सुरंगीची फुले (सुगंधी वनस्पती) Surangi Flower

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • सुरंगीची फुले (सुगंधी वनस्पती) Surangi Flower
    कोकणातील मार्च महिन्यातील सकाळ म्हणजे सुरंगीच्या सुगंधाने दरवळलेला आसमंत. सुरंगीची फुले खुपच आकर्षक व सुगंधी असतात. या फुलांचा गजरा स्त्रीयांना खुपच आवडतो. सकाळी लवकर उठून सुरंगीच्या न उमललेल्या कळ्या काढायच्या, त्यांचा देठ नखाने तोडायचा व बाहेरच्या दोन संदलांना उलट पिळटायचे. यालाच "कळ्या #पटकाळणे" असे म्हणतात. नंतर पटकाळलेल्या कळ्यांचे संदल दोर्‍यात ओवून गजरा करायचा. बाजारात सुरंगीचे #वळेसार (गजरा) चांगल्या किंमतीने विकले जातात. सुरंगीच्या सुकवलेल्या कळ्या आणि फुलांना अत्तर उद्योगात खुप मागणी असते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. सुरंगीचे लाकुड खुप टणक व टिकावू असल्याने फर्निचर साठी वापरले जाते.
    सुरंगी हे तळकोकणात आढळणारे सदाहरीत, मध्यम आकाराचे झाड आहे. झाडाला जखम झाल्यावर खोडातून पिवळसर डिंक येतो. याची पाने लांबट, रबरी असतात. मार्च-एप्रिल दरम्यान याला फुले येतात. सुरंगीची फुले फुलोर्‍यात न येता, जुन्या फांद्यांवरच येतात. फुलांना चार पांढर्‍या पाकळ्या, दोन संदल, खुप पुंकेसर व लांब देठ असतो. याची नर व मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. मालवणीत नर झाडाला #सुरंगी व मादी झाडाला #बुरंगा म्हणतात. दोन्ही झाडे दिसायला सारखीच असतात. यांत फरक असा की, नर फुलांमध्ये फक्त पुंकेसर असतात. पुंकेसर पिवळ्या रंगाचे व सुगंधी असतात. तर मादी फुलांच्या मध्यभागी फुलदाणीच्या आकाराचा, लाल रंगाचा एकच स्रीकेसर व त्याभोगती पुंकेसर असतात. गजरा व अत्तरासाठी फक्त नर फुलांचाच वापर केला जातो. नर फुलांपासून फळ तयार होत नाही. तर मादी फुलांपासून अंडाकृती, दगडी फळ तयार होते.
    **************************************************
    ● 👉Teligram Group
    t.me/joinchat/...
    ●👉Facebook Page
    / 104738371965130
    ●👉Instagram
    ...
    **************************************************
    #रानफुल
    #कोकणातले_चव्हाण
    #सुरांगीचे_फुले
    #ranamanus
    #कोकण
    #कोकणातीलअविस्मणीयअनुभव
    #सुगंधी_सुरांगीची_गोष्ट
    #कोकणातील_रानफुल_गोष्ट
    #सुगंधी_दरवळ
    #कोकणचं_सोन

Комментарии • 25

  • @madhavimore120
    @madhavimore120 2 месяца назад

    Khupch chan pan fandyanchi new rope banun hi vikun aankhi Jodi danda hoil ki kakanna and Ashi zade ajun wadhaun nisarga hi ghamghamel and aaapalya kokanacha shan madhe ajun eak manacha turant hi mirvel🎉❤😊

  • @the_riding_rebel
    @the_riding_rebel 2 года назад +1

    Lai bhari Dada 👏🔥

  • @varshatalware172
    @varshatalware172 Год назад

    Khup chan..video...
    Mahiti purn video..👌👌👌

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 6 месяцев назад

    छान माहिती दिली. असेच नवीन विषय घेत रहा.

  • @rajendrachinderkar9385
    @rajendrachinderkar9385 2 года назад

    mahitipurn video! Thanks

  • @dhanashrigawas
    @dhanashrigawas 5 месяцев назад

    सर तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
    मला
    कुंडीत लावण्यासाठी वेलचीचे रोप मिळतील का

  • @pandharinathmhaske1993
    @pandharinathmhaske1993 Год назад

    खूप छान माहिती दिलीस भावा. 25 4 2023 च्या agrowon सकाळ मध्ये छान लेख एकनाथ पवार यांनी लिहिला आहे.

  • @ज्योतीशेडगे-ज8ज

    👌🏼👌🏼

  • @SAP_S4_HANA_free_Learning_FICO
    @SAP_S4_HANA_free_Learning_FICO Год назад +1

    We call it surgi flower in kannada Karnataka 50O RS per kg

  • @vaishaliindulkar656
    @vaishaliindulkar656 Год назад +2

    Shade todu nayet pan

  • @dhanashriprabhu5852
    @dhanashriprabhu5852 5 месяцев назад

    Surangiche jhad vikat milteel ka ??

  • @luvd8090
    @luvd8090 4 месяца назад

    Can u tell me who takes it an address pls without fail

  • @dhundirajremane
    @dhundirajremane 6 месяцев назад

    सुरंगी हार मिळेल का?

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 года назад

    खुपछान दुर्मिळ फुलांचे ओळख करून दिली काकांनी धन्यवाद 🙏🏼सुरंगीचे रोपे कूठे मिळतात याची माहीती मिळेल का दादा

  • @dhundirajremane
    @dhundirajremane 6 месяцев назад

    ज्यांच्याकडे फुलं किंवा हार उपलब्ध असेल त्यांचा नंबर द्या

  • @madhumatibhandare2697
    @madhumatibhandare2697 4 месяца назад

    सुरंगीची फुले म्हणजेच बकुळ आहे का

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Год назад

    Sukleli kalya pahijet. Kase contact karayache

  • @yogeshtarate3335
    @yogeshtarate3335 Год назад

    दादा किंवा काकांचा नंबर द्या 🙏🙏🙏

  • @jayantpalwankar7648
    @jayantpalwankar7648 Месяц назад

    मोबाईल नंबर प्लीज