अप्रतिम लेझीम नृत्य.. प्रजासत्ताक दिन 2025.. सातारा जिल्हा परिषद शाळा शेवरी.
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- आज 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन अभिमानाने आणि उत्साहाने माझ्या सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवरी या ज्ञानमंदिरात शालेय व्यवस्थापन समिती उपस्थित मान्यवर सदस्य यांनी पूजन करून उपाध्यक्ष श्री.बाळू हिरवे यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून अध्यक्ष सौ.अपर्णा राजगे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण झाले..... सरपंच सौ.भारती अमोल मुळीक, उपसरपंच श्री.अरविंद राजगे, अँड.श्री.विलास हिरवे, मा उपसरपंच/सदस्य अजित चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.अपर्णा जयप्रकाश राजगे, उपाध्यक्ष श्री.बाळू हिरवे,श्री विजय हिरवे,सौ.रेश्मा विठ्ठल राजगे, सौ.जनाताई अवघडे, श्री विलास पवार, वरिष्ठ मुख्याध्यापक श्री हनुमंतराव कदम व माझे सर्व सहकारी गुरुजन वर्ग आणि सर्व ग्रामस्थ तसेच पालक वर्ग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माझा झालेला सन्मान माझ्या शेवरीसह माणदेशी मायभूमीस समर्पित... सर्वांचे धन्यवाद 💐💐🙏
शाळेत उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम तसेच देशभक्तीपर गीते, विद्यार्थ्यांशी वक्तृत्व छान झाली... याशिवाय लेझीम नृत्याने सर्वजण भारावून गेले... सर्वच कार्यक्रमासाठी शेवरीकर ग्रामस्थ पालक यांनी लेकरांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.... सर्वांचे धन्यवाद..
याशिवाय श्री.महादेव अवघडे (गुरुजी) श्री विनायक शिंदे, श्री तुकाराम राजगे तसेच विविध मान्यवरांनी फंड रूपातून सुरू असलेला अनेक वर्षांपासूनचा उपक्रम यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.... सदैव ऋणी 💐💐🙏
सर्व शेवरीकर ग्रामस्थ, पालक, युवा मित्र बंधू-भगिनी या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद..सदैव ऋणी💐💐🙏
आपला देश समृद्ध, बलवान आणि एकतेचा प्रतीक राहो! स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गर्वाने बोलू भारतीय आहे मी, देशातील टिकवूनी शांतता, बदल घडवू, माणूसकी जपू, आहोत एक आम्ही जरी देशात विविधता प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!💐💐💐💐💐
=====@ शुभेच्छुक @======