फर्माईश : मी फूल तृणातील इवले | Spruha Joshi | Poems

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 мар 2022
  • मी फूल तृणातील इवले-
    मी फूल तृणातील इवले
    जरी तुझीया सामर्थ्याने
    ढळतील दिशाही दाही
    मी फूल तृणातील इवले
    उमलणार तरीही नाही.
    शक्तीने तुझीया दिपुनी
    तुज करतील सारे मुजरे
    पण सांग कसे उमलावे
    ओठातील गाणे हसरे?
    जिंकील मला दवबिंदू
    जिंकील तृणाचे पाते
    अन स्वत:स विसरून वारा
    जोडील रेशमी नाते
    कुरवाळीत येतील मजला
    श्रावणातल्या जलधारा
    सळसळून भिजली पाने
    मज करतील सजल इशारा
    रे तुझीया सामर्थ्याने
    मी कसे मला विसरावे?
    अन रंगांचे गंधांचे
    मी गीत कसे गुंफावे?
    येशील का संग पहाटे
    किरणांच्या छेडीत तारा;
    उधळीत स्वरातुनी भवती
    हळू सोनेरी अभीसारा?
    शोधीत धुक्यातुनी मजला
    दवबिंदू होउनी ये तू
    कधी भिजलेल्या मातीचा
    मृदु सजल सुगंधीत हेतू!
    तू तुलाच विसरुनी यावे
    मी तुझ्यात मज विसरावे
    तू हसत मला फुलवावे
    मी नकळत आणि फुलावे
    पण तुझीया सामर्थ्याने
    ढळतील दीशा जरी दाही
    मी फूल तृणातील इवले
    उमलणार तरीही नाही.
    - मंगेश पाडगावकर
    तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    #SpruhaJoshi #Poems #Marathi
    _________________________________
    Credits
    ________________________________
    Cinematography
    Angad Joshi
    Shubhankar Havele
    Editor
    Soham Kurulkar
    Tanishq Mohite
    Yogesh Dixit
    Audio
    Mandar Geetapathi
    Hair n Makeup
    Bhagyashree Patil
    Location Partner
    Bamboo and Bricks Resort
    Costumes
    Cotton Village
    Production Stills
    Rahul Kulkarni
    Styling
    Tanmay Jangam
    Special Thanks
    Pornima Khadke
    Rahul Kondekar
    Brand Collaborations & Partnerships
    Anurag Pathak
    Created by
    Nachiket Ashok Khasnis
    ____________________________
    About Spruha Joshi :
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    _________________________
    For More Updates :
    ___________________________
    Facebook : / spruhavarad
    Twitter : / spruhavarad
    Instagram : / spruhavarad
    Email : team@brewbackers.com
    ______________________________
    DISCLAIMER: This is the official RUclips Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

Комментарии • 174

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 2 года назад +2

    आम्हाला इ. ७ वी मध्ये ही कविता होती. तोंडी परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी 'वर कोऱ्या आभाळाची भट्टी तापली तापली '( तापमाय) ही कविता म्हटली होती; परंतु मी एकट्याने 'मी फूल तृणातील इवले'ही कविता 'ये मेरे वतन के लोगो' या गाण्याच्या चालीवर म्हटली होती,. तेव्हा माझ्या मराठीच्या शिक्षकांनी माझे पूर्ण वर्गात खूप कौतुक केले होते तो क्षण मला आज पुन्हा आठवला.

  • @PP.2898
    @PP.2898 2 года назад +6

    देखणे ते चेहरे, जे प्रांजला चे आरसे, गोरठे वा सावळे यांस मोल नाही फारसे,
    हि कविता तुमच्या आवाजात फार छान वाटेल...

  • @pallavijoshi5508
    @pallavijoshi5508 2 года назад +12

    खूप उत्सुक.......आम्हाला शाळेत होती ही कविता.....मी शोधतच होते .....खरंच धन्यवाद

  • @rushvina55
    @rushvina55 2 года назад +2

    ही कविता माझे सर खूप छान आवाजात म्हणायचे.

