25 वर्षानंतर पाण्याखालून निघाले मंदिर | वाईतील पुरातन मंदिर | Gokarneshawar & Dhureshwar Mandir |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोर खोऱ्यात कृष्णा नदीवर बलकवडी हे धरण बांधलेले असून धरणाचा एकूण पाणीसाठा हा ४ टी.एम.सी. इतका आहे. धरणाच्या फुगवट्यामुळे तिथल्या गावांना मूळ जागेपासून विस्थापित व्हावं लागलं. गेल्या वर्षी महाराष्ट्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. त्यात सर्व धरणांतील पाणीसाठा घटला आणि धरणं कोरडी ठक्क पडली. त्यामुळे धरणातील पुरातन अवशेष उघडे झाले. बलकवडी धरणात तब्बल २४ वर्षांनी शिवकाळातील दोन मंदिरे पाहण्यासाठी खुली झाली आहेत. त्यातील पहिल म्हणजे...
    १) श्री धुरेश्वर मंदिर(धुर्जटलिंग), गोळेगाव
    २) श्री गोकर्णेश्वर मंदिर, गोळेवाडी
    तीन वर्षांपूर्वी मी आणि सौरभ या मंदिरांच्या शोधात जोर खोऱ्यात गेलो होतो. परंतु धरणाचा पाणीसाठा जास्त असल्याने धुरेश्वरचा कळस फक्त दिसत होता. यंदा धरणात फक्त मृत पाणीसाठा राहिल्यामुळे धरण संपूर्ण कोरड पडलं आणि ही दोन मंदिरे पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली.
    १) श्री धुरेश्वर मंदिर (धुर्जटलिंग), गोळेगाव
    क्षेत्र महाबळेश्वर मध्ये पंचगंगा मंदिरातून कृष्णा नदीचा उगम होतो. तिथून कृष्णा नदी गुप्त होऊन कृष्णाई मंदिरात प्रकटते तिथून ती कड्यावरून धाव घेऊन खाली धुरेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा जोरकडून वाहत येणाऱ्या वेदगंगा नदीशी संगम होतो. या ठिकाणाचा स्कंदपुराणातील कृष्णा महात्म्यात अध्याय क्रमांक ४ मध्ये संदर्भ आलेला आहे तो असा, पुढे वाहता कृष्णा ऐसी ॥ वेदनद करी संग तिशी ॥
    जो का निघाला उत्तरेसी ॥ वेदगिरीच्या ॥
    जेथे कृष्णावेदसंग तिथे असे धुर्जटलिंग ॥
    जयाचेनि दर्शन चतुर्वर्ग ॥ फल भर्गकृपेने॥
    विष्णूच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. गोळेवाडीच्या पुढच्या बाजूला असणाऱ्या ओहोळातून धरणात उतरल्यावर आपल्याला श्री धुरेश्वराचे मंदिर पहायला मिळते. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला दोन कळस आहेत. त्यातील सर्वात मोठा कळस गर्भगृहाचा आहे तर दुसरा हा सभामंडपाचा आहे. कळसाला पूर्वी चुन्याच्या गिलाव्याचे काम असावे. पण बरेच वर्षे पाण्यात राहिल्यामुळे चुना निघून गेला असावा. पूर्व बाजूने छोट्या दरवाजातून मंदिरात प्रवेश केल्यावर आपण छोटेखानी सभामंडपात येतो. इथे डाव्या आणि उजव्या बाजूला वातायानासाठी दोन झरोके ठेवलेले दिसतात. दरवाजाच्या आतील बाजूस दोन चौकोनी देवकोष्ठके आहेत त्यात मुर्त्या बसवलेल्या नाहीत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मध्यभागी गणेशपट्टी असून बाजूला दोन कमळपुष्प कोरलेले आहेत. गर्भगृहात प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला वातायानासाठी दोन झरोके ठेवलेले आहे. शिवलिंगाच्या मागच्या बाजूस एक देवकोष्ठक असून तिथे लामनदिवा ठेवलेला आहे. मंदिराचे शिखर आतल्या बाजूने आयताकृती शिळा भौमितिक पद्धतीने रचून ठेवल्यामुळे विलोभनीय दिसते. गर्भगृहातील शिवपिंडीची शाळुंका चौकोनी असून लिंग रुद्राक्ष स्वरुपाचे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस नंदी असून त्याचे मुख भग्न झालेले आहे. मंदिराच्या उत्तर बाजूला दगडी चाक आहे. मंदिराचे स्थापत्य बघता मंदिराची निर्मिती १६-१७ व्या शतकातील शिवकाळ किंवा तद्नंतर झाली असावी असे वाटते.
