म्हसा यात्रा मुरबाड २०२५ | सर्वात मोठा बैल बाजार म्हसायात्रा | mhasa yatra 2025 |
HTML-код
- Опубликовано: 19 янв 2025
- म्हसा यात्रा मुरबाड २०२५ | सर्वात मोठा बैल बाजार म्हसा
यात्रा | mhasa yatra 2025 | #mhasa #bailbazar #nadekachbailgadasharyat #live #like #like share comments subscribe to my youtube channel
Mhasa Yatra In Murbad: महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला नुकतीच सुरुवात झालेली आहे तब्बल तीन वर्षानंतर ही यात्रा सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पौष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्याला वेध लागतात म्हसा यात्रेचे. म्हसा हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव आहे. कर्जतपासून ४२ कि.मी. तर मुरबाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात म्हसोबाचे (भगवान शंकराचे) प्राचीन मंदीर आहे, या मंदीरावरून गावास म्हसा हे नाव पडले. म्हसा आणि खांबलिंगेश्वर इटुकल्या मंदिरांचं गाव, मग गर्दीने फुलून जातं. पंचक्रोशीतील भाविक म्हसोबा आणि खामलिंगेश्वराच्या दर्शनाला येतात. या यात्रेला दोनशे वर्षाची परंपरा आहे तीन ते चार किलोमीटर परिसरामध्ये ही यात्रा भरते. या यात्रेत फक्त राज्यातून नव्हे तर इतर राज्यातूनही लाखो भाविक येतात.
पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजेच यात्रेत भरणारा बैलांचा बाजार. अनेक जनावरं या यात्रेत विक्रीसाठी आणली जातात. बैलाची जात रंग आणि वयानुसार त्यांच्या किमती ठरतात गुलाल उधळून बैलांचा व्यवहार होतो. पंधरा दिवसात या बैलांची उलाढाल एक कोटीहून जास्त जाते. या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला टोपली बाजार. बांबूच्या टोपली बनवणारे ठाकूरही मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात. या बाजारात टोपल्यांची मोठी उलाढाल होते. लहान मोठ्या आकारांच्या टोपल्या, करंडे येथे मिळतात. तसेच उखळ शेतीसाठी लागणारी अवजारे आणि घरगुती वापराच्या वस्तू या बाजारात मिळतात. मेंढीच्या लोकरी पासून बनवलेल्या अस्सल घोंगड्या आणि कांबळे हे या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. विणलेल्या आणि लाटीव अशा दोन प्रकारच्या घोंगड्या येथे मिळतात. पाचशे रुपये पासून ते पंचवीसशे रुपये पर्यंत घोंगड्या येथे मिळतात.
करमणुकीचे खेळ, आकाश पाळणे, खाऊ खेळणी चे दुकानं यांची रेलचेल येथे असते. म्हसा यात्रेत हातुलीजा खाचा गुलाबजामुन पंचक्रोशीत फेमस आहे. दूरवरून ही मिठाई घेण्यासाठी लोक बाजारात येतात. रात्रीही या यात्रेची रंगत काही औरच असते काही लोक यात्रेला मुक्कामी येतात. तंबू ठोकून राहतात आणि यात्रेतच चुल करून जेवून जातात. शहरी गजबजाटापासून दूर भरणाऱ्या या यात्रेत एक वेगळाच आनंद मिळतो.
#mhasa #mhasajatra #mhasayatra #2025 #bailbazar #bailbazaarmaharashtracha #bailbajar #murbad
Nice ❤
खूप छान भावा ❤
❤❤
सांगोला म्हणजे तेच का ते काय डोंगार काय झाडी.......
Bhaus tyavi number sangla ka tu pn bolun sang tyancha aavaj ny yet jast tujha yeto mhanun