  • @saee_datar
    @saee_datar 2 года назад

    खरंच खूप सुंदर कविता.... जसं तू शेवटी म्हणालीस तसं, ही कविता सुरुवातीला ऐकताना सामाजिक विषयावरची वाटली होती, पण नंतर त्यातून प्रेमकवितेचाही रंग येऊ लागला, किती छान रुपक दिलं आहे पाडगांवकरांनी.....
    पहिल्या चार ओळी तर फारच सुंदर.... म्हणजे, समोर कितीही मोठी शक्ती असली तरी ती एका खऱ्या, निसर्गनिर्मित रचनेला कुठलाही धक्का पोहचवू शकत नाही....
    खूप खूप धन्यवाद
    -सई श्रीराम दातार
    FY Engg.

  • @vdomixmasala
    @vdomixmasala 2 года назад +12

    मॅम एक लहानपणी शाळेत असताना मी छोटेसे बहिण भाऊ उद्याला मोठाले होऊ हे कविता वाचली होती खूप छान आहे ती पण तुम्ही या चॅनेलवर ती सादर करावी अशी माझी इच्छा आहे

  • @abhijeetbanarase2322
    @abhijeetbanarase2322 2 года назад +5

    अप्रतिम कविता आणि तेवढाच सोज्वळ सादरीकरण. ..प्र.के.अत्रे यांची "प्रेमाचा गुलकंद" ही कविता ऐकायला आवडेल . धन्यवाद

  • @tejashreemandale5437
    @tejashreemandale5437 2 года назад

    खूप छान...आम्हाला शाळेत असताना होती ही कविता..आनि त्या वेळी आम्ही या कवितेला छान चाल लावली होती

  • @priyankadhumal8699
    @priyankadhumal8699 2 года назад

    खूपच सुंदर..... तुझे सादरीकरण खरंच खूप अप्रतिम असते....मी देखील कविता करते.... माझी कविता तुझ्या कडून इथे सादर करता येईल का....मी माझ्या कविता कधीही कुठेही बाहेर दिलेल्या नाहीत....पण तुझ्या तोंडून माझी कविता सादर झाली तर ती आणखी जास्त सुंदर होईल अन्‌ लोकांपर्यंत पोहोचेल असे प्रामाणिक पणे वाटते.....मला खरंच खूप आवडेल....

  • @rugvedsawe7150
    @rugvedsawe7150 2 года назад +1

    Atishay sundar...mast watla tujha tondun Aikun...

  • @mangalawararkar9778
    @mangalawararkar9778 2 года назад

    फुलराणी सादर कर please,तुझ सादरीकरण अप्रतिम ऐकतच रहावे असं वाटते tysm

  • @sachinrk79
    @sachinrk79 2 года назад +4

    खुपचं सुंदर स्पृहा....
    प्लिज माझी एक इच्छा आहे की तु
    बहिणाबाई चौधरी यांची
    "कशाले काय म्हनू नही"
    ही कविता सादर करावी...
    नम्र विनंती 🙏🙏

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 Год назад +1

    अप्रतिम,, तू ही अन् कविताही,

  • @utkarshatari1613
    @utkarshatari1613 2 года назад +2

    'पैल ताे गे काऊ काेकताहे' ही कविता सादर करावी. ताई तु खुप छान सादरीकरण करते.

  • @trushalisaindane2617
    @trushalisaindane2617 2 года назад

    खूपच सुंदर कविता n तितकेच सुंदर सादरीकरण...
    स्पृहा तू ती ...गवत फुला re गवत फुला ...असा कसा re मला लागला सांग तुझा re तुझा लळा...ही कविता सादर कर n प्लीज

  • @pujaalam975
    @pujaalam975 2 года назад +1

    खूप छान ताई ! ही कविता मला बी.ए ला होती.

