भजन शिकू या... होईन भिकारी, पंढरीचा वारकरी ... श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थी गीतार्थ पाठ आळंदी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024
  • होईन भिकारी - संत तुकाराम अभंग -
    होईन भिकारी ।
    पंढरीचा वारकरी ॥१॥
    हाचि माझा नेम धर्म ।
    मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु.॥
    हेचि माझी उपासना ।
    लागेन संतांच्या चरणा ॥२॥
    तुका म्हणे देवा ।
    हेचि माझी भोळी सेवा ॥३॥
    *************************************************
    गायक/संवादिनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
    तबला.... डिजिटल तबला मास्टर.
    तबला कंट्रोलर.... खुशी शिंबरे.
    टाळ संगत आणि कोरस... खुशी शिंबरे,आरोही बिरादार,
    प्रतिक इंगोले.
    कॅमेरा शुटींग.... सार्थक वाबळे.
    *************************************************
    आयोजक....गीतार्थ पाठ, माऊली पार्क हनुमानवाडी केळगाव आळंदी. मोबा.9823150559.
    *************************************************
    भजन शिकू या...(उद्देश).
    ********************
    या उपक्रमात आम्ही अनेक श्रोत्यांच्या मागणी नुसार शिकवणुकीच्या भजनांची vdo टाकणार आहोत. मित्रहो भजन हा आपल्या जीवनात निर्मळ आनंद देणारा भाग आहे.यातून भगवंताचे स्तवन होते तसेच स्वतः बरोबर इतरांनाही आनंद देता येतो.
    समाजात दोन प्रकारचे गाणारे असतात...*१.उपजत गाणारे *२.शिक्षण घेऊन गाणारे.यापैकी उपजत गाणारे मोठ्या प्रमाणात आहेत.यांना थोडं जरी सांगितलं तर छान भजन होऊ शकते.
    जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेत त्यांना नोटेशन काढता येते तसेच ते नोटेशन नुसार हार्मोनियम वाजवून भजन म्हणू शकतात, मात्र जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेले नाहीत आणि उपजत ज्ञानाने हार्मोनियमवर भजन म्हणतात,अशा भजनप्रेमींना वेगवेगळी भजने म्हणताना अडचण येते, तेंव्हा अशा भजनप्रेमींना आपल्या घरीच मोबाईलद्वारा थोडंसं मार्गदर्शन झालं तर भजन अधिक रंजक आणि भावपूर्ण होऊ शकते. असा उद्देश मनात ठेवून साध्या -सोप्या पद्धतीने साधी-सोपी भजने म्हणता येईल,यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.ज्यांच्यापर्यंत जाणकार पोहचू शकत किंवा जे जाणकारांपर्यंत जाऊ शकत नाहीत,अशांपर्यंत मोबाईल द्वारा पोहचण्याचा हा लहानसा प्रयत्न केला आहे.
    *************************************************

Комментарии • 63