११ जागा १२ उमेदवार हे आमदार होता होता पडणार ? |vidhan parishad election | mahayuti |mahavikas aghadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #vidhanparishadelection #vidhanparishad #mahavikasaghadi #mahayuti #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #uddhavthackeray #nanapatole #pankajamundhe #sadabhaukhot #jayantpatil #milindnarvekar #bhavnagavali #krupaltumane #rajeshvitekar
    मंडळी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे. या 11 जागांसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडी कडून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंडळी, भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, आणि अमित गोरखे हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज दाखल केले. शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसच्या वतीने प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरला. आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठिंब्यावर शेकापच्या जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. विधानसभेमध्ये भाजपचे बळ पाहता ते त्यांचे पाच उमेदवार जिंकून आणू शकतात, राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्या संख्याबळानुसार दोन दोन उमेदवार जिंकून आणू शकतात. तर महाविकास आघाडी कडून काँग्रेसची संख्या पाहता प्रज्ञा सातव या निवडून येऊ शकतात. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असतांनाही उबाठा सेनेने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 15 आणि शरद पवारांच्या पक्षाचे दहा अशी आमदारांची संख्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या पाहता 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र आमदारांचा संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडी कडून तीन उमेदवार देण्यात आल्यामुळे अधिकच्या मतांची संख्या कशा पद्धतीने जुळवण्यात येईल हे पहाणे उत्सुकतेच असणार आहे. याच जुळवाजूळवीच्या राजकारणाला खरी सुरुवात झालेली आहे. मंडळी
    या निवडणुकीसाठी 12 जुलैला मतदान होणार असून, या निवडणुकीत आमदारांचा घोडेबाजार देखील होऊ शकतो.
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 1

  • @sunilraut769
    @sunilraut769 2 месяца назад

    शेकाप चे जयंत पाटील हे बळीचा बकरा होणार हे 100% खात्री आहे.