माझं गाव माझी ओळख गणपती डेकोर|गणपती बाप्पा मोरया
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- माझं गाव माझी ओळख गणपती डेकोर|गणपती बाप्पा मोरया
#rmexplorer
माझं गाव...माझी ओळख
प्रत्येकाची नाळ जुळलेली असते ती आपल्या आई सोबत, वडिलांसोबत, मग आपल्या माणसांशी. मग त्यानंतर आपल्या घरासोबत, गावासोबत आणि तिथल्या माती सोबत. आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्यावर आपल्याला नकळत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 'काय गाव कुठलं तुमचं...?' आता आपलं गाव काय असतं हे सांगायची गरजच नाहीये.
पण...
आज माझ्या गावाला विकासाची वाळवी लागली. तिने आधी आमची झाडं पोखरली,डोंगर पोखरले, एवढच काय तर आमची शाळा आणि अगदी आमची घर सुद्धा.....
ही विकासाची लाट एवढ्या जोरात आली की आमचा समुद्र ही बुजवला गेला, का तर "म्हणे विकास होतो". पण इथला स्थानिक शेतकरी पिढ्यान पिढी चालवत आलेला या जगाचा पोशिंदा आज सहज स्थलांतरित होतोय. आता त्याला कसायला तशी जमीनच नाही, राहायला जागाच नाहीये. मग हा विकास कशासाठी..? कोणासाठी..? इथली सगळी नैसर्गिक गोष्टी धुळीस मिळवून त्यावर स्मार्ट सिटी उभारणार... सगळं पिकवून खाणारा आता विकत खाऊन जगणार. "म्हणे विकास होतोय"
हा चुकीचा विकास जर थांबवायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन आपलं अस्तित्व टिकवावंच लागेल.
हे लाडक्या गणराया तुझ्या चरणी एकच प्रार्थना आता आमची स्थापना आमच्या गावात आमच्या मातीतच होऊ देत..आमच्या गावात आमच्या मातीतच होऊ दे.
कला दिग्दर्शक
विनोद मेणसे & शुभंम मेणसे
पत्ता :
घ. नं. 173/2
गणपती गल्ली उचगांव बेळगाव
खूप छान संदेश..!!
आपल गाव..आपली माती..आपल अस्तित्त्व असत..आणि एकदा का आपली माती,आपली जमीन विकली गेली की गावापासून आपण कोसो मैल दूर फेकले जातो आणि आपली किंमत शून्य होते..!!
हे गणराया सर्वांना सद्बुद्धी दे..!!❤❤❤
Khup chan concept & decoration. Ganpati bappa morya 🎉