Konkan's Traditional fishing and best fishing idea's

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कोकणातील पारंपरिक मासेमारी पैकी एक पावसाळ्यातील मासेमारीचा हा प्रकार आहे..
    पावसाचे आणि कोकणाचे एक अद्भुत नाते आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात मान्सूनचे आगमन होते आम्ही त्याला मिरगाचा पाऊस म्हणतो. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाच्या तालावर वरुण राजा बरसतो...मोर नाचायला लागतो ,पावश्या गायला लागतो , कोकणातली जैवविविधतेचा कण न कण आनंदाने डोलू लागतो..
    पाऊस म्हणजे कोकण चा खरा निसर्गोत्सव
    भाताची लावणी , डोंगर दऱ्यातून कोसळणारे धबधबे , चढणीचे मासे, काठोकाठ भरून वाहणाऱ्या नद्या, हिरवागार सडा ,सड्यावरची रंगीबेरंगी फुलांची चादर , धुक्यात हरवलेले डोंगर , दऱ्या , दरीतून कोसळणारे धबधब्याचे पाणी वाऱ्याने पुन्हा उलट्या दिशेने अंगावर झेलण्याचा अनुभव घ्यावा तो कोकणातल्या सड्यांवरच , पावसाचे निसर्ग संगीत गाणारे पक्षी..अगणित जीवांना तृप्त करणारा हा पाऊस
    ह्याच पावसात कोकणातल्या नद्यांचा जन्म होतो.. कातळ सड्यांवरून वाट काढत सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतलेले हजारो जिवंत प्रवाह असे उंचावरून कोसळतात धबाधबा , एखादे लहान मूल हसत खेळत आईच्या कुशीत जावे तश्या कोकणातल्या दऱ्या खोऱ्यातून वाट काढत सागराच्या कुशीत जाऊन विसावतात,...
    जेव्हा सागराच्या पाण्यातून नदी जन्म घेत असते तेव्हा पुन्हा आपल्या आईकडे येण्याचे वचन तिने दिलेले असते...दरवर्षी पाऊस हे वचन पाळतो , सागराला त्याची नदी परत देतो..
    ह्या प्रवासाचां मी साक्षीदार आहे एवढेच काय ते भाग्य....ह्या थेंबांत ह्या पाण्यात मला माझे अस्तित्व दिसते .... सृष्टीचा हा सोहळा पाहायला मी पावसात सह्याद्री चढतो आणि प्रवाहा सोबत खेळताना मी पाऊस होतो..
    पावसाळ्यातील रान भाज्या , रानफुले ह्यांनी बहरलेला कोकण लहानपणापासून पाहत आलोय.. जगलोय ...पावसाळ्यातील हे जीवन म्हणजे खरच एक स्वर्गीय अनुभुती असते..
    कोकणातील पावसाळ्यातील निसर्ग जीवनाची अनेक रूपे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे..
    FOLLOW US ON FACEBOOK
    / stifan.pinto.3
    FOLLOW ME ON INSTAGRAM
    / spinto_03
    FOLLOW ME ON TWITTER
    / pinto_stifan

Комментарии • 17

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 4 года назад

    सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👍

  • @shine84
    @shine84 4 года назад

    Nice video

  • @rahulpatil3317
    @rahulpatil3317 4 года назад

    Nice narrative style. Beautiful location. As vatate live experience ghet aahe

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 4 года назад +2

    अरे व्वा.आज खरो गाववालो शोभलस.
    लय मस्त video..
    Tysm...

  • @alexfernandis1127
    @alexfernandis1127 4 года назад

    Kdk

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +1

    Khup Sundar👌 🙏

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 4 года назад +1

    mast place......

  • @pankajjuikar1275
    @pankajjuikar1275 4 года назад

    Video stable nastat plzzzzzzz

  • @pankajjuikar1275
    @pankajjuikar1275 4 года назад

    Are dad tuzr me sarva video baghto chaan pan yaar ek gimble ghe yaar

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 4 года назад

    Vaibhvadi cha bajula ahe kay

  • @sajankashelakr8271
    @sajankashelakr8271 4 года назад +1

    तूम्ही खवलो मासे म्हणता ना आम्ही करवाला म्हणतो

  • @vikaskadam2535
    @vikaskadam2535 4 года назад

    Aho ek member video banavala avadlo maka

  • @sachinsatam7616
    @sachinsatam7616 4 года назад +1

    Kurli cha mandir dakhvals tar bara hoeil...

  • @djshock3483
    @djshock3483 4 года назад

    Bhai tuza gaav konta aahe

  • @rahul21jun1990
    @rahul21jun1990 4 года назад

    व्हिडीओ बघुक खरी माझ्या आज इली आपल्या भाषेत बरा वाटलं ऐकून

  • @abhijeetpatil9935
    @abhijeetpatil9935 4 года назад

    Kharch khup chan ahe kokan.... Nisargane natlela... Mitrano punyatil ashych nisrgane natlelya place chya visit sathi click kra khalil link vr ani anand ghya nisargacgaha ruclips.net/video/th3NWxf7buw/видео.html