Kitida Navyane - Full Audio | Ti Saddhya Kay Karte | Mandar Apte | Abhinay Berde & Arya Ambekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 635

  • @ganeshchaudhari9560
    @ganeshchaudhari9560 Год назад +455

    पहिल प्रेम पहिली शाला आणी आपले खेड्याचे गांव म्हनजे अविस्मरणीय क्षणांचा ठेवा..😢

  • @an_authentic_deep0506
    @an_authentic_deep0506 9 месяцев назад +288

    कधी कधी एखाद्या व्यक्ती पेक्षा,
    तिच्या सोबत घालवलेले क्षण
    जास्त अविस्मरणीय असतात ❤0506❤

  • @TruptiNagawade-u7s
    @TruptiNagawade-u7s Год назад +144

    हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही का काही लोकांच्या वाटेला नाही येत.. एकच तर इच्छा होती देवा की तो आणि मी सोबत असावे .पण तुला ते मान्य का नसावे ...आयुष्यभर एकत्र नव्हते ठेवायचे तर भेट का घडून दिली ..किती वेळा त्या व्यक्ती ची आठवणीत रमून जायचे ..किती त्रास सहन करायचा ..किती वेळा रडायचे ..समोर कोण आले तर गुपचूप अश्रू पुसून शांत व्हावे....का लोकांचा विचार करून आयुष्य भर प्रेम लांब करावे ...का घरचे देखील समजून घेण्यास कमी पडावे ...खूप साऱ्या अपेक्षा इच्छा कधी ठेवला नाही मी देवा tuzakfun पण एक मात्र गोष्ट तुला मला मात्र देता आली नाही.....किती त्या तक्रारी आहेत देवा माझा .. पण उपयोग नाही त्याचा कारण तू मदत नाही करत तर बोलून किती वेळा रडत बसावे....खर च देवा 1 गोष्ट दिली असती फ्ल्ट मला आयुष्भर ऋणी राहिले अस्ती तुझी..खूप आठवण येते मला त्या व्यक्तीची..प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र ..किती अजून देवा सहन करावे मी..थोडी सुधा दया येत नाही माझी तुला 🥺🥺🥺

    • @horror4077
      @horror4077 10 месяцев назад +7

      bas tai comment manala lagli

    • @SamadhanDahije
      @SamadhanDahije 8 месяцев назад +1

      Bhetel nakki bhetel Tula tuz prem🎉🎉

    • @SmartUReels
      @SmartUReels 6 месяцев назад

      ​@@horror4077खरंच आई वडील का नाहीत समजून घेत काय माहीत

    • @bios5849
      @bios5849 5 месяцев назад +2

      देवा ने रे यांना त्या व्यक्ती जवळ😢...

    • @Littlesadhus
      @Littlesadhus 5 месяцев назад +1

      सांग, सध्या तो काय करतोय? ❤

  • @Pritipatil-o1g
    @Pritipatil-o1g 4 месяца назад +109

    एखाद्यावर आभाळा येवढं प्रेम केलं तर, पावसा प्रमाणे रडू येणारच ना ❤😢

  • @jadhavaman8927
    @jadhavaman8927 Год назад +134

    खऱ्या प्रेमाची फीलिंग्स काही तरी वेगळीच असते...
    खरच तिला पाहता श्रणी वेगळीच अंगातून शहारे येतात ❤❤

  • @durgashelke1770
    @durgashelke1770 Год назад +136

    ... मागे वळून पाहिलं..,,, तर नुसत्या "आठवणी राहतात पण ती व्यक्ती आपण कधीच विसरू शकत नाही,,,,, (.......) आयुष्य खूप कमी आहे पण बरच काही घडतं.. "

    • @amitsutar7831
      @amitsutar7831 8 месяцев назад

      😢

    • @shreeparashakticontraction5544
      @shreeparashakticontraction5544 7 месяцев назад

      खर आहे. माणूस ठराविक वेळेत नक्कीच नसेल
      पण आठवणी जीवघेण्या होतात 😢

    • @abhijeetp678
      @abhijeetp678 3 месяца назад

      ​@@shreeparashakticontraction5544maran aal tri chalel ata

    • @santoshnaik7041
      @santoshnaik7041 3 месяца назад

      ताई तुम्ही निःशब्द करून ठेवले 😢

  • @sudeshborade3883
    @sudeshborade3883 Год назад +744

    पहिलं प्रेम - कधीही न मिटणारी आठवण 🥺🫀👸

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Месяц назад +28

    सगळ्या कंमेंट वाचल्या 😊🙏🙏❤ मी या गाण्याची गीतकार देवयानी कर्वे कोठारी ❤❤ खूप खूप प्रेम मिळाले या शब्दांना 😊🙏 असेच राहूद्या. खूप खूप आभार 😊🙏🙏🙏

