Jay Bhim Valyachya Naadi Lagayach Naay | Vaishali Made | Megha Ghadge | New Marathi Song | Bhim Geet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 апр 2024
  • Jay Bhim Valyachya Naadi Lagayach Naay | Vaishali Made | New Marathi Song | Bhim Geet | Marathi Song
    Vaishali Made Present's "Jaibhim Valyanch Naade Laagayacha Nahi" A superhit Marathi Bhim Geet, Inspire By Dr. Bhimrao Ramji Ambedkar.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------
    🎧 Streaming On
    ♪ iTunes - music.apple.com/us/album/jay-...
    ♪ Apple Music - music.apple.com/us/album/jay-...
    ♪ Gaana - gaana.com/song/jay-bhim-valya...
    ♪ JioSaavn - jiosaavn.com/song/jay-bhim-va...
    ♪ Wynk - wynk.in/music/song/jay-bhim-v...
    ♪ Spotify - open.spotify.com/track/6tMSS2...
    ♪ Amazon Music - music.amazon.com/albums/B0CYH...
    ♪ RUclips Music - • Jay Bhim Valyachya Naa...
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    पिसफुल बिट्स प्रस्तुत..
    जयभीम वाल्याचा नादी लगायचं नाय
    निर्माती - वैशाली माडे
    गायिका - वैशाली माडे
    नृत्य - मेघा घाडगे
    गीत/ संगीत - विशाल जाधव
    म्युझिक अरेंजर व प्रोग्रॅमर-
    उदय साळवी
    लाइव्ह रिदम अरेंजर -
    सत्यजीत जामसंडेकर
    रत्नदीप जामसंडेकर
    शेहनाई - योगेश मोरे
    बँजो - फुलचंद कोकाटे
    व्हिडिओ टीम
    दिग्दर्शन - राहुल गायकवाड
    नृत्य दिग्दर्शिका - मेघा पवार
    कॅमेरा - सचिन लोखंडे, प्रज्ञेश फुलसुंदे
    हेअर मेकअप - नम्रता पाटील & टीम
    मेघा घाडगे हेअर- कोमल
    मेकअप - सूरज
    पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ
    अनुसया आर्टस् प्रॉडक्शन्स, नवी मुंबई
    पोस्ट प्रोडक्शन हेड -
    शिरीष विजय अशोक पवार
    संकलन - आकाश प्रकाश मोरे
    डी आय | कलरिस्ट - सुयश आचार्य
    टायटल कॅलिग्राफी -
    संतोष संखद
    पोस्टर & क्रिएटिव्ह
    अमित पवार
    ------------------------------------------------------------------------------------------------------------
    #bhimsong #bhimgeet #jaibhim #vaishalimade #marathisong #marathigeet #jaibhimsong #jaibheem
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    Don't Forget To Like, Comment And Share!!!!!!
    -----------------------------
    Managed and Promoted by ERIK Business Consultancy, Mumbai
    ©All rights reserved at
    Peaceful Beats
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 815

  • @Amitjadhav358
    @Amitjadhav358 3 месяца назад +147

    लावणी हा महाराष्ट्रातील एक नृत्यप्रकार आहे.आणि या नृत्याच्या माध्यमातून वैशाली ताईंनी बाबासाहेबांचं गीत सादर केलं आहे. यात चुकीचं काहीच नाही.💙💙

  • @bhagyeshkamble737
    @bhagyeshkamble737 3 месяца назад +57

    लावणीच्या रुपात बाबासाहेबांचं गाणं वाव खूप आवडलं. सर्व कलाकारांना सप्रेम जयभीम. लावणी आहे पण त्यात वाईट काय नाही.

  • @kishorchavan7964
    @kishorchavan7964 3 месяца назад +134

    मी जय भीम नसतानाही मला बाबा साहेबांचा अभिमान आहे , या लावणी च्या माध्यमातून सत्य घटना आत्याचार ,गुलामी केलेली सांगितले व लोकांना समजावे या साठी ही लावणी असावी

    • @UbaleVM
      @UbaleVM 3 месяца назад +1

      भाऊ जय भीम हा जयघोष आहे.
      सरळ म्हण की मी बौद्ध नाही.

    • @farukpathan8292
      @farukpathan8292 3 месяца назад

      बरोबर

    • @ymcreation2504
      @ymcreation2504 3 месяца назад +2

      तु जय भीम वाला नाही तर तरी पण तु बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो त्यांचा तुला अभिमान वाटते
      मानतो तर भावा तु उपकार करत आहे का ? तुलाच नाही तर अख्खा जगाला मानावे च लागणार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशासाठी एवढे महान कार्य आहे तर कोणाला पण त्यांचा अभिमान असणारच
      जय भीम 💙

    • @farukpathan8292
      @farukpathan8292 3 месяца назад +1

      Baba saheb hai sarvache ahai

    • @jitendrawaghmare9200
      @jitendrawaghmare9200 2 месяца назад

      Right

  • @rajendrasakawar
    @rajendrasakawar 3 месяца назад +107

    ज्यांना अक्कल नाही त्यांनी रिकामी ज्ञान पाजाळू नये
    लावणी खूप सुंदर आहे ❤❤❤❤

    • @PujaDhabarde-jv4ot
      @PujaDhabarde-jv4ot 2 месяца назад

      Brobr.

    • @pradnyakale1920
      @pradnyakale1920 2 месяца назад

      Agdi barobar bolalet👍

    • @ajayboynar7742
      @ajayboynar7742 Месяц назад

      बरोबर दादा❤

    • @vaibhavkotangale6028
      @vaibhavkotangale6028 20 часов назад

      बरोबर बोललं दादा आपण.गाण्यातील बोल बघा अगोदर मग बोला. काहीही चुकीचं नाही यात

  • @user-py7qx4uy5r
    @user-py7qx4uy5r 3 месяца назад +32

    मी बघितलेल्या आतापर्यंतच्या सादरीकरण पैकी सर्वोत्कृष्ट सादरीकरण. एकच नंबर गीत

  • @PavanKamble-mb5wl
    @PavanKamble-mb5wl 2 месяца назад +9

    काही असो पण बेस्ट लै भारी गायल वैशाली माडे ने❤ absolutely जय भीम क्रांतीचा

  • @Nainachaudhari3835
    @Nainachaudhari3835 3 месяца назад +25

    Vaishali ताई आणि मेघाताई दोघींना खडक जय भीम...💙💙💙💙💙

  • @user-qo8qg8dw1r
    @user-qo8qg8dw1r 3 месяца назад +24

    प्रबोधन आणि भावना समजून घेण्याची गरज आहे.ही बाबासाहेबांची लेक आहे.

  • @santoshhankare225
    @santoshhankare225 Месяц назад +2

    रचना उत्तम आहे... त्यामुळे आक्षेप घेण्यासारखे यामध्ये काही नाही.. वैशाली ताईचे हार्दिक अभिनंदन जयभीम

  • @chandraguptbansod1319
    @chandraguptbansod1319 3 месяца назад +21

    भिमगित लावणी हा नविन प्रकार आहे
    मला खुप आवडला
    जय भिम ताई

  • @dinkardond9490
    @dinkardond9490 Месяц назад +4

    गाणे खूपच गोड गायले आहे वैशाली ताईंनी

  • @vishalmasugaikwad
    @vishalmasugaikwad 3 месяца назад +206

    बाबासाहेबांचे गाणे तमाशाच्या पद्धतीने दाऊ नये ही सर्व कलाकारांना विनंती

    • @prashikkhandare8427
      @prashikkhandare8427 3 месяца назад +9

      खर आहे भाऊ

    • @Swara61910
      @Swara61910 3 месяца назад +3

      👆

    • @bhushaningle109
      @bhushaningle109 3 месяца назад +10

      Tamashya lavani kalavant pn Manus ch ahe tyana pn bhavana ahe tyanintyanchya padhhatine manvndana dili tyat kahi chukiche nai Ani purn video mde asshil as kahi hi nai ugach nav thevu nka jayntila daru piun nachata te chalte yevdhya Sundar ganyala nav thevta

    • @yogeshgacche263
      @yogeshgacche263 3 месяца назад +4

      अगदी बरोबर आहे. चार पैसा साठी आणि जयंती चे अवचित्त साधून काही पण करणे बंद करा. समाजाला बदलण्याचे काम यातून होणार नाही तर समाजाची दिशा भुल करत आहेत.

    • @yogeshgacche263
      @yogeshgacche263 3 месяца назад +1

      @@bhushaningle109 यात सुन्दर काय आहे
      मला तर एवढंच दिसले की दुसऱ्या समजातील लोकांना आपल्या राहणीमानाची प्रचिती देत आहात. आपण बुद्ध नाही तर आपण अजून हि काळाने कलंकित केलेले महार आहोत याची.

  • @arunkharat2732
    @arunkharat2732 3 месяца назад +48

    महाराष्ट्रामध्ये अनेक लोकगीताचे प्रकार आहेत त्यात अनेक भिमशाहिरांनी, गायकांनी आणि कवींनी आपल्या आवाजाने व लेखणीने "भीम गीत" हा गीताचा प्रकार उदयास आणला. ह्याच कलावंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शहरापासून गाव खेड्यात, वाड्या वस्त्यांवर पोहोचवले त्यावेळी आंबेडकरी जलसे ही निर्माण झाले. लोकरंजनातून समाज प्रबोधन आजही कलावंत करतच आहेत. आज सुप्रसिद्ध गायिका *वैशाली माडे* व सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना *मेघा घाडगे* या दोन भिमकन्यांनी "भीम लावणी" ची लोकसंगीतात भर घातली आहे. धन्यवाद... *अरुण खरात* (लोककला व लोककलावंत अभ्यासक, कोपरगाव)

    • @yogeshgacche263
      @yogeshgacche263 3 месяца назад

      अतिशय चूक आपण थोडा विचार करावा महामानवाच्या विचारांचं आपल्याला उत्तर मिळून जाईल.

    • @vishalkj
      @vishalkj 3 месяца назад +2

      त्याला अभ्यास करावा लागतो.. पण काहींच कसय की उचलली जीभ आणि लावली टाळुला..ते निगेटीव्ह कमेंट करणारे स्वतःही काही करत नाहीत आणि दुसऱ्यांनी काही केलेल त्यांना पटत नाही आणि पचत पण नाही..

    • @yogeshgacche263
      @yogeshgacche263 3 месяца назад

      @@vishalkj ruclips.net/p/PLUa6EAVoT1AuKDMRDJtqoYmwkzENnRSwB&si=TIweNq602SRkK2n-

  • @user-py7qx4uy5r
    @user-py7qx4uy5r 3 месяца назад +17

    अतिशय सुंदर गीत, अप्रतिम, अप्रतिम गीत, अप्रतिम संगीत, अप्रतिम नृत्य, अप्रतिम सादरीकरण, एवढं सुंदर गीत बनवलं की आणखी काय काय लिहावं, समजत नाही, अतिशय सुंदर गीत

  • @DhananjayRawade
    @DhananjayRawade 3 месяца назад +111

    बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे तमाशाच्या पद्धतीने दाऊ नये सर्व कलाकारांना माझी ही कळकळीची विनंती

    • @rahulkamble3112
      @rahulkamble3112 3 месяца назад +5

      याला लावणी म्हणतात, तमाशा नाही हा...

    • @SunilBWagh
      @SunilBWagh 3 месяца назад +2

      अगदी बरोबर ही लावणी आहे तुमच्या कॉमेंट्स वरून असे वाटते तुम्हाला बाबासाहेबांचे विचार समजले नाही अभ्यास करा त्यांच्या विचारांचा प्लिज

    • @rahulkamble3112
      @rahulkamble3112 Месяц назад

      @@SunilBWagh मित्रा Original Writing and Speeches वयाच्या 21 व्या वर्षांपासून वाचतोय... ते पण english मध्ये... त्यामुळे बाबासाहेब आणि विचारधारा कोळून पिलिये मी...

    • @user-zj9mp3zr2y
      @user-zj9mp3zr2y 11 дней назад

      ​@@SunilBWagh कोणते विचार, तुम्हाला काय कळले डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगा थोड विस्ताराने....

    • @user-zj9mp3zr2y
      @user-zj9mp3zr2y 11 дней назад

      तुम्हाला खुपचं जास्त वाईट वाटतं असेल तर तुम्ही हे व इतर कोणतेच गाणे पाहू नये.... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले व त्यात त्यांनी स्वतंत्र आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, तुमच्या सारखे हुकूमशाही करायला कुठेच सांगितले नाही ... हे असं करू नये ते तस करा असं कुठे सांगितलं का?..... जर संविधानात असं कुठे सांगितलं असेल तर आम्हाला पण सांगा..

  • @satyapalmaharajofficial7519
    @satyapalmaharajofficial7519 3 месяца назад +45

    लावणी ही एक उत्कृष्ट लोककला आहे,आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचार घराघरात पोहचविले,ताई खूप छान गीत आणि लावणी सुधा छान .... शुभेच्छा

    • @yogeshgacche263
      @yogeshgacche263 3 месяца назад +2

      विचार वाढवावं लागतील सत्यपाल महाराज आपले.

  • @user-vf5jx1st2b
    @user-vf5jx1st2b 3 месяца назад +11

    जयभीम ताई, अतिशय सुंदर लावणी ...गीत,नृत्य सादरीकरण आणि त्यावर गोड आवाज...एकदम मस्त

  • @rameshshejwal3940
    @rameshshejwal3940 3 месяца назад +20

    अतिशय सुंदर गीत लावणीमधून सादर केले आहे.आणि ह्या गीतामध्ये सुसंस्कृतपणा दिसून आला आहे.व चांगला संदेश दिला आहे.

