उत्पन्न वाढीचे मुख्य स्रोत- हिरवळीचे खते लागवड माहिती, बियाणे किंमत व उपयोग |Green Manure

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळी खते फायदेशीर
    सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळी खते फायदेशीर आहे. पृथ्वीतलावर जमीन ही निसर्गाने दिलेली बहुमूल्य देणगी असून मानवाने आपल्या हव्यासापोटी नैसर्गिक तत्त्वाच्या विरोधात जाऊन, अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर करून जमिनीचे नैसर्गिक सुपीकता आणि स्वास्थ्य कमी केले आहे.
    परिणामी अशा जमिनी कालांतराने नापीक होऊन उत्पादनक्षम राहत नाहीत. त्यामुळे अशा समस्येवर शेतकरी बांधवांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी, हिरवळीच्या खतांचे महत्त्व समजून घेता यावे आणि उद्भवलेल्या समस्येचे निराकारण करून जमिनीचे स्वास्थ्य व आरोग्य दीर्घकाळापर्यंत सुपीक व अबाधित ठेवण्यासाठी हिवळींच्या खतांचा उपयोग करणे अत्यंत गरजेचे व फायदेशीर झाले आहे.
    प्रस्तुत लेखामध्ये हिरवळीचे खत म्हणजे काय, हिरवळीचे खत जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी कसे गरज व उपयुक्त आहे याबाब माहिती देऊन हिरवळीच्या खतांचे प्रकार, हिरवळीच्या खतांचे पिके, लागवड पद्धत, जमिनीसाठी वापर व हिरवळी खताचे फायदे आदी घटकांविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी हिरवळीचे खते जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी फायदेशीरया लेखात करण्यात येत आहे.
    हिरवळीचे खत म्हणजे काय?
    हिवळीचे खत म्‍हणजे शेतात वाढलेल्‍या हिरव्‍या वनस्‍पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळया फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्‍ये पेरून वाढलेली पिके फुलोऱ्यावर आल्‍यावर शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे. या वनस्‍पतींच्‍या हिरव्‍या आणि कोवळया पाल्यापासून तयार करण्यात आलेल्‍या खताला हिरवळीचे खत असे संबोधतात.
    जमिनीची सुपीकता दीर्घ काळापर्यंत टिकवण्‍यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्‍याची उपलब्‍धता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खतांची गरज पूर्ण करण्यासाठी हिरवळीची खते शेतीसाठी आणि शेतकऱ्यांना उपयुक्त व फायदेशीर आहेत. ही पिके जमिनीत अन्‍न पुरवठ्याबरोबरच जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म सुधारण्‍यास मदत करतात. नत्राचे प्रमाण : 0.03% ते 2.4% गाडलेल्‍या पिकांना कुजण्‍यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो.
    #ताग #plantcare #धैंचा #शेतकरी #farming #शेतकरीbrand #trending

Комментарии • 25