    • @vinayvrajput
      @vinayvrajput 14 дней назад +2

      Khup chan... Shabda Suchala aahet tumala madam.....❤❤❤

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 14 дней назад

      @vinayvrajput thxxxx

    • @shiwparhe5466
      @shiwparhe5466 7 дней назад +1

      अविस्मरणीय गाणे..❤

  • @pruthavirajmohite1299
    @pruthavirajmohite1299 9 месяцев назад +118

    हे गाणं एकल की का माहित नाही पण डोळ्यातून पाणी येते आणि पुन्हा एकदा तिची आठवण येते 😢😢😢

  • @ajayyendhe8358
    @ajayyendhe8358 Год назад +95

    i literally cried while reading comments..some are mesmerising fathers and mothers ..some are mesmerising love ... who said it is 2023 and emotions are lost in this hectic life..no totally wrong

  • @sohamdeshmukh4123
    @sohamdeshmukh4123 Год назад +171

    I lost my baba 4 years ago, this song reminds me of him each time I listen to it and brings tears along with it. Not those sad tears though, it brings back the sweet memories and his warm smile.

    • @paragdhuru585
      @paragdhuru585 Год назад +3

      Sorry for your loss , take care

    • @chaitanyalandge4524
      @chaitanyalandge4524 Год назад

      Music 🗽❤️

    • @vinayvrajput
      @vinayvrajput 14 дней назад +1

      Khara aahe... Prem he Fakta muli kiva mula che nasate.... Aai... Baba... Bhau... bahin... Mavashi... Kaka... Mitra... Ani Niragas Maitrin....ashu shakate...❤❤❤

    • @shantishete5818
      @shantishete5818 3 часа назад

      So sad 😢

  • @ashwinisinkar8248
    @ashwinisinkar8248 Год назад +82

    पहिल्या प्रेमा
    इतक
    जगात काहीच निरागस नाही 😢😢😢❤❤

  • @travellingentertainer8166
    @travellingentertainer8166 10 месяцев назад +134

    2003 साली कॉलेजला असतांना शुभांगी तुला prapose केलं आज आयुष्याच्या 40 वर आलो पण तुझी आठवण आजही मनात कायम आहे.😔😓

  • @khedkar_pravin6706
    @khedkar_pravin6706 Год назад +267

    पहिलं प्रेम म्हणजेच शेवटच प्रेम 🥺😢
    अस किती लोकांना वाटत

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 5 месяцев назад +6

      ते आपोआप होऊन जात दादा त्यानंतर दुसऱ्या माणसावर प्रेम होतच नाही.

    • @Vaibhavkapde
      @Vaibhavkapde 3 месяца назад

      Hmm

  • @Vikrampawar_2004
    @Vikrampawar_2004 Год назад +130

    ते पहले शाळेतले पाहिले प्रेम कधीच विसरत नाही अचानक कधी ते आठवत आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात असं वाटते की एकदा परत ते दिवस जगावे...कितीदा नव्याने तुला आठवावे😢

  • @TejMore-dg1mb
    @TejMore-dg1mb Год назад +59

    आयुष्य मोठे होते पण भेट ही छोटीशी होती 🥺💔 पाहिलं प्रेम न विसरणारी यातना 😢

  • @ashwinsapkale92
    @ashwinsapkale92 9 месяцев назад +25

    पहले मित्र शाळा आणि प्रेम कधीच विसरता येत नाही, मरे पर्यंत काळजा मधे अविस्मरणीय आठवण बणून राहते 😊

    • @gulabg7
      @gulabg7 Месяц назад +1

      मनातलं

  • @sachinveer8452
    @sachinveer8452 Год назад +58

    हे गाणे ऐकले की पहिल्या प्रेमाची आठवण होते. ...खुप खुप सुंदर गाणे आहे. ..

  • @chitraprabhu1140
    @chitraprabhu1140 Год назад +174

    The pain of first love is immeasurable whether you are 16 or 60 the song always brings tears & more tears😢😢

    • @samaykirad
      @samaykirad Год назад

      How old are you bro

    • @chitraprabhu1140
      @chitraprabhu1140 11 месяцев назад +5

      Actually I am not a bro I have no idea how old you are but I am a female 63 years old maybe I night be your mom's age but yes of course first love cannot be forgotten 😢😢😢😢