  • @nanubotkawar9793
    @nanubotkawar9793 3 месяца назад +13

    खूपच सुंदर ताई, काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं जय भीम वैशाली ताई अँड मेघा ताई

  • @surajshirsath7720
    @surajshirsath7720 3 месяца назад +11

    विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏💙

  • @amoldive8198
    @amoldive8198 3 месяца назад +7

    ज्याला नाही आवडले त्यांचा विचार नाही करायचा शंभरात दहा वाईट विचार करणारे काही विरोधक असणारच त्यांना टाळून पुढे जात राहायचे बस
    मला खूपच आवडले हरकती पण छान घेतल्या ताई चाल तर खूपच सुंदर ज्यांना वाईट वाटले त्यांनी गाण्याचा मुखडा ऐकायचा तेच त्यांचे उत्तर आहे....
    जय शिवराय जय भिमराय

  • @yogeshgaikwad240
    @yogeshgaikwad240 3 месяца назад +27

    कलेतून बाबासाहेबांचं गुणगान गायले खूप छान ताई🎉🎉जय भीम

    • @rajfegade9153
      @rajfegade9153 3 месяца назад

      जय भीम भावांनो ❤

  • @mahendragaikwad2594
    @mahendragaikwad2594 3 месяца назад +15

    वैशाली मांडे यांनी मस्त गाणं गायलेलं आहे

  • @user-de7wf6sb6m
    @user-de7wf6sb6m 3 месяца назад +5

    अप्रतिम सॉंग रचना, अप्रतिम voice... Amasing लावणी..
    जय भीम

  • @KhushalWankhede-qd1pm
    @KhushalWankhede-qd1pm Месяц назад +3

    दाखवलेल्या प्रासंगिक दृश्यातुन हे दाखविले कि जयभीम वाचल्याबरोबर असे कृत्य केल्यास परिणाम वाईट होईल.छान

  • @varsharanikamble1692
    @varsharanikamble1692 4 дня назад

    मेघा ताई आणि वैशाली ताई....खूप छान लावणीच्या माध्यमातून सादरीकरण केले..❤❤❤

  • @sidharthkamble3836
    @sidharthkamble3836 3 месяца назад +16

    जय भीम वाल्याच्या नदाला ल लागायच नाही....❤❤🔥🔥

  • @ashokkhandare908
    @ashokkhandare908 3 месяца назад +13

    ह्यामध्ये गैर काहीही नाही हा एक वेगळ्या पद्धतीने प्रबोधनाचा प्रकार आहे खूप खूप अभिनंदन ताई

  • @shahiruttamraomhaske4138
    @shahiruttamraomhaske4138 2 месяца назад +3

    बाबासाहेबाच्या जन्मा आधी आपल्या समाजाची काय दूरदशा होती आणि बाबासाहेबानी घटना लिहून ती दूरदशा दूर केली हे या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न केला या गीताला लावणीचे रूप दिल्याने गान आधीक छान झाले,,,
    वैशाली ताईचे आणि मेघा ताईचे खुप खुप अभिनंदन

  • @user-kg5hp9lk7p
    @user-kg5hp9lk7p Месяц назад

    वैशाली ताईचे खूफ अभिनंदन जय भीम नमोबुद्धाय जयसंविधान

  • @poonamkhadtale7798
    @poonamkhadtale7798 3 месяца назад +4

    अप्रतिम😊 एकच नंबर... गायिका, गीतकार आणि नृत्यांगना यांना मानाचा जय भीम 🙏💙🙏

  • @ravindrabarathe9497
    @ravindrabarathe9497 3 месяца назад +20

    चांगला प्रयोग आहे...आज अनेक मनाला न पटणारी गाणी व बिभित्स नृत्य आपण पाहतो...या दोघी भिमाच्याच लेकी आहेत उत्तम सादरीकरण

    • @vishalkj
      @vishalkj 3 месяца назад

      हे या मंदबुध्दी आणि अर्धशिक्षितांना कसं समजवायचं? येड्याची जत्रा

  • @user-sx4in9qm3k
    @user-sx4in9qm3k 3 месяца назад +8

    खूपच सुंदर अप्रतिम ताई वेगळाच पटर्न ❤❤

  • @prashantkatare2131
    @prashantkatare2131 2 месяца назад +4

    गाणे अतिशय सुंदर. कला हया दृष्टी ने बघा. तमाशा मध्ये देव-देवता यांच्या नावाने सुरवात होते. वाईट काहीच नाही. जय भीम

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 3 месяца назад +4

    वैशाली ताई कोकीळ कोकिळा सारखं आवाज ऐक नंबर 👌👍

  • @prof.drvitthals.jadhavoffi1728
    @prof.drvitthals.jadhavoffi1728 3 месяца назад +9

    बाकी लोकगीतांच्या प्रकारांमध्ये भीम गीत लावणी ही वेगळ्या पद्धतीने विकसित केली त्याबद्दल आपले अभिनंदन

  • @user-qx7xf2vr4w
    @user-qx7xf2vr4w 3 месяца назад +3

    खूप छान,मेघा घाडगे आणि वैशाली माडे स्पेशल धन्यवाद दोघींना अप्रतिम अभिनय आतापर्यंत झालेला अन्याय तुम्ही दोघींनी व्येक्त केलात माध्यमं कोणताही असो खूप छान सादरीकरण केले जय शिवराय ,जय भीम, जय ज्योती.

  • @ashokantarvelikar8353
    @ashokantarvelikar8353 3 месяца назад +3

    अतिशय सुंदर लावणी, अप्रतिम आवाज, अप्रतिम नृत्य खूपच छान. या गाण्यातून लावणी या शब्दाला उचं शिखर प्राप्त झाल्यासारखं वाटतंय. असेच छान - छान गात रहा. धन्यवाद.

  • @sanjaymohite436
    @sanjaymohite436 3 месяца назад +12

    क्या बात है.. व्वा वाह व्वा एक आगळा वेगळा प्रबोधनकारी प्रयोग.. सलाम आहे गीतकाराला.. वैशाली ताई आपल्या गोड, मधुर आणि सुरेल आवाजाने गाण्याला फार बाहेर आली जी🙏🌻🌺🌹🌷💐

  • @darshanabhadange763
    @darshanabhadange763 3 месяца назад +3

    खूप सुंदर ताई जबरदस्त गाणे तुमच्या या गाण्याला क्रांतिकारी जयभिम 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️😇

  • @ashokkhare2402
    @ashokkhare2402 Месяц назад +1

    वैशाली ताई माडे आणि मेघा घाडगे यांना सप्रेक जयभिम 🙏🙏

  • @rohitakhade1311
    @rohitakhade1311 3 месяца назад +22

    बाबासाहेब ही एक विचारधारा आहे ती अश्या प्रकारे दाखाऊ नका ही मनापासून कळकळीची विनंती आहे .

  • @tfctamashafilmcafe7948
    @tfctamashafilmcafe7948 3 месяца назад +3

    शिंदे घराण्याने गायिलेल्या डबल मिनिंग गाण्यापेक्षा हे गीत खूप सुंदर आणि संयमीत भाषा वापरून बाबासाहबांबद्दल सादर केलं आहे. आदर युक्त भावना आहेत. खूप छान ताई... जय भीम जय शिवराय..

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 11 дней назад

    Immortal lavani by Vaishali Made Tai.

  • @dattatrayatayade8191
    @dattatrayatayade8191 3 месяца назад +2

    कला प्रांतातील बाबासाहेब आंबेडकरजी यांची व समाज भावना परिणाम कारक पध्दतीने सादरीकरण केले आहे.धन्यवाद.

  • @ajayshinde5158
    @ajayshinde5158 2 месяца назад +2

    वा वा अप्रतिम सादरीकरण ❣️❣️

  • @pankajtapase358
    @pankajtapase358 3 месяца назад +3

    अतिशय सुंदर ताई सप्रेम जय भीम नमो बुद्धाय

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 3 месяца назад +12

    जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी जय महाराष्ट्र

  • @vivek81297
    @vivek81297 3 месяца назад +3

    Lot of love nd respect from mp , jai bhim jai bharat

  • @avinashmore1168
    @avinashmore1168 3 месяца назад +5

    वैशाली ताई मी तुमचे सर्व भीम गीते खूप मन लावून ऐकतो अन मला ते नेहमी आवडतात पण आज मला खूप वाईट वाटलं कि तुम्ही हे आशा प्रकारे गाणं सादर केलं आणि त्यावर हा असल्या गलिच्छ प्रकार चा धिंगाणा घातला, मला तर वाटत गीत छान आहे पण त्याची लावणी करण्याची काही एक गरज नव्हती, वैशाली ताई भविष्यात आपण अशी चूक करणार हीच एक अपेक्षा....
    जय भीम 🙏

    • @luckypgotekar
      @luckypgotekar 3 месяца назад

      Kaay galichhoana aahe kahi pan
      Sadri Karan karnaryana kaay pagal samjhle kaay

  • @Fact_fanta70
    @Fact_fanta70 2 месяца назад

    ❤❤❤❤❤ just heart , feeling express krta yet nahi aahe mhanun , khup sundar

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 3 месяца назад +4

    बाबा साहेबाना विनम्र अभिवादन, लावणी गीते बरोबर वाटत नाही. जय भीम.

  • @bhimraozade5148
    @bhimraozade5148 29 дней назад

    खुप सुंदर गायीकी वैशाली माडे

  • @gurudhammobhante7280
    @gurudhammobhante7280 3 месяца назад +4

    आता पर्यंत च्या भीम गिता पेक्षा वेगळे काही करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला, फार सुंदर गायले, नकारात्मक लोकांकडे लक्ष देऊ नका, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या बलाने आपल्या इच्छा आकांक्षा पोर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे परिपूर्ण होवो अशी ऊदात्त मंगल मनोकामना 🌹

    • @PRSRTJ123
      @PRSRTJ123 3 месяца назад

      लवणीतून तुला काय कळले

    • @BabyMartin-ip1rs
      @BabyMartin-ip1rs 2 месяца назад

      ​@@PRSRTJ123सर्व कळले. गप बसा. तुम्हालाच नाही कळलेल दिसते. 👌गान् आणि त्यातून संदेश.❤ एकदम छान आहे. किती जोशपूर्ण गांण तेही जोमात गाइल!👌🙏🏻

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad 3 месяца назад +6

    भीम लावणी उदयास आणल्याबद्दल खूप खूप आभारी....छान सादरीकरण केलं आहे, नकळत भावना व्यक्त केल्या आहेत, खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @gulabavachar8749
    @gulabavachar8749 3 месяца назад +8

    🙏🙏 जयभिम छान सादरीकरण उत्तम कलाकार.होऊन जाऊद्या जयंती साजरी आणि जल्लोषात मीरवनुकीत मज्जा येईल महाराष्ट्र मधील सर्व भिमकन्या मुलिंना..👌👌🇪🇺🇪🇺

  • @swapnalikamblekamble
    @swapnalikamblekamble 3 месяца назад +3

    Jay bhim nmo budh 🙏🏻💙

  • @santoshdongare4642
    @santoshdongare4642 3 месяца назад +10

    Hats off for this song... super se bhi upar kadak जय भीम 🙏

  • @Preamble1950
    @Preamble1950 3 месяца назад +2

    अतिशय सुंदर लावणी सादर केली, भारतात लोकशाही आहे, आणि लोकशाहीत प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्याचा आनंद घेत जगायचं असतं.. काही होबासराव स्वतः ला स्वयंम घोषित समाजसुधारक समजतील की हे बरोबर नाही ते अतिशहाणे फक्त मूर्खच नाहीत तर ते संविधान आणि लोकशाही विरोधी आहेत त्यांना वाटते की इतरांनी त्यांच्या मताप्रमाणे वागावं... ते हुकूमशाही विचाराचे लोकं आहेत.. इतरांवर स्वतः हुकूमशाही लादतात, त्यांना स्त्रियांना कुठेच स्थान नको असते.. ते संविधन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावं घेऊन हुकूमशाही, दडशाही, झुंडशाही ही स्त्रीया आणि समाजावर लादत असतात.. ते आंबेडकर विरोधी आणि लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी आहेत हे दीडशहाणे कमी नाहीत... कारण ते लोकशाही आणि संविधान मानत नाहीत.. त्यांना वैशाली ताई माडे ह्या भीक घालणार नाहीतचं... वैशाली ताई तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने संविधान आणि लोकशाही मूल्यं समाजात स्वाभिमानाने रुजवता येतील तेवढे रुजवा.. हाती चला बाजार कुत्ते भौंकते हजार... जय भीम..जय संविधान जय भारत

    • @vishalkj
      @vishalkj 3 месяца назад

      अगदी खरं आहे. हे नकारार्थी प्रतिक्रिया देणारे असे थोर सामाजिक कार्यकर्ते असतात जे स्वतः जयंतीला दारु पिऊन धिंगाणा घालतात आणि इकडे उपदेश देतात. यांना स्वतःला जे आवडत तेच इतरांनी कराव अशी जबरदस्ती यांची असते. ह्यात किती आयडी ओरिजनल आहेत यात देखील शंका आहे. मनुवादी किडे फेक आयडी लावून कमेंट करताय. येवढं मात्र खरंय. असो गाण जोरात वाजणार यात काही शंका नाही. सप्रेम जय भीम🙏

