ujani dam update : आनंदाची बातमी! उजनी धरणामध्ये येणारी आवक वाढली | उजनी धरण अपडेट | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #उजनी #ujanidam #Ujanidamupdate #ujani_water_level #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : आनंदाची बातमी! उजनी धरणामध्ये येणारी आवक वाढली | उजनी धरण अपडेट | Hello Baliraja
    काल कोल्हापूर, अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तर सोलापूर, पुणेसह इतर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. आज देखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
    आज रविवार ७ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. यामध्ये उजनी धरणात सद्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ४ हजार १८४ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये वाढ झाली आहे. काल सकाळी उजनी धरणात ३ हजार ३१ क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४२.८३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस २०.८३ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३८.८८ टक्क्यावर आहे.
    उन्हाळ्यात निच्चांकी उणे ६० टक्क्यांवर पोहोचलेले उजनी धरण आता उणे ३९ टक्क्यांवर आलंयं. पावसाळा सुरू होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. असं असलं तरी उजनीमध्ये संथ गतीने आवक येत आहे. ही दिलासादायक बाब आहे. आत्तापर्यंत उजनीत १२ टीएमसी पाणी जमा झालयं.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •