मी गेलो माझ्या गावी मित्राच्या लग्नाला | Wedding My Friend

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025
  • कोकणातल्या गावं किंवा वाड्यावर होणारी लग्नं सामूहिक सहकार्याचा उत्तम नमुना असायचा. मांडव घालणं, जेवणावळीचा स्वयंपाक करणं किंवा लग्न होत असलेल्या गावासह आसपासच्या गावांमध्ये निमंत्रण पत्रिका पोहोचवण्यापर्यंत विविध कामं ग्रामस्थ नियोजनपूर्वक वाटून घायचे आणि ती बिनबोभाटपणे पारही पाडायचे. लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा किंवा हळदीसारखा कार्यक्रमही नवरामुलगा किंवा मुलीच्या घराच्या अंगणातच व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी गावात उपलब्ध असलेल्या वाद्यांच्या गजरात विवाह सोहळा संपन्न व्हायचा. त्यामुळे लग्नात फार मोठय़ा प्रमाणावर उधळपट्टी होताना दिसत नव्हती.
    सोयरीक
    तेव्हाच्या विवाह समारंभात! लग्न होईपर्यंत वधू-वरांनी एकमेकांना पाहिलेलंही नसायचं. मोठ्यांनी पसंत केलं की मग साखरपुडा. साखरपुड्याला ‘गोडकातली’ (गुळखोबरं) म्हटलं जायचं. या समारंभातसुद्धा वधूवरांना काही महत्त्व नसायचं. सगळी मोठी.. जाणती.. माणसंच असायची. हा समारंभ वधूच्या घरी व्हायचा. सर्वांना वधू पसंत पडली की नारळ फोडून, त्याच्या फोडी करून त्यात गूळ मिसळून सर्वांना वाटल्या जायच्या. हीच ती ‘गोडकातली’.
    नंतर लग्नाच्या दोन दिवस अगोदर मुलाकडची वडीलधारी मंडळी मुलीच्या घरी जायचे. त्यांच्या साठी खास रोस शीत (गोड जेवण ) चा कार्यक्रम असायचा. दोन्ही पक्ष (वधु आणि वर ) मिळून ठरवलेलं देणं घेणं पक्के केलं जायचं. देणं घेण्यात काही अनिष्ट प्रथा पण होत्या: उदारणार्थ हुंडा. किती तोळे दागिने मुलीला घातले जाईल ह्याच्यावर पण शिक्कामोर्तब व्हायचे.
    लग्नमंडप
    मांडव घालणं हा पण एक सोहळा असायचा. बहुतेक सगळी लग्नें घरासमोरच्या अंगणात व्हायची. याच माटवात जन्मगाठी पण बांधल्या जायच्या. मांडव घालण्यासाठी सगळे साहित्य यजमानांकडे उपलब्ध नसायचे. मग त्यासाठी लागणाऱ्या झावळ्या (चुडीतं), मेडी इत्यादी वाड्यावरच्या लोकांकडून परत देण्याच्या धर्तीवर मागून आणली जायची. मांडव घालण्यासाठी आमंत्रण वाड्यावरच्या लोकांना दिलं जायचं. वाड्यावरची लोकं ठरलेल्या वेळात हजर असायची. मांडव घालण्याची सुरवात नारळ फोडून केली जायची. जाणत्या (मला “जाणतेलो” म्हणजे वडीलधारी असा वाटायचा, तो तसा नसावा ) माणसांची मते घेऊन मांडवाची रचना आखली जायची. आमच्या सारखी लहान मुलं नारळाची कट्टी घेऊन खड्ड्यातील माती उपसण्याची कामे करायचो. खड्डा खोदण्यासाठी लांब आणि आखूड अशा दोन्ही प्रकारच्या पारय वापरल्या जायच्या. मांडव उभा राहिल्यावर टपावर नारळाच्या सुकलेल्या झावळ्या (चुडीत असा कोकणी शब्द) घातल्या जायच्या जेणेकरून उन्हं लागणार नाहीत. माटवाला मल्लां (विणलेल्या झावळ्या ) लावून किंवा कडातर लावून आडोन घेतलं जायच. शेवटी आंब्या ताळी लावून मांडव उभारण्याची सांगता व्हायची. लग्नाच्या आदल्या रात्री सगळ्या मेडिना वर्तमान पत्राचे कागद चिटकवायचे, रंगीबेरंगी पताके लावायचे, जेणेकरून मांडवाला शोभा यायची. वाड्यावरचे लग्न म्हणजे आपल्याच घरचे लग्न असे समजून कार्य सिद्धीस नेण्यास, सारे समर्पित भावनेने कामाला लागायचे.

Комментарии • 1