  • @chandrashekharchavan1876
    @chandrashekharchavan1876 3 месяца назад +8

    *अति उत्तम.... खूपच छान...... खूप खूप आशीर्वाद आणि तुमच्या भरघोस यशासाठी शुभेच्छा*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @varshakamble9057
    @varshakamble9057 2 месяца назад

    Khup chan koni kahi bolu dya💙💙💙💙💙💙💙 Jai bhim

  • @rahulwankhade6381
    @rahulwankhade6381 3 месяца назад +11

    लावणी वाईट नाही.. ती आपली लोककला आहे... ज्याचा जसा चश्मा तो तसा बघेल...

  • @gajanangawai2140
    @gajanangawai2140 3 месяца назад +3

    Jai bhim ताई❤❤

  • @SUNILSHEGAONKAR
    @SUNILSHEGAONKAR 3 месяца назад +7

    सुंदर रचना, सुंदर गायन आणि सुंदर नृत्य..

  • @jyotibabhalerao2437
    @jyotibabhalerao2437 3 месяца назад +3

    ह्या गाण्याचे शब्द खूपच छान पण आशा नृत्य दाखनेये कारण डाँ.बाबासाहे आंबेडकर जगामधे ज्ञानाचा प्रतीक मांतेत🙏🏼🙏🏼

  • @SudhirPandit-si8si
    @SudhirPandit-si8si 2 месяца назад

    Roj....10 vela tari ekto....lyy..Soft...and sober Song

  • @ravikantkawade7884
    @ravikantkawade7884 3 месяца назад +9

    अप्रतिक रचना
    खूप छान आवाज
    सुंदर नृत्य ❤❤❤❤

  • @anandbangale1859
    @anandbangale1859 3 месяца назад +1

    क्या बात है अतिशय सुंदर गीत आणि खूपच सुंदर विडीओ वैशाली ताई एक नंबर आवाज आहे तुमचा जय भीम जय सविदान

  • @yogeshjagtap916
    @yogeshjagtap916 26 дней назад

    एकच नंबर

  • @kunalnikale1004
    @kunalnikale1004 3 месяца назад +2

    Jay Bhim💙💙

  • @ashokkhare2402
    @ashokkhare2402 Месяц назад

    आज ही अन्याय अत्याचार होत आहेत त्यांना हा इशारा आहे.जयभिम जय भीम जयभिम

  • @user-sx4in9qm3k
    @user-sx4in9qm3k 3 месяца назад +2

    खूप छान माडे ताई❤❤❤

  • @saurabhnarnaware8824
    @saurabhnarnaware8824 2 месяца назад

    Khup chaan jai bhim jai shivrai

  • @D.N153
    @D.N153 3 месяца назад +2

    Great 💙💙💙💙💙

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 3 месяца назад +2

    शिवाजी महाराजांनी तुम्हाला पाहिलं नसतं अशीच आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो, असे वदले श्री छत्रपती, वेदिका विठोबा घाडीगावकर

  • @rahulwankhade6381
    @rahulwankhade6381 3 месяца назад +2

    खूप छान Composition...tai

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 3 месяца назад +6

    मला असं वाटतं की गीत आहे मस्त पण व्हिडिओ नाही बरोबर
    जय भीम जय संविधान

    • @thesingersachindada78
      @thesingersachindada78 3 месяца назад +2

      सहमत

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 3 месяца назад

      अगदी बरोबर् डोळे michkaun मानेने चल म्हणारा सिन khatkala.

    • @balajijanrav5936
      @balajijanrav5936 2 месяца назад

      अगदी बरोबर आहे सर
      बाबासाहेबांचा स्वप्न होतं
      लोकांनी वाचावं
      नाचावं नाही
      जय भीम

  • @vipeensonawane2608
    @vipeensonawane2608 2 месяца назад +1

    जय भिम वैशाली ताई आणि मेघा मॅडम 👍👍❤️❤️🌹🌹🙏🙏

  • @SatishNikalje-cq3kc
    @SatishNikalje-cq3kc 3 месяца назад +2

    लाजा धरा

  • @rakhijadhav7408
    @rakhijadhav7408 3 месяца назад +1

    Khup chaan❤ jay bhim jay shivray 💙

  • @user-nh9xo9wy1z
    @user-nh9xo9wy1z 3 месяца назад +2

    Super song and dance , vaishali and megha Tai 🙏🙏🙏💐💐💐

  • @pravinwaghmare5941
    @pravinwaghmare5941 2 месяца назад

    Kdk jay bim ❤❤❤🎉

  • @girishadakmol3948
    @girishadakmol3948 3 месяца назад +1

    ❤❤❤ छान सादरीकरण व्हा जय भीम ❤❤❤

  • @premwaghmare6833
    @premwaghmare6833 3 месяца назад +1

    Khup chan mazi mulgihi lavani nrytyagana ahe amchi pan khup iccha hoti ki babanchya vr ek prabodhanatmak lavani v saval javab karykram krava pan mulagi ajari aslyamule te amhala karta ale nahi pan he gane eiklyapasun mazya mulila punha ekda utsah ala ahe thank u all team❤❤