    • @akshay-jr1qz
      @akshay-jr1qz 10 месяцев назад

      60 year old are fucking 18 year old chicks they don't care about thaat one chick

    • @JSD999
      @JSD999 8 месяцев назад

      @@chitraprabhu1140 am in same boat age 52 male first love cannot be forgotten

    • @chitraprabhu1140
      @chitraprabhu1140 8 месяцев назад

      Believe It Or Not But Love Is The Greatest Power In This World ❤❤❤❤❤❤

  • @bhartipatil8270
    @bhartipatil8270 2 месяца назад +5

    पहिलं प्रेम म्हणजे कधीही न दिसणारी अविस्मरणीय गोष्ट आणि ते आठवलं डोळ्यात पाणी येतं आणि चेहऱ्यावर हसू येतं कधीच विसरता येत नाही अशी एक आठवण आहे आपल्या आयुष्यातील खूप स्पेशल ती मिळवता येत नाही तरीही तिच्या आठवणीत आपण आपलं आयुष्य घालवतो तो क्षण आठवला की आपल्याला चेहऱ्यावर हसू येतं डोळ्यात पाणी येतं हेच तर प्रेम असतं समोरचा व्यक्ती कसाही वागला तरी आपण त्याच्यावर निस्वार्थी मनाने प्रेम करतो तू कसाही वागला तरी त्याच्या वागण्याचा त्रास होतो पण त्याच्यावर आपण आयुष्यभर राग नाही करू शकत शब्दात व्यक्त करण्यासारखे प्रेम नाही तर प्रेम हे एक व्यापक संकल्पना

  • @bhagwansawale712
    @bhagwansawale712 Год назад +27

    या सुंदर गीताने नकळत डोळे भरून येतात.जुन्या आठवणींना या छान अशा लयबध्द गाण्याने प्रत्येकाला पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
    I also miss my dear..love❤

  • @fcbayernmunchenbundesliga7638
    @fcbayernmunchenbundesliga7638 6 месяцев назад +21

    भावनाना पाझर फोडणारी माझी मराठी भाषा❤ अभिमान आहे ह्या सर्वश्रेष्ठ भाषेचा♥️🙏

  • @snehajadhav7041
    @snehajadhav7041 10 месяцев назад +71

    जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा त्याची आठवण आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤😊

  • @dhruveshtandel8239
    @dhruveshtandel8239 10 месяцев назад +52

    पहिलं प्रेम कोणालाच मिळत नाही आणि हे सत्य आहे...... 💔

  • @prathameshpatil6609
    @prathameshpatil6609 Год назад +57

    Traveling in train it's Morning 6:40 and listening to this, remembering all the good memories ❤

  • @dilipasmar8061
    @dilipasmar8061 Год назад +12

    प्रिय आवडाबाई मी तुला खुप खुप मिस करतो असा एक दिवस नाही तुझी आठवण येत नाही सकाळी झोपेतून उठतो तुझे नाव घेऊन आणि रात्री झोपताना पण तुझेच ध्यान कधी भेटशील मला तूझ्या विना जगणे अवघड झाले आहे

  • @vaibhavgingule104
    @vaibhavgingule104 Год назад +20

    सुख, भावना, राग, प्रेम, आणि किती काही ते प्रेम खुप वेगळं होत आणि नेहमी राहिलं❤️❤️🧿

  • @akshaypatil1525
    @akshaypatil1525 9 месяцев назад +8

    Kadhi kadhi tichi Ani sobat ghalvlelyaa vele chi khup athavan yete, pan ata doghe jan aamchya Life madhe khup pudhe nighun aloy, tich lagn pan zalay... Ata fakt tya sundar athavani ahet jya kadhi tari alya ki changl ani vait sobat vatat.... Pahil prem ani ti vyakti kadhi visru nahi shakat manus

  • @BindaZzProduction
    @BindaZzProduction 3 месяца назад +5

    चंद्राहुनी सुंदर तुका दिसावे
    आभाळाएवढ्या जगात फक्त का तुलाच पहावे
    तुझं छायाचित्र का हृदयी कायम राहावे
    तुझें नावही ऐकल्यावर चेहऱ्यावर हास्य का यावे
    मनाला वाटे कायम तुला विसरावे
    विसरण्याचा प्रयत्नात हे आयुष्य संपावे
    आणि कितीदा नव्याने तुला आठवाव
    डोळ्यातले पाणी नव्याने वहावे...

  • @joshi_hardi_k15
    @joshi_hardi_k15 Год назад +24

    पहिलं प्रेम- कधी ही न मिटणारी आठवण.....🥺

  • @dhanshrichavan1864
    @dhanshrichavan1864 4 месяца назад +10

    पहिलं प्रेम आणि धोका 😅हे कधीही नाही विसरणार मी ..एवढा मोठा होऊन दाखवणार की जळाली पाहिजे

  • @janardanghige5389
    @janardanghige5389 Год назад +36

    असा एकही क्षण नाही की तूझी आठवण येत नाही आज इतक्या वर्षानंतर सूद्धा

  • @janardanghige5389
    @janardanghige5389 3 месяца назад +8

    बारा वर्षे लागली तुला विसरायला पण हे गाणं ऐकलं न एक क्षणही लागला नाही तुझ्या आठवणीत डोळे ओले व्हायला खूप त्रास होतो तुझी आठवण आल्यावर miss you ranu 😢

  • @dnyaneshwarjalamkar5871
    @dnyaneshwarjalamkar5871 11 месяцев назад +9

    खरच 'प्रेम' शब्द जरी कानी पडला तरी डोळ्यासमोरुन त्या सर्व आठवणींची झुळुक येऊन जाते. 'कितीदा नव्याने तुला आठवावे' ऐकतांना 'डोळ्यातले पाणी' कधी वाहायला लागते कळत सुध्दा नाही. माझ्यासारखाच तुला सुद्धा या गाण्याच्या ओळींना ऐकण्याचा मोह आवरत नाही ना. मन भरुन येते यार भेटशील ना परत एकदा तरी.

