भालगाव शाळेतील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी थेट ठाण्यातून सोशल मीडिया द्वारे मदत सन-2024/25

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • _ठाणे येथील रहिवासी श्री.राजेंद्र परमसागर हे माझ्याशी विविध शैक्षणिक उपक्रमास सोशल मीडियाद्वारे जोडले असताना जवळपास शाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरीही माझ्या वर्गातील एका विशिष्ट समाजातील विद्यार्थ्यांनी अजूनही शैक्षणिक साहित्य खरेदी केले नव्हते.. याचे मुख्य कारण की पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणास अडथळा येत होता.. आपल्याकडे शैक्षणिक साहित्य नसल्यामुळे विद्यार्थी सतत गैरहजर राहू लागले.. व वर्गातील इतर विद्यार्थ्यांमध्ये त्यांना कमीपणाची भावना जाणवू लागली._*_विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिद्द आहे पण साहित्य अभावी ती अपूर्ण राहते किंवा त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात ही गरज ओळखून राजेंद्र परम सागर यांनी *फोन पे द्वारे तीन हजार तीन रुपये पाठवत त्याचे सर गरजेनुसार साहित्य घ्या असे सांगितले तसेच यातून एका गरीब विद्यार्थिनीच्या दवाखान्यासाठी खर्च झालेला आहे त्यातून त्यास पैसे द्या असेही सांगितले ..._*सामाजिक भावनेच्या बांधिलकीतून समाजातील गरजवंत व्यक्तींची केलेली सेवा ही परमेश्वराच्या सेवेपेक्षा महान आहे याचे मूर्तीमंत उदाहरण ठाणे येथील राजेंद्र परमसागर यांनी सर्वांसमोर ठेवले..**आपली जबाबदारी व भूमिका ओळखून केलेली कृती ही समाजाला नेहमीच दीपस्तंभ प्रमाणे दिशादर्शक असते...*_आपण केलेल्या शैक्षणिक मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड निर्माण होऊन या विद्यार्थिनी शाळा सोडून स्थलांतर करणार नाहीत व शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला होणार नाही..._आपण केलेली हे शैक्षणिक साहित्याचे दानाचा उपक्रम समाजातील अनेक तरुणांनी पुढाकार घेऊन गावोगावी जिल्हा परिषद शाळेत व्ह्यायला हवेत..👍🏼🚸*अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्तीनी पुढाकार घ्यावा..आणि आमच्या देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गावातील शाळेला गरजवंत विद्यार्थ्यांना पेन,वह्या,दप्तर, पुस्तके अशी शैक्षणिक साहित्य द्यावे या आव्हानाला प्रतिसाद देत श्री राजेंद्र परम सागर यांनी उचललेले पाऊल नक्कीच सर्वांसाठी आदर्शवादी आहे..**आदरणीय श्री राजेंद्र जी परम सागर आपणास सर्व विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या वतीने खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद...🌹🙏🏼👍🏼*मुख्याध्यापिका सौ सरिता सावंत मॅडम✒️वर्गशिक्षक:- श्री राहुल

Комментарии •