Learn German in Marathi : Level A1 Ep 1 : German verb conjugation and making simple sentences

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @lataterni5503
    @lataterni5503 3 года назад +205

    केदार तुमचा हा प्रयत्न अत्यंत सुज्ञ व स्तुत्य आहे। प्रत्येक मराठी माणसाने तुमचे मनापासून आभार मानले पाहिजेत। 🙏🙏🙏

  • @spardha_pariksha
    @spardha_pariksha 2 года назад +3

    Hello Kedar Sir,
    tumhi khup chan kam karat ahat plz hi series chalu theva , i really want to learn this language.
    thank you sir , he sarv marathi madhye uplabadh karun dilya baddal,

  • @upendrasankpal
    @upendrasankpal 3 года назад +23

    नमस्कार. माझा जर्मन शिकण्याचा कोणताही मानस नव्हता, निव्वळ उत्सुकता म्हणून मी इथे आलो आणि हा व्हिडिओ संपेपर्यंत मनात ठरवून ही टाकलं की आपण पुढच्या तीन महिन्यात जर्मन बोलायला लागायचं..इतकं सुटं आणि सोपं करून समजावून सांगितलं आहे तुम्ही की न शिकावं असं वाटुच शकत नाही..खूप छान..

  • @phalkek
    @phalkek 3 года назад +68

    Dear respected Kedar my father neelkanth dhundiraj phalke was a great German language teacher and he was called in Germany to teach German students German language. I am proud of you that you are doing this activity. God bless you.

    • @Shwe-M
      @Shwe-M 3 года назад +3

      Wow
      I am a German language learner...
      Its really great to know about your father..
      Proud of him...

    • @rahulpetare6879
      @rahulpetare6879 Год назад +1

      धन्यवाद केदार सर आपल्य

    • @sbb10068
      @sbb10068 3 месяца назад

      Great !

    • @supriyamahajan7139
      @supriyamahajan7139 Месяц назад

      Have you written any book on this

    • @smitaindolikar9679
      @smitaindolikar9679 Месяц назад

      My daughter is in germony. She want to learn germon. Can she contact you.she went there in Aug 24

  • @vishywalker4037
    @vishywalker4037 3 года назад +18

    Kedarbhau, मानलं तुम्हाला.
    निर्लज्ज नेते मंडळी, जर जणांची नाही तर मनाची असल तर डुबावं जाऊन एखाद्या नाल्या मध्ये.
    केदारभाऊ, you are simply GREAT👍

  • @dudecool4u
    @dudecool4u 3 года назад +4

    fantastic ...मी खर तर कामानिमित्त जर्मनी ला येणार म्हणून पंधरा वर्षांपूर्वी A१ शिकलो होतो पण काही कारणाने येणं झाले नाही आणि मग भाषा थोडी मागे पडत गेली....तुमचा विडिओ खरंच छान आहे... आमच्या goethe institute च्या instructor आठवण झाली एकदम ...पुन्हा एकदा...खूप छान आणि धन्यवाद

  • @alkachitnis7415
    @alkachitnis7415 3 года назад +5

    अप्रतिम!! सुरेख . मला ९ भारतीय भाषा येतात. जापनिज येते. आता तुमच्याकड़ून जर्मन नक्की शिकते. वही घातली देखील. Thanks 🙏 a lot for giving wonderful knowledge in simple words. Happy teacher”s day from India . I am very senior most person . 👏👏👏👏👏👏for you my teacher.

  • @vibehigher9656
    @vibehigher9656 3 года назад +123

    Dear Kedar appreciate your Selfless Contribution & efforts. Proud of you Boss. God bless you. Tc

    • @kaluramwable7876
      @kaluramwable7876 3 года назад +1

      Very good .thanks

    • @rajendradombe8055
      @rajendradombe8055 3 года назад +1

      धन्यवाद.🙏
      अतिशय सहजसुंदर पध्दत.
      गरजूंना जरूर सुचवीत आहे.

    • @geetanjalibedrejoshi9930
      @geetanjalibedrejoshi9930 3 года назад

      @@kaluramwable7876
      ruclips.net/video/WUdXaQ0aY4s/видео.html

    • @RenukaKunale
      @RenukaKunale Месяц назад

      Thank you

  • @amrutapatil4527
    @amrutapatil4527 3 года назад +6

    मी खूप खूप आभारी आहे तुमची केदार जाधव सर जी!!!मला खूप आवड आहे जर्मन शिकण्याची ..ह्याच संधीची आतुरतेने वाट पाहत होते,तुमच्या माध्यमातून ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल,,मी munich ला अली होती ,दीड महिना जर्मनीत खूप छान व्यथीत गेले ,langauge पूर्ण knowlege नसल्याने दुःख पण झाले होते..पण आता नक्कीच आनंद द्विगुणित झाले आहे..धन्यवाद सर!!!😊नवीन वर्षाची सुरुवात 2021 खूप चांगली झाली 😍

    • @tejashreekulkarni1399
      @tejashreekulkarni1399 3 года назад +1

      खूप छान मार्गदर्शन सर .संस्कृत भाषेच्या जवळची आहे.

