शिक्षक-पालक सभा २०२४-२५ ५ जुलै २०२४
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- *पलूसकर माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षक-पालक सभा उत्साही वातावरणात संपन्न...*🌹🌹👍🌹🥈🥇🙏
*आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षक-पालक सभा उत्साही वातावरणात संपन्न झाली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.उदय परांजपे साहेब, उपाध्यक्ष मा. विश्वास रावळ, सचिव मा. जयंतीलाल शहा,संचालिका सौ. सविता परांजपे, मुख्याध्यापक मा.टी.जे.करांडे सर , सर्व शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते*.
*प्रतिमापूजनानंतर संगीत विभागाने अतिशय सुंदर असे स्वागत गीत सादर केले.प्रास्ताविक विभाग प्रमुख बी.डी.चोपडे सर यांनी केले.इयत्ता पाचवी आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, दहावीतील पहिले तीन क्रमांक, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले*.
*यावेळी परीक्षा विभाग प्रमुख मा.ए.जे. सावंत सर यांनी शिक्षक पालक संघ,माता पालक संघ ,शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य,शालेय परीक्षा याची सविस्तर माहिती दिली. प्रा.बी.एन.पोतदार सर यांनी वर्षभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.क्रीडा शिक्षक संदीप सावंत सर यांनी सर्व स्पर्धांची माहिती दिली. अटल टिंकरींग लॅब विषयी विज्ञान विभाग प्रमुख सौ.प्रज्ञा बिराज यांनी सर्व माहिती दिली*...
*यावेळी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे साहेब व सचिव जयंतीलाल शहा ,मुख्याध्यापक तानाजी करांडे सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयात आयोजित करत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली व गेल्या शैक्षणिक वर्षाचा आढावा घेतला*.
स्काँलरशिप,NTS,NMMS,सर्व शाळाबाह्य परीक्षा , नवोदय परीक्षा.निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांची माहिती दिली
*शिक्षक - पालक सभेसाठी सर्व शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते*🌹🙏🌹🙏