नंदलाला घुमव कृपेचा पावा | सरोजाताई बोधनकर | पुष्पलताताई पैंजणे | संत सुरदास | मराठी भजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • कसा कळेना तुला विसरलो
    कुणी साधीला दावा
    नंदलाला घुमव कृपेचा पावा ।।धृ।।
    सचेतना तन-मनात भिनली
    त्यास तनू ही कशी विसरली
    मदमोहाच्या धुंदीमधुनी
    जडला कृष्ण दुरावा
    नंदलाला घुमव कृपेचा पावा ।।१।।
    वाचेमधुनी नाम स्फुरेना
    सहा रिपुंचा संग सुटेना
    सुख लोलुप या मन भ्रमराला
    कसा मरंद मिळावा
    नंदलाल घुमव कृपेचा पावा ।।२।।
    जन्म मरण हा एक पिंजरा
    त्यातून सुटका नसे पाखरा
    सुरदास ही बंदिवान रे
    करी दिठीतून धावा ।। ३ ।।
    रचना - संत सुरदास
    गायन, हार्मोनियम -
    सरोजाताई बोधनकर
    तबला -
    पुष्पलताताई पैंजणे
    निवेदन,टाळ -
    अंकिता बोधनकर
    व्हिडीओ, Mixing, Editing -
    साईकेदार बोधनकर
    विशेष आभार -
    चारुशीला पैंजणे
    वैष्णवी महाराज, वसमत.
    नमस्कार ! व्हिडीओ आवडल्यास Like , Share करा.जर आपल्याला आपले भजनाचे व्हिडीओ आमच्या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित करायचे असतील आणि भजन, टाळ, हार्मोनियम इ.च्या क्लासेस साठी आमच्याशी संपर्क करा.अशीच गाणी आणि भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादींच्या मार्गदर्शक व्हिडीओंसाठी आमच्या चॅनल ला Subscribe करायला विसरु नका..
    आमच्या या उपक्रमास आपण मदत करण्यास इच्छुक असाल तर नक्की करू शकता..
    Google Pay - 8975202836
    Saikedar Bodhankar
    Contact -
    Mo.+91 8975202836
    E-mail - sselmohkar@gmail.com

Комментарии • 99