    • @vishalkj
      @vishalkj 3 месяца назад

      Thank you so much🙏🙏

  • @sambhajimisal996
    @sambhajimisal996 3 месяца назад +1

    संगीत व गीत रचना उत्तम असली तरी चित्रिकरण कालबाह्य आहे. लोकनाट्य जिवंत ठेवताना आंबेडकरी चळवळीचा तमाशा करु नये हीच कलाकारांना विनंती.

    • @ShalinNaik-ux4wh
      @ShalinNaik-ux4wh 2 месяца назад

      ज्यांनी ज्यांनी या लावणीवर प्रतिक्रिया दिल्या त्यांनी आपल्या आपल्या अभ्यासातून दिल्या माझ्या मते लावणी अतिशय सुंदर आवाजात गायले पण बाबासाहेब आंबेडकर एक जगात विचारधारा आहे असे नृत्य यावर बसविणे मला आवडले नाही

  • @SakshiKamble-ng1ds
    @SakshiKamble-ng1ds 3 месяца назад +3

    छान अजून अशा अनेक प्रकारच्या लावणी तयार करा

  • @akashkshirasagar8112
    @akashkshirasagar8112 3 месяца назад +1

    Jay bhim tai💙💙

  • @more.1000
    @more.1000 3 месяца назад

    U always rock in evry music genere Vailashi ji❤❤❤

  • @gautamdehade956
    @gautamdehade956 2 месяца назад +1

    अप्रतिम शब्दरचना आणि संगीत व गायन

  • @bharatghusale2824
    @bharatghusale2824 3 месяца назад +2

    खूपच छान गायलं song

  • @user-dk6hu7ni6x
    @user-dk6hu7ni6x 2 месяца назад

    Jai bheem Thai 🙏Iam from Adilabad in Telangana gana khup chahan ahe ,,,kalakaryana sapram Jai bheem ✍️👌💐

  • @bharatghusale2824
    @bharatghusale2824 3 месяца назад +2

    Nace

  • @nandasonawane-f5j
    @nandasonawane-f5j Месяц назад

    वैशालीताई खूप छान

  • @Bhagwangedam-ow6cc
    @Bhagwangedam-ow6cc 3 месяца назад +2

    💙💙💙Khatarnak Jay bhim 💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @sanp-ld9zr
    @sanp-ld9zr 3 месяца назад +2

    Bhartiya striyansathi babasahebanani khup kam karun thewalay mag jar ekhadi striya tichya bhawana vakt karte tar tyat gair kay....
    He sarv karyala himmat lagate ji babasahebanani ch dili ahe... Ha atmavishwas ya ganayaswaraupat sarv samajat pohachu shakato
    Jay bhim jay bharat

  • @jyotisarvade3276
    @jyotisarvade3276 3 месяца назад +1

    Kuni kitibi lava Shakti, kuni kitibi ladva yukti ,kuni kral kitibi halla lay majbut bhimacha killa. Jay Bhim Tai 🙏 🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @KajalJagtap-ie7bd
    @KajalJagtap-ie7bd 2 месяца назад

    Jai bhim ❤😊

  • @akashdodke9718
    @akashdodke9718 3 месяца назад

    You are Amezing vaishali tai ❤❤❤ super voice

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m 2 месяца назад

    छान घाडगे tai👌

  • @sahilbansodekth7471
    @sahilbansodekth7471 3 месяца назад +15

    आंबेडकर जयंती ला दारू पिऊन गल्ली बोळात चौकात नंगा नाच करणारी पोरी पोरं चालतात या समजाला ते ही नको त्या गाण्यावर .✔️...आणि दुसरी कडे अंग झाकून पारंपारिक वेशात आंबेडकर यांच्यावरच्या गाण्यावर लावणी केलेली आवडत नाही❌ वा.....रे माझा समाज👍👍

    • @PujaDhabarde-jv4ot
      @PujaDhabarde-jv4ot 2 месяца назад +1

      Ho n etk shundr asun naw thewt ahe je astat tyana tsch dist😂