White Java Plum |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • नमस्कार शेतकरी बंधूंनो,
    बदलत्या काळात आपणसुद्धा बदललं पाहिजे आणि म्हणूनच शेतीतसुद्धा नवीन लागवड केली पाहिजे या हेतूने कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारे आणि महाराष्ट्रात प्रथमच यशस्वी प्रयोग झालेले पांढरे जांभुळ.
    पांढरे जांभुळ पिकाची वैशिष्टे
    💥 कमी खर्च
    💥 औषध फवारणी अत्यंत कमी ( नाहीच म्हटलं तरी चालेल )
    💥 2.5 वर्षात उत्पन्न सुरू ( या अडीच वर्षाच्या कालावधीत आपण आंतरपीक घेऊ शकता आणि त्याच्या उत्पन्नातून जांभळाच्या रोपांसाठी केलेला खर्च निघतो.)
    💥 कमीत कमी 200 रु/किलो ते जास्तीत जास्त 450 रु/किलो इतका मार्केट रेट
    💥 याशिवाय अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ बघा
    • White Java Plum | @abp... ( एबीपी माझा न्यूज चॅनल )
    किंवा संपर्क करा
    लाळगे शेती फार्म, इंदापूर
    9970472222
    राज्यातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणात आधुनिकतेची कास धरीत आहेत, आधुनिकतेची कास धरून शेतकरी बांधव आता शेती क्षेत्रात नवनवीन नाविन्यपूर्ण प्रयोग कार्यान्वित करीत आहेत. असाच काहीसा हटके व नाविन्यपूर्ण प्रयोग पुणे जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने केला आहे. या अवलिया शेतकऱ्याने चक्क पांढऱ्या जांभळाची लागवड करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सराफवाडी मध्ये हा आगळा वेगळा व नावीन्यपूर्ण प्रयोग अमलात आणला गेला आहे. मौजे सराफवाडी येथील भारत वामन लाळगे या हुन्नरी शेतकऱ्याने हा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे.
    इंदापूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली जाते, फळबाग पिकांपैकी जांभळाची देखील लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, परंतु तालुक्यात पांढऱ्या जांभळाची लागवड करण्याचा हा पहिलावहिला प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. यंदा प्रथमच सराफवाडी च्या भरत यांनी पांढऱ्या जांभळाची लागवड केली आहे आणि आगामी काही दिवसात या पांढऱ्या जांभूळ लागवडीतून हा अवलिया शेतकरी भरघोस उत्पादन प्राप्त करणार आहे. भारत नेहमीच आपल्या शेतीत नवनवीन पिकांची लागवड करीत आले आहेत, यंदा त्यांनी पांढऱ्या जांभळाची लागवड करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. या अवलिया शेतकऱ्याने ओडिशा राज्यातून पांढऱ्या जांभळाचे रोपे मागवली होती. जांभळाची रोपे मागवल्यानंतर भरत यांनी 12 बाय 12 या अंतरावर ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून पांढऱ्या जांभळाची लागवड केली.
    भारत यांनी लावलेल्या जांभळाला यंदा तीन वर्षे कम्प्लिट झालेत, त्यामुळे त्यांनी यंदा प्रथमच या पांढऱ्या जांभूळचा बहार धरला आहे. सध्या भारत यांचे पांढरे जांभूळ फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत आणि उन्हाळ्याच्या शेवटी यापासून उत्पादन प्राप्त होणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. पांढऱ्या जांभूळमध्ये मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असल्याचा दावा केला जातो, त्यामुळे त्याचे सेवन मानवी आरोग्यासाठी विशेष लाभप्रद असल्याचे सांगितले जाते आणि म्हणूनच या पांढऱ्या जांभळाला विशेष मागणी असल्याचे सांगितले जाते. पांढरे जांभूळ आतून व बाहेरून पांढरेच असते, या फळाला देशांतर्गत एक मोठी बाजारपेठ आहे.या फळाची मागणी दिल्ली बेंगलोर मुंबई पुणे यांसारख्या मेट्रो शहरात मोठ्या प्रमाणात असते. या फळाला इतर जांभळापेक्षा अधिक बाजार भाव प्राप्त होत असतो, या पांढऱ्या जांभळाला सुमारे चारशे रुपये प्रति किलोपर्यंत असा दर मिळत असल्याचे सांगितले जाते. भरत यांना पांढऱ्या जांभळाच्या शेतीसाठी आपल्या परिवारातील सदस्यांचे मोठे अनमोल सहकार्य लाभत आहे. भार त यांच्या मते, शेतकरी बांधवांनी नेहमीच शेती क्षेत्रात नवनवीन नावीन्यपूर्ण प्रयोग कार्यान्वित करणे काळाची गरज बनली आहे.

Комментарии • 9

  • @sngroup50
    @sngroup50  Год назад

    संपर्क करा
    लाळगे शेती फार्म, इंदापूर
    9970472222

  • @Iampramodinishinde
    @Iampramodinishinde 2 года назад +1

    Rope Kote miltin

  • @gopalrayate3962
    @gopalrayate3962 2 года назад +2

    रोपे कुठे मिळतील व रोपांची किंमत किती आहे सांगितले तर फारच उत्तम होईल धन्यवाद

  • @ajayshewale4825
    @ajayshewale4825 Год назад

    रोपे कोठे उपलब्ध होतील ते कळवा. 🙏⚘⚘

    • @sngroup50
      @sngroup50  Год назад

      संपर्क करा 9970472222

  • @achutpatlewad7561
    @achutpatlewad7561 Год назад

    त्यांनी बाग तयार झाला ती रोपे काढून