  • @shreyaraikar3656
    @shreyaraikar3656 2 года назад +2

    खूपच सुंदर कविता...शाळेत असताना वाचली होती पण कवितेतला खरा अर्थ आता कळत आहे..👌👌🌹🌹

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 года назад +2

    स्पृहा तुला आणि तुझ्या दोन्ही परिवाराला गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा ,,,,,मंगेश पाडगावकर हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व ,,,,,, नेहमीप्रमाणे कविता खूप सुंदर ,,,आणि रिलेशनशिप काय हे लहान असताना काही कळत नव्हतं पण एक निसर्ग कविता म्हणून ऐकत होते ,,, पण आज हा नवीन अर्थ उमगला खूपच म्हणजे खूपच सुंदर तुझ्यासाठी फक्त फक्त निव्वळ प्रेम

  • @SeemaYadav-sf6cy
    @SeemaYadav-sf6cy 5 месяцев назад

    माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार
    ही इंदिरा संत यांची कविता ऐकायची आहे.

  • @rashmisonar5320
    @rashmisonar5320 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद...फर्माईश पूर्ण करण्यासाठी....

  • @supriyagokhale6378
    @supriyagokhale6378 2 года назад +3

    खूप छान कवितेचं खूप सुंदर सादरीकरण ! Thank you so much Spruha ❤ माझ्या आईला एक कविता ऐकायची होती , बरीच शोधली पण नाही मिळाली .नाव माहित नाही पण बोल असे आहेत , " यज्ञ शंभरावा होताच पुरता , गमे भूपा झाली जन्म सफलता .." ही कविता जर ऐकायला मिळाली तर खूप आवडेल.

  • @sampadaranade3766
    @sampadaranade3766 2 года назад

    खूपच छान कविता आहे मलाही ही कविता लहानपणी होती ..

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 2 года назад +2

    Fantastic Spruha wow !!

  • @onkarsawade7799
    @onkarsawade7799 2 года назад

    Khup Sundar kavita...shalechya aathavani jagya zalay...Thanks Spruha......

  • @cancer4684
    @cancer4684 2 года назад +2

    Nehmipramane sunder kaviyatriche sunder presentation. Chaitra padwachya Tula in advance shubhecha. He Navin varsha tula Ani tuzhya familyla mangalmaya, arogyadayi javo hi iccha.👈❤️🙏👌

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 2 года назад

    Spruha mam sooooooo beautiful. kavita sadrikaran apratim an vishleshan suddha

  • @manaligaikwad6377
    @manaligaikwad6377 2 года назад

    खूप छान ताई,तुझा आवाज खूप गोड, छान वाटतो ऐकायला. सगळ काही शांत झाल्यासारखं वाटत.मला पण कविता करायला फार आवडतात.शाळेच्या दिवसांवर मी काही कविता केल्या आहेत, तू त्या फक्त तुझ्या आवाजात मांडाव्यात एवढीच इच्छा आहे जर तुला काही हरकत नसेल तर 😊

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 3 месяца назад

    खरोखरच तुम्ही सादरीकरण , चाल छान केले आहे

  • @vaibhavjadhav4183
    @vaibhavjadhav4183 2 года назад +2

    जिप्सी संग्रहामध्ये ही कविता आहे. फार सुंदर

  • @akshaygatole1874
    @akshaygatole1874 2 года назад

    असे जगावे अव्हानाचे लावून अत्तर..

  • @suvarnamaind9646
    @suvarnamaind9646 2 года назад +2

    प्रिय स्पृहा, तुझी कविता सादर करण्याची पद्धत खूप आवडली. माझ्या वडिलांची pensioner नावाची कविता तू सादर करावी असे मनापासून वाटते.(तुला जर आवडली तरच.) नुकतेच आठ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना ही श्रद्धांजली ठरेल.ही कविता सगळ्यांना खूप आवडते. प्लिज मला reply दे

