Malad Malvani Mhadacha Raja | मालाड मालवणी म्हाडाचा राजा | Rahul Lehnar | Ganpati Bappa Song 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025
  • RAHUL LEHNAR OFFICIAL
    Present
    " मालवणी म्हाडाचा राजा "
    Singer : Rahul Lehnar
    Lyrics : Anil Lehnar
    Music : Jay Rangraj
    रूप सुंदर ते साज नाव गावो गावी गाज
    ज्याच्या नावाचा होई गाजावाजा
    मालाड मालवणी म्हाडाचा आमचा राजा ||ध्र||
    भव्य दिव्य शोभे उंच मुर्ती
    तिची पसरली जगभर किर्ती
    झाली स्पर्शाने पावन धरती
    गुण गाती सारे भुवरती
    हाकेला धावणारा नवसाला पावणारा
    असा गुणांचा बाप्पा माझा ||१||
    ओम श्री गणेश मित्र मंडळ
    पोर हि सारी आहेत चपळ
    एक जुटीन धाऊनी येती
    सोहळ्यासाठी हि तळमळ
    काय सांगु राव सारे घेतीया ते धाव
    मनोभावे करती पुजा ||२||
    उपनगराची आहे तो शान
    राजा म्हाडाचा असा महान
    चरणी नमतीया थोर सान
    सांगे सम्राटाच हे गाण
    आहे त्याची ख्याती लोक दर्शना येती
    फुल हार घेऊनी ताजा ||३||

Комментарии •