... Anant upkar ahet mahatma Phule ani Savitri bai Phule che tyani mulinsathi shikshanachi dare ughde kale.... Mahnun Sudha murti sarkhi eak mahan mahela ghadle...I am proud of you u r such amazing leady...
    👍

  • @LKINTELLIGENCE
    @LKINTELLIGENCE 3 года назад +99

    *She has knack of quickly connecting with people. So relatable. She is like mother and grand mother to many of us.*

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 2 года назад +3

    सुधा मुर्ती मॅडम यांचे "गोष्टी माणसांच्या" हे पुस्तक लहाणपणापासून कित्येकदा वाचले आहे . खरोखर एक महान अश्या व्यक्तिमत्व असणाऱ्या सुधा मुर्ती मॅडमची इतकी छान मुलाखत घेतल्याबद्दल ABP Maza (आनंद बाजार पत्रिका) यांचे खुप आभार !
    आणि सुधा मुर्ती मॅडमचा साधेपणा खरोखरच खुप भावला आणि मराठी मातृभाषा नसून त्या इतकी छान मराठी बोलल्या हे पाहून देखील मस्त वाटलं !
    एक खुप मस्त मुलाखत 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @adityagaikwad6467
    @adityagaikwad6467 3 года назад +6

    सुधा मूर्ती = Power of Smiling😊👏🙏🙌

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 3 года назад +11

    अप्रतिम मुलाखत.खरोखरच *साधी राहाणी उच्च विचारसरणी.* सुधाताई आपला आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा.🙏🙏

  • @aumkarupadhye1
    @aumkarupadhye1 3 года назад +29

    अतिशय सुंदर, खरच शिकण्यासारखं खूप आहे.. सुधा ताईंच्या प्रत्येक वाक्यात, शब्दात गोडव्या सोबत एक शिकवण आहे..राजीव सर "माझा कट्टा" यासाठीच माझा सर्वात आवडत कार्यक्रम आहे! 💐

  • @vijayalande7678
    @vijayalande7678 Год назад +5

    सुधाताई आपली शांत सुंदर आणि प्रसन्न मूर्ती पाहून खूप आनंद होतो आहे.अस आदर्शवादी व्यक्तीमत्व ऐकून खूप छान वाटलं.धन्यवाद.

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 3 года назад +113

    माझा कट्यावरील मी पाहिलेली सर्वात चांगली मुलाखत.

  • @hanumantkadam437
    @hanumantkadam437 3 года назад +11

    ही अशी मुलाखत आहे, ज्यातून आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखा खूप काही आहे, मी सर्व तरूण मित्रांना सांगू इच्छितो की आवश्य पहा.

  • @pradipgaikwad4926
    @pradipgaikwad4926 2 года назад +3

    विनम्रतेच उत्तम उदाहरणं म्हणजे सुधा मूर्ती...!!

  • @pranalimangawade9389
    @pranalimangawade9389 3 года назад +259

    "The beauty of a Person lies in Simplicity and Confidence."
    I totally agree...🙌

  • @swarapore8494
    @swarapore8494 3 года назад +5

    किती किती शिकावं तुमच्या प्रत्येक वाक्यातून , आणि किती लडिवाळ व्यक्तिमत्व आहे सुधा ताई तुमचं, तुमची सगळी पुस्तकं मी वाचली आहेत, त्यापेक्षा ही तुम्ही खूप गोड आणि great आहात...... love you soooooo much

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Год назад +1

    खूपच प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले , अशाच मुलाखतीचे व्हिडिओ कराल हि अपेक्षा व विनंती धन्यवाद .
    ..
    .

  • @vidyapatil7248
    @vidyapatil7248 3 года назад +3

    सगळे असताना इतकं साधं राहणीमान कृतीयुक्त उच्च विचारसरणी असताना हे निगर्वी बहुआयामी प्रेमळ व्यक्तिमत्व. आदरयुक्त नमस्कार. एबीपी माझाचे धन्यवाद. सुधाताई तुमचे विचार हृदयापर्यंत पोहचतात.
    . भरपूर आरोग्यपूर्ण आयुष्य लाभू दे.हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना.

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 3 года назад +8

    काय व्यक्तिमत्व आहे राव❣️ नायाब#

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 2 года назад +3

    Great personality.
    Tyanche Marathi khupach god( sweet ) vatthe

  • @purushottamkulkarni3357
    @purushottamkulkarni3357 Год назад +2

    सुधाताईंच 'जय महाराष्टू' लय भारी
    तसे आम्हि कोल्हापूरी पण लय भारी

  • @sunilkhirgond7597
    @sunilkhirgond7597 3 года назад +26

    KANNADAD Kannamni 🙏🙏🙏🙏🙏 Love you Amma 🙏🙏🙏🙏

  • @saritapatil7982
    @saritapatil7982 3 года назад +4

    माझ्या सर्वात आवडत्या व्यक्ती. मला त्यांच्या बद्दल ऐकायला खूप आवडते... माझ्या दोन्ही मुलींना त्या खूप आवडतात त्यांची मुलांसाठी ची सर्व पुस्तके त्यांनी वाचलीत...खूप महान व्यक्ती.

