माझ्या भीमाला आठवा-आकांक्षा साळवे || भिमाची ओवी || महापरिनिर्वाण दिन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • समता, बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यांची देण देशाला देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीच्या साऱ्या वाटा खुल्या केल्या. गरीब, हीन, वंचित, शेतकरी, मजूर लोकांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी जीवनभर अविरतपणे लढा दिला. स्त्रियांच्या अधिकारासाठी ते झटत राहिले, देशाची आर्थिक परिस्थिती सुधारवण्यातही बाबासाहेबांचे कष्ट आहेत. असा झालाच नाही कुणी, असा होणार नाही कुणी दिनाचा धनी ग हे वाक्य खरंच तंतोतंत बाबासाहेबांना शोभत. अश्या ह्या देश्याच्या कैवाऱ्याचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ ला झाले. पण त्यांच्या स्मृतीमध्ये आणि माणसांच्या ह्रदयांमध्ये आजही ते जिवंत आहे. बाबासाहेबांना अभिवादनपर लिहिलेली ही ओवी नक्की ऐका..!
    जसा उठवला भीमाने, तसा आवाज उठवा
    माझा व्याकुळतो जीव, माझ्या भीमाला आठवा...!
    नाव भीमाच ग घेता, जात फिरे गरागरा
    कस सांभाळील त्याने, नवकोटीच्या संसारा
    चैत्यभूमीला जायाला, भल्या पहाटे उठवा
    माझा व्याकुळतो जीव, माझ्या भीमाला आठवा...!
    शोषितांचा कैवारी, निजला ग सागरतीरी
    बाबाच्या वियोगाने, शोक करिती लहरी
    समतेच्या आभाळाला, अभिवादन पाठवा
    माझा व्याकुळतो जीव, माझ्या भीमाला आठवा...!
    बंध रुढीचे तोडून, आम्हा माणूस बनविले
    संविधानाने देशात, लोकशाहीला सजविले
    उपकार बा भिमाचे, लोचनांत हो साठवा..!
    माझा व्याकुळतो जीव, माझ्या भीमाला आठवा...!
    -आकांक्षा साळवे

Комментарии • 13

  • @vikrantsalve
    @vikrantsalve 3 года назад +1

    खूप छान आवाज आणि सादरीकरण

  • @sawanshinde9091
    @sawanshinde9091 3 года назад +1

    छान आहे
    जय भीम 🙏

  • @AmrapaliJadhavVlogs
    @AmrapaliJadhavVlogs 3 года назад +1

    #JaiBhim

  • @shubhamwatve
    @shubhamwatve 3 года назад +1

    खुप छान

  • @babitadokhe6974
    @babitadokhe6974 3 года назад +1

    Jai bheem

  • @Shashi01999
    @Shashi01999 2 года назад

    बहन
    नमो: बुद्धाय।
    जय भीम।।

  • @devashishnegi2996
    @devashishnegi2996 3 года назад +1

    Obc, sc ,st में आने वाले कुछ ब्राह्मणों व कुछ क्षत्रियों की सूची::
    facebook.com/100046670058023/posts/218560389709628/?app=fbl
    कृपया इसके कमेंट भी पढ़ें।.....।।।।

  • @ProfAkshaySalve
    @ProfAkshaySalve 3 года назад +1

    अप्रतिम लेखन आणि सादरीकरण..👌👌

  • @rahulmane7461
    @rahulmane7461 3 года назад +1

    छान लिहिले आणि सुंदर ताईने म्हणले 👍
    जय भीम

  • @ashishsahani2882
    @ashishsahani2882 3 года назад +2

    Jai Bhim Babasaheb jindabad

  • @mayurimore6552
    @mayurimore6552 3 года назад +1

    शब्द आणि गोड आवाज खूप छान 👌👏😍

  • @mhiii--narwade8599
    @mhiii--narwade8599 3 года назад +1

    So sweet tai Chan aavaj aahe aani lihile pn khupch Chan jay bhim namo buddhay 🙏

  • @kavitalahase915
    @kavitalahase915 3 года назад +2

    Jai bhim 🙏