BHAIRIBUVACHA SHIMGOTSAV
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. शिमग्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री श्रीदेव भैरीमंदिरातून पालखी निघते. यावेळी हजारो रत्नागिरीकर भैरीमंदिरात गर्दी करतात. प्रत्येकजण पालखीच्या दर्शनासाठी धडपडत असतो. ही पालखी वाजतगाजत मंदिरातून बाहेर पडते आणि शहरातून मार्गक्रमणा करत दुसऱ्या या दिवशी झाडगांव येथील सहाणेवर येऊन बसते. त्यानंतर त्याठिकाणी होळी उभी केली जाते. ही होळी उभी करताना रत्नागिरीकरांच्या एकजुटीचे दर्शन घडते. शेकडो लोक एकत्र येऊन ही होळी उभी करतात. त्यानंतर 5 दिवसांनंतर रंगपंचमीच्या दिवशी श्रीदेव भैरीबुवांची पालखी सहाणेवरुन उठते आणि सगळीकडे रंगांची उधळण केली जाते. अन्यठिकाणी होळीच्या दुसऱ्या या दिवशी म्हणजे धुलीवंदनाला रंगांची उधळण केली जाते. रत्नागिरीत रंगपंचमीला सर्वजण रंगात न्हाऊन निघतात.
SHIMGA IS A ICONIC FESTIVAL OF KONKAN. IT STARTS BEFORE ONE WEEK OF HOLI. THIS VIDEO IS FROM RATNAGIRI DISTRICT WHERE PALKHI OF BHAIRIBUVA COMES OUT OF TEMPLE BEFORE HOLI.