    • @kavitabsiddesh
      @kavitabsiddesh 3 года назад

      Thanks a lot Sir...Your teaching methodology is very simple to understand...Really great initiative useful for rural students who cannot afford to go and learn such things in big cities..

  • @shrikantathavale2094
    @shrikantathavale2094 3 года назад +48

    Hey Kedar, this is a fantastic idea ... of learning German in Marathi. At 74 years of age too, it appealed to me totally !!!

    • @sunilamladi7223
      @sunilamladi7223 4 месяца назад

      Yes. I am learning German language at the age of 67. I appreciate efforts of Mr Kedar.

  • @ashahalgekar2735
    @ashahalgekar2735 3 года назад +15

    सर जर्मन शब्दांचे उच्चार मराठीत लिहले तर आम्हाला आणखी सोपे होईल . आपण खुपच छान शिकवता .
    आपल्या या उपक्रमांस हॅटस् आॅफ सर . Really great 👍🏻 🙏🏻

    • @kalpanabengrut3786
      @kalpanabengrut3786 3 года назад

      सर मी ज्येष्ठ नागरिक आहे पण तरीही मला शिकावेसे वाटते आणि शिकतच आहे तुम्ही छानच शिकवता धन्यवाद सर

    • @renukasahasrabuddhe8124
      @renukasahasrabuddhe8124 3 года назад

      खूप छान शिकवता sir

  • @ajijsayad9217
    @ajijsayad9217 3 года назад +21

    छानच शिकवताय सर, घरी बसुन रिटायर माणसांना सुद्धा शिकता येईल, फारच सोप्या पद्धतिने समजावून सांगता आपण धन्यवाद

  • @akshayaparab4900
    @akshayaparab4900 3 года назад +4

    खुपच कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे.प्रत्येक वाक्यात तुमची शिकवण्याची तळमळ जाणवते.१५दिवसांपुर्वीच माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेला आहे आणि आज मला हा तुमचा एपिसोड पहायला मिळाला त्यामुळे जर्मन शिकण्याची माझी इच्छा पुर्ण होणार याची खात्री वाटते.🙏🙏

  • @mamtamadnaik4933
    @mamtamadnaik4933 3 года назад +2

    Herr Kedar Dankeschon...खूप छान शिकवीत आहात, मी पुण्यात रानडे इन्स्टिट्यूट मध्ये काही दिवस जर्मन शिकत होते, पण नंतर कोर्स पूर्ण करू शकले नाही, आत्ता तुमच्या मुळे माझी जर्मन शिकण्याची इच्छा पूर्ण होईल, खूप खूप धन्यवाद

  • @vishwajeetpatil3312
    @vishwajeetpatil3312 3 года назад +14

    स्पष्ट उच्चार, आणि शिकवण्याची सोपी पद्धत याने आपण जर्मन भाषा खूप सोपी करून टाकली आहे
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @akshaydange7990
    @akshaydange7990 3 года назад +4

    मी खुप आधी बेसिक जर्मन चा कोर्स मॅक्समूलर मध्ये केला... त्या वेळी खुप अवघड गेले करण मी मराठी मिडीयम मध्ये शिकलो.... तुमचा हा उपक्रम खुप आवडला... आणि पुन्हा एकदा आशा निर्माण झाली.. आज वयाच्या 50 शिला राहून गेलेली जर्मन शिकण्याची इच्छा जागृत झाली... धन्यवाद 🙏

  • @herambthakur3949
    @herambthakur3949 3 года назад +4

    खूप सोप्या पद्धतीने आणि ते सुद्धा मराठीत जर्मन शिकणे, एक विस्मयकारक अनुभव.
    धन्यवाद!

  • @faktkhaki
    @faktkhaki Месяц назад +2

    खूप छान उपक्रम सुरू केला आहे केदार भाऊ. भारतातील मुलांना फक्त जास्तीत जास्त 5 ते 6 भाषा बोलता येतात. त्यात तुम्ही जर्मन भाषा शिकविण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे बऱ्याच मुलांना जर्मन भाषा सुद्धा शिकता येईल.
    त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप अभिनंदन
    🙌🙌🙌

  • @padmavatipawar4644
    @padmavatipawar4644 3 года назад +3

    केदार सर, हा उपक्रम मला अतिशय आवडला. जर आपल्याला एखादी भारताबाहेरची भाषा बोलता व लिहिता यायला लागली तर फारच छान वाटेल. त्यात परत हा दुग्धशर्करा योग आहे. केदार सर फारच छान, मला ही भाषा शिकायची आहे, मला वेगळी अशी एखादी भाषा शिकायला मिळते आहे. हेच माझे भाग्य आहे.
    धन्यवाद

  • @mrinalinikagalkar1400
    @mrinalinikagalkar1400 3 года назад +26

    फारच मस्त! सोपं करून कसं शिकवायचं ते बरोबर माहीत आहे. शिकवण्याची आवड आणि तळमळ प्रकर्षानं जाणवते. फारच छान! माझ्यासारख्या निवृत्त व्यक्तींना सुद्धा शिकायला खूप खूप आवडेल. मनःपूर्वक धन्यवाद! आणि हार्दिक शुभेच्छा!💐

    • @not0016
      @not0016 3 года назад

      खूप छान. खूप सोपकरून सांगितलं आहे.

  • @rohitpimpley9026
    @rohitpimpley9026 2 года назад +12

    Hello Kedar, Thank You very much for your teaching. You made the understanding of German Language very easy.
    Last week I gave my A1 exam and scored 91% 😊
    Your videos helped me a lot !
    Thank you very much 😊

  • @bhalchandrakulkarni3766
    @bhalchandrakulkarni3766 3 года назад +2

    केदार,
    नमस्कार, तुमचा हा उपक्रम पाहिला, तुमच्या जर्मन भाषेच्या ज्ञानाविषयी तर बोलायची गरजच नाही पण तुमचे मराठीत शिकवणे, आपल्या गावा गावातील मुलांना सहजपणे शिकता यावे ही तळमळ आणि सर्व विनामूल्य देणे ह्या गोष्टी खूपच कौतुकास्पद! आपल्या मराठी किंवा भारतातील कुठल्याही राज्यातील मुलांच्या बुद्धीबद्दल कुठलाच संशय नाही पण ही इंग्रजी भाषा मध्ये रखवालदार म्हणून उभी असते, दुर्दैवाने आपल्या स्वातंत्र्यानंतर उलट तिचे महत्व कमी होण्याऐवजी वाढलेच! आणि जर्मन माणसाला तुमच्याशी व्यवहार करताना तुम्ही छान जर्मन बोललात की तुम्हाला इंग्रजी येते का नाही हा विचारही येत नाही, आपल्याच मनाचा खेळ तो! तुम्ही खूपच महत्वाचे कार्य करीत आहेत, खूप खूप शुभेच्छा!
    भालचंद्र कुलकर्णी

  • @mau8538
    @mau8538 3 года назад +7

    🙏सर मला जर्मन शिकण्याची खुप इच्छा होती आणि ती तुमच्या मुळे ही संधी प्राप्त झालेली आहे खुप खुप धन्यवाद

  • @prashantkulkarni7907
    @prashantkulkarni7907 3 года назад +10

    केदार, खूप चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे आणि तुमचं हे कार्य अभिनंदनीय आहे। गावातील आणि निम्नशहरी भागातील मुलांना याचा नक्कीच खूप उपयोग होईल। तुमचे खूप खूप धन्यवाद । देव तुमचं भलं करो (सध्याच्या मराठीत - गॉड ब्लेस यू ☺️)

  • @anildeshmane4171
    @anildeshmane4171 3 года назад +6

    धन्यवाद 👏👏
    श्री. केदार जाधव सर - आपला प्रयत्न फारच स्तुत व दिव्य आहे .
    नक्कीच प्रत्येक मराठी माणूस याचा फायदा घेईल 👍

  • @chhayakamat4029
    @chhayakamat4029 3 года назад +7

    खूप स्तुत्य उपक्रम! जर्मन शिकण्याची इच्छा निर्माण झाली. शिकवण्याची पध्दत उत्सुकता निर्माण करतेय. मनापासून धन्यवाद!!

  • @vidyasatalkar4470
    @vidyasatalkar4470 3 года назад +13

    खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहात. लहानांपासून आमच्यासारख्या साठीपुढच्या लोकांसाठीही अतिशय उपयुक्त .

  • @tejasjadhav610
    @tejasjadhav610 3 года назад

    सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद आणि तुमचे आभार. निस्वार्थी भावनेने तुम्ही 'जर्मन भाषा' मराठीमधून सोपी करून शिकवत आहात, खूप विशेष आहे हे. तुम्ही शिकवत असलेल्या जर्मन शब्दांचे उच्चार मराठी मधून स्क्रीन वर दाखवले तर आमच्या सारख्या नवशिक्या मंडळींना त्याची खूप मदत होईल.
    I just finished first episode and I really enjoyed it. Thank you once again.