  • @mayurigawas9406
    @mayurigawas9406 2 года назад +1

    खूप छान... आम्हाला शाळेत होती ही कविता . कविता पाठांतरामधे पाठ केलेली ही कविता आजही पाठ आहे. धन्यवाद माझी आवडती कविता ऐकवल्याबद्दल

  • @dattajiraopatil
    @dattajiraopatil 2 года назад +1

    खूपच छान सादरीकरण

  • @vrushaliapte7682
    @vrushaliapte7682 2 года назад +1

    साधी, सोपी ,सुंदर ,समजेल अशी निसर्ग कविता एक एक शब्द हळूवार नाजूक फुलासारखा सादर केलायस ..छान स्पृहा

  • @mr.dongare2093
    @mr.dongare2093 2 года назад +6

    I don't think It is only for a relationship, there is a deeper meaning to it, anyway I love your presentation always.

    • @spruhaajoshi
      @spruhaajoshi  2 года назад +5

      कवितेची तीच तर गम्मत आहे.. प्रत्येकाला वेगळा अर्थ सापडतो. मला हा जाणवला.. तुम्हाला आणखी काही सापडेल 🙂

  • @sandipkulkarni1982
    @sandipkulkarni1982 Год назад +1

    कविता खूपच अप्रतिम आहे. सादरही फार फार छान केली.

  • @nitinvaidya3013
    @nitinvaidya3013 2 года назад +1

    कमाल
    शुभ संध्याकाळ

  • @sandeshilake3058
    @sandeshilake3058 2 года назад

    खूपच सुंदर कविता होती .

  • @sagartambre.
    @sagartambre. 2 года назад

    रक्तात पेटलेल्या अगनित सुर्यांनो ही कविता एकदा ऐकवा.

  • @nishkaswapnakarkhanis5549
    @nishkaswapnakarkhanis5549 2 года назад

    Fa. Mu. Shinde yanchi 'Aai' hi kavita sadar karavi ashi mazi vinanti ahe.

  • @vanajaupalekar8990
    @vanajaupalekar8990 2 года назад

    अप्रतिम कविता तसेच सादरीकरण

  • @yogeshsutar61
    @yogeshsutar61 2 года назад +1

    खुप छान वाटल तुमच्या आवाजात कविता ऐकून.तुम्ही छान स्पष्टीकरण केले.मला दहावीत असताना ही कविता होती.

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 2 года назад +2

    अत्यंत सुंदर कविता आणि सादरीकरण खूपच छान

  • @amarsinghchandel101
    @amarsinghchandel101 2 года назад +2

    लक्ष्मीकांत तांबोळी यांची आनंता इतके द्यावे फुलांचे रंग ना जावे...plz

  • @sanglifood
    @sanglifood 2 года назад

    मी तुमचा सर्वात मोठा fan आहे..🤗🤗

  • @shubhangikulkarni2002
    @shubhangikulkarni2002 2 года назад

    वाह....
    माझी सुध्दा खूप आवडती कविता आहे ..
    शाळेत कुठे तरी वाचली होती .
    स्पृहा तुझ्या ह्या कार्यक्रमाने पुन्हा नव्याने तिचा आनंद घेऊ शकले...त्यातही गोदातीर्थला जाँईन झाल्यानंतर त्यातील वृत्ताचाही आनंद घेतला.
    तुझं सादरीकरण नेहमीप्रमाणेच लाघवी ,गोड सुंदर अगदी मनाचा ठाव घेणारे.
    थँक्यु गं....❤️🌹😊

  • @saee_datar
    @saee_datar 2 года назад

    आणखी एक मोठ्ठी फर्माईश स्पृहा ताई..... जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा गीत रामायणातील गीतं कविता रुपात ऐकायला खूप आवडतील कारण त्या सगळ्याच खूप अर्थपूर्ण कविता आहेत.....

  • @sureshagashe1862
    @sureshagashe1862 2 года назад +2

    अर्थगर्भ कविता आणि छान सादरीकरण.

  • @vidyasagardev8598
    @vidyasagardev8598 2 года назад +1

    कमाल

  • @deathnote6361
    @deathnote6361 2 года назад +3

    Sometimes simple Kavitas also do have such pivotal messages. Beautiful Kavita
    And the location made me more perfect.👏✨

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 2 года назад +2

    💐💐 शुभ संध्या 💐💐

  • @vaishnavispoetry6917
    @vaishnavispoetry6917 2 года назад +2

    खूप खूप सुंदर कविता......♥️आणि उत्तम सादरीकरण......👍

  • @kavitanaik5558
    @kavitanaik5558 2 года назад +1

    Khup chan Kavitahi ani sadarikaran hi! पृथ्वीचं प्रेमगीत, गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या pan kara na sadar 😊🙏🏻

  • @rekhamainde5077
    @rekhamainde5077 Год назад

    Khup surekh Kavita❤😍

  • @sanjeevdalvi5578
    @sanjeevdalvi5578 2 года назад +2

    फार छान कविता.

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 2 года назад

    Very beautiful....😍

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i 2 года назад +2

    कित्ती सुंदर !

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 2 года назад +2

    खरंच खूपच सुंदर कविता आणि सादरीकरण 👌👏🌹

  • @AjitJoshiPune
    @AjitJoshiPune 2 года назад

    Atishay sundar

  • @smitakulkarni-youtube
    @smitakulkarni-youtube 2 года назад +2

    Beautiful and perfect!

  • @shrikantlaghate7402
    @shrikantlaghate7402 2 года назад +1

    नेहमी प्रमाणे ऊत्तम सादरीकरण.खूपच छान.

  • @pracheekulkarni9354
    @pracheekulkarni9354 2 года назад

    Spruha khup chan mazasathi purva samudri disha ujalave hi Kavita vachahil ka

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 2 года назад +1

    व्वा व्वा व्वा....छान निवड

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 2 года назад

    खूप छान.
    खूप उत्तम अर्थ ❤

  • @deepaliapte9468
    @deepaliapte9468 2 года назад +1

    Beautiful 👌👌

  • @amollyricswrld...1819
    @amollyricswrld...1819 2 года назад +1

    खूपच छान अप्रतिम कविता आहे.👌👌👌👌👌

  • @asmanaikwadi4280
    @asmanaikwadi4280 Год назад

    Khup ch chan

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 года назад +1

    कविता सुंदर, अर्थपूर्ण, सादरीकरण सुंदर, खूप प्रेम.

  • @profeetenterprises9088
    @profeetenterprises9088 2 года назад +3

    What a beautiful expression to underline the importance of harmonious coexistence in any relationship..articulated equally Beautifully.. Thank You Spruha..❤

  • @kadamdevidas4603
    @kadamdevidas4603 2 года назад

    Khup chan ❤💞

  • @pavangaigol2455
    @pavangaigol2455 2 года назад

    शोधीत धुक्यातुन मजला दवबिंदू होऊन ये तु खुप छान अप्रतिम

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 2 года назад

    सुरेख कविता ,अगदी सुंदत अर्थाची.....👌💐
    आणि सुरेख सादरीकरण नेहमीप्रमाणे spurahatai ......तुझा आवाजात जादू आहे .....प्रत्येक गोष्ट कशी तू सादरीकरण केल्या वर ऐकायला सुंदरच वाटते👍👍👌👌 masttt khup Chan 💐💐

  • @shwetatakalkar
    @shwetatakalkar 2 года назад +1

    Beautiful Open with Awesome Presentation...👌

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 2 года назад

    वाह ! सुंदर कविता आणि संगीताची साथ फारच उत्तम सादरीकरण ❤️👏

  • @sanjaysawantofficial
    @sanjaysawantofficial 2 года назад +1

    वाट पाहतोय आम्ही

  • @punamshimpi8009
    @punamshimpi8009 2 года назад

    खूप छान ताई...

  • @siddheshgolatkar9290
    @siddheshgolatkar9290 2 года назад

    सुंदर👌 💓💯

  • @ashoktawade6141
    @ashoktawade6141 Год назад

    Favorite peom 😊 thank you

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 года назад +1

    कवीवर्य मंगेश पाडगावकर हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक अजरामर नाव.
    मी‌ फुल तृणातील इवले, ही एकदम मनमोहक काव्य होत, नाही तेवढेच मनमोहक सादरीकरण आणि उत्कृष्ट विवरण.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @patmani66
    @patmani66 2 года назад

    खुप छान 👍👍

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade1233 2 года назад +1

    🌷👌very very deep meaning i love this and too you also🥰

  • @asmishindevlogs
    @asmishindevlogs 2 года назад

    मी शाळेत असताना ह्य कवितेला चाल लावून वर्गात म्हणून दाखवली होती...एका मराठी गाण्याची चाल होती

  • @sanikakale3488
    @sanikakale3488 2 года назад +2

    आम्ही शाळेत असताना 'ए मेरे वतन के लोगो' च्या चालीवर ही कविता म्हणायचो... 😊

  • @Ravindrajoshi67
    @Ravindrajoshi67 Год назад

    अप्रतिम

  • @prachijoshi1731
    @prachijoshi1731 2 года назад +1

    Spruha tai mst 🤩... samjayla thod kathin hot pn tu sangitlas na kasa artha ghyaycha mg sopp zhala ... thankyou 😊

  • @mydelight7579
    @mydelight7579 2 года назад

    सुंदर सादरीकरण. स्पृहाजी,बा. भ. बोरकरांची 'कांचनसंध्या 'तुमच्या आवाजात ऐकायला मला आवडेल.

  • @sushmawagh5530
    @sushmawagh5530 2 года назад +2

    कवी नारायण सुर्वे ची," तू तेव्हा एक कर, जेव्हा मी अस्थित्वाच्या पोकळीत नसेन" ही कविता वाचन करा

  • @swapnilb4016
    @swapnilb4016 2 года назад

    Khuch chan kelay

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 года назад

    वाह ..... खूपच सुंदर आहे कविता , आणि सादरीकरण पण खूप सुंदर , 👌👌👌👌

  • @hemlatakhandare8944
    @hemlatakhandare8944 2 года назад

    Khup sundar

  • @noushadbirajdar2528
    @noushadbirajdar2528 2 года назад +1

    Nice ❤️

  • @sanikayadav6563
    @sanikayadav6563 2 года назад +2

    सगळ्यात आधी तू खूप सुंदर दिसतीयेस ताई ! 😍 आणि आजची कविता पण फार अप्रतिम होती आणि सादरीकरण पण अतिशय उत्कृष्ट आहे. 👍👌

    • @pradipgijare4325
      @pradipgijare4325 2 года назад +1

      खूपच छान कविता व सादरीकरण नेहमी प्रमाणेच
      मला कवियात्री इंदिरा संत यांची. गवत फुला रे गवात फुला,असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा.ही कविता ऐकायची आहे.मला अजून आठवते ती ७ वित असताना होती.आता मी ६२ वर्षांचा आहे.
      कृपया ऐकावा v pathav

  • @sahilDgreatRAUT
    @sahilDgreatRAUT 2 года назад

    ❤️

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад

    🎉🎉🎉

  • @samikshawakode9971
    @samikshawakode9971 2 года назад

    खूप छान 🤗

  • @akshaygatole1874
    @akshaygatole1874 2 года назад

    छान..❤️

  • @anuradhaharmalkar3806
    @anuradhaharmalkar3806 2 года назад

    खूप छान कविता, खूप वर्षांनी मनात जागी झाली. 👌

  • @rohitkolase
    @rohitkolase 2 года назад +1

    Usually we listen poems very casually but seriously for the first time i experienced deep meaning and thoughtfulness of this poem very well presented spruha keep going

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +1

    Apartim kavita

  • @RE_M350_GAJRAJ
    @RE_M350_GAJRAJ 2 года назад

    Unique 👍👍👍