    • @priyapatil1506
      @priyapatil1506 11 месяцев назад

      भेटणार...❤😢😢

  • @pratikgiri1768
    @pratikgiri1768 6 месяцев назад +37

    हे गीत ऐकल्यावर आपल्याला आपल्या प्रेयसीची आठवण आल्याशिवाय राहत नाही......🥺

  • @latahawaldar2248
    @latahawaldar2248 29 дней назад +3

    ज्या व्यक्तीचं खरं प्रेम असतं ना ते कधीच कोणाला मिळत नाही, ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त आणि मनापासून प्रेम केलं ती व्यक्ती कधीच आपली होत नाही आणि भेटत ही नाही,😢 मग का स्वामी त्या व्यक्तींना आयुष्यात आणता,😢 रोज आठवण आल्याशिवाय राहत नाही, आणि त्याच्याशिवाय जगता ही येत नाही फक्त आठवण काढत त्यातच रमत जाणं एवढच आहे आत्ता, हे गाणं ऐकल्यानंतर तर खुप आठवण येते ❤😢

  • @akashjadhav7429
    @akashjadhav7429 6 месяцев назад +7

    लोग कहते है की किसीके एक चले जाने से जिंदगी नही रुक जाती मगर ये नही जानते है की लाखो मिल जाने से भी उस एक की कमी पुरी नही होती है 💯

  • @premadsule2120
    @premadsule2120 Год назад +32

    खूप सुंदर मार्मिक भाव आहे गाण्यात
    खुप आठवणी ताज्या होतात

  • @sandhyashinde586
    @sandhyashinde586 5 месяцев назад +15

    पहिली नजर भेट
    पहिला कॉल
    पहिली भेट
    पहिलं डोळ्यातून आलेलं पाणी
    हेच पहिलं प्रेम ❤❤

  • @neel-vp6dm
    @neel-vp6dm 3 месяца назад +6

    कमेंट्स पाहुन एक गोष्ट लक्षात आली की आशा किती तरी प्रेम कथा अर्धवट राहिल्यl आहेत 😢😢😢😢

  • @Mr.punesh
    @Mr.punesh 5 месяцев назад +5

    अनु तू माझा जीव आहे तुझ्या शिवाय मी नाही राहू शकत आणि तू माझ्या शिवाय ...प्रेम ऐक अनंत काहानी आहे..

  • @janardanghige5389
    @janardanghige5389 3 месяца назад +5

    मी जेव्हा कधी हे गाणं ऐकतो तेव्हा तुझी आठवण होते आणि जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा हेच गाणं ऐकत असतो😢miss you ranu😢

  • @sagarsapkal-dz5ei
    @sagarsapkal-dz5ei 4 месяца назад +4

    खूप भारी असतं पहिलं प्रेम आठवण आली का डोळ्यात पाणी येतं ❤🎉❤

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale Год назад +107

    साक्षी तु म्हणत होतीस ना अगदी तसंच झालं ;अखेर तु कायमची दुसर्याची झालीस 💔मी रोज हे गाणे न ह्रदयात वाजे ही 2 गाणी ऐकत तुला आठवून रडत असतो.
    किमान तुझ्या लग्नात तरी मला तुला खुष बघायचं होतं😭😭
    मीसुद्धा काही दिवसांत कायमचा Germany🛫ला निघून जाईन ;फक्त त्यापूर्वी एकदा मी *सांगलीत* येईन कारण मला तुला पाहायचं आहे (लांबूनच) .. फक्त एवढा दिलासा हवा आहे कि तु सुखी न योग्य व्यक्तीसोबत आहेस❤😭😭

    • @vishalhonrao2537
      @vishalhonrao2537 Год назад +3

    • @gangurdesantosh5056.
      @gangurdesantosh5056. Год назад +3

      माझी पन साक्षी कायमची दुसर्याची झाली. 😔😔😔🥺🥺🥺

    • @vivek-ri3qg
      @vivek-ri3qg Год назад +17

      BE MATURE GUYS .................SAKSHI LA ATAVUN TUMHI TUMCICH ZINDAGI BARBAAD KARNAR AHAT TYAPEKSHA YEK LIFE AHE ANANDAT JAGA MAJJA KARA CHANGLE KARM KARA.........THATS IT

    • @mc_stun1
      @mc_stun1 Год назад

      ​​@@gangurdesantosh5056.दोघांचीपण एकच साक्षी असेल😂😂

    • @sonalgharat9535
      @sonalgharat9535 Год назад +3

      Saglyna sagle sodun gelt 😂😂😂

  • @sangramchougale1939
    @sangramchougale1939 10 месяцев назад +5

    हे गाणं ऐकताना जुन्या आठवणी जाग्या होतातच मग त्या प्रेमाच्या असूदेत किंवा मैत्रीतील.... आठवणी कधीच जुन्या होत नसतात आणि त्यामध्ये लहापणीच्या आठवणी वेगळ्याच असतात, कधी कधी अस वाटतेय त्या लहापणीच्या आठवणींमध्ये रमून जावं आणि त्या कधीच संपूच नयेत...