  • @anaghajoshi4552
    @anaghajoshi4552 3 года назад +4

    खरोखर हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहेत केदार सर आपण! अभिनंदन आणि शुभेच्छा! मी नक्की जर्मन शिकण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • @kalpananalavade1786
    @kalpananalavade1786 Месяц назад +2

    केदार जाधव खूप छान शिकवता.माझे वय ६३ आहे.शिकण्याला वयाचे बंधन नसते.मी आत्ता जर्मन भाषा शिकणार आहे.Thanks.❤❤❤❤

  • @shriprasadpise5921
    @shriprasadpise5921 3 года назад +10

    The Patience, the dedication, the smartness, the never give up, the make it work attitude and most importantly selfless act of teaching by way of classes and now by this channel.
    THE SUPERHERO........

  • @anirudhakulkarni9911
    @anirudhakulkarni9911 3 года назад +2

    धन्यवाद केदार फारच छान !!! खूप सोप्या पद्धतीने आपण जर्मन भाषा शिकवत आहात, आपला उपक्रम खूपच स्तुत्य आहे.
    मी काही दिवसांसाठी कामानिमित्त मागच्या वर्षी म्युनिक मध्ये होतो. पुन्हा संधी मिळाली तर आपली प्रत्यक्ष भेट घ्यायला नक्की आवडेल.

  • @rajendrakumargawhale4731
    @rajendrakumargawhale4731 3 года назад +8

    केदार अतिशय सोप्या पद्धतीने सांगत आहेत,नवीन मुलांनी फायदा घ्यावा.खूप छान

  • @rajshreerao163
    @rajshreerao163 3 года назад +2

    Hi Kedar, Rajshree Rao here,ur newest student..I have messaged u on FB too,I watched this 1st episode..I am hooked..u r getting there so simply..mi pann 3mahinyat faad-faad German bolen..thank you from the bottom of my heart..

  • @purvawarke7020
    @purvawarke7020 3 года назад +18

    Sir hello this is Purva warke.... I m in 3rd year (mech engg) and I was thinking for a German class... This morning my dad forwarded me a wp msg through which I saw your video and I m totally satisfied and felt easy while learning with u.... It's totally worth it 💯 thank you

    • @poojakudare8234
      @poojakudare8234 3 года назад

      Can u reply me on 7888040990 this number on WhatsApp I wanna also join Germany collages so can u help please

    • @priyankapatil-zy6fc
      @priyankapatil-zy6fc 3 года назад

      Hallo, really gr8...m also Maharashtrian...n saw u r video and got a confidence..really I want to learn German.. and make a German expert ..plz learn me

  • @jayashrikarle9139
    @jayashrikarle9139 3 года назад +7

    Today watched your video for the first time and liked it,I am eagar to learn,and I am quite confident that I could do it easily as you are demonstrating it very nicely.

  • @prabhaganu4638
    @prabhaganu4638 3 года назад +3

    केदार तुम्ही खुप छान जर्मन भाषा शिकवून सरस्वती ची एक प्रकारे
    उपासना करताय
    तुमच्या आयुष्यात सुख,शान्ति,समृध्दी
    नेम फेम,मिळो
    तुम्हांला तुमच्या परिवाला देवाचे आशिर्वाद मिळो

  • @chaitalipotdar2502
    @chaitalipotdar2502 3 года назад +5

    तुम्ही हाडाचे शिक्षक आहात. विद्यार्थ्यांना सगळे नीट कळावे म्हणुन तुम्ही ज्या तळमळीने सांगता त्याला तोड नाही. मला भाषेची प्रचंड आवड आहे अणि माझ्या मुलालाही. आम्ही सगळे videos आवर्जून बघू.

  • @yogynny
    @yogynny 3 года назад +1

    Atishay sunder shailit,soppya paddhatini,kuthalyahi vayachya vyaktila samajel ashya paddhatini tumhi samavun sangitla ahe.Dhanyavad!

  • @satyajitghate7902
    @satyajitghate7902 3 года назад +6

    Hello Kedar ,
    Appreciate your intention and efforts to teach German to all
    मराठी माणूस.
    Easiest way and it encourages to learn German. Keep it up.

  • @vilaspawar3505
    @vilaspawar3505 3 года назад +1

    केदार, .तुम्ही छान मिशन हाती घेतले, तुमचे मनापासून खूप कौतुक. माझा मुलगा देखील जर्मन मध्ये एम एस करतोय. मला जर्मन शिकायची खूप इच्छा होती, मी यू ट्यूब वर अधे मध्ये प्रयत्न करतो, वेले अभावी regular जमत नाही. खरे तर मराठीत कोणी अशा रीतीने सांगावे अशी खूप इच्छा होती , ती आता आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे निश्चित पूर्ण होईल अशी आशा आहे.
    आपली शिकवायची हातोटी, तळमळ खूपच छान व कौतुकास्पद आहे. आपण सर्वनाम व त्यानुसार क्रियापद, tenses far छान सांगतात. आपल्या मुळे जर्मन सोपी वाटायला लागली.

  • @thunderbolt8115
    @thunderbolt8115 3 года назад +12

    Ich lerne German!! Thank u so much sir, ur efforts are mind-blowing, just like ur awesome way of teaching 🙏 God bless

  • @anant7607
    @anant7607 3 года назад +6

    Dear Mr. Kedar,
    I came accross your this channel while surfing. Hats off to your selfless efforts. God bless you. As you rightly said this will certainly help students who can not afford huge fees. Many thanks for this great effort.

  • @surekhakr8499
    @surekhakr8499 3 года назад +32

    I am learning german and i am a student in 6th standard , and I have choosed german , so this video is solving my doubts. Thank you kedar sir

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 года назад +4

    खूप दिवस इच्छा होती जर्मन शिकायची, इतक्या सोप्या पद्धतीने शिकता येईल असं वाटलं नव्हतं! Thank you so much for taking initiative

  • @thebookhopper
    @thebookhopper 3 года назад +2

    केदार, खूप चांगला उपक्रम आहे. मनःपूर्वक शुभेच्छा. शेवटी तुम्ही जी ३० क्रियापदे दिली आहेत. त्यांचे मराठीत उच्चार दिले तर अजून पटकन जमेल. मी वाक्य तयार करताना ती लिहण्याचाही प्रयत्न करत आहे. आणि लिहिताना उच्चारत आहे.

  • @medhagodbole2509
    @medhagodbole2509 3 года назад +5

    खुप छान सोप्या भाषेत शिकवताय. माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना खुपच उपयोगी आहे. आपल्या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

  • @sanyogitagodbole6163
    @sanyogitagodbole6163 3 года назад +2

    अतिशय प्रशंसनीय आणि उपयुक्त उपक्रम..🙏🙏👏👏...आपली, अवघड गोष्टी सोप्या करून शिकवण्याची हातोटी आवडली 👌👌. ह्या निरपेक्ष आणि कळकळीने सुरू केलेल्या उपक्रमासाठी आपणास मनःपूर्वक धन्यवाद...🙏 आणि भरभरून शुभेच्छा!👍👍

  • @samrudhisalgaonkar280
    @samrudhisalgaonkar280 3 года назад +3

    Thank you so much. I currently pursued for MBA Marketing in Cardiff Metropolitan University. I'm staying in UK. Actually this is my internship year but I'm unable to get internship because some of them asking for German language. Thank you for this huge help and its in marathi that's really helpful for me. Thank you again 🙏👍

  • @aratilad3941
    @aratilad3941 3 года назад +3

    Khup chan upakram... . Ajpasun survat keli ahe... Shikavnyachi paddhat khup sopi ani sunder... Khup kautuk ani shubhechchha.. 🙏

  • @meghaambavale5014
    @meghaambavale5014 3 года назад +27

    👍👍 छान शिकाविता. परंतु एक विनंती कि, आपण जर्मन शब्दांचे उच्चार मराठीत लिहावेत

    • @chefmalvi4089
      @chefmalvi4089 3 года назад +1

      Yes sir....please🙏🙏🙏..and. Thank you...

    • @LearnGermanwithKedarJadhav
      @LearnGermanwithKedarJadhav  3 года назад +7

      I have created episode 14 with all pronunciations

    • @djgaming3386
      @djgaming3386 3 года назад +2

      @@LearnGermanwithKedarJadhav sir can i have your contact number

    • @arnavbhalerao7191
      @arnavbhalerao7191 3 года назад

      Agree

    • @mayureshsahasrabudhe3045
      @mayureshsahasrabudhe3045 3 года назад

      @@LearnGermanwithKedarJadhav want to join your class, is it possible for you to share your contact details?? Regards Mayuresh

  • @vaijayantiwagh806
    @vaijayantiwagh806 Год назад

    Hallo, I am Vaijayanti Wagh. 61 year old.
    Retired last year from nationalised bank.
    Followed you in Covid period. Afterwards there was a big gap of 2-3 ears.
    Now again stared to follow you, your videos.
    My daughter stays in suburb of Munich . She is in Germany from last 11 years.
    Which inspired me to learn German .
    Your coaching is very easy to understand.
    Let us hope that I will be able to cope up .
    Thank you.

