श्रीमती सुमती ताई बापट- उपासना ब्रम्हांडनायकाची आणि स्वानुभव
HTML-код
- Опубликовано: 29 окт 2024
- जय गजानन ..!! श्रीमती सुमती ताई बापट ह्या शेगांवच्या श्री गजानन महाराजांच्या निःस्सीम भक्त. अतिशय साधं आणि सोज्वळ व्यतिमत्व. ३६६९ ओवी असलेला “श्री गजानन विजय ग्रंथ” मुखोद्गत होऊन जाहीरपणे पारायण करण्यात सुमती ताई अग्रस्थानी आहेत.
सुमती ताईंना गजानन महाराजांचा परिचय १९६७ साली झाला. १९७२ मध्ये महाराजांची कृपा होऊन त्यांना हा ग्रंथ मुखोद्गत झाला. आजपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांत ८००० पेक्षा जास्त मुखोद्गत पारायणे झाली आहेत. खुद्द श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव येथे देखील १९७३ मध्ये शारदीय नवरात्राच्या शुभ पर्वात ताईंना मुखोद्गत पारायणासाठी आमंत्रित केले होते आणि त्यावेळेसचे विश्वस्त श्री पुरुषोत्तम हरी पाटील ह्यांनी ताईंना त्यावेळी सन्मानित केले होते.
त्यांचा एक कार्यक्रम आता आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमांत ताईंच्या सुमधुर वाणीतून, आपले आराध्यदैवत गजानन महाराजांविषयी सखोल माहिती जाणून घ्यायची सुवर्ण संधी लाभली आहे. सदर कार्यक्रम २.५ - ३ तासांचा असेल. कार्यक्रमाची रूपरेषा खाली दिल्याप्रमाणे:
१ . श्री गणेश वंदना आणि श्री गजानन महाराज आवाहन.
२. ताईंच्या गोड आवाजात श्री गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचे पठण.
३ .ताईंना महाराजांचा परिचय कसा झाला याविषयी विवेचन.
४ .महाराजांचे प्रगटीकरण.
५ .१९७४ -आजपर्यंत ताईंना आलेले महाराजांचे अद्भुत अनुभव.
६ .महाराजांची भक्ती कशी करावी आणि त्यांच्या सानिध्यात कसे राहावे ह्यावर ताईंचे अनमोल मार्गदर्शन.
७. महाराजांची आरती
गजानन ग्लोबल ग्रुप च्या आधी झालेल्या कार्यक्रमांची link खाली देत आहोत.
सौ विद्या ताई पडवळ ह्यांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण
• Gajanan Maharaj Vijay ...
• Vidya Padwal Parayan A...
डॉ गजानन खासनीस ह्यांचे 'श्रीं चा समाधी सोहळा' ह्यावरील निरूपण
• Shree Gajanan Maharaj ...
सौ विद्याताई पडवळ - ऐसें स्वामी गजानन | भक्तवत्सल खरोखरी ||
• सौ विद्याताई पडवळ - ऐस...
जय गजानन 🙏