मनसे दणक्यामुळे बस स्थानकाचे नाव तातडीने बदलले ! खंडाळा अर्बन बँकेने घेतली तातडीने दखल...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • मनसेच्या दणक्यामुळे बस स्थानकाचे नाव तातडीने बदलले ; खंडाळा अर्बन बँकेने घेतली तातडीने दखल*
    रत्नागिरी -- मनसेचे धडाडीचे रत्नागिरी उपशराध्यक्ष आणि विविध सामाजिक क्षेत्रात नेहमीच चर्चेत राहणारे अमोल श्रीनाथ यांच्या दणक्यामुळे बस स्थानकाचे नाव तातडीने बदलले आहे. खंडाळा अर्बन बँकेने याबाबत तातडीने दखल घेतली त्यामुळे पुढील प्रसंगाला विराम मिळाला आहे.
    खंडाळा अर्बन बँकेने रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे बस थांब्याला शिवाजीनगर बस स्टॉप अशा नावाचा फलक प्रसिद्ध केला होता. या फलकावर शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला होता त्यामुळे मनसेचे रत्नागिरीतील नेहमीच आक्रमक असलेले आणि चर्चेत असणारे रत्नागिरी शहर उपशराध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनी याबाबत आवाज उठविला. याबाबत खंडाळा अर्बन बँकेच्या अधिकाऱ्यांकडे अमोल श्रीनाथ यांनी तातडीने संपर्क करून फलकावरील शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी झालेला उल्लेख त्वरित बदलण्यात यावा अशी चर्चा करून मागणी केली. त्या चर्चेला, मागणीला प्रतिसाद देत सदर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्याची दखल घेत तो फलक त्वरित बदलला. त्यामुळे रत्नागिरीतील तमाम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. शिवाय बँकेच्या अधिकाऱ्यांसहित अमोल श्रीनाथ यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
    #thackeray #राजसाहेब_ठाकरे #राजठाकरे #मनसे #राजसमर्थक #rajthackeray #dahihandi #balanandgaonkar #rajupatilmns #rajsahebthackeray #mns #mnsquad #mnsmedi #nashikmns #manse #marathipost##isupportrajthackeray #mnse #maharashtranavnirmansena #amitthackeray #balanandgaonkar #मनसेध्वज #महाराष्ट्रसैन

Комментарии •