करमाळा बाजार समिती निवडणुकीत बागल गटाच्या तरुण नेतृत्वाने केली सत्तापालट !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2024
  • करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक विविध कारणाने गाजली म्हणजे धनशक्ती ,मनगटशाही ,शह -काटशह आरोप-प्रत्यारोप आणि सर्व होणारच कारण या वेळी प्रथमच या निवडणुकीत बळीराजाला मतदानाचा अधिकार मिळाला होता त्यामुळे सर्व गटाने सर्वच आयुधे वापरून मतदारराजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला .
    आणि शेवटी निकाल लागला जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे गटाकडे सभापतीपदाच्या किंगमेकर अशी भूमिका बजावणार अशीच एन्कदारीत चित्र निर्माण झाले होते . पण शेवटच्या दिवशी बागल गटाने सभापतिपदाचे कुलूप उघडले , आमदार पाटील समर्थक व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रा . शिवाजी बंडगर यांच्या सहकार्याने जगताप-पाटील युतीला धक्का देऊन बागल गटाने जगताप गटाची ३० वर्षाची सत्ता मोडीत काढली ,शेवटी ३० वर्षाची सत्ता हातातून निसटल्यामुळे माजी सभापती जयवंतराव व त्यांचे सुपुत्र यांनी बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल आणि शिवाजी बंडगर यांच्याबरोबर बाजार समिती च्या दालनात हातापायी केली यामध्ये दिग्विजय बगल ,शिवाजी बंडगर आणि इतर सहकरयाना या मारहाणीत जखमा झाल्या .
    यावेळी प्रसन्न डिजिटलशी बोलताना दिग्विजय बागल यांनी अश्या दडपशाही ला आम्ही घाबरणार नाही आणि आम्ही लोकशाही मार्गाने अशा प्रवृत्तीविरुद्ध लढा देत राहू.
    त्याचप्रमाणे रश्मी बागल यांनी बागल गट हा नेहमी शांतता प्रिय गट आहे आणि आम्ही क्रिया ला प्रतिक्रिया म्हणून बागल गट कायदा हातात घेणार नाही आणि कार्यकर्त्यांनी देखील शांत राहावा असा आवाहन केले आहे.
    या सर्व प्रकाराबद्दल करमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि पुढील तपस पोलीस करत आहे.
    शेवटी या निवडणुकीचाच विश्लेषण इतकंच करता येईल कि लोकनेते दिगंबर बागल यांचं स्वप्न रश्मी बागल आणि युवा नेते दिग्विजय बागल या इतरणापेक्षा अनुभवाने नवख्या असण्याऱ्या तरुण नेतृत्वाने पूर्ण केले .
    अशा अनेक सामाजिक, शेतीविषयक तसचे राजकीय मुलाखतीसाठी आमच्या प्रसन्न डिजिटल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा..!
    Mo- 9730 99 1252
    9960 15 8737 ---
    Disclaimer
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Комментарии • 36