  • @SANDEEPGHOLVE1
    @SANDEEPGHOLVE1 3 года назад +13

    👌👌🙏🙏 खूपच छान पुढाकार आणि उपक्रम.... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ravindradixit3053
    @ravindradixit3053 3 года назад +3

    Hello केदार, तुमची शिकवण्याची पद्धत फारच छान आहे ! तुमचा हा उपक्रम लोकांना नक्कीच उपयोगी पडेल. तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद !

  • @ritakeshkamat4368
    @ritakeshkamat4368 3 года назад +1

    Ambadnya kedarsinh Jadhav.you teach very nicely n by simple method .Thank you.

  • @nishadalvi2507
    @nishadalvi2507 3 года назад +3

    खुपच छान उपक्रम!नेहमी शिकत रहायला आवडेल!मनापासुन धन्यवाद!खुप अभिमान वाटतो तुझी तळमळ पाहुन!खुप खूप शुभेच्छा!

  • @kambalesagar
    @kambalesagar 3 года назад

    अतिशय उत्कृष्ट आणि सरळ सोप्या भाषेत सादरीकरण केले आहे. आजच्या काळात असं निस्वार्थी विचार भावनेने केलेलं हे काम अतिशय स्तुत्य. खूप खूप धन्यवाद आणि पुढील Videos साठी शुभेच्छा 💐

  • @manojpawar007
    @manojpawar007 3 года назад +3

    Commendable effort Kedar.
    First time someone explained which is easy to follow.

  • @mohangangan8290
    @mohangangan8290 8 месяцев назад +1

    केदारभाऊ, आपल्या निस्वार्थ सेवेस शतकोटी प्रणाम!🙏 निवृत्त वयात पुन्हा शिकायची आवड निर्माण झाली! आपणांस खूप खूप धन्यवाद!

  • @mangeshkukalkar8443
    @mangeshkukalkar8443 3 года назад +7

    Liked it. Explained with simplicity for beginners to learn easily

  • @nupurchitale3469
    @nupurchitale3469 3 года назад

    Ich bin jui. Ich lebe in thane.ich lerne Deutsch online kurs.
    धन्यवाद दादा
    माझी ११वीत असल्यापासून जर्मन शिकायची इच्छा आज पूर्ण झाली.
    जर्मन मधून वाक्य लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

  • @vedhasp
    @vedhasp 3 года назад +4

    Very nice!!! I too found too many similarities between Marathi and German when I learnt, I have been meaning to do something similar! But great that you did it already!!!! Thanks a lot for this, sending this to all my friends, family groups!!! It is getting viral now!!!

  • @varshaaklekar830
    @varshaaklekar830 3 года назад +1

    केदार सर तुम्ही खूप सुंदर समजावून सांगता त्यामुळे माझी जर्मन शिकायची इच्छा एव्हढी तीव्र झाली की मी वही आणि पेन घेऊन लिहायला सुरुवात केली. खूप खूप धन्यवाद.

  • @santoshkulkarni7884
    @santoshkulkarni7884 3 года назад +4

    केदार सर , तुमची जर्मन शिकवण्याची पद्धत खूप च सोपी अन अफलातून आहे , धन्यवाद सर 👍

  • @shubhangideshpande7292
    @shubhangideshpande7292 3 года назад +2

    Thanks Kedar. शिकण्यासाठी वय नसतं. आज निवृत्ती नंतरही मी नवीन भाषा शिकू शकते तेही घरबसल्या आणि विनामूल्य! तुमचा हा उपक्रम फारच स्तुत्य आहे. धन्यवाद!

  • @panachester13
    @panachester13 3 года назад +4

    Fantastic Effort..First time I am seeing German being taught in Marathi & Hindi. This is super stuff!!!

  • @jayantkarpe1028
    @jayantkarpe1028 3 года назад +1

    केदार फारच सुंदर शिकवणि , अगदी सोप्या भाषेत , शिकणारयां वर दड़पन न अनुभव देता
    आनंदमय ......

  • @smitabalvally1145
    @smitabalvally1145 3 года назад +8

    Appreciate your intention and efforts Kedar. Wonderful and easy to learn approach. I want to continue speaking in German now that I have completed B1. Would you be able to help or provide suggestions please.

  • @ketakeepaage613
    @ketakeepaage613 3 года назад +2

    खूप छान👌
    मी स्वतः C1 पर्यंत जर्मन शिकलीये 2011 मध्ये,पण काहीही कॉन्टॅक्ट नाही भाषेशी, त्यामुळे बोलता येत नाही, मनःपूर्वक धन्यवाद, पुन्हा सुरुवात केली नव्याने शिकायला👍
    Danke schoen!

  • @vaibhavshimpi5420
    @vaibhavshimpi5420 3 года назад +3

    Dear Kedar Sir. Thanks for your efforts for German language learning video in easiest way.
    I am referring a website since lockdown to learn German. But With this video I am very much confident to learn further.

  • @prashantmore434
    @prashantmore434 Месяц назад

    Really you are doing very good task of teaching German language without taking fee that is really worthy of praise. Thanks sir and God bless you.

  • @tatyavinchu1
    @tatyavinchu1 3 года назад +3

    I was looking for same... And here I got this... Just one word... Wow😍😍... मस्त केदार सर🙏👏

  • @shyamsundartanmor2508
    @shyamsundartanmor2508 8 месяцев назад

    खूप छान जर्मन भाषा मराठीतून शिकायची संधी मिळत आहे ! आपले अभिनंदन ...निस्वार्थ भावनेने शिकवताय त्याबद्दल ...proud of you sir... मी पण एक शिक्षक आहे इंग्लिश शिकवतो ...विद्यार्थ्यांना जर्मन शिकायला प्रेरित करतोय ...तसे तर माझे विद्यार्थी खूप वेगवेगळ्या जसे रशियन,जापनीज,फ्रेंच इत्यादी शिकताहेत सध्या ...अर्थात 6 वी ते 8 वीचे विद्यार्थी आहेत पण मला माहित आहे लहान वयातच खूप भाषा सहजासहजी शिकता येतात !😊😊

  • @krishnakantsarda
    @krishnakantsarda 3 года назад +5

    Great Video Kedar !! Your passion for teaching is commendable

  • @mrudulajoshi2714
    @mrudulajoshi2714 3 года назад +1

    सर तुम्ही खुप छान जर्मन शिकवता आहात .माझा मुलगा पण जर्मनीत गेली ९ वर्षं आहे.मला जर्मन शिकायची इच्छा होती पण कुठे अॅडमीशन ला वेटींग लिस्ट होती त्यामुळे प्राब्लेम येत होता पण आपण तो सोडवला . आपल्या ला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sakharambkadam4848
    @sakharambkadam4848 3 года назад +4

    खूप छान खूप छान पद्धतीने व सहज सोप्या भाषेत जर्मन भाषा आपण शिकवत आहे सर. मनस्वी धन्यवाद

  • @AkshayPatil-ss3ku
    @AkshayPatil-ss3ku 3 года назад +2

    केदार सर मी आतापर्यंत Duolingo App वापरात होतो. तुमच्या या video series मुळे जर्मन शिकणं अधिकच सोपं वाटतंय. Danke😀

  • @geetaganjave6148
    @geetaganjave6148 3 года назад +5

    Excellent. Thank you for this selfless effort. You have indeed made it very very simple to understand

  • @maddyraut7
    @maddyraut7 Год назад +2

    Such a gem of a person he is !!! Really genuine and selfless.. Proud of you brother.. ❤

  • @anitatalegaon2643
    @anitatalegaon2643 3 года назад +5

    very organised way of teaching! i loved the video and am eager to learn! thanks Sir, for wonderful video. your selfless effort is highly appreciated!

  • @uddhav2904
    @uddhav2904 3 года назад +2

    खूप छान..माझ्या सारखे बरेच ज्यांनी शिकायला सुरुवात केली, पण मराठी माध्यम, म्हणून सोडून दिले, अशांसाठी खूप छान. व्हिडिओ पाहून, परत शिकायची इच्छा निर्माण झाली.

  • @digitalsscmaths6161
    @digitalsscmaths6161 3 года назад +3

    2 वर्ष जर्मनीत राहून आज काही वाक्य आपल्या व्हिडिओ मार्फत शिकलो आहे..धन्यवाद दादा

  • @jayantdandegaonkar7427
    @jayantdandegaonkar7427 Месяц назад +1

    अद्भुत! शिकविण्याची पद्धत खूप छान आहे. खूप खूप धन्यवाद !

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 3 года назад +6

    Awesome efforts, Please continue your efforts..I want to learn i took admission in A but was not able adjust with speed at superintensive course at Geothe

  • @devashreemarathe8351
    @devashreemarathe8351 3 года назад +1

    खूपच स्तुत्य उपक्रम आहे केदार तुमचा. माझी मुलगी जर्मनीतच आहे. तीच्याकडून सुरूवातीला शिकायला सुरूवात केली होती.पण नाही झालं शिकणं. पण आता तुमच्या सोबतीने प्रयत्न करायला आवडेल आणि तिला surprise देता येईल. खूप खूप धन्यवाद.

  • @Neha_P
    @Neha_P 3 года назад +3

    Thank you so much to teach German language in easy to understand format!!! A request if you published a book teaching and explaning German in to Marathi... Thant will be a great help!!!!

  • @harshadsathe4598
    @harshadsathe4598 3 года назад

    केदारजी तुम्ही अगदी सोप्या भाषेत आपण जर्मन भाषा मराठीत शिकू शकतो हे दाखवले आहे. ह्यानिमित्ताने परदेशी भाषा शिकण्याची एक आवड पण लोकांमध्ये निर्माण होत जाईल. तुमच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा 👍👌👏

  • @sachinyeravadekar
    @sachinyeravadekar 3 года назад +4

    Very nice Kedar. It was a blessing for me, I wanted to brush up on my German learned in school.

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 6 месяцев назад

    केदार सर खुपच छान व सोप्या पद्धतीत शिकविता. मला जर्मन भाषा शिकायची आहे. तरी मार्गदर्शन करा. आपले व्हीडीओ पाहून मी प्रयत्न करणार आहे. प्रभावीपणे शिकण्यासाठी अजून आपले काही कोर्स असल्यास मार्गदर्शन करावे.
    आपण मराठीतून जर्भन शिकवता ही खुपच अभिमानाची गोष्ट आहे. आपणास खुप खुप शुभेच्छा

  • @vedavatihabbu4914
    @vedavatihabbu4914 3 года назад +5

    खूप स्तुत्य उपक्रम आहे. अनेक शुभेच्छा

  • @vaishalibhardwaj2936
    @vaishalibhardwaj2936 3 года назад +1

    Hello Kedar khupch stutya upkram .. tumchya ya video s mule kityek jananchi Jarman shiknyachi ichha purn hot aahe.. tumche manapasun kautuk aani aabhar🙏..

  • @vaibhavsawal5626
    @vaibhavsawal5626 3 года назад +4

    Amazing sir! No word for teaching style! great work sir
    🙏🙏 please keep it up series.

  • @sagarchokatkar3132
    @sagarchokatkar3132 3 года назад +2

    तुम्ही खूपच छान शिकवता सर, एवढं सोपं करून शिकवता आहात अजिबात गोंधळ होत नाही.
    खूप धन्यवाद सर

  • @SSK_Music1771
    @SSK_Music1771 3 года назад +3

    Dear Kedar
    Very nice initiative, highly appriciated👌👌👌
    I totally agree, German to English is very difficult to learn, I have tried learning through Maxmuller Institute B'luru.
    I would like to join this course you are offering🙏

  • @dr.mrunalinibhagurkar88
    @dr.mrunalinibhagurkar88 3 года назад +4

    Thank you so much sir...🙏 I wanted something like this since many years.... Thanks a lot...and I would like to do complete course with you 👍 I love German ❤️

  • @anilsawlekar5389
    @anilsawlekar5389 3 года назад +1

    Khupach chhan. Atishay sulabh aani sahaj.Matru bhashemule aankhinach soppe. Manapasun Aabhar. Navin Varsh Sukhache Jao.

  • @sanjaykulkarni2974
    @sanjaykulkarni2974 3 года назад +3

    खूपच छान. अतिशय सोप्या पद्धतीने शिकवता. कोणालाही शिकता येईल. ...

    • @manasikane5855
      @manasikane5855 3 года назад

      खूपच छान सोप्या पद्धतीने शिकवता.
      जे 30 शब्द वाक्य तयार करायला दिले आहेत त्याचे उच्चार कसे करायचे?
      प्लिज कळवाल का?

    • @manasikane5855
      @manasikane5855 3 года назад

      खूपच छान सोप्या पद्धतीने शिकवता.धन्यवाद!!
      तुम्ही वाक्य बनवण्यासाठी जे 30 शब्द दिले आहेत, त्याचे उच्चार कसे करायचे? प्लिज कळवाल का?

  • @jagannathpatil4611
    @jagannathpatil4611 3 года назад

    मी जगन्नाथ पाटील उमराळे नालासोपारा, महाराष्ट्र,भारत,
    माझे वय ८१ चालू असून मला जर्मन भाषा शिकण्याची संधी आपण विनामूल्य दिली आहे, याबद्दल खूप खूप धन्यवाद.आजचे आपले पहिले मार्गदर्शन आवडले. बघूया किती जमतंय ते.जाधव सर आपण मराठी लोकांना मोलाचं भाषा ज्ञान देत आहात.धन्यवाद

  • @somaybhalerao3911
    @somaybhalerao3911 3 года назад +3

    Kedar sir really appreciate you selfless work . Hope you continuing with more videos .

  • @shashidharjoshi2956
    @shashidharjoshi2956 3 года назад +2

    Thanks for a person for sharing your channel link in the group. Your passion to teach is highly appreciated.