काळगांव परिसरात शेतीच्या मशागतीच्या कामाची लगबग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • काळगांव विभागामध्ये धुळवाफेवरील पेरणीला प्राधान्य दिले जाते. यामध्ये भात, सोयाबीन, भुईमुग, मका इ. पीके घेतली जातात. सध्या या भागात पेरणीची धांदल सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार माणसांनी गजबजलेला दिूसन येत आहे. मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे काळगांव भागाला वारा आणि पावासाने झोडपून काढले आहे. त्यामुळे लोकांनी मशागतीला सुरुवात केली आहे.बांधाची जुळवाजुळव करणे, शेतीतील सड, पालापाचोळा काढून रान स्वच्छ करणे, खत विस्कटणे इ. कामे महिला करत आहे. डोंगर कपारीतील अडचणीच्या जागेवर असणारी शेती, शेतांचा छोटा आकार असल्यामुळे ट्रैकटर किंवा अन्य शेती यंत्रे या ठिकाणी जावू शकत नाहीत. त्यामुळे लोक पारंपारिक अवजारे वापरण्याकडे लक्ष देत आहेत. एकंदिरत शेती अवजारांची ही कामे उरकण्याची गडबड सुरु आहे.
    पेरणीमुळे सर्व लोक शेतामध्ये दिसत आहे. सर्व शिवार माणसांनी फुलून गेला आहे. काळगांव विभागातील डाकेवाडी, लोटळेवाडी, येळेवाडी, करपेवाडी, मस्करवाडी, चोरगेवाडी, वेताळ, निवी, सलतेवाडी, मत्रेवाडी इ.वाडया वस्त्यांवर सध्या धुळवाफेवरील मशागतीची तसेच पेरणीची लगीनघाई सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Комментарии • 2