    २) श्री गोकर्णेश्वर मंदिर, गोळेवाडी
    श्री धुरेश्वराचे (धुर्जटलिंग) दर्शन घेतल्यानंतर आम्ही गोकर्णेश्वर मंदिराकडे निघालो. गोळेवाडीतून गोळेगावकडे आलो. श्री कॅम्प रिसॉर्टच्या जवळून पायवाट धरणात उतरते. त्यावाटेने खाली जाऊन श्री गोकर्णेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. हे मंदिर धरणाच्या सखल भागात असून इथे भरपूर प्रमाणात गाळ साठलेला होता. याला रुद्रतीर्थ देखील म्हटले जाते. स्कंदपुराणातील कृष्णा महात्म्यात अध्याय क्रमांक ४ मध्ये गोकर्णेश्वरचा देखील उल्लेख आलेला आहे
    ©️ संदर्भ :-
    स्कंदपुराण कृष्णामहात्म्य
    श्री क्षेत्र वाई वर्णन :- गो. वि. आपटे
    मंदिर कसे पहावे :- गो. बं. देगलुरकर
    काश्यपशिल्प
    ⛰️भटकंती सह्याद्रीची परिवार, वाई🚩
    ✍🏻रोहित शिवाजी मुंगसे
    My vlog video link :-
    1) कावेची विहीर, वाई | सह्याद्रिमधला फ्रीज | कमळगड | Kamalgad | Film City Wai | Jangal Trek | wai_fort
    • कावेची विहीर, वाई | सह...
    2) वाई हे मंदिरांचे शहर | दक्षिण काशी | Dakshin Kashi | Shri Bhadreshwar Mandir | Puratan Mandir | wai
    • वाई हे मंदिरांचे शहर |...
    3)Chhatrapati Shivaji Maharajyancha Rajyabhishek Sohala | 350 वा राज्याभिषेक सोहळा | छत्रपती | रायगड |
    • Chhatrapati Shivaji Ma...
    4) भीमाशंकर ज्योतिर्लिंग | Bhimashankar jyotirling yatra |
    • भीमाशंकर ज्योतिर्लिंग ...
    5) 950 वर्षा पूर्वीचे मंदिर | प्राचीन शिव मंदिर | अंबरनाथ | मंदिराचा इतिहास | Ambernath Shiv Mandir |
    • 950 वर्षा पूर्वीचे मंद...
    a
    6) पांडवगड | wai | वाई जवळचे किल्ले | pandavgad_wai | विराट नगरीचा पहारेकरी | pandavgad fort |
    • पांडवगड | wai | वाई जव...
    7) भैरवनाथ मंदिर | महाशिवरात्री | आमच्या गावची यात्रा | रेणावळे | wai |
    • भैरवनाथ मंदिर | महाशिव...
    8) रायरेश्वर | Rayareshwar | रायरेश्वरचे पठार | Trekking vlog | Marathi vlogs |
    • रायरेश्वर | Rayareshwa...
    9) Road trip Navi mumbai to Lonavala | Tung fort | कठिनगड | moto vlog | Honda cb shine 125cc bike
    • Road Trip Navi Mumbai ...
    *************************************************
    Follow me on
    * Instagram
    nilesh.8080
    www.instagram....
    * Facebook page
    मी पाहिलेले गड - किल्ले आणि रोड ट्रिप
    Page Id - @nilesh.80800
    / nilesh.80800
    *************************************************
    #satara
    #waitourisum
    #dhom

Комментарии •