  • @sagarp7279
    @sagarp7279 3 года назад +35

    "Murty jast bolat nahit manun me jast bolte"
    🤣
    Ek number Sudha Tai..

  • @sureshpandit1765
    @sureshpandit1765 3 года назад +2

    From Pune Sudha Mam Very very Nice Mulakhat Khup Khup Aanand Zala Dhanawad

  • @renukapatil6598
    @renukapatil6598 Год назад +1

    अतिशय प्रेरणदायी प्रवास त्यांनी सांगितलं ऐकताना त्यांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटत होते. किती सुसंस्कारी आहेत सुधा ताई तुम्ही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, अशीच जनसेवा तुमच्या कडून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @mangatesandipk2254
    @mangatesandipk2254 2 года назад +3

    ताई अभिमान आहे तुमचे सर्व पुस्तके वाचली आहे मी तुमचा आवाज इकंनेची इच्छा होती ती पण आज ABP माझ्या वरून पूर्ण झाली

  • @supriyaamberkar1497
    @supriyaamberkar1497 3 года назад +3

    ज्ञानदा ने खूप छान वाक्य सांगितलं सुधा मॅडम साठी साधी राहणी उच्च विचारसरणी जिवंत उदाहरण सुधा मॅडम...समाजसेवेचा वसा अविरतपणे चालू ठेवून आपल्या पिढी साठी पैसे ना साठवता समाजच आपण देणं लागतो ह्याची जाणीव ठेवणाऱ्या सुधा ताई ना ईश्वर उदंड आयुष्य देवो.अशी माणसं आपल्या देशात जन्माला आली हे खरंच आपला भाग्य

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 9 месяцев назад +1

    सुधा मूर्ती तुम्ही खरच खूप ग्रेट आहे
    तुमचे साधी राहणी उच्च विचार खूप आवडतात मला 🙏🙏

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 11 месяцев назад +1

    मॅडम किती साध्या आहेत. आणि किती हुशार आहेत. आम्हाला अभिमान आहे मॅडमचा. आमच्या कडून नमस्कार त्याना.

  • @yogendrarajput4239
    @yogendrarajput4239 2 года назад +3

    सुधा ताई तुम्ही भरताची शान आणि अभिमान आहेत

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 3 года назад +4

    Abp maza ला नम्र विनंती आहे की फालतु राजकारणी लोकांना माझा कटटयावर बोलावण्यापेक्षा अशा महान व साध्या लोकांना बोलावत जा..... Lockdown मध्ये पाहीलेला सुंदर विडिओ......

  • @manoramashintre5112
    @manoramashintre5112 Год назад +1

    मुलाखत फारच आवडली. मॅडमना उगीच वाटले त्यांना मराठी येत नाही. परंतु तसे नाही. उलट त्यांचे मराठी उच्चा रण फार गोड वाटले. त्यांच्या सारख्या विदुषी वर कोणती प्रतिक्रिया द्यावी इतकी माझी योग्यता खासच नाही. पण सगळा प्रवास एखाद्या साध्या सामान्य माणसाच्या अनुभवातील आहे. त्यामुळे त्या आपल्या वाटल्या. अर्थात विद्वत्ते बद्दल प्रचंड आदर वाटला. त्यांना सादर प्रणाम.

  • @ganeshchavhan1282
    @ganeshchavhan1282 Год назад +2

    सुधाताई सलाम आपल्या कार्याला🙏🙏

  • @smitakulkarni7765
    @smitakulkarni7765 3 года назад +13

    साधी राहणी उच्च विचारसरणी चे
    तंतोतंत उदाहरण म्हणजे सुधा मूर्तीजी

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 3 года назад +19

    खरोखरच छान मुलाखत.एबीपी माझाला धन्यवाद.आणि सुधाताई मुर्ती तर ग्रेटच.साधी राहणी उच्च विचारसरणी.बोलताना त्या आमच्या ताईच वाटतात.

    • @tulshiramnaikwade3595
      @tulshiramnaikwade3595 Год назад

      अतिशय सुंदर मुलाखत.
      सामान्यातून असामान्य असे विचार, जगणं आणि असणं वास्तव अनुभव स्पष्टपणे मांडणारे या दुर्मिळ व्यक्तिमत्वाची भेट घडली.या संवादाने फारच आत्मविश्वास वाढला.
      सुधाताईंना खूप खूप धन्यवाद...

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 2 года назад +2

    अप्रतिम, खूप प्रेरणादायी मुलाखत. मुलाखत अशी वाटलीच नाही. अगदी सहज सुंदर ओघवत्या भाषेत गप्पा सुरू आहेत असेच वाटले. सुधा मूर्ती मॅडम माझे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. धन्यवाद ABP माझा टीम.

  • @rekhajoshi3201
    @rekhajoshi3201 4 месяца назад

    ताई आपलं व्यक्तिमत्त्व इतकं प्रेरणादायी आहे की आपलं नांव उच्चारताच खूप एनर्जेटिक वाटतं.समाजाला अश्या अजून सुधा मूर्ती हव्या आहेत. आपण एक चांगला मार्ग समस्त महिला वर्गासाठी तयार केला आहे.परमेश्वर आपणांस उदंड आयुरारोग्य प्रदान करो.,😊❤

  • @DhanajiKene
    @DhanajiKene 3 года назад +4

    माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व,
    आपल्या लेखनाने समृद्ध होतोय आम्ही

  • @swapnilb16
    @swapnilb16 3 года назад +4

    Kiti chhan marathi bolat aahet👌🏻👌🏻👌🏻 kon mhanen ya karodo rupayanchya malak aahet, nahitar aata 1 marathi serial keli ki heroin english madhe suru kartat ani mhantat aamch marathi titk changl nahi.. you know we are in bollywood industry 😄

  • @gouravjoshi1825
    @gouravjoshi1825 3 года назад +32

    Simple Living and High thinking, Huge RESPECT mam!!

  • @varshadesai.6416
    @varshadesai.6416 3 года назад +33

    I am speechless. Such a great and humble lady, a lot to learn from her. Such a simple lady 🙏🙏

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 года назад +3

    सुधा मुर्ती ना नमस्कार तया कर्नाटक राज्यातील आहेत मला खुप अभिमान आहे माझ माहेर घर भेटल🙏🙏

  • @shailajanaik4302
    @shailajanaik4302 3 года назад +40

    सुधा मुर्ती यांची पुस्तक खूप छान असतात खूप छान लेखन करतात सुधा ताई

  • @sharayuwagh4251
    @sharayuwagh4251 2 года назад +2

    खुप छान अनुभव आहेत खुप खुप काही घेण्या सारखे आहे

  • @balsanskarfrommanishamam7290
    @balsanskarfrommanishamam7290 2 года назад +2

    Khupach chan wyaktimatwa👌👌👌👌👍

  • @bhaskar2508
    @bhaskar2508 3 года назад +239

    शिळं, उष्ट, खरकटं, (संजय राऊत) खाऊन झालयावर जसं काहीतरी गोड पाहिजे असतं तसं ही मुलाखत आहे बघा .......

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 3 года назад +4

    kharach khup maja aali....Thanks ABP Maza.

  • @rajendraajarekar7436
    @rajendraajarekar7436 3 года назад +1

    शेवटी खूप छान, लहान मुलानं सोबत आपली वागणूक कशी हवी हे सुंदर संगितले आहे

  • @user-og3ww5ee7h
    @user-og3ww5ee7h 3 года назад +9

    माणसाला मासूनपन आणणाऱ्या 1 सामाजिक न्याय, सुधारणा, करणाऱ्या व्यक्तीला कळजपून सलाम

  • @shrinivaskyatham3344
    @shrinivaskyatham3344 3 года назад +54

    सकल भारतवर्षास अभिमानास्पद असे आंतरराष्ट्रीय आदर्श व्यक्तीमत्व पद्मश्री इंजिनिअर सौभाग्यवती सुधा नारायणमुर्ती यांस मानाचा मुजरा सादर प्रणाम जी !!!!!
    🙏🇮🇳🙏 🙏🇮🇳🙏 🙏🇮🇳🙏 🙏🇮🇳🙏

  • @shreyashbande7924
    @shreyashbande7924 2 года назад +34

    I can listen to her whole day, her stories are amazing. She feels so homely like my grandmother is speaking to me herself.

    • @rekhawalimbe3886
      @rekhawalimbe3886 Год назад

      अप्रतिम, मौल्यवान आणि मूल्यवान मुलाखत

  • @bk7407
    @bk7407 3 года назад +2

    ग्रेट वूमन, अप्रतिम मुलाखत, मुलाखत अजून पुढे हवी होती. आणि किती छान प्रतिक्रिया दिल्यात सर्व प्रेक्षकांनी त्यामुळे असे वाटते की भरपूर खरंच चांगली माणसं आहेत आपल्या भारतात अजून. कारण या मुलाखतीत बाबत ठराविकच लोक प्रतिक्रिया देवू शकतात.

  • @pravinjadhav5617
    @pravinjadhav5617 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद ABP माझा.. 🙏
    मी हा व्हिडिओ फार वेळा पाहिला.. 👍

  • @bttxts3132
    @bttxts3132 3 года назад +18

    This is true example of being succesful
    Founder of Infosys yet so simple honest and kind
    Hats off to your attitude a lot to learn from you

  • @akasharerao9313
    @akasharerao9313 3 года назад +6

    माझ्या कट्ट्यावर भरपुर चांगल्या मुलाखती असतात परंतु हि मुलाखात हि आजवरचि सर्वात निरपेक्ष अशि मुलाखत म्हनायला काहि हरकत नाहि. उतुंग व्यक्तिमत्व तितकाच सामान्य अविरभाव. खुप छान वाटल एकुन

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 2 месяца назад

    खूपच सुंदर व्यक्तीमत्व म्हणजे सुधा मूर्ती छान मराठी बोलता तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @mahendrakumarkandu8350
    @mahendrakumarkandu8350 Год назад +1

    Adbhut ! Sudha Tayi aapan great aahot ! Dhanyavad to ABP MAJHA TEAM !

  • @undoubtedlybindhaast
    @undoubtedlybindhaast 3 года назад +7

    उत्साहवर्धक,आल्हाददायक, मृदू,वास्तविक,सुसंस्कृत तसेच निर्भेळपणे मुलाखत

  • @prajaktavispute1301
    @prajaktavispute1301 2 года назад +4

    माहिती नाही का, पण दाटून आले आहे हा व्हिडिओ पाहून.... यांच्यासारखी व्यक्ती परत होणे नाही 🙏 साष्टांग 🙏

  • @vpp121
    @vpp121 Год назад +1

    खूप छान मुलाखत
    मॅडम तुम्ही लिहिलेल्या कथा कादंबरी खूप छान

  • @mangallokhande4052
    @mangallokhande4052 2 года назад +2

    Tai bdaychai shubhechha ! Mi tumachi books vachali aahet ,khup prabhavi aahet .mala tumhala prateshat bhetanaichi khup ucha aahe .

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 3 года назад +142

    खांडेकर खूप पाल्हाळ लावतात, थोडक्यात प्रश्न विचारत जा, पाल्हाळ खूप कंटाळा येतो

    • @sohangurav8843
      @sohangurav8843 3 года назад +17

      उगाचच सर्वज्ञ असल्याचा भाव असतो. जसं काय लै मोठ्ठा तत्त्वज्ञानाने भरलेला गहन प्रश्न विचारत आहे, असा अविर्भाव असतो.

    • @keshavmodi9215
      @keshavmodi9215 3 года назад +1

      I agree with u

    • @MarathibhauAkshay
      @MarathibhauAkshay 3 года назад

      @@sohangurav8843 😜😜😜Same...

    • @vinayparab2363
      @vinayparab2363 3 года назад +1

      @@sohangurav8843 hahahah khar bolla yar tu....mla vatl fakt mlach asch vatt

    • @killedarmadhav8
      @killedarmadhav8 3 года назад +3

      अशांना पढतमूर्ख म्हणतात.

  • @sandeshkulkarni09
    @sandeshkulkarni09 3 года назад +94

    Instead of calling dirty politicians show these inspiring people stories thanks to ABP maja

    • @YoursHonestly
      @YoursHonestly 3 года назад +4

      So true these are our real inspiration.. and not any bollywood actors

    • @shreyakulkarni1724
      @shreyakulkarni1724 3 года назад

      Very True...

    • @Akshay-ow1dm
      @Akshay-ow1dm 10 месяцев назад

      Kalkarnya marathit lihi na

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 Год назад +2

    मराठी भाषेचा अभिमान साधी राहणी तुमच्या कार्यपद्धतीला सलाम

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 года назад +2

    सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती ह्यांना सलाम...सर रतन टाटा ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ह्या दांपत्याने दाखवून दिलं की उद्योजक कोण असतो...
    बाकी कर्नाटक च्या असूनही सुधा मॅडम ह्यांची मराठी खूपच छान आहे...
    असच कार्य तुमच्या हातून होत राहो मॅडम... 😊
    जय महाराष्ट्र 🚩

  • @user-me4un6zi1r
    @user-me4un6zi1r 3 года назад +4

    खूपच आनंद समाधान देणारी मुलाखत
    सुधाताईचे हिमालया सारखे कर्तृत्व असूनही शालिनता सोज्वळता वाखाणण्यासाठी...सर्वांसाठी आदर्श