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Год назад +13

    पहिलं प्रेम म्हणजे कधीही न व्यक्त झालेलं प्रेम 🥺

  • @tejasjairange8302
    @tejasjairange8302 Год назад +40

    W movie
    W song
    Gonna keep coming for this masterpiece ❤

  • @akashpagare1586
    @akashpagare1586 Год назад +25

    आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
    आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.😶

  • @Mr.VishalYadav9
    @Mr.VishalYadav9 3 месяца назад +3

    माझ्या पहिल्या प्रेमा तुझी खुप खुप आठवण येते, तुला जर तेव्हांच बोललो असतो तर आज माझ्या सोबत असली असती पण माणसांना पहिल्यांदा भेटलेली गोष्ट म्हणजे एक अमृत च जे की भेटत नाही, तुला भेटुन चार वर्ष झाले खुप आठवण येते यार

  • @akashpoman5707
    @akashpoman5707 Месяц назад +2

    आजही तिच्या आठवणी ,तिच्या सोबत घालवलेला क्षण , वेळ,तिचे बारीक डोळे,
    सगळं आठवत.❤
    तुझा सहवास miss karto me.
    miss u dear panda🐼💝

  • @SuyogKhatod
    @SuyogKhatod Год назад +7

    खरंच यार पहिल प्रेम किती महत्वाचे असते आपल्यासाठी_______😔😔miss you yaar.......

  • @Aakash-je8rr
    @Aakash-je8rr 11 месяцев назад +5

    कोणत्याही व्यक्तीला आपल्या भावना समजतं नाही हेच कटु सत्य आहे 😢 0:36 त्यामुळे ह्या सर्व गोष्टी फक्त चित्रपटात छान वाटतात 😊 जीवनात ह्या सर्व गोष्टींचा विचार करणे,हा एक फालतूपणा आहे असे मला वाटते, 3:11 कुठल्याही व्यक्तीची सवय माणसाला पुर्णपणे बाद करते हे नक्की
    वैयक्तिक अनुभव 😢😢😢😢 तरी पण मी तिला नाही विसरू शकत, मला क्षमा कर मोनिका मी तुझी वाट पाहतोय 😢😢

    • @sachinpandit-sr2jl
      @sachinpandit-sr2jl 11 месяцев назад

      तुझी मोनिका येणार येणार 😂😂

    • @SmartUReels
      @SmartUReels 6 месяцев назад

      मी माझ्या मोनीला फसवल , पण तिची उणीव मला आयुष्भर जाणवेल मिस यू मोनि 😢😢❤❤

  • @ruturajkore5085
    @ruturajkore5085 Год назад +13

    शिवांजली अशीच गेलीस सांगून आहे माझं तूझ्या वर प्रेम मग कधी येणार परत 12वर्षे झाली अजून वाट पाहतोय

  • @ajayshendage5012
    @ajayshendage5012 Год назад +13

    माझे पण प्रेम आदुरे राहिले😢 मिस यू प्रिया i mis you ❤️ Priya तुझ जाल लग्न पण माज आयुष तुझ्या आठवणीत चाले 😢

  • @shitaljagtap3246
    @shitaljagtap3246 Год назад +23

    This song is dedicated to my late sweet little daughter... mesmerizing song.....

    • @samaykirad
      @samaykirad Год назад +2

      May she RIP, so sorry to hear about your loss

    • @gauravugale532
      @gauravugale532 Год назад

      @@samaykiradRIP your mom sory for ur loss too

    • @ranjitsjwagh0256
      @ranjitsjwagh0256 11 месяцев назад

      😢 Take care..

  • @nelsonlobo5239
    @nelsonlobo5239 11 месяцев назад +20

    This song will always be remembered by everyone for their teenage crush and feelings & emotions 💔
    Very beautiful song!!!

  • @Sachinkanthale-m7b
    @Sachinkanthale-m7b 5 месяцев назад +10

    माझी पण खुप इच्छा होती, माझ्या नावासमोर अंजलीच नाव यावं अस पण तस नाही झालं, कारण पहिलं प्रेम थोडीच कधी कोणाला मिळतं, म्हणून आता मी माझ्या मुलीचं नाव अंजली ठेवणार ❤️love you अंजु

  • @Shubham_bhise_production
    @Shubham_bhise_production Месяц назад +1

    प्रेम अशी नशा आहे जी करावी लागत नाही ती होऊन जाते.
    एकदाच केलेलं प्रेम जीवनात आयुष्यभर अविस्मरणीय असतं त्यालाच खर प्रेम म्हणतात.
    अस माझ्या सोबत झालेलं आहे. ती कधी बोलली नाही मी ही कधी बोललो नाही तिला वाटल मी बोलाव आणि मला वाटल तीने बोलाव या वादात आमच्या मनाच्या भावना तशाच राहिल्या. आता या गोष्टीला ५ वर्ष लोटली ❤.

  • @SakshiChikhalkar-vl1cc
    @SakshiChikhalkar-vl1cc 5 месяцев назад +3

    Even if you have not fall in love till, even if you don't have your first love, the song , music & lyrics can feel you these emotions❤. Isn't it the magic of this song and all these magical artists?

  • @mayurgawade240
    @mayurgawade240 Год назад +18

    Sitting alone alongside of the goa beach at 2:00am early morning & listening this song . Don’t know but heartbroken ♥️♥️♥️

  • @OnlyNEET-hr6bd
    @OnlyNEET-hr6bd 2 месяца назад +6

    Sometimes you have feelings for some one but when you realised for them you don't exist 💔
    Its hard to believe, we have to move on 💔

  • @deepakbhagat1476
    @deepakbhagat1476 11 месяцев назад +6

    खरंच पहीलं ❤ कधीच विसरू शकणार नाही.

  • @RutujaGaikwad-nb2fw
    @RutujaGaikwad-nb2fw 16 дней назад +2

    Pahila swapn...je purn karta aal nahi ani kadhich karta hi yenar nahi...it dedicates to that fluently🥹

  • @arunpalav8741
    @arunpalav8741 Год назад +38

    Mesmerizing voice and best music director Mandar Apte, hats off to you. More music from you truly appreciated

  • @nsureshkumar3121
    @nsureshkumar3121 2 месяца назад +2

    Outstanding song. Though I don't know Marathi, I like this song very much. My elder daughter, Upasana, introduced me to this song.

  • @AakashGarud
    @AakashGarud Год назад +146

    I dedicate this song to my late father...❤

  • @AyeshaTelange
    @AyeshaTelange 2 месяца назад +2

    No one will believe I am 16 years old and still have a lots of love for this song 🎵❤ Love this movie and it's songs the most 😊❤ coz it's quite relatable😌❤

  • @shubhamofficial2037
    @shubhamofficial2037 3 месяца назад +53

    2024 कोण कोण आहे हिते 💔

  • @Just_Pranav07
    @Just_Pranav07 26 дней назад +5

    तनिष्का मी गेल्या एक वर्षापासून खूप मिस केलं. मला माहित आहे चूक माझीच होती मीच तुझ्यावर संशय घेतला, तुला इग्नोर केलं. पण मला माझी चूक कळली आहे. आता तरी माझ्या आयुष्यात पुन्हा येशील का ? प्रेमिका म्हणून नको पण एक चांगली मैत्रीण म्हणून तर. 🥺🤧

  • @Kohinoor-i6k
    @Kohinoor-i6k Год назад +13

    मला तू खूप आवडतेस ग.जेव्हा तुझ लग्न ठरलय हे एकल्यावर तुटून गेलो मी.खूप जीव अडकलाय खरचं खुप ञास होतोय. तूझ्या समोर काही वेगळं वागत नाही कारण तुला टेन्शन नाही यायला पाहिजे म्हणून..😢❤

  • @SahilMujawar-qq5lo
    @SahilMujawar-qq5lo 10 месяцев назад +8

    पाहिलं प्रेम - कधीच विसरता येत नाही 🥺💔🥀

  • @AbhijitGaikwad-sh8ht
    @AbhijitGaikwad-sh8ht Месяц назад +1

    मनापासून प्रेम करणारा
    कधीच वेडा नसतो कारण ते
    वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
    मनापासून प्रेम करावं लागतं

  • @vishwambharmundkar1559
    @vishwambharmundkar1559 10 месяцев назад +3

    आज पण मला रडायला येते हे गाणं ऐकले की..तुला वाटत असेल मी तुला विसरलो असेल पण आज पण तुझ्यावर तेवढेच प्रेम करतो यार....I miss you...😢😢

  • @anilkakde143
    @anilkakde143 Год назад +14

    मी आज बघितलं तिला तब्बल 4 वर्ष 10 महिने 1 दिवसानंतर . लग्न झालंय पण तीच 😢. दिवाळीची जत्रा मधी दिसली आज 😢

    • @vishalmore6526
      @vishalmore6526 2 месяца назад

      कोणते गाव आपले

  • @Krishna-y1j2h
    @Krishna-y1j2h 2 месяца назад +1

    कोण कोण हा song रोज ऐकतोय आणि खरंच डोळ्यातून पाणी येतोय 😢😢😢

  • @bhartimohini
    @bhartimohini 7 месяцев назад +2

    When I was a teen, I had some really good friends and some of them they really liked me. Some of them expressed their feelings but I had my parents teachings, to have an arranged marriage. I don’t regret arranged marriage but I miss those days where I was so adored. I had some say to me that they respect my boundaries and the person who becomes my partner will be very lucky to have me. I sometimes go back to those memories and feel sad for them.

  • @tusharwankhadetusharwankha7930
    @tusharwankhadetusharwankha7930 Месяц назад +2

    It's really directly hurt touching song.this dedicat to professional and sensitively lovers,amazing sweet pain.

  • @MAU9820.
    @MAU9820. 7 месяцев назад +4

    School days Shraddha 😪 jaati chi bandhane could not come together never but still love in the heart...😢😢😢😢😢😢😢😢

  • @123user98
    @123user98 Месяц назад +3

    My daily routine at night listen to these song....i miss him 💔💔 every day...i am be like kash apan sobat asto 😢😢💔🥺

  • @omkargangle347
    @omkargangle347 Год назад +6

    The person reading this,
    I know how it feels when you're listening to this song, especially when it's 2am & you're single aaaffff..😢😢

  • @Vinayak-13-t3b
    @Vinayak-13-t3b 2 месяца назад +4

    आज दिसलीच शेवटी मला ती ❤❤ खूप आठवण येत होती तिची

  • @pratikpatil4
    @pratikpatil4 4 месяца назад +1

    आयुष्यात कुणीही येऊदे, कितीही नवीन प्रेम मिळू दे…पण पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम असतं❤ खासकरून निरागसतेतून तरुणपणात उतरलेलं….शाळेतून कॉलेजापर्यंत पोहोचलेलं…कुणाला मिळालेलं, कुणाला नं मिळालेलं…
    हृदयात इतक्या खोलवर रुजलेलं, की त्या आठवणी कधीच आपल्यापासून दूर होऊ शकत नाही. ते क्षण, ते प्रसंग, त्या गप्पागोष्टी, तो तिचा सुगंध, ते हसणं, ते रडणं, ते दुरावणं, ते रुसवे, ते फुगवे, ते तिच्यासाठी तासनतास झुरणं….आणि शेवटी ती ताटातुट…

  • @prachijadhav1860
    @prachijadhav1860 Год назад +41

    I remember my true first love...... but got break up after 8 years of relationship..... nothing is permanent in our life...but memories are permanent in life...

    • @anil12544
      @anil12544 Год назад

      लवकर समजल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @gitavora312
      @gitavora312 11 месяцев назад

      So true 😢

  • @janardanghige5389
    @janardanghige5389 Год назад +9

    😢miss you ranu😢कितीदा नव्याने तुला आठवावे😢

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 6 месяцев назад +11

    पुन्हा लहान होता येत नाही मित्रांनो..... राहतात त्या फक्त आठवणी.......
    ती शाळा, ते कोलेज... पुन्हा नाही येत आयुष्यात........😢
    🌱🌱

  • @D_Solitude
    @D_Solitude Год назад +4

    Ana... i love you 4ever...
    its me your anu❤ miss you
    तुझ्या आठवणीतले जग...
    जिथे कुठे अश्शील तिथे कायम आनंदी राहा❣️

  • @vaibhavipawar.2462
    @vaibhavipawar.2462 Год назад +19

    This song is really related to me😩❤️
    Stay him always happy 😌

  • @rajeshwanjale-hm6xt
    @rajeshwanjale-hm6xt 7 месяцев назад +1

    जेव्हा जेव्हा तिची आठवण येते, मी हे गाणे ऐकतो.
    जेव्हा जेव्हा ती स्वप्नात भेटते, सकाळ अगदी गोड स्मित हास्याने होते.
    जिथे आहेस तिथे तू , आणि आठवणीत इथे मी ,खुश रहा.😃
    कितीदा नव्याने तुला आठवावे,
    डोळ्यातले पाणी नव्याने वहावे.🥹

  • @ratanborkar1776
    @ratanborkar1776 8 месяцев назад +4

    बऱ्याच जणांचे पाहिले प्रेम हे अधुरेच असते...

  • @sujatagajbhare401
    @sujatagajbhare401 3 месяца назад +8

    माझ्या आयुष्यात पण एक व्यक्ती अलिये जिच्यावर मी प्रचंड प्रेम करते .. मला तर लांग्न करायचं आहे . पण नियती काय लिहून ठेवलाय माहीत नाही . जाती भेद अजूनही आहे त्यात लव्ह marriage krn म्हणजे खूपच अवघड आहे 😢. पण माझा माझ्या नरेंद्र माऊली वर पूर्ण विश्वास आहे अन् जर आमचं लंग्न झालं की मी तुम्हाला सगळ्यांना संदेश टाकल सगळ्यांनी माझ्यासाठी parthana करा प्रेम खर आहे म्हणून आज तुम्हाला नाव पण सांगू इच्छिते प्रमोद विनोद पांडे अस माझ्या होणाऱ्या नवऱ्यच नाव आहे proud of you my dear pamma❤❤❤❤❤❤ song ekll tuzi athvan ali

    • @lasttravel
      @lasttravel Месяц назад +1

      Ja jile apani जिंदगी bindhast..

    • @sujatagajbhare401
      @sujatagajbhare401 7 дней назад

      @@lasttravel thanks brother

  • @shraddhapawar4326
    @shraddhapawar4326 9 месяцев назад +4

    This song dedicated you Vijay..
    Mala mahit ahe mi agodar khup vait vagle ani kahi ashya goshti ghadalya jene karun apan lamb zalo..
    Pn maji kayam hich echa ahe ka tu happy rahavas..jari bolo tari apali bhandan jast hotat karan aajahi vichar different ahet..
    Ani dogana self-respect thodi jast ahe mhanun kadachit aaj apan yevadhe lamb ani anolakhi ahot..
    Pn tu suddha life madhe 2nd chance dyayala shik..

  • @madhavikamble9182
    @madhavikamble9182 Год назад +26

    Wow 🤩😍heart touching song 🎵🎵🎵🎵🎵🎵👌👌👌👌👌mala he song far aavdate movie pan 👍aahe,dole mitun akantat akayla far chan vattey 😞😞😞😞

    • @skfeelings3668
      @skfeelings3668 Год назад +1

      Tumcha lifa cha related asnar movie

    • @madhavikamble9182
      @madhavikamble9182 Год назад +1

      @@skfeelings3668 mala song aavdte, mazasarkhya kitekk lokana he song aavdte tar essential nahi aahe ki maza kivva kunacha lifeshich related asave song aahe tyatle lyrics kunalahi aavdu shakte kavvachit lok astil jyanna nasel aavadt mhnun ase judgment dene ok aahe ase mala tari vatat nahi 😊👍👍

  • @maheshholsamudre197
    @maheshholsamudre197 Год назад +13

    I dedicate this to my Evergreen Love.
    Miss you my Sweet Love.

  • @adityavibhute4833
    @adityavibhute4833 Год назад +2

    Khup sweet pain ahe hya ganyat , milun n milaleli goshtich dukh sangitlayy , khup manala chednar gan ahe ❤

  • @akshaysugave181
    @akshaysugave181 11 месяцев назад +2

    आयुष्यात जेव्हा अस होत की आता त्या व्यक्ती शिवाय जगणे शक्य नाही तेव्हाच ती का सोडून जाते

  • @abhihajkakks
    @abhihajkakks 5 месяцев назад +4

    Journey from Impression to depression is called love 💔

  • @Itsgoodcooker
    @Itsgoodcooker Год назад +11

    School sampla one side love one side ch rahila .. kadhi sangu hi nahi shakli ❤tyala 😢I love u so much ..

    • @rutvikjadhav960
      @rutvikjadhav960 8 месяцев назад

      Khup junya aathvni jagya hotat ❤nice song 💞

    • @atharavthakare797
      @atharavthakare797 20 дней назад

      आता तर सांगून दे ताई कारण तू जरी त्याची जीवनसाथी नाही बनू शकली तरी एक चांगली मैत्रीण होशील.....शेवटी आठवणीच राहतात ❤😢

  • @shubhamsonune1498
    @shubhamsonune1498 3 месяца назад +7

    १५-०९-२०२४ आज माझ्या आई चे आठवे पुण्यस्मरण, आठ वर्ष कधी निघून गेले कळले नाही.... 😢 पण आई ची उणीव भरून काढणे खुप कठीण...... आठवणी येतात अठवणी हसवतात, अठवानी रडवतात, काही ही न सांगता आठवणी निघून ही जातात, तरी आयुष्यात उरतात त्या फक्त आठवणी....😢

  • @Deep89
    @Deep89 3 месяца назад +2

    अश्विनी मी तुला खूप Miss करतोय कुठे निघून गेलीस आज ही तुझी आठवण येते मला आज खरे तर तुझी जाणीव झाली जर तू असतीस तर ही वेळ आली नसती माझ्याव एक मैत्रीण म्हणून तू कायम आठवणीत रहाचील कायम तुझी आठवण येते मला तुला खूप शोधले मी पण भेटली नाहीस कधी भेट होईल आपली काय माहित पण एकदा भेट नक्की व्हावी हीच इच्छा आहे तुझा मित्र दिपक

  • @buntysagole2734
    @buntysagole2734 9 месяцев назад +1

    Music Composer's feel and singing is too good..🎉 God bless. For. Creation of this Song.. ❤❤❤❤❤❤