New Raje Umaji Naik hd video song 1080p 2020 सुर्य तळपला उमाजी नाईक चमकला MP3 song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक:-
    हिंदुस्तानच्या इतिहासा मध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काहीची नोंद झाली,तर काही तशाच काळाच्या पडद्या आड राहून गेल्या. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व सर्व प्रथम इंग्रज सरकार विरुद्ध स्वराज्यासाठी बंड करून क्रांती घडविणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर "आघ क्रांतीवीर" नरवीर ठरला गेला तो म्हणजे "आघ क्रांतीवीर उमाजी नाईक" होय. अशा क्रांतिकारकाचा स्मुर्ती दीन नुकताच ३ फेब्रुवारी रोजी झाला परंतु रामोशी समाजाशिवाय कोणाच्याच तो लक्षात राहिला नाही आणि उमाजी नाईक फक्त रामोशी समाजापुरतेच सिमित राहून गेल्यासारखे वाटू लागले.क्रांतिकारकांचा आवर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्याही जाती धर्मातील असोत.मग हे "उमाजी नाईक"असे उपेक्षित का राहिले हे समजत नाही.खरे पाहता या क्रांतीकारकाबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी प्रमाणात आहे.त्यामुळेच ते उपेक्षित राहिले असावेत याचा विचार मनात बाळगून आम्ही आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची माहिती (पुस्तकी संदर्भानुसार) जमा करून त्यांनी या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल या हेतूनेच प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांना खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा म्हणून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र निमगाव दावडी येथील मल्हार गडावरती श्री खंडेरायाच्या आशिर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा अश्वरूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत.
    एक उपेक्षित क्रांतिकारक आघ क्रांतिवीर राजे उमाजी नाईक:-
    १७६१ मध्ये पानिपतच्या पराभवानंतर मराठी राजवट संपुष्टात येऊ लागली होती. विजापूरपासून पंजाबपर्यंत आणि सुरतपासून कटक पर्यंत संपूर्ण मध्य भारतावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करणाऱ्या मराठेशाहेची विभागणी झाली.त्यातून ग्वाल्हेर,बडोदा,इंदोर,नागपूर हि मराठी संस्थाने उदयास आली.याच काळात इंग्रजांनी वेशावर सत्ता मिळवण्यासाठी उचल खाल्ली.इंग्रजांसोबत मराठांच्या लढायाही झाल्या.परंतु इंग्रजांपुढे टिकाव लागला नाही. त्यामुळे या संस्थांनांनी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेऊन इंग्रज राजवटीत विलीन होण्याचा निर्णय घेतला.१८०३ मध्ये पुण्यात दुसरा बाजीराव पेशवा राजगादीवर बसला. त्यानेही इंग्रजांची गुलामी पत्करली .संस्थानिकांनी शस्त्रे खाली ठेवल्यामुळे इंग्रजांनी संपूर्ण भारत काही वर्षातच आपल्या अधिपत्याखाली घेतला. बाजीराव पेशव्याने इंग्रजांच्या बळावर रामोशी समाजाकडून पुरंदर गडाच्या संरक्षणाची जबाबदारी (पुरंदर वतन) काढून घेतली.अत्यंत धाडशी,निडर,लढवय्यी अशी क्षत्रिय जमात आणि तितकीच इमानदार अशी या रामोशी समाजाची ओळख त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांकडे या समाजाला खास स्थान होते.
    महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत यशस्वी कामगिरी बजावणारा "बहिर्जी नाईक " याच रामोशी समाजाचाच होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात रामोशांना महत्वाचे स्थान होते. महाराजांनी स्वराज्यात अनेक गडकिल्ल्यांच्या संरक्षणांची महत्वाची जबाबदारी याच रामोशी समाजाकडे दिली होती. पुरंदर त्यापैकीच एक किल्ला होता.बाजीराव पेशव्याच्या अन्यायकारक कृती विरुद्ध रामोशांनी आवाज उठविला होता. परंतु इंग्रजांच्या माध्यमातून त्याने त्यांच्यावर अत्याचार सुरु केला.या अत्याचारातच इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या क्रांतीची बिजे पेरली गेली.आपल्या समाज बांधवावरील अत्याचाराविरुद्ध "उमाजी नाईक" नावाचा एक तरुण पेटून उठला.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचाट शौर्यातून स्फूर्ती घेऊन उमाजीनाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारण्याचा निर्धार केला.अवघ्या सतरा ते अठरा वर्षाच्या उमाजी नाईकांनी प्रथम स्वतःला सक्षम बनविली.सर्वप्रथम त्यांनी आपली पारंपारिक हेरकला आत्मसात केली.त्यानंतर दांडपट्टा,तलवार ,भाले , कुऱ्हाडी,गोफणी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.
    विठुजी नाईक,कृष्णा नाईक,खुशाबा नाईक या आपल्या सहकार्यांना त्यांनी एकत्र केले.जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासींना एकत्र केले.आणि त्यांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली.युद्ध कलेबरोबरच गनिमी काव्याचे धडे घेतले.वेगवेगळ्या ठोण्यांमध्ये त्यांची विभागणी केली.श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवत भंडारा उधळत त्यांनी जुलमी इंग्रजी राजवटी विरुद्ध पहिल्या सशस्त्र क्रांतीचे शिंग फुंकले.
    इंग्रज सरकारचे खजिने ,इंग्रजी राजवटीला शरण आलेले वतनदार ,सावकार यांना उमाजी नाईकांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच राजे उमाजी नाईकांनी इंग्रजांपुढे मोठे आव्हान उभे केले.परंतु सन १८१८ मध्ये राजे उमाजी नाईक इंग्रजांच्या हाती लागले.उमाजी नाईकांना एक वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.परंतु यामुळे उमाजी नाईकांचे बंड येथेच थांबणार नव्हते.हि एक वर्षाची शिक्षा त्यांच्यासाठी मोठी पर्वणीच ठरली.कारण जन्मापासूनच पूर्णपणे अशिक्षित असलेल्या उमाजी राजांनी या शिक्षेचा सदउपयोग करून घेतला.
    या एका वर्षात उमाजी राजेंनी कारागृहात असताना शिक्षणाचे महत्व समजावून घेऊन शिक्षणाचे धडे घेतले.शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या उमाजी राजांनी मोठ्या प्रमाणावर नव्याने जुळवाजुळव केली.इंग्रजांशी लढा द्यायचा असेल तर त्याला व्यापक स्वरूप हवे याची उमाजी राजेंना जाणीव होती.यासाठी उमाजी राजेंनी सर्वप्रथम समाजात स्वत:चे स्थान निर्माण केले. एकीकडे इंग्रजांशी लढा ,तर दुसरीकडे समाजातील अत्याचारित पीडित समाज घटकांना विशेषतः अत्याचारित महिलांना न्याय मिळवून देण्याची मोहीम उघडली.
    शिव छत्रपतीं प्रमाणे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे हात-पाय कलम करण्यास सुरुवात केली. अनेकांना देह दंड हि दिला

Комментарии • 46