rain in Maharashtra : विजांचा कडकडाटासह तुफान पाऊस IMD कडून सतर्कतेचा इशारा | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #heavyrainMaharashtra #heavyrain #rain #mansoon #cyclone #पाऊस #rain #strom #flashflood #cloudburst
    rain in Maharashtra : विजांचा कडकडाटासह तुफान पाऊस IMD कडून सतर्कतेचा इशारा | Hello Baliraja
    कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मागील ४ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळं येथील ओढे नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दुसरीकडं इतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. तो जिल्हे कोणते आहेत. ते आपण पाहूयात.
    हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळं या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
    मराठवाड्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरलाय. या भागातील काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस झाला. दरम्यान, पुढील 3 दिवसात येथे पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात या आठवड्यात पाऊस सरासरीहून अधिक राहणार आहे, असे हवामान विभागानं म्हटलंय. विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, नाशिक या जिल्ह